https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

District Collector जिल्हाधिकारी


  •  जिल्हाधिकारी पदाची महत्त्व- 
  • भारतीय प्रशासन सेवेतील ग्रुप A मधील एक प्रमुख प्रशासकीय पद आहे.जिल्हाधिकारी हा जिल्ह्याचा प्रमुख असतो.
  • 1772 मध्ये ब्रिटिश गव्हर्नर वारेन हेस्टिंग्स यांनी जिल्हाधिकारी पदाची निर्मिती केली.
  • जमीन महसूल वसुलीच्या उद्देशाने हे पद निर्माण करण्यात आले. या पदाचेमहत्त्व वाढवण्यासाठी कंपनी सरकारने न्यायदान आणि नागरी प्रशासनाचीजबाबदारी जिल्हाधिकाऱ्याकडे सोपवली.
  •    जिल्हाधिकाऱ्याला इंग्रजीमध्ये Collector असे म्हणतात.हा शब्द Dritrictम्हणजे जिल्हा आणि Collect म्हणजे गोळा करणारा या दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे.
  •       1781 मध्ये कंपनी सरकारने जिल्हाधिकाऱ्यांकडे कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी सोपवली.
  •      ब्रिटिश काळात जिल्हाधिकारी पदाकडे सत्ता, सन्मान, गौरव आणि भीती निर्माण करणारे पद म्हणून पाहिले जात असे.
  •  जिल्हाधिकारी हा जिल्ह्यातील सर्व श्रेष्ठ अधिकारी असतो.
  •  स्वातंत्र्योत्तर काळात जिल्हाधिकारी पदाच्या अधिकार जबाबदारीत बदल करण्यात आला.जनकल्याणाची संबंधित अनेक कार्य त्यांच्याकडे सोपवण्यात आली.
  •   जिल्हाधिकाऱ्यांची निवड दोन मार्गाने केले जाते. पहिला मार्ग म्हणजे सरळ सेवा भरती होय. संघ लोकसेवा आयोगाकडून भारतीय प्रशासकीय सेवा पदासाठी निवड केलेल्या उमेदवाराची जिल्हाधिकारी म्हणून राज्यशासन नेमणूक करते.
  •   संघ लोकसेवा आयोगाकडून निवड झालेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सेवाशर्ती,वेतन,बढती,सेवा निवृत्ती बाबत केंद्र सरकारचे नियम लागू होतात.
  •   राज्य सेवेत उपजिल्हाधिकारी म्हणून कार्य करणाऱ्या व्यक्तीस बढती देऊन जिल्हाधिकारी पदावर नेमले जाते.
  •   भारत प्रशासन सेवेतून आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांचे सेवानिवृत्ती वय 60 वर्ष तर बढती मिळून जिल्हाधिकारी बनलेल्या 58 व्या राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे सेवानिवृत्त होतात.
  •  जिल्हाधिकाऱ्यांची कार्य अधिकार-
  •        जिल्ह्याचा प्रमुख या नात्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे अनेक जबाबदाऱ्या संपलेल्या आहेत.

           जिल्हा प्रशासकीय अधिकारी- जिल्ह्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांच्या नेमणुका, बदल्या,चौकशी, रजा मंजूर करणे. जिल्ह्याचे अंदाजपत्रक तयार करणे. कर्मचारी वर्गावर देखरेख नियंत्रण ठेवणे. जिल्हा प्रशासनाची ध्येय धोरणे ठरवणे. जिल्ह्यात घडणाऱ्या घडामोडींची राज्य शासनाला माहिती देणे.

           जिल्हा नियोजन मंडळाच्या सचिव म्हणून काम पाहणे.

           जिल्ह्याचा राजशिष्टाचार अधिकारी या नात्याने जिल्ह्यात येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करणे.

           जिल्हादंडाधिकारी या नात्याने कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक ती पावले उचलणे.

           जिल्हा महसूल अधिकारी या नात्याने महसूल प्रशासनावर देखरेख ठेवणे.

           जिल्हा विकास अधिकारी या नात्याने जिल्ह्यात विविध विकास कामांची अंमलबजावणी करणे.

           आमदार आणि खासदार फंडातून निधी खर्च करणे. पंचायत राज्य संस्थांवर नियंत्रण ठेवणे.

           जिल्हा निवडणूक अधिकारी या नात्याने निवडणुका पार पडण्यासाठी आवश्यक ती कार्य करणे.

           नैसर्गिक आपत्तीच्या काळात नागरिकांचे संरक्षण करणे मदत करणे.

           नागरिकांना राष्ट्रीयत्व किंवा विविध प्रकारचे दाखले देणे.

           जिल्ह्यातील सांस्कृतिक सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित राहणे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेवर देखरेख नियंत्रण ठेवणे.

        जिल्हाधिकारी You Tube Video Link



  • https://www.youtube.com/watch?v=Uh2y3W9UBtw&t=59s

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.