जिल्हा पोलीस प्रमुख-
• जिल्हा पोलीस प्रमुखाला जिल्हा पोलीस अधीक्षक म्हटले जाते. संपूर्ण जिल्हा पोलीस प्रशासन जिल्हा पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली चालते.
• पोलीस अधीक्षक पदाची निर्मिती ब्रिटिश काळात 1908 मध्ये झाली.
• जिल्हा पोलीस अधीक्षक एकाची निवड संघ लोकसेवा आयोगाकडून केली
जाते.
• पोलीस उपअधीक्षकांना राज्य
शासन बढती देऊन पोलीस अधीक्षक पदावर नेमणूक
शकते.
जिल्हा पोलीस अधीक्षक नेमणूक व सेवाशर्ती-
• पोलीस कायदा 1861 कलम 4 नुसार राज्यशासन जिल्हा
पोलिस अधीक्षकांची नियुक्ती करते.
• जिल्हा पोलीस अधीक्षकाचे वेतन, बडतर्फी व सेवाशर्ती केंद्राकडून केली जाते. वेतन व भत्ते राज्य निधीतून दिले जातात.
• संघ लोकसेवा आयोगाकडून निवडलेले पोलीस अधीक्षक वयाच्या 60 वर्षी तर बढती बनलेले पोलीस अधीक्षक राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे 58 व्या वर्षी
सेवानिवृत्त होतात.
• पोलिस अधीक्षकांच्या मदतीला
अतिरिक्त पोलीस अधीक्षक, उपाधीक्षक, पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, हवालदार व पोलीस शिपाई मदतीला असतात.
जिल्हा पोलीस अधीक्षक अधिकार व कार्य-
• जिल्हा पोलिस अधिकारी हा जिल्हाधिकार्यांना नंतरचा पोलिस प्रशासनातील सर्वश्रेष्ठ असतो. त्याच्याकडे पुढील जबाबदाऱ्या सोपविलेल्या असतात.
• जिल्हा पोलीस अधीक्षक जिल्हा पोलिस यंत्रणेचा मुख्य नियंत्रक असतो. जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीने जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचे काम करतो.
• जिल्ह्यातील गुन्ह्यांवर नियंत्रण व देखरेख करणे, विशेष प्रकरणांची हाताळणी करणे.
• आपल्या कार्यक्षेत्रातील पोलीस चौक्या व ठाण्याची तपासणी करणे
• पोलीस व जनता यात मैत्रीचे संबंध प्रस्थापित करणे.
• आपल्या हाताखालील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करणे. पोलीस दलात शिस्त निर्माण करणे.
• जिल्ह्यातील गुन्हेगारी वर आळा बसवणे. गंभीर गुन्ह्याचा तपास आपल्या हाती घेणे.
• पोलिस यंत्रणेशी संलग्न अभी कारणांवर नियंत्रण ठेवणे.
• पोलीस दलाचे मनोधैर्य वाढवण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम आखणे.
• वरिष्ठ अधिकारी व न्यायालयाकडून आलेल्या आदेशांचे पालन करणे.
• पोलीस यांची मालमत्ता, हत्यारे व दस्तऐवज सुरक्षित राखणे.
• गंभीर गुन्ह्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवणे.
• आपल्या कार्याबद्दलचे दैनंदिन व गोपनीय अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवणे.
• चांगला जनसंपर्क निर्माण करून जनता आणि शासन यात दुवा म्हणून काम करणे.
• जिल्ह्यातील शासकीय आणि अशासकीय कार्यक्रमात भाग घेणे.
• अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षितता राखणे.
• स्टेशन डायरी मधील नोंदींची पाहणी करून त्याला लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी सूचना करणे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.