https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

Kotwal कोतवाल, पात्रता, भरती पद्धत आणि अधिकार व कार्य


  •     कोतवाल पद मोगल काळापासून अस्तित्वात आहे.

  •       जागल्या, रामोशी इत्यादी लोक कनिष्ठ ग्राम नोकर पोलीस पाटीलाचे मदतनीस म्हणून काम पाहत होते.
  • मुंबई कनिष्ठ गाव वतने निर्मूलन कायदा, १९५८ अन्वये १ फेब्रुवारी १९६३ पासून अनुवांशिक कनिष्ठ गावसेवक प्रणाली संपुष्टात आली. त्यानंतर गावच्या लोकसंख्‍येनुसार कोतवालाचे नियमित मानधन घेणारे पद निर्माण करण्यात आले.
  • कोतवालांची पदे म्हणजे पोलीस पाटील आणि तलाठी यांना प्रशासनात मदत करणार कनिष्ठ नोकर म्हणजे कोतवाल होय.
  •    कोतवाल हे महसूल खात्यातील सर्वात कनिष्ठ पद आहे. कोतवाल हा चोवीस तास सरकारी सेवेला बांधील असतो. कोतवाल पद काही काळ जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आले होते. पुन्हा दिनांक १ डिसेंबर १९५९ पासून  कोतवालाची पदे पुन्हा महसूल विभागाकडे वर्ग करण्यात आली.
  • कोतवाल पात्रता-   कोतवालाची नेमणूक तहसिलदार करतात. 
•       कोतवाल पदासाठी शिक्षण: १२ वी पास
•       शारीरिकदृष्ट्या सक्षम आणि चारित्र्यवान असावा.
•       संबंधित तालुका किंवा गावाचा रहिवाशी असावा.
•       कोतवाल पदासाठी वयोमर्यादा: १८ ते ४५ वर्षापर्यंत असावे.
•       कोतवालाचे सध्याचे मानधन: रु. ७५०० रु आहे.
•       कोतवाल भरतीसाठी जिल्हाधिकारीकडून नामनिर्देशित अधिकाऱ्याची समिती नेमली जाते.
•       १०० गुणाची परीक्षा लेखी ७५ गुण आणि २५ गुण तोंडी परीक्षा कोतवाल पदासाठी होते.
•       कोतवाल पदासाठी शासकीय नियमाप्रमाणे आरक्षण असते.
 

 कोतवाल अधिकार आणि कार्य- घोलप समिती अहवालानुसार कोतवालाची कर्तव्ये:

•       शासकीय रक्कम शासकीय तिजोरीत भरण्यात सहाय्य करणे.

•       शेत सारा, शासकीय देणे अदा करण्यासाठी गावकर्‍यांना चावडीवर बोलावुन आणणे.

•       शासकीय पैसा, कार्यालयीन कागदपत्रे आणि शासकीय वसुली म्हणून जप्त केलेल्या मालमत्तेवर लक्ष ठेवणे.

•       अटकवलेली/जप्त केलेली मालमत्ता/जनावरे चावडीवर घेऊन येणे.

•       आवश्यकतेनूसार गाव दप्तर गावातून तहसिल कार्यालयात नेणे.

•       चावडीचे टपाल तहसिल कार्यालयात व तहसिल कार्यालयाचे टपाल चावडीवर नेणे.

•       शासकीय अधिकार्‍यांना त्यांच्या दौर्‍यात, पीक पाहणीत, हद्दीच्या खुणा तपासण्यात सहाय्य करणे.

•        नोटीस/ समन्स बजावणे व नोटीस/ समन्स बजावण्यासाठी पोलीस पाटलास मदत करणे.

•        गावातील जन्म, मृत्यू, लग्न आणि अर्भक मृत्यूची माहिती ग्राम पंचायत सचिवाला देणे.

•       लसीकरण मोहीमेत मदत करणे, शासनाच्या आदेशांबाबत गावात दवंडी देणे.

•        अपघाती मृत्यू, आग, साथीचे रोग या प्रसंगी पोलीसपाटलांना मदत करणे.

•        गुन्हेगारांच्या हालचाली पोलिसांना कळवणे तसेच तपासात आणि गुन्हे

•       प्रतिबंध समयी पोलिसांना मदत करणे.

•        पोलीस पाटलाच्या अभिरक्षेत असलेल्या गुन्हेगारावर पहारा देणे.

•       गावातील अधिकार्‍यांना जमीन महसूल वसुलीस मदत करणे.

•       गावात शासकीय कामासाठी आलेल्या अधिकार्‍यांना सहाय्य करणे.

•       गावातील चावडी स्वच्छ ठेवणे आणि तेथे दिवाबत्ती करणे.

•       गावातील अधिकार्‍यांना त्यांच्या इतर शासकीय कामात मदत करणे.

•       बेवारस मृतदेहांची विल्हेवाट लावण्यास तसेच शव विच्छेदनासाठी प्रेत घेऊन जाण्यात पोलिसांना सहाय्य करणे.

•       पोलीसपाटील आणि पोलीसांना रात्रीच्या गस्तीसाठी मदत करणे. संशयास्पदप्रकरणांची माहिती पोलीस पाटलास देणे.

कोतवाल, पात्रता, भरती पद्धत आणि अधिकार व कार्य Video YouTube Link



https://www.youtube.com/watch?v=_OsxAqzhpw8&t=7s

 








1 टिप्पणी:

If you have any donuts. Lets me Know.