https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

Kotwal कोतवाल, पात्रता, भरती पद्धत आणि अधिकार व कार्य


  •     कोतवाल पद मोगल काळापासून अस्तित्वात आहे.

  •       जागल्या, रामोशी इत्यादी लोक कनिष्ठ ग्राम नोकर पोलीस पाटीलाचे मदतनीस म्हणून काम पाहत होते.
  • मुंबई कनिष्ठ गाव वतने निर्मूलन कायदा१९५८ अन्वये १ फेब्रुवारी १९६३ पासून अनुवांशिक कनिष्ठ गावसेवक प्रणाली संपुष्टात आली. त्यानंतर गावच्या लोकसंख्‍येनुसार कोतवालाचे नियमित मानधन घेणारे पद निर्माण करण्यात आले.
  • कोतवालांची पदे म्हणजे पोलीस पाटील आणि तलाठी यांना प्रशासनात मदत करणार कनिष्ठ नोकर म्हणजे कोतवाल होय.
  •    कोतवाल हे महसूल खात्यातील सर्वात कनिष्ठ पद आहे. कोतवाल हा चोवीस तास सरकारी सेवेला बांधील असतो. कोतवाल पद काही काळ जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आले होते. पुन्हा दिनांक १ डिसेंबर १९५९ पासून  कोतवालाची पदे पुन्हा महसूल विभागाकडे वर्ग करण्यात आली.
  • कोतवाल पात्रता-   कोतवालाची नेमणूक तहसिलदार करतात. 
       कोतवाल पदासाठी शिक्षण: १२ वी पास
       शारीरिकदृष्ट्या सक्षम आणि चारित्र्यवान असावा.
       संबंधित तालुका किंवा गावाचा रहिवाशी असावा.
       कोतवाल पदासाठी वयोमर्यादा: १८ ते ४५ वर्षापर्यंत असावे.
       कोतवालाचे सध्याचे मानधन: रु. ७५०० रु आहे.
       कोतवाल भरतीसाठी जिल्हाधिकारीकडून नामनिर्देशित अधिकाऱ्याची समिती नेमली जाते.
       १०० गुणाची परीक्षा लेखी ७५ गुण आणि २५ गुण तोंडी परीक्षा कोतवाल पदासाठी होते.
       कोतवाल पदासाठी शासकीय नियमाप्रमाणे आरक्षण असते.
 

 कोतवाल अधिकार आणि कार्य- घोलप समिती अहवालानुसार कोतवालाची कर्तव्ये:

       शासकीय रक्कम शासकीय तिजोरीत भरण्यात सहाय्य करणे.

       शेत साराशासकीय देणे अदा करण्यासाठी गावकर्यांना चावडीवर बोलावुन आणणे.

       शासकीय पैसाकार्यालयीन कागदपत्रे आणि शासकीय वसुली म्हणून जप्त केलेल्या मालमत्तेवर लक्ष ठेवणे.

       अटकवलेली/जप्त केलेली मालमत्ता/जनावरे चावडीवर घेऊन येणे.

       आवश्यकतेनूसार गाव दप्तर गावातून तहसिल कार्यालयात नेणे.

       चावडीचे टपाल तहसिल कार्यालयात व तहसिल कार्यालयाचे टपाल चावडीवर नेणे.

       शासकीय अधिकार्‍यांना त्यांच्या दौर्‍यातपीक पाहणीतहद्दीच्या खुणा तपासण्यात सहाय्य करणे.

        नोटीस/ समन्स बजावणे व नोटीस/ समन्स बजावण्यासाठी पोलीस पाटलास मदत करणे.

        गावातील जन्ममृत्यूलग्न आणि अर्भक मृत्यूची माहिती ग्राम पंचायत सचिवाला देणे.

       लसीकरण मोहीमेत मदत करणे, शासनाच्या आदेशांबाबत गावात दवंडी देणे.

        अपघाती मृत्यूआगसाथीचे रोग या प्रसंगी पोलीसपाटलांना मदत करणे.

        गुन्हेगारांच्या हालचाली पोलिसांना कळवणे तसेच तपासात आणि गुन्हे

       प्रतिबंध समयी पोलिसांना मदत करणे.

        पोलीस पाटलाच्या अभिरक्षेत असलेल्या गुन्हेगारावर पहारा देणे.

       गावातील अधिकार्‍यांना जमीन महसूल वसुलीस मदत करणे.

       गावात शासकीय कामासाठी आलेल्या अधिकार्‍यांना सहाय्य करणे.

       गावातील चावडी स्वच्छ ठेवणे आणि तेथे दिवाबत्ती करणे.

       गावातील अधिकार्‍यांना त्यांच्या इतर शासकीय कामात मदत करणे.

       बेवारस मृतदेहांची विल्हेवाट लावण्यास तसेच शव विच्छेदनासाठी प्रेत घेऊन जाण्यात पोलिसांना सहाय्य करणे.

       पोलीसपाटील आणि पोलीसांना रात्रीच्या गस्तीसाठी मदत करणे. संशयास्पदप्रकरणांची माहिती पोलीस पाटलास देणे.

कोतवाल, पात्रता, भरती पद्धत आणि अधिकार व कार्य Video YouTube Link



https://www.youtube.com/watch?v=_OsxAqzhpw8&t=7s

 








1 टिप्पणी:

If you have any donuts. Lets me Know.