- तलाठीला हिंदीत पटवारी असे म्हटले जाते. तलाठी हे पद मोगल काळापासून अस्तित्वात आहे. दिल्लीचा बादशहा शेर शहासुरीयांच्या दरबारातील भुअभिलेख मंत्री राजा तोरडमल यांनीपटवारी पदाची निर्मिती केली.
- ब्रिटीश राजवटीत १८१४ च्या अधिनियमानुसार ग्रामीणभागातील हिशोब आणि दप्तर सांभाळण्यासाठी तलाठी पदाचीनिर्मिती करण्यात आली.
- १९१८ साली कुलकणी वतने नष्ट करून पगारी तत्त्वावर तलाठीपदे भरली जाऊ लागली.
महाराष्ट्र जमीन महसूल व्यवस्थेतील ग्राम पातळीवरील कर्मचारी म्हणजे तलाठी होय.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार तलाठयाची नेमणूक केली जाते. तलाठी पदासाठी परीक्षा जिल्हा निवड मंडळ किंवा लोकसेवा आयोगाकडून घेतले जाते.परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडून तलाठी पदी नेमणूक केलीजाते.
दहावी अथवा बारावीची परीक्षा पास असणेइतकेच पात्रता होती. मात्र आता किमानपदवीधर असणे आवश्यक आहे.
राज्याच्या महसूल विभागातील सर्वात कनिष्ठ पद म्हणजे तलाठी होय
तलाठी पदाच्या पात्रता-
तलाठी पदाची परीक्षा देण्यासाठी कोणत्याही विद्याशाखेची पदवी असणे आवश्यक असते.
जनरल प्रवर्गासाठी18 ते 38, मागास प्रवर्ग-18ते43, माजी कर्मचारी 46 वयापर्यंत परीक्षा देता येते.
तलाठी हा महसूल व्यवस्थेतील वर्ग 3 चाकर्मचारी असतो . मंडळ अधिकारी आणितहसीलदारांच्या नियंत्रणाखाली कार्य करतो
.तलाठी कार्यालयाला सजा असे म्हणतात.1 ते21 क्रमांकाच्या नमुन्यात तलाठ्याचे दप्तरठेवलेले असते.तलाठ्यांना एकूण 36 प्रकारचे दाखले देण्याचाअधिकार कायद्याने दिलेला आहे.
तलाठीचे अधिकार व कार्य-
ग्रामीण भागाच्या नोंद वह्या अद्यायावत ठेवणे.गावकरी आणि सरकार या दुवा म्हणून काम पाहणे
.सरकारच्या विविध योजना आणि परिपत्रकांची गावकऱ्यांना माहिती देणे
.नैसर्गिक आपत्ती बाबत मंडळ अधिकारी व तहसीलदार माहिती देणे .
जमीन महसूलाची वसूली करणे . पीक पाण्याची नोंद करणे. विविधप्रकारचे दाखले जनतेला देणे.
जमीन खरेदी व्यवहार आणि वारसाहक्काच्या नोंदी करणे
.नैसर्गिक आपत्तीच्या काळात पंचनामे करून संकट ग्रस्तांना मदतमिळवून देणे
महसूल प्रशासनाशी संबंधित माहिती विविध विभाग वसरकारला पुरविणे.
साथीच्या रोगाचा बद्दल तहसीलदार वआरोग्य अधिकार्यास माहिती देणे.
तहसीलदार व पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशाने नोटिसा,चौकशी, प्रतिवृत्त आणि जबानी संदर्भात कागदपत्रे तयार करणेकिंवा मदत करणे
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने गावातीलशिधापत्रिकांची सूची तयार करणे.निवडणूक संदर्भातली कामे पार पाडणे.
महसूल कायद्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोपवलेले कामे पार पाडणे.
विशिष्ट नमुन्यात आपल्या कार्याचा अहवाल तहसीलदारासदेणे.
तलाठी पद You Tube Video Link
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.