- दादाभाई नवरोजींना भारतीय राजकारणातील पितामह म्हटले जाते.
- दादाभाई भारताच्या आर्थिक राष्ट्रवादाचे जनक आहेत.
- त्यांचा जन्म 4 सप्टेंबर 1825 रोजी मुंबईतील बाहारकोट भागात एका पारशी कुटुंबात झाला. वडील नवरोजी पालनजी धर्मगुरू होते.वयाच्या चौथ्या वर्षी वडिलांचे निधन झाल्यामुळे आई माणकबाई यांनी त्यांचा सांभाळ केला.
- शिक्षण नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत झाले. शिक्षणानंतर नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत शिक्षक आणि पुढे गणिताचे प्राध्यापक बनले. त्या संस्थेतील ते पहिले भारतीय प्राध्यापक होते.
- जनतेच्या तक्रारींना वाचा फोडण्यासाठी 1852 मध्ये बॉम्बे असोसिएशन नावाच्या संस्थेची स्थापना केली.
- 1861 साली 'रास्त गोफ्तार' नावाचे साप्ताहिक सुरू केले.
- इंग्लंड मध्ये ईस्ट इंडिया असोसिएशन नावाची संस्था स्थापन केली.
- ब्रिटिश पार्लमेंटच्या साऊथ बरो समितीसमोर भारताच्या आर्थिक परिस्थितीबद्दल मत मांडले.
- 1874 साली बडोदा संस्थानाचे दिवाण
- मुंबई महानगरपालिकेचे सदस्य, 1885 मध्ये मुंबई प्रांतिक विधीमंडळाचे सदस्य
- 1892 मध्ये लिबरल पक्षाच्या तिकिटावर फिन्सबरी मतदारसंघातून हाऊस ऑफ कॉमन मध्ये विजय
- 1886,1892,1906 च्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष बनले होते.
- 1906 च्या ऐतिहासिक अधिवेशनात टिळकांच्या चतुःसूत्रीच्या ठरावाला पाठिंबा दिला.
- 1915 होमरूल लीगची अध्यक्षपद
- 30 जून 1917 मध्ये निधन झाले.
- Poverty and British Rule in India ग्रंथाचे लेखन केले.
- दादाभाई नवरोजीचा राजकीय उदारमतवाद-
- दादाभाईच्या सामाजिक राजकीय आणि आर्थिक विचारांची मुळे उदारमतवाद सापडतात त्यांना उदारमतवादी संकल्पनेचे बाळकडू इंग्रजांकडून मिळाले होते.
- व्यक्तिस्वातंत्र्य हा उदारमतवादाचा प्रमुख आधारस्तंभ होता.
- ब्रिटिश साम्राज्याचा घटक या नात्याने आवश्यक स्वातंत्र्य इंग्रजांनी देणे आवश्यक आहे. 1858 च्या राणीच्या जाहीरनाम्यात भारतीयांना वचन देण्यात आले होते .
- भारतीयांना कायदेमंडळात योग्य प्रतिनिधित्व द्यावे. कायदेमंडळ प्रतिनिधींची जनतेकडून निवड व्हावी. कायदेमंडळ सदस्यांना कर विषयक धोरण आणि प्रश्न विचारण्याचा अधिकार असावा.
- प्रशासन व लष्कर यावरील खर्च कमी करावा.
- सनदी सेवेत भेदाभेद न करता भारतीयांची नेमणूक करावी.
- ब्रिटिश राजवट विषयी विचार-
- दादाभाईच्या मनात ब्रिटिश राजवट विषयी आस्था व आदराची भावना होती.
- ब्रिटिशांच्या सहवासात भारतीयांचा विकास होईल अशी त्यांची खात्री होती.
- ब्रिटिशांनी रेल्वे, पोस्ट,तार,कायदा आणि सुव्यवस्था इत्यादी अनेक भौतिक आणि प्रशासकीय सुधारणा केल्या.
- ब्रिटिश जनतेचे स्वातंत्र्य प्रियता, न्यायबुद्धी आणि लोकशाहीवरील निष्ठा हा त्यांच्या श्रद्धेचा प्रमुख स्रोत होता.
- ब्रिटिश राजवट भारतीयांसाठी योग्य धोरण आखेल हा विश्वास कायम होता.
- त्यांनी स्वराज्याची मागणी केलेली असली तरी स्वराज्याचा आशय अंतर्गत स्वयंशासन किंवा वसाहतीचे स्वराज्य हा होता.
ब्रिटीश राजवटीवर टीका-
• देशाच्या बदलत्या परिस्थितीच्या प्रभावातून दादाभाईचे ब्रिटीश राजवटी बद्दलच्या मतात बदल झाला.
• 1906 च्या कलकत्ता अधिवेशनात ब्रिटिश राजवटीवर टीका केली. लोकमान्य टिळकांच्या चतुःसूत्री कल्पनेला पाठिंबा दिला.
• साम्राज्यांतर्गत स्वराज्य ध्येयाचा पुरस्कार करून जहाजांच्या भूमिकेचे समर्थन केले.
• इंग्रजांनी सनदी सेवेत भारतीयांना फारशी संधी दिली नाही.
• बंदूक आणि दडपशाहीच्या जोरावर ब्रिटिशांनी साम्राज्य चालविण्याचा प्रयत्न केला.
• ब्रिटिश भारतात हुकुमशाही आणि दडपशाहीचा वापर करतात.
• ब्रिटिश सनदी अधिकारी चैनी व विलासी आहेत. सरकारी पैशाची उधळपट्टी करतात. भारतीयाशी अरेरावीने वागतात.
• सनदशीर चळवळ- दादाभाईच्या राजकीय विचारात सहनशीर मार्गांना स्थान होते.
• घटनात्मक किंवा विधी संमत मार्गाच्या माध्यमातून बदल घडवून आणण्याच्या प्रक्रियेला सनदशीर मार्ग म्हणतात.
• त्यांच्या सनदशीर मार्ग आहेत तीन गोष्टींचा समावेश होता.
• 1. मागण्यांच्या न्यायतेविषयी विश्वास
• 2. ब्रिटिशांच्या न्याय बुद्धीवर विश्वास
• 3. मागण्यांची योग्यता पटवून देण्यासाठी परिश्रमाची तयारी
• त्यांचा ब्रिटिशांचे न्याय बुद्धीवर विश्वास होता. त्यांनी आपले लक्ष ब्रिटिशांची न्यायबुद्धी जागृत करण्यावर केंद्रित केले.
• दादाभाईंचा सनदशीर मार्ग अर्ज विनंत्या पुरता मर्यादित नव्हता. त्यांनी लोकांच्या प्रश्नावर आवाज उठविण्याचे धाडस दाखवले.
• दादाभाईचे सनदशीर मार्ग नेमस्ता पेक्षा व्यापक होते.
• चळवळीत त्याग व निष्ठेला महत्त्व होते.
• चळवळ लोकांना सामर्थ्या आणि अधिकाराची जाणीव करून देणारी असावी.
• आपल्या मागण्याचे महत्व ब्रिटीशांना पटवून देण्यासाठी मेहनतीची आवश्यकता आहे.
• स्वदेशी आणि बहिष्कार मार्गाला ते सनदशीर मार्गाचा दर्जा देतात.
• भारताच्या राजकीय परिस्थितीचा विचार करून त्यांनी सनदशीर मार्गात बदल केला. त्यामुळे त्यांना जहालाच्या जवळ गेलेले नेमस्त नेते म्हटले जाते.
दादाभाई नवरोजी यांच्या विचारातील वैचारिक बदल-
• दादाभाईनी भारतीय राजकारणात प्रदीर्घ काळ व्यतीत केला. परंतु 1906 साली काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष पदावरून घेतलेल्या भूमिकेवरून ते नेमस्त होते की जहाल हा प्रश्न निर्माण होतो.
• सुरवातीच्या काळात दादाभाई इंग्रजांच्या उज्वल इतिहास, लोकशाहीसाठी संघर्षाची पार्श्वभूमी आणि उदारमतवादी वारश्याने प्रभावित होऊन इंग्रजी राजवटीचे समर्थन करू लागले.
• ब्रिटिशांकडून होणाऱ्या अन्यायाची मीमांसा करण्यासाठी ब्रिटिश जनता आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या वर्तन विसंगतीचे दाखले देऊ लागले.
• स्वातंत्र्य कायदा आणि न्यायावर विश्वास असलेले ब्रिटिश नागरिक आपल्याला न्याय देतील हा त्यांना विश्वास होता.
• इंग्लंडच्या राणीने जाहीरनाम्यात दिलेले आश्वासन ब्रिटिश पाळतील असे त्यांना वाटत होते.
• वैचारिक परिवर्तन-
• विसाव्या शतकात दादाभाईचा ब्रिटीश राजवटीवरील विश्वास उडू लागला.
• ब्रिटिश दडपशाहीच्या माध्यमातून आपली राजवट टिकून ठेवण्याचा प्रयत्न करत होते.
• ब्रिटिश अधिकाऱ्यांचे भारतीयांवरील अन्याय व अत्याचार वाढत चालले होते.
• भारतीयांना कायदेमंडळात व सनदी सेवेत मर्यादित प्रतिनिधी होते.
• ब्रिटिशांनी भारतीयांना दिलेली आश्वासने न पाळल्यामुळे 1906 च्या कलकत्ता येथील काँग्रेस अधिवेशनात टिळकांच्या चतुःसूत्रीला पाठिंबा देऊन स्वराज्याची हाक दिली.
• दादाभाईंनी कॅनडा प्रमाणे भारताला वसाहतीचे स्वराज्य द्यावे ही मागणी केली.
• त्यांनी आयुष्याच्या उत्तरार्धात जहाजांच्या भूमिकेला पाठिंबा दिलेला असला तरी नेमस्तवादाचा त्याग केला नाही.
• देशाच्या बदलत्या परिस्थितीचा अंदाज घेऊन नेमस्त वादाचा विस्तार केला. नेमस्तवादात स्वदेशी आणि बहिष्कार मार्गांचा समावेश केला.
• नेमस्त मार्गाने भारतीयांच्या मागण्या पूर्ण होणे शक्य नव्हते म्हणून त्यांनी जहाल यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला.
• काळानुरूप आपल्या भूमिकेत बदल केल्यामुळे दादाभाईंना जहालाच्या जवळ गेलेले नेमस्त नेते असे म्हटले जाते.
• भारतीय राजकारणातील योगदान-
• भारतीय राजकारणाला वळण देणार्या मोजक्या नेत्यात दादाभाईचा समावेश होतो.
• आर्थिक शोषणचा सिद्धांत मांडून आर्थिक राष्ट्रवादाला आकार दिला.
• भारतीय राजकारणातील बदलाची दिशा ओळखून आपल्या धोरणात बदल केला. नेमस्तां प्रमाणे जहालाचे मार्गदर्शक बनले.
• ब्रिटिशांचे खरे रूप उघड करून भारतीय राष्ट्रवादी चळवळीला गती प्राप्त करून दिली.
• भारतीयांच्या समस्या सोडवण्यासाठी इंग्लंड आणि भारत येथे अनेक संस्था स्थापन केल्या.
• पार्लमेंट आणि पार्लमेंटच्या विविध समित्यांमध्ये भारतीयांची बाजू मांडली.साम्राज्यांतर्गत स्वराज्याची उघडपणे मागणी केली.
•
दादाभाई नवरोजीचे आर्थिक नि:सारण सिद्धांत-
v दादाभाई यांनी शास्त्रीय पद्धतीने ब्रिटिशांच्या शोषणयुक्त व्यापारनीतीचे स्वरूप उघड केले.
v त्यांना भारताच्या आर्थिक राष्ट्रावादाचे जनक मानले जाते.
v Poverty and un British Rule in India ग्रंथात ब्रिटिशाच्या आर्थिक धोरणाचा त्यांनी अभ्यास केला. भारतीयाच्या दारिद्रयास ब्रिटिश राजवट जबाबदार असल्याचा निष्कर्ष काढला.
v ब्रिटिशानी राजधर्मापेक्षा व्यापारधर्माला जास्त प्राधान्य दिले.
v भारतीय अर्थव्यवस्था मुळापासून उखडून टाकण्याचा प्रयत्न केला.
v आर्थिक नि:सारण सिद्धांताची मांडणी करण्यासाठी १८५१ ते १८७१ पर्यंतच्या आकडेवारीच्या आधार घेतला.
v गझनीच्या महंमदाने सतरा स्वाऱ्या मध्ये जेवढी लुट केली नशेल त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त लुट ब्रिटीश एका वर्षात करतात.
v १९व्या शतकाच्या प्रारंभी ३ दशलक्ष पीड इग्लंड मध्ये जात होती. ती १९०५ पर्यंत ५१५ करोड पींड पर्यंत पोहचली.
v बिटीश राजवटीचे आर्थिक परिणाम-
v सनदी नोकर व लष्कर यावरील खर्च, भत्ते निवृत्तीवेतन आणि व्यापारातील नफा इत्यादीचे माध्यमातून इंग्लंडमध्ये पैसा जातो आणि त्या पैशाचे भांडवलात रूपांतर होऊन इंग्लंडच्या औद्योगिक विकासाला चालना मिळते .
v भारतात ब्रिटिश सनदी अधिकारी चैनी व विलासी जीवन जगतात.
v वाढीव खर्च करण्यासाठी जास्तीत जास्त कर आकारणी किंवा कर्ज काढतात. या ब्रिटिशांच्या धोरणामुळे भारत कर्जबाजारी बनला आहे.
v ब्रिटिश अर्थनीतीचे दुष्परिणाम-
v भारतीय वस्तूंची निर्यात कमी करण्यासाठी भारतीय उद्योगांचे खच्चीकरण आणि भारतीय वस्तूंवर जास्त करा करण्याचे धोरण ब्रिटिश अवलंबतात.
v ब्रिटिश व्यापाराच्या माध्यमातून भारतीयांची लूट करतात. कमी किमतीत भारतीयांकडून कच्चामाल घेतात आणि त्याचे पक्क्या मालात रूपांतर करून चढ्या किमतीत विकतात.
v ब्रिटिशांनी सरकारी पैशाची उधळपट्टी करून देश कर्जबाजारी बनविला.
v ब्रिटिशांच्या अर्थनीती मुळे भारतीय उद्योग बंद पडल्यामुळे लोक बेरोजगार झाले.
v भारताचे दारिद्रय दूर करण्याचे उपाय योजना—
v दादाभाईंनी भारताचे दारिद्रय दूर करण्यासाठी पुढील उपाय सुचविले आहेत.
v १. ब्रिटिश सैन्य व प्रशासनावरील खर्च कमी करावा.
v २. भारतात उद्योगांची स्थापना करावी आणि उद्योग चालवण्याची भारतीयांना प्रशिक्षण द्यावे.
v भारतात भांडवल निर्मितीचा प्रयत्न करावा.
v भारतीयांवर लादलेले जास्त कर रद्द करावेत.
v सरकारी तिजोरीतील उधळपट्टी थांबवावी. प्रशासकीय सेवेचे हिंदीकरण करावे. प्रशासनातील उच्च पदांवर भारतीयांची नेमणूक करावी.
नैतिक शोषण किंवा लूट-
• दादाभाईच्या मते, इंग्रजांनी भारताचे आर्थिक शोषणासोबत नैतिक लूट देखील केली.
• नैतिक लूट भारतीयांच्या आकांक्षावर आघात करणारी आणि नैतिक दृष्टिकोनातून खच्चीकरण करणारी आहे.
• नैतिक शोषण दोन मार्गाने केले जाते. पहिला मार्ग म्हणजे वरिष्ठ पदावर ब्रिटिश अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाते. कनिष्ठ पदांवर भारतीयांची नेमणूक केली जाते.
• दुसरा मार्ग म्हणजे ब्रिटिश अधिकाऱ्यांना प्रशासकीय अनुभव मिळाल्यानंतर त्यांची इंग्लंडमध्ये बदली केली जाते. भारताच्या तिजोरीतून खर्च केल्या जाणाऱ्या पैशातून मिळालेल्या अनुभवाचा उपयोग इंग्लंडला होतो.
• भारतीय जवळ उच्च दर्जाचे कर्तव्य आणि बुद्धिमत्ता आहे परंतु त्यांचे वरिष्ठ पदांवर नेमणूक केली जात नाही हे ब्रिटिशांचे धोरण भारतीय तरुणांमध्ये असंतोष निर्माण करणारे आहे.
• सनदी सेवेचे निवडीसाठी होणारी आय.सी. एस. ची परीक्षा इंग्लंड मध्ये होते. त्यामुळे ही परीक्षा भारतीयांना आर्थिक दृष्ट्या परवडणारी नाही. त्यामुळे गुणवत्ता असूनही भारतीय तरुणांना वरच्या पदांवर काम करण्याची संधी मिळत नाही.
• सनदी सेवेवर खर्च केला जाणाऱ्या पैशांचा भारतीयांना काहीही लाभ होत नाही.
• ब्रिटिश अधिकारी परके असल्यामुळे त्यांना भारतीयांच्या समस्या व आकांक्षांची जाण नाही. ते जनतेशी अरेरावीने वागतात. सरकारी पैशाची उधळपट्टी करतात. या लुटीचे भयंकर राजकीय दुष्परिणाम भारतीयांना भोगावे लागत आहे.
• नैतिक शोषण थांबवण्यासाठी प्रशासकीय सेवेचे हिंदीकरण करून भारत यांची वरिष्ठ पदांवर नेमणूक करावी असा सल्ला दादाभाईंनी दिला.
- दादाभाई नवरोजी You Tube Video Link
- https://www.youtube.com/watch?v=3bLlP2pQ-Vo&t=11s
भारतीय राज्यघटना नोटस/ Indian Constitution- VEC notes
-
Download बटन वर दिलेल्या लिंकवर क्लिक करून FYBSc/B.A.-VEC-II Sem-
II-2024-25 Indian Constitution Notes PDf File Download करता येईल.
३ दिवसांपूर्वी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.