राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 प्रमुख विशीष्टे-
- पहिले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 साली अंमलात आले. त्यात 1992 मध्ये बदल 2009 मध्ये शिक्षण हक्क कायदा संमत झाला. त्यांची 2013 पासूनअंमलबजावणी
- राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मसुदा निर्मिती व मान्यता- राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मसुदा तयार करण्यासाठी इस्त्रोचे माजी अध्यक्ष डॉ. डी.कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. ह्या समितीने तयार केलेला मसुदा 2019मध्ये प्रकाशित करण्यात आला. त्यावर संबंधित घटकांशी चर्चा झाल्यावर 29 जुलै 2020 रोजीकेंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 प्रमुख विशीष्टे खालीलप्रमाणे होत.
- शालेय शिक्षणाच्या स्वरूपात बदल-10+2 ऐवजी 5+3+3+4 ही नवी प्रणाली
- प्रथम टप्पा-पूर्व प्राथमिक तीन वर्षे आणि 1ली आणि 2 री असे एकूण पाच वर्ष
- पूर्व प्राथमिक शाळेसाठी NCERT अभ्यासक्रम तयार करून देशभरात लागू करेल.
- तिसरीपर्यत वाचन,संख्या, अक्षर ओळख मूलभूत शिक्षण
- दुसरा टप्पा- तिसरी ते पाचवी पर्यंतचे शिक्षण, पाचवी पर्यंतचे शिक्षण मातृभाषेत दिले जाईल.
- पूर्वप्राथमिक पासून ते वयाच्या 14 व्या वर्षापर्यंत शिक्षण हक्क कायदा लागू
- मध्यान्न भोजन योजनेचा विस्तार
- शंभर टक्के विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणणे.
- राष्ट्रीय उत्पन्नाच्या सहा टक्के रक्कम शिक्षणावर खर्च करणे
- शिक्षकांना नियमित स्वरूपात प्रशिक्षण देणे.
- तिसरा टप्पा- सहावी ते आठवी पर्यंतचे शिक्षण, सहावीपासून व्यवसायिक शिक्षणाचा समावेश,
- सरकारी आणि खाजगी शाळातील शिक्षणात समानता. सहावीनंतर त्रिभाषा सूत्र- प्रथम भाषा मातृभाषा, द्वितीय भाषा-राष्ट्रभाषा हिंदी, तृतीय भाषा इंग्रजी किंवा इतर भाषा
- शिक्षक-विद्यार्थी प्रमाण30:1, शिक्षकांच्या भरतीचे अधिकार संबंधित संस्थांना, शिक्षक भरती गुणवत्तेनुसार,
- प्रथम नियुक्ती पाच वर्ष परीक्षाविधीन कालावधी, देखरेख समिती आणि विद्यार्थी प्रतिसाद लक्षातघेऊन कायमस्वरूपी नियुक्ती, हसत खेळत आणि प्रायोगिक शिक्षणावर भर
- चौथा टप्पा- नववी ते बारावी पर्यंतचे शिक्षण, या टप्प्यात कोणतीही शाखा नसेल. विद्यार्थ्यांना
- विषय निवडण्याची संधी उदा. विज्ञान शिकताना संगीत विषय शिकता येईल.
- बोर्डाच्या परीक्षेचे महत्व कमी होणार, सेमिस्टर पॅटर्न नुसार परीक्षा, वर्षातून दोनदा परीक्षा, नववी ते बारावीची आठ सेमिस्टरमध्ये विभागणी
- शालेय गुणपत्रकात व्यापक बदल-गुणपत्रकावर विद्यार्थी,वर्गमित्र आणि शिक्षकाचा शेरा
- बारावी पूर्ण झाल्यानंतर बारा वर्षांचे रिपोर्ट कार्ड दिले जातील.
- व्यवसायिक अभ्यासक्रमावर भर- प्रात्यक्षिक व कौशल्य शिक्षणावर भर
- विद्यार्थ्यांचे विद्यार्थी स्वतः, सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षक मूल्यांकन करणार
- मुलांच्या शिक्षणात पालकांचा सहभाग,
- उच्च शिक्षणातील बदल-कायदा आणि वैद्यकीय महाविद्यालय वगळता देशातील सर्व उच्च शैक्षणिक संस्थांचे संचालनकरण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण आयोगाची स्थापना.
- राष्ट्रीय शिक्षण आयोग शिक्षण विषयक धोरण ठरवेल.
- केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय याऐवजी शिक्षण मंत्रालय हे नामकरण
- M.Phil ची पदवी कायमची रद्द
- उच्च शिक्षणात स्वायत्तता, गुणवत्ता आणि संशोधनाला प्राधान्य
- 50 टक्के पर्यंत उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढविणे.
- विद्यार्थ्यांना अधिक वेळा परीक्षा देण्याची संधी
- देशातील 100 विद्यापीठात ऑनलाइन शिक्षणाची सोय
- आठ प्रादेशिक भाषेत ई-कार्सेस निर्मिती, वर्च्युअल लॅब निर्मिती
- उच्च शिक्षणात तीन प्रकारच्या संस्था-
- 1.संशोधन संस्था- यात केंद्रीय विद्यापीठे आणि केंद्र सरकारच्या सर्व अनुदानित संस्था- अध्यापनआणि उच्च दर्जाचे संशोधन
- 2. शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठे- पदवी-पदव्युत्तर शिक्षण आणि संशोधन
- 3.महाविद्यालये- पदवी आणि पदविका शिक्षण
- गुणवत्तापूर्ण दूरस्थ शिक्षणाला चालना, MOOC ला प्राधान्य
- परदेशी मुलांसाठी विद्यापीठात पंधरा टक्के राखीव जागा
- शिक्षक आणि विद्यार्थी आंतरराष्ट्रीय पातळीवर देवाणघेवाण
- उच्च शिक्षणात संशोधन व नवनिर्मितीला प्राधान्य, संशोधन निधीत वाढ, संशोधनासाठी प्रस्ताव स्वीकृती विभागीय कार्यालयाकडून, संशोधनासाठी पायाभूत सुविधांची निर्मिती
- खाजगी व सार्वजनिक उद्योग 0.1 टक्के रक्कम संशोधनासाठी खर्च करणार
- संस्थेच्या व्यवस्थापन मंडळात शिक्षण क्षेत्रातील तज्ञ व व्यासंगी शिक्षकांची नियुक्ती
- शिक्षक प्रशिक्षण मनुष्यबळ विकास केंद्र विद्यापीठात विलीन
- महाविद्यालयीन प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा आणि स्वतंत्र अस्थापनाद्वारे प्रवेश होणार
- विद्यापीठ आणि महाविद्यालय पातळीवर शिक्षक प्रशिक्षण आणि शैक्षणिक कार्यक्रम
- पदवीनंतर एम.ए.शिवाय Ph.D.ला प्रवेश
- B.ed बारावीनंतर चार वर्षे आणि पदवीनंतर एक वर्ष
- प्रथम वर्षानंतर प्रमाणपत्र, द्वितीय वर्षानंतर पदविका आणि तृतीय आणि चतुर्थ वर्षानंतर पदवी
- विद्यार्थ्यांना एकाच वेळेस दोन ज्ञान शाखांचे विषय घेऊन पदवी मिळवता येईल.
- पाली,पर्शियन आणि प्राकृत भाषेत साठी स्वतंत्र संस्था
- राष्ट्रीय पोलीस आणि फॉरेन्सिक विद्यापीठाची स्थापना
- व्यवसायिक आणि ऑनलाईन शिक्षणाला प्राधान्य
- भारतीय विद्यापीठ जागतिक दर्जाचे बनवणे.
- राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 YouTube Video Link
- https://www.youtube.com/watch?v=rA-WZe5wzhg&t=9s
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.