ॲरिस्टॉटल-
• ॲरिस्टॉटल यांना राज्यशास्त्राचे जनक मानले जाते.
• ॲरिस्टॉटल हा प्लेटाचा शिष्य होता. त्यांचा जन्म इसवी सन पूर्व 384 मध्ये फेस थ्रेस
येथील स्टँगिरा येथे झाला. वडील निकोमेक्स मॅसिडोनियाच्या दरबार आज राजवैद्य होते. वडिलांच्या प्रभावाने त्यांच्यात विज्ञानाची रुची निर्माण झाली.
• वयाच्या अठराव्या वर्षी
प्लेटोच्या अकॅडमी संस्थेत दाखल झाले. प्लेटोच्या मृत्यूनंतर अकॅडमी सोडून बारा वर्षे भटकंती केली. या भटकंतीच्या काळात विविध देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास केला. सहा वर्ष अलेक्झांडर यांचा शिक्षक म्हणून काम केले.
• अथेन्समध्ये परत आल्यानंतर 'लिसियम'नावाची पाठशाळा सुरू केली. या पाठशाळेत अध्ययन-अध्यापन आणि ग्रंथ लेखन करू लागले.
• अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर लोक देश करू लागल्यामुळे अथेन्स सोडून कॅल्सिस येथे राहू लागले. इसवी सन पूर्व 322 मध्ये कॅल्सिस येथे त्यांचे निधन झाले.
• त्यांनी जवळपास विविध विषयांवर 400 ग्रंथ
लिहिले. त्यांच्या लिखाणावर प्लेटोच्या विचारांचा प्रभाव दिसून येतो.
• The
Politics आणि The Constitution हे दोन ग्रंथ राज्यशास्त्राच्या दृष्टीने महत्वपूर्ण मानले जातात.
• निरीक्षण, विश्लेषण आणि उपाय योजना या शास्त्रीय पद्धतीने लेखन केल्यामुळे त्यांना 40 शास्त्रांचे जनक मानले जाते. त्यांनी लेखन करताना जीवशास्त्रीय सिद्धांतांचा उपयोग केलेला आहे.
• राज्यशास्त्राचा जनक-
• प्लेटो ने सर्वप्रथम राजकीय विचारांची मांडणी केलेली असली तरी ॲरिस्टॉटल यांना राज्यशास्त्राचे जनक म्हटले जाते. त्याची कारणं खालीलपैकी होत.
• राज्यशास्त्र ला स्वतंत्र दर्जा व अस्तित्व मिळ्वून दिला.
• लिखाणात शास्त्रीय दृष्टिकोनाचा वापर- निरीक्षण, विश्लेषण व उपायोजना
• विगमनात्मक व ऐतिहासिक पद्धतीचा वापर- 'काय असावे 'यापेक्षा 'काय करणे शक्य आहे' यावर भर
• व्यवहारवादाचा अवलंब- वस्तुस्थितीचा विचार
• कायद्याला महत्व
• सार्वभौमिक विचार- मनुष्य एक राजकीय प्राणी आणि राज्य ही संस्था व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी निर्माण झाली आहे.
• व्यक्तिवादी व परंपरावादी- समतेला विरोध आणि विषमतेचा स्वीकार, संपत्तीचे अधिकाराचे समर्थन, गुलामगिरी सारख्या परंपरेचे समर्थन आणि विशिष्ट गुणवत्ता असलेल्यांना नागरिकत्व प्रदान करतो.
• मध्यममार्गी विचार- राज्यात मध्यमवर्गीयांची सर्वाधिक संख्या असण्यावर भर
• उपयुक्ततावादी- गुलामगिरी,संपत्ती, कुटुंब इत्यादींच्या उपयोगितेचा आधारावर समर्थन केले.
• ॲरिस्टॉटलचा प्रभाव- सेंट ऑगस्टीन, मॅकीव्हेली,डांटे,बाँदे, माँन्टेस्क्यू, हेगेल आणि कार्ल मार्क्स इत्यादी विचारवंतांवर प्रभाव
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.