संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे स्वरूप
- पात्रता- संघ लोकसेवा आयोग परीक्षा देण्यासाठी पुढील पात्रता असतात.
- उमेदवार भारतीय नागरिक असावा.
- मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उमेदवाराकडे असणे आवश्यक असते.
- वय- खुला प्रवर्ग 21 ते 32, इतर मागास वर्ग- 21 ते 35, अनुसूचित जाती जमाती, माजी सैनिक,खेळाडू आणि अपंग-21 ते 37 दरम्यान असणे आवश्यक असते.
- शासनाने निर्धारित केलेले शारीरिक मानक उमेदवाराने पूर्ण केले पाहिजे.
- संघ लोकसेवा आयोग परीक्षा खुल्या प्रवर्गातील उमेदवाराला सहा वेळा, इतर मागासवर्गीयांना नऊ वेळा अनुसूचित जाती जमाती अपंग आणि माजी सैनिकांना निर्धारित वयापर्यंत कितीही वेळा देता येते.
- पूर्व परीक्षा- पूर्व परीक्षेत दोन पेपर होतात.
- सामान्य अध्ययन पेपर 1- 200 गुणांचा पेपर असतो. शंभर बहुपर्यायी प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्न दोन गुणांचा असतो. पेपर सोडवण्यासाठी दोन तासाचा कालावधी असतो.
- चालू घडामोडी- 10 प्रश्न,
- इतिहास- 15
- भारत व जगाचाभूगोल-15 प्रश्न
- भारतीय राज्यपद्धती व प्रशासन-15 प्रश्न
- सामाजिक व आर्थिक विकास, पर्यावरण संदर्भात प्रश्न-15 प्रश्न
- सामान्य विज्ञान 15 प्रश्न विचारले जातात.
- सामान्य अध्ययन पेपर 2- C-SAT- या पेपर मध्ये 200 गुणांसाठी 80 बहुपर्यायी प्रश्न विचारले जातात.
- साधारणता भाषा करण्यासाठी उताऱ्यावरील 40 प्रश्न,
- तर्कसंगत विश्लेषण-8 प्रश्न
- निर्णय क्षमता व समस्या निराकरण-8 प्रश्न
- साधारण बुद्धिमत्ता चाचणी-8 प्रश्न
- अंक ज्ञान व माहिती विश्लेषण-8 प्रश्न
- मराठी व इंग्रजी भाषा आकलन-8 प्रश्न
- सामान्य अध्ययन पेपर 1 व 2 निगेटिव्ह मार्किंग असते. तीन चुकीच्या उत्तरा मागे एका प्रश्नाचे गुण कमी केले जातात.
- साधारणता दोन्ही पेपरमध्ये ते 33 टक्के गुण मिळवणारा विद्यार्थी मुख्य परीक्षेत पात्र समजला जातो.
- मुख्य परीक्षा- संघ लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेत 2350 गुणांसाठी 9 नऊ पेपर असतात. यातील भारतीय भाषा-300 गुण आणि अनिवार्य भाषा-300 गुण हे पात्रता पेपर असतात. पात्रता पेपर मध्ये किमान 25 टक्के गुण मिळवणे आवश्यक असते.
- पात्रता पेपरचे 600 अंतिम गुणवत्ता यादीत ग्राह्य धरले जात नाही.
- अंतिम गुणवत्ता यादी पेपर - अंतिम गुणवत्ता यादीसाठी 1750 गुणांसाठी एकूणच 7पेपर होतात. प्रत्येक पेपर 250 गुणांचा असतो.
- पेपर-1-निबंध-250 गुण
- पेपर 2- भारतीय वारसा व संस्कृती, इतिहास, भारत व जगाचा भूगोल-250 गुण
- पेपर 3- शासन राज्यघटना राजकारण, सामाजिक न्याय व आंतरराष्ट्रीयसंबंध-250 गुण
- पेपर 4- अर्थव्यवस्था पर्यावरण, विज्ञान व तंत्रज्ञान-250 गुण
- पेपर 5- नैतिकता निष्ठा,कल/ दृष्टिकोन-250 गुण
- पेपर 6 वैकल्पिक पेपर-250 गुण
- पेपर 7 वैकल्पिक पेपर-250 गुण
- मुलाखत- लेखी परीक्षेत किमान गुण मिळवणाऱ्या उमेदवारास मुलाखतीसाठी दिल्ली येथे बोलविले जाते. मुलाखत 275 गुणांची असते. मुलाखतीतून उमेदवाराची कार्यक्षमता,भाषा, प्रसंगावधान, त्वरित निर्णय क्षमता इत्यादींची तपासणी केली जाते. मुलाखतीतून उमेदवाराची भाषा, बुद्धिमत्ता आणि व्यक्तिमत्व समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो.
- नियुक्ती- मुख्य परीक्षेतील गुण आणि मुलाखतीतील कुणाच्या आधारावर अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केले जाते. उमेदवाराला मिळालेले गुण आणि मुख्य परीक्षेचा अर्जकरताना उमेदवाराने निर्धारित केलेल्या वरीयता क्रमानुसार शिफारस सरकारला केली जाते. शिफारशीनुसार सरकारउमेदवारांना नियुक्ती पत्र देते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतरस्थायी स्वरूपाची नेमणूक दिली जाते.
- YouTube Video Link
- https://www.youtube.com/watch?v=jJhT-9B1YTs&t=29s
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.