https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

सरपंच Sarpanch


 

सरपंच

  •  ग्रामपंचायतीच्या कार्यकारी राजकीय प्रमुख सरपंच असे म्हणतात.
  • भाजप-शिवसेना युती सरकारने 3 जुलै 2017 रोजी सरपंच थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय घेतला होता.
  • महा विकास आघाडी सरकारने जानेवारी 2020 मध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय रद्द करण्याची अध्यादेश काढला परंतु हा अध्यादेश राज्यपालांनी रद्द केला. 25 फेब्रुवारी 2020 रोजी महा विकास आघाडी सरकारने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विधेयक मंजूर करून सरपंच यांची निवड सदस्यांकडून करण्याचा नवा निर्णय घेतला.
  • सरपंचाची निवड-
  • मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कलम दहा नुसार ग्रामपंचायत सदस्यांची नावे प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्याने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलावली जाते. 
  • या बैठकीत नवीन कायद्यानुसार सदस्य आपल्यामधून एकाची सरपंच म्हणून निवड करतात. सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एकाची उपसरपंच म्हणून निवड करतात. सरपंच व उपसरपंच यांचा कार्यकाल पाच वर्षे इतका असतो. कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी स्व-इच्छेने राजीनामा देऊ शकतात.
  • ग्रामपंचायत सदस्यांनी दोन तृतीयांश बहुमताने अविश्वासाचा ठराव मंजूर केल्यास सरपंचाला आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो.
  • सरपंच मानधन-
  • सरपंचांना 3000 ते 5000 पर्यंत मानधन दिले जाते. गावाच्या लोकसंख्येनुसार निश्चित केले जाते.
  • उपसरपंच याला 1000 ते 2000 पर्यंत मानधन दिले जाते.
  • मानधनाची 75 टक्के रक्कम राज्य शासनाकडून दिली जाते. 25% रक्कम ग्रामपंचायत निधीतून खर्च केली जाते.
  • सरपंचाचे अधिकार व कार्य-
  • मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कलम 38 अन्वये सरपंचाकडे पुढील जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत.
  • ग्रामपंचायतीची बैठक बोलविणे आणि बैठकीचे अध्यक्षस्थान स्वीकारणे. सभेच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणे.
  • ग्रामपंचायतीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर देखरेख व नियंत्रण ठेवणे.
  • ग्रामसेवकांच्या मदतीने अर्थसंकल्प तयार करून सदस्यांकडून मंजूर करून घेणे.
  • ग्रामपंचायतीस आवश्यक असलेली विवरणपत्रे व कागदपत्रे  तयार करणे.
  • ग्रामपंचायत क्षेत्रासाठी विविध योजना तयार करणे व त्या मान्य करून घेणे.
  • ग्रामपंचायत दारे विविध योजनांची अंमलबजावणी करणे व त्यावर देखरेख ठेवणे. कर वसूली करणे.
  • ग्रामपंचायतीने संमत केलेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे.
  • गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आवश्यक कार्यक्रमांची आखणी करणे.
  • ग्रामपंचायतीचे सर्व कागदपत्रे, निवडणे आणि दस्तऐवज मागण्याचा अधिकार सरपंचाला असतो.
  • ग्रामपंचायत आणि पंचायत समिती यात समन्वय साधणे.
  • ग्राम सभेचे अध्यक्षपद सांभाळणे.
  • जिल्हा परिषद आणि राज्य शासनाने दिलेल्या आदेश व कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे.
  • सरपंचाचे अनुपस्थित ही कामे उपसरपंच पार पडतो.

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.