https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

अमेरिकन राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि वैशिष्ट्ये--Historical Background and Characteristic of American Constitution


 

अमेरिकन राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी-

       1492  मध्येअमेरिका खंडाचा शोध कोलंबसने लावला.

       1607 ते1732 पर्यंत इंग्लंडमधल्या लोकांनी अमेरिकेत तेरा वसाहती स्थापन केल्या.

       इंग्लंडमधील आर्थिक मंदी, पहिला जेम्स आणि पहिला चार्लस राजांनी केलेल्या प्रॉटेस्टंट पंथीयांचा छळ केला. या छळाला कंटाळून लोक अमेरिकेत पोहोचले आणि त्यांनी तेरा वसाहती स्थापन केल्या.

       वसाहतींचा दर्जा-

       अमेरिकेतील वसाहतींचा दर्जा समान नव्हता. त्यांचा दर्जा पुढीलप्रमाणे होता.

       1.क्राऊन वसाहती- इंग्लंडच्या राजाच्या अंमलाखाली आठ क्राऊन वसाहती होत्या.त्यांचा कारभार राजाने नेमलेल्या गव्हर्नर कडून चालवला जात असे.

       2.प्रोप्रायटरी वसाहती- प्रोप्रायटरी वसाहती तीन होत्या.त्यांना राजाकडून राज्यकारभाराचे अधिकार मिळाले होते. त्यांना खाजगी वसाहतीचा दर्जा होता.

       3.चार्टर वसाहती- दोन वसाहती चार्टर कॉलनी होत्या. राजाकडून मिळालेल्या आज्ञा पत्रानुसार एखादी व्यक्ती किंवा मंडळाकडून वसाहतीचा कारभार चालवला जात असे.

       वसाहतींमध्ये बहुसंख्य नागरिक इंग्लंड मधून आले होते.

       अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध-

       अमेरिकेतील वसाहतींवर इंग्लंडच्या राज्याची सार्वभौम सत्ता होती.1756 ते1763 काळातील इंग्लंड फ्रान्स मधील सप्तवार्षिक युद्धाची हानी भरून काढण्यासाठी ब्रिटिश संसदेने वसाहतींवर कर लादला.या करवाढीमुळे ब्रिटिश संसद आणि वसाहतींमध्ये संघर्ष सुरू झाला.’ प्रतीनिधित्वा शिवाय कर नाही.’ही घोषणा वसाहतीतील नेत्यांनी केली.

       राजा तिसऱ्या जॉर्जच्या सल्ल्यानुसार ब्रिटिश पार्लमेंटने चहा वगळता सर्व  वस्तूंवरील कर मागे घेतले. परंतु या कृतीने वसाहतींचे समाधान झाले नाही. त्यांना इंग्लंड पासून स्वातंत्र्य हवे होते.

       16 डिसेंबर 1773 रोजी क्रांतिकारकांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या जहाजातील चहा समुद्रात फेकून दिला. या कृती च्या विरोधात  कारवाई म्हणून मँसँच्युएटस वसाहतीची सनद रद्द केली.

       इंग्लंडने केलेल्या कृतीच्या विरोधात 5 सप्टेंबर 1774 रोजी फिलाडेल्फिया येथे पहिली कॉन्टिनेन्टल काँग्रेस बोलली. या परिषदेत ब्रिटिश सत्तेला विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला. ब्रिटिशांच्या विरुद्ध लढण्यासाठी जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय सेना उभारण्यात आली.

       थॉमस जेफर्सन यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा तयार करण्यात आला.

       4 जुलै 1776 रोजी अमेरिकन वसाहतींनी स्वातंत्र्याची घोषणा केली.

       स्वराज्याची घोषणा केल्यानंतर वसाहतीनी परिषद बोलून संघराज्याची घटना तयार करून  मान्यतेसाठी पाठवली.

       सर्व वसाहतीनी मान्यता दिल्यानंतर एक राज्यसंघ निर्माण करण्यात आला.

       राज्यसंघाचे स्वरूप-

       राज्य संघाच्या घटनेत अनेक उणिवा होत्या. राज्यांना फटून निघण्याचा अधिकार होता. काँग्रेसला मर्यादीत अधिकार होते. राज्यांवर नियंत्रण ठेवण्याचा काँग्रेसला अधिकार नसल्यामुळे राज्य प्रबळ बनली. वाढत्या राजकीय अस्थिरतेमुळे राज्य संघ नष्ट होण्याची चिन्हे दिसू लागली. राज्य संघाच्या घटनेत दुरुस्ती करण्यासाठी 28 मे 1778 मध्ये फिलाडेल्फिया येथे परिषद बोलवली. परिषदेत बारा राज्यांचे पंचावन्न प्रतिनिधी उपस्थित होते. परिषदेचे अध्यक्ष जॉर्ज वाशिंग्टन होते. परिषदेचे काम साडेतीन महिने चालले. परिषदेने राज्य संघाच्या घटनेत दुरुस्ती करण्या ऐवजी नवीन घटना तयार केली. या घटनेला 1789 पर्यंत अकरा साथीने मान्यता दिली.

       4 मार्च1789 रोजी नव्हे संघराज्य सरकार अस्तित्वात आले. 30 एप्रिल 1789 रोजी जॉर्ज वॉशिंग्टन अमेरिकेचे अध्यक्ष बनले. अमेरिकेत सुरुवातीला 13 राज्य होती. आता त्यांची संख्या पन्नास झालेली आहे.

अमेरिकन राज्यघटनेची वैशिष्ट्ये-

       फिलाडेल्फिया परिषदेने मंजूर केलेली राज्यघटना 30 एप्रिल 1789 पासून अंमलात आली.

       अमेरिकेची राज्यघटना सर्वात पहिली लिखित आणि संघराज्य व्यवस्थेचा स्वीकार केलेली राज्यघटना आहे.

       अमेरिकेची राज्यघटना सर्वात लहान राज्यघटना आहे.मूळ घटनेत सात कलमे आणि एकवीस पोट कलमे होती.

       घटनाकारांनी शासनास संबंधित मूलभूत तत्त्वांचा समावेश केलेला आहे.राज्‍य कारभाराबद्दलच्यासुधारणांची जबाबदारी शासनावर सोपविलेली आहे.

       अमेरिकेच्या घटनेत आज पर्यंत सत्तावीस दुरुस्त्या झालेल्या आहेत.

       घटनेच्या सहाव्या कलमानुसार राज्यघटना सर्वश्रेष्ठ आहे. घटनेतील तरतुदी सर्वांवर बंधनकारक आहेत. घटनेच्या श्रेष्ठत्वाच्या रक्षणाची जबाबदारी न्यायालयाकडे सोपवलेले आहे.

       अमेरिकन राज्यघटनेने जनतेचे सार्वभौमत्व मान्य केलेले आहे.

       सत्ता संतुलन आणि नियंत्रणासाठी घटनाकारांनी माँन्टेस्क्यूच्या सत्ता विभाजन सिद्धांताचा स्वीकार केलेला आहे. त्यासोबत नियंत्रण आणि संतुलन तत्वाचा वापर केलेला आहे. शासनाचे तिन्ही विभाग स्वतंत्रपणे काम करत असले तरी प्रत्येक विभाग दुसऱ्यावर नियंत्रण ठेवून सत्तेचा समतोल टिकून धरतो.

       घटनाकारांनी न्यायालयाला न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार दिलेला आहे. या अधिकाराचा वापर करून न्यायालय संघराज्य आणि राज्यघटना यांचे संरक्षण करते.

       अमेरिकेच्या मूळ घटनेत मूलभूत हक्कांचा समावेश नव्हता.1791मध्ये दहा दुरुस्त्या करून हक्कांचा घटनेत समावेश करण्यात आला. पारंपारिक लिखित हक्कांना मान्यता देण्यात आली. काही दुरुस्त्या नंतर करण्यात येऊन नवीन हक्कांचा समावेश करण्यात आला.

       अमेरिकेची राज्यघटना अत्यंत परिदृढ अशा स्वरुपाची आहे. घटनेत दुरुस्ती करण्यासाठी काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांनी दोन तृतीयांश बहुमताने आणि तीन चतुर्थास राज्यांनी मान्यता दिल्यानंतरघटनादुरुस्ती होते.

       अमेरिकन राज्यघटनेने अध्यक्षीय पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. अध्यक्षाची निवड जनतेकडून चार वर्षांसाठी केले जाते. अध्यक्ष हा कायदेमंडळाला जबाबदार नसतो.

       अमेरिकन राज्यघटनेने दुहेरी नागरिकत्वाचा स्वीकार केलेला आहे. प्रत्येक व्यक्तीला संघराज्य आणि घटक राज्याचे नागरिकत्व प्राप्त होते.

       अमेरिकन राज्यघटना संघराज्यवादी आणि संघराज्य विरोधी यांच्या तडजोडीतून तयार झालेली आहे.




 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.