https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

लोकमान्य टिळकांचे राजकीय विचार आणि सांस्कृतिक राष्ट्रवाद-- Political Thoughts and Cultural Nationalism of Lokmanya Tilak


 

लोकमान्य टिळकांचे राजकीय विचार-

•       टिळकांच्या राजकीय जीवनाचे दोन कालखंड आहेत.

•       राजकीय जीवनाच्या प्रथम कालखंडात ब्रिटिशांनी केलेल्या सुधारणा आणि कामाची प्रशंसा करतात. ब्रिटिशांमुळे भारतात कायदा-सुव्यवस्था शिक्षण आणि राष्ट्रवादी विचारांचे बीजारोपण झाले.

•       टिळकांची ब्रिटिश राजवट विषयी  सुरुवातीच्या काळातील भूमिका नेमस्तांच्या भूमिकेशी मेळ खाणारी होती.

•       टिळकांनी आपल्या राजकीय जीवनात सुरुवातीच्या काळात  ब्रिटिश राजवटीचे  समर्थन केले असले तरी  नंतरच्या काळात आपली भूमिका बदलली. ब्रिटिश राजवटीवर कठोर टीका करू लागले.

•       ब्रिटिश राजवटीला विरोध-

•       1896-97 च्या दुष्काळ निवारणाचा बाबत ब्रिटिशांनी फारसे प्रयत्न केले नाही. प्लेग निवारणाच्या काळात रँड व इतर अधिकाऱ्यांनी  जनतेवर केलेला अन्याय रोखण्यासाठी प्रयत्न केल्यामुळे टिळकांनी  केसरी व मराठा  वर्तमानपत्रात  ब्रिटिशांनी वर टीका केली.

•       लॉर्ड कर्झन यांनी केलेल्या बंगालची फाळणीमुळे टिळकांचा ब्रिटीश राजवटी वरील विश्वास उडाला.

•       बंगालच्या फाळणीला विरोध करण्यासाठी टिळकांनी वंगभंग आंदोलनाला पाठिंबा दिला.

•       कलकत्ता अधिवेशनात चतुःसूत्रीचा ठराव मांडून ब्रिटिशांविरोधात आक्रमक भूमिका घेतली.

•       भारताचा राज्यकारभार ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या लहरीवर चालतो. भारतीयांना ते राजकीय क्षेत्रात अमानुष वागणूक देतात.

•       प्रशासनातील वरिष्ठ जागांवर भारतीयांची नेमणूक करत नाही.

•       ब्रिटिशांच्या आर्थिक शोषणामुळे भारतात दारिद्रय वाढते आहे.

•       ब्रिटिश अधिकारी हुकूमशाही वृत्तीने वागतात.

•       सरकारी पैशाच्या जोरावर चैनी व विलासी जीवन जगतात.

•       ब्रिटिश अधिकाऱ्यांना भारतीयांच्या सुखदुःखाशी देणेघेणे नाही.

•       ब्रिटिश नोकरशाहीपासून देशाला वाचवण्यासाठी टिळकांनी जहालवादी भूमिकेचा  स्वीकार करून स्वराज्य प्राप्तीसाठी संघर्ष करण्याची जाहीर केले.

•       साम्राज्यशाहीची मीमांसा-

•       टिळकांनी ब्रिटिश राजवटीची खरे स्वरूप सर्वांसमोर उघड केले.

•       मवाळांच्या मांडणीतील कच्चे दुवे लक्षात घेऊन ब्रिटिश राजवटीच्या साम्राज्यशाही धोरणाची मीमांसा केली.

•       ब्रिटिशांचा उदारमतवादी, न्यायवादी आणि लोकशाहीवादी असल्याचा दावा  अमान्य केला.

•       ब्रिटिशांच्या साम्राज्यशाही नीतीला विरोध करण्यासाठी जहालवादी राजकारणाचा अवलंब केला.

•       ब्रिटिशांशी संघर्ष करण्यासाठी आवश्यक कार्यक्रम जनतेला दिला.

•       ब्रिटिश साम्राज्यशाही विरोधात राष्ट्रीय चैतन्य निर्माण करून स्वराज्य मिळवण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली.

•       सांस्कृतिक राष्ट्रवाद-

•       टिळकांनी भारतीय संस्कृतीच्या आधारावर राष्ट्रवादाची मांडणी केली.

•       गणेशोत्सव आणि शिवजयंतीच्या माध्यमातून हिंदू समाजात एकात्मता निर्मितीचे प्रयत्न केले.

•       राष्ट्रप्रेमाचा धर्माची जोड देऊन हिंदूंच्या परंपरांना राष्ट्रीय परंपरेत जागा मिळवून दिली.

•       टिळक सनातन धर्म, ऐतिहासिक परंपरा व संस्कृतीच्या आधारावर राष्ट्रवादाची बीजारोपण करण्याचा प्रयत्न करतात.

•       भारतीय राष्ट्रवादाचे मूळ पाश्चिमात्य संस्कृती नसून भारतीय संस्कृती असल्याचे नमूद करतात.

•       लोकांच्या धार्मिक भावनांचा वापर करून राष्ट्रीय कार्यासाठी प्रवृत्त करणे हे टिळकांच्या राष्ट्रवादाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.

•       भारतासारख्या विविधता असलेल्या देशात सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आधारावर राष्ट्रवादाची स्थापना करता येईल.

•       टिळकांनी हिंदू धर्मीयांच्या संघटनावर भर दिला.

•       हिंदू परंपरांना श्रेष्ठ मानून त्यांची राष्ट्रीय पातळीवर स्थापना करण्याचा प्रयत्न केला.

•       टिळकांसमवेत सर्व जहाल नेते ब्रिटिश आक्रमणाला  सांस्कृतिक आक्रमण मानत होते.

•       स्वातंत्र्य चळवळीचा विचार निव्वळ राजकीय सत्ता बद्दल न मानता नैतिक आणि अध्यात्मिक  मुक्तीचा मार्ग मानत होते.

•       टिळकांनी धर्माच्या आधारावर राष्ट्रवादाची मांडणी केलेली असली तरी परधर्मीयांच्या द्वेष केला नाही. लीग सोबत लखनौ करार घडवून आणण्यात पुढाकार घेतला.

•       टिळक हिंदू धर्माकडे भारतीयांना एकत्र आणणारा घटक म्हणून पाहतात.

•       हिंदू धर्मातील सामर्थ्य, बहुविविधता आणि स्वातंत्र्याला असलेले महत्त्व सर्वांना लक्षात आणून देतात.

•       हिंदू धर्म ग्रंथांना राष्ट्रीय ठेवा म्हणतात.

•       हिंदूंच्या समान सांस्कृतिक वारसाच्या आधारावर विविध पंथीयांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतात.

•       टिळकांच्या राष्ट्रवादावर भारतीय संस्कृती वेदातील अद्वैत वाद आणि मँल्लिनी बर्क इत्यादींचा प्रभाव दिसून येतो.

•       दादाभाई नवरोजी यांच्या आर्थिक शोषण सिद्धांताला आपल्या राष्ट्रवादात स्थान देतात.   

•     

 


1 टिप्पणी:

If you have any donuts. Lets me Know.