महान्यायवादी-
महान्यायवादी हा भारत सरकारचा अधिकृत कायदेविषयक सल्लागार असतो.
न्यायालयात सरकारची बाजू मांडत असतो.
घटनेच्या 76 व्या कलमात महान्यायवादी पदाबद्दल तरतुदी केलेल्या आहेत.
भारत सरकारची कायदेविषयक जबाबदारी कायदा व न्याय मंत्र सांभाळत असतो. परंतु तो कायदेतज्ञ असेलच असे नाही. सरकारी धोरणांना कायदेविषयक परिभाषेत रूपांतरित करण्यासाठी महानेवडी पदाची निर्मिती केलेली आहे.
पात्रता, नेमणूक आणि कार्यकाल-
घटनेच्या 76 {1} कलमानुसार महान्यायवादी ची नेमणूक करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो. साधारणता सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश पदासाठी पात्र असलेला व्यक्तीची राष्ट्रपती महान्यायवादी पदी नेमणूक करत असतो. अर्थात पंतप्रधान, कायदा व न्याय मंत्री यांच्याशी सल्लामसलत करून नेमणूक केली जाते. महान्यायवादी पुढील पात्रता आहेत.
1. भारतीय नागरिक 2. उच्च न्यायालयात वकिलीचा दहा वर्षे अनुभव किंवा पाच वर्षे न्यायाधीश पदाचा अनुभव 3. सुप्रसिद्ध कायदेपंडित 4. वय 65 पेक्षा जास्त नसावे.
महान्यायवादीच्या कार्यकाल बाबत घटनेत काही उल्लेख नाही. मंत्रिमंडळाची इच्छा असेपर्यंत तो पदावर राहू शकतो.
वेतन, अधिकार आणि कार्य-
महान्यायवादीच्या वेतना बद्दल घटनेत तरतूद नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला इतके वेतन त्याला दिले जाते. तो स्वतःहून पदाचा राजीनामा देऊ शकतो. घटनाबाह्य वर्तन केल्यास राष्ट्रपती पदावरून दूर करू शकतो.
महान्यायवादी हा केंद्र सरकारचा सर्वोच्च कायदा अधिकारी असतो. त्याला मदत व सहाय्य करण्यासाठी सॉलिसिटर जनरल व अतिरिक्त सॉलिसिटर जनरलची नेमणूक सरकारकडून केली जाते. महान्यायवादी पुढील प्रकारचे कार्य करतो.
राष्ट्रपतीला कायदेविषयक सल्ला देणे.
भारत सरकारचा अधिकृत वकील या नात्याने सरकार संबंधित खटल्यात सरकारची बाजू मांडणे व शपथपत्र दाखल करणे.
संसदेची संबंधित खटल्यात सरकारची बाजू मांडणे.
महान्यायवादीला भारतातल्या कोणत्याही न्यायालयात उपस्थित राहण्याचा अधिकार असतो.
महान्यायवादी संसदेच्या कामकाजात भाग घेऊ शकतो. चर्चा करू शकतो पण त्याला मतदानाचा अधिकार नसतो. संसदेत विचारल्या जाणाऱ्या कायदेविषयक प्रश्नांची उत्तरे तो देत असतो.
संसद सदस्य नसलेले सर्व विशेषाधिकार व संरक्षण कायद्याने त्याला प्राप्त होतात.
केंद्राप्रमाणेच राज्यपातळीवर राज्याची कायदेविषयक बाजू सांभाळण्यासाठी महाधिवक्ता हे पद निर्माण केलेले आहे. तो सरकारला कायदेविषयक सल्ला देऊन सरकारची बाजू भक्कम करण्याचे काम करतो.
सध्या काळातील काय त्याच्या वाढत्या गुंतागुंतीमुळे या पदाचे महत्त्व वाढलेले दिसून येते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.