सामाजिक व राजकीय चळवळी ऱ्हासाची कारणे-
• समाजातील महत्त्वपूर्ण घटक व व्यवस्था यात समाज हिताच्या बाजूने बदल घडून आणण्यासाठी किंवा समाजविघातक बदलांना संघटित विरोध करण्यासाठी समाजातील असंख्य व्यक्तींनी एकत्र येऊन हेतुपुरस्कर केलेला प्रयत्न म्हणजे सामाजिक चळवळ होय.
• सध्या कामगार आहेत पण चळवळी दिसत नाही. चळवळीतून नवीन नेतृत्व उदयाला येताना दिसत नाही. सध्या काळात व्यापक विषयावर चळवळी करण्यापेक्षा छोट्या-छोट्या विषयांवर चळवळी सुरू झाल्याने त्यांच्याविषयीची अस्मिता कमी झाली.
• चळवळीच्या नावाखाली बिगर सरकारी संघटनांचे पीकच जोरात आलेले आहे.
• जागतिकीकरणाच्या उदयाने संपूर्ण भारतीय समाजाचे संदर्भ व प्रश्न बदलले. जागतिकीकरणाच्या प्रभावाने क्रांतिकारी विचार बोथट झाल्यामुळे देखील चळवळी संपल्या. वाढत्या सामाजिक गतिशीलता मुळे संघर्ष नको सामोपचाराने रहा या विचारधारेने मुळे क्रांतिकारी जाणीवा बोथट होण्यास हातभार लागला.
• नेतृत्व व विचारप्रणालीचे उपयुक्तता संपल्याने किंवा चळवळी उद्दिष्ट हीन बनल्यामुळे संपल्या.
• प्रामाणिक व तळमळीच्या कार्यकर्त्यांचा अभावामुळे चळवळी संपल्या.
• प्रसिद्धी व सत्ताप्राप्तीसाठी कणा नसलेली माणसं चळवळीत शिरल्याने चळवळीच्या तत्वात काळानुरूप बदल केला नाही. कालबाह्य मागण्या घेऊन चळवळी सुरू राहिल्यामुळे चळवळी संपल्या.
• बदलते जनमताचा कानोसा न घेता आल्याने चळवळीची व्यवहार्यता संपून त्या इतिहासजमा झाल्या.
• चळवळीचे संदर्भ,नेतृत्व आणि प्रश्न बदलल्याने देखील चळवळी संपल्या .
• अनेक चळवळी भावनिकतेच्या बाहेर यायला तयार नसल्यामुळे देखील संपल्या.
• चळवळीच्या तत्वावर विश्वास नसलेली माणसे चळवळीत शिरली आणि त्यांनी चळवळ बळकाल्याने चळवळी संपल्या.
• चळवळीतील प्रमुख नेत्यांना दैवत्व बहाल करण्यात आले. चळवळीतल्या तत्त्वांकडे दुर्लक्ष करून नेत्यांचे गुणगान करण्याची स्पर्धा सुरू झाली.
• चळवळींचे संघटन जात, नातीगोती आणि धर्म या पारंपरिक परिघात अडकल्यामुळे चळवळीमध्ये कमालीचे साचलेपण आले आहे. चळवळीत समाजातल्या सर्व घटकांचे सामीलीकरण करून न घेतल्यामुळे विशिष्ट गटाच्या हातात चळवळीची सूत्रे व मक्तेदारी गेल्याने चळवळी संपल्या.
• वेळ, पैसा व ज्ञान इत्यादी सामाजिक भांडवल लोक द्यायला तयार नसल्यामुळे चळवळी संपल्या.
• चळवळींचे राजकीय पक्षात रूपांतर झाल्यामुळे आणि चळवळीचे कार्यकर्ते अनेक राजकीय पक्षात शिरल्यामुळे चळवळी संपल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.