https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

National Voters Day राष्ट्रीय मतदार दिवस


 राष्ट्रीय मतदार दिवस-

  • दरवर्षी 2011 पासून 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो. 25 जानेवारी 1950 रोजी निपक्ष आणि पारदर्शक पद्धतीने निवडणुका पार पाडण्यासाठी भारतीय निवडणूक आयोग या घटनात्मक संस्थेची स्थापना करण्यात आली.

  • राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात कायदा मंत्रालयाने दिलेल्या प्रस्तावानुसार माहिती  व प्रसारण मंत्री अंबिका सोनी यांनी 2011 पासून 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्याची घोषणा केली तेव्हापासून हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो.

  • राष्ट्रीय मतदार दिन उद्देश-

  • राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे तरुण मतदारांचा राजकीय प्रक्रियेत सहभाग वाढविणे आहे.

  • दरवर्षी एक जानेवारीपासून पात्र मतदारांची नोंदणी करण्यासाठी एक अभियान राबवले जाते. या अभियानाची सुरुवात देशातून 850000 मतदान केंद्रापासून सुरू होते. या अभियानाअंतर्गत 18 वर्षावरील मतदारांची नोंदणी करणे आणि त्यांना ओळखपत्र बहाल करणे यासाठी विशेष मोहीम राबवली जाते. या मोहिमेच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणावर शाळा महाविद्यालय आणि सार्वजनिक संस्थांच्या माध्यमातून मतदार नोंदणी जागृती अभियान राबवले जाते.

  • राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रम-

  • राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रमाच्या दिवशी मतदान जागृती साठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते त्यात व्याख्याने रॅली ,सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. सर्व मतदारांना शपथ दिली जाते. स्वतंत्र निपक्ष आणि शांततापूर्ण निवडणुका घेण्यासाठी आणि देशाची लोकशाही परंपरा कायम ठेवून धर्म जात भाषा आणि समुदाय यांचा प्रभाव न घेता निर्भयपणे मतदान देण्याचे वचन द्यावे लागते.

  • मतदार असल्याचा अभिमान,  मतदानासाठी तयार अशा घोषणा दिल्या जातात. मतदाराच्या अधिकारापासून कोणीही वंचित राहू नये या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.

  • राष्ट्रीय मतदार दिन महत्व-

  • भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. 65 टक्के मतदार तरुण आहेत. परंतु तरुणांचा मतदान प्रक्रियेतील सहभाग अत्यंत कमी आहे. त्यांचा सहभाग वाढवण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.

  • मतदार नोंदणी साठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी-कर्मचारी यांना मतदार दिनाच्या गौरविले जाते.

  • प्रत्येक नागरिकाने मतदान प्रक्रियेत भाग घेणे आवश्यक असते कारण निवडणुकीवर लोकशाहीचा डोलारा उभा असतो. सामान्य माणसाच्या मतातून सरकार तयार होत असते. प्रत्येक नागरिकाने विचारपूर्वक मतदान करावे ही जागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. 

  • निवडणुका आणि मतदान शांततेने आणि सनदशीर मार्गाने सत्तांतर करण्याचा एक प्रभावी मार्ग मानला जातो. त्यामुळे प्राचीन काळापासून मतदानाच्या माध्यमातून राज्यकर्ते निवडण्याची परंपरा भारतासह अनेक देशात अस्तित्वात होती याच परंपरेला प्रभावी बनवण्यासाठी मतदार दिन साजरा केला जातो. या दिवशी आयोगाच्या कार्याची ओळख करून दिली जाते. मतदानाचे महत्व पटवले जाते.

  • निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातून अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीचे, जातीय धार्मिक आणि संकुचित प्रवृत्तीचे प्रतिनिधी निवडून येतात आणि लोकशाहीला कलंकित करतात. म्हणून मतदारांना योग्य पद्धतीने जागृत केले तर सुयोग्य प्रतिनिधी निवडून येतील. प्रतिनिधींच्या दर्जावर लोकशाहीच्या दर्जा अवलंबून असतो. लोकशाहीचा दर्जा उंचावण्यासाठी आणि मतदारांना जागृत करण्यासाठी आणि मतदानाचे प्रमाण जास्तीत जास्त वाढवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.