https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

प्रजासत्ताक दिनाचा इतिहास History of Republic Day


 प्रजासत्ताक दिन-

  • 26 जानेवारी हा दिवस संपूर्ण देशभर प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. त्या दिवसाला गणराज्य दिवस असे देखील म्हणतात.

  • प्रजासत्ताक म्हणजे देशाची अंतिम सत्ता जनतेच्या हातात असणे होय. जनता सार्वभौम असून सत्तेची खरी मालक जनता आहे. जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून देशाच्या राज्यकारभार चालवत असतो.

  • गणराज्य म्हणजे राजा नसलेले किंवा देशाचा सर्वोच्च प्रमुख प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मार्गाने विशिष्ट काळासाठी जनतेकडून निवडून दिलेला असतो.

  • गणराज्य दिनाचा इतिहास-

  • 31 डिसेंबर 1929 रोजी लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू यांनी रवी नदीच्या तीरावर तिरंगा ध्वज फडकावून संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केली. इंग्रजांनी एका वर्षाच्या आत भारताला स्वातंत्र्य द्यावे ही मागणी केली. इंग्रजांनी या मागणीकडे दुर्लक्ष केलेले असले तरी 26 जानेवारी 1930 पासून दरवर्षी हा दिवस काँग्रेस स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा करत होती. या दिवसाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन घटना जरी 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी स्वीकृत करण्यात आलेली असली तरी तिची अंमलबजावणी मुद्दाम पुढे ढकलण्यात आली आणि 26 जानेवारी 1950 रोजी घटनेची अंमलबजावणी करण्यात आली. या दिवशी भारत सार्वभौम बनल्यामुळे प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो.

  • भारताला 15 ऑगस्ट 1947 या दिवशी स्वातंत्र्य मिळाले असले तरी 25 जानेवारी 1950 पर्यंत इंग्लंडची राणी भारताची अधिकृत प्रमुख होती. राणी चा प्रतिनिधी म्हणून भारताचा कारभार गव्हर्नर पाहत  असे. 26 जानेवारी 1950 पासून राष्ट्रपती हा भारताचा अधिकृत व कायदेशीर प्रमुख बनला. त्यामुळे हा दिवस साजरा केला जातो.

  • प्रजासत्ताक दिनी भारताची राजधानी नवी दिल्ली येथील रायसीना हिल्स पासून राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथावर संचलन केले जाते. सैनिकांचे स्मारक अमर ज्योती जवान याला पंतप्रधान पुष्पचक्र अर्पण करतात. दरवर्षी प्रजासत्ताक दिनी परराष्ट्रातील प्रमुखांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले जाते. राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजवंदन केले जाते. 21 तोफांची सलामी दिली जाते. देशासाठी शौर्य गाजवणाऱ्या सैनिकांना राष्ट्रपतींच्या हस्ते अशोक चक्र, कीर्ती चक्र आणि शौर्य गाजवणाऱ्या बालकांना राष्ट्रीय शौर्य पुरस्कार बहाल केले जातात.

  • प्रजासत्ताक दिन कार्यक्रम-

  • भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांचे आणि केंद्रीय पोलिस दलाचे संचलन प्रजासत्ताक दिनी आयोजित केले जाते. हे संचलन पाण्यासाठी देशातील अनेक मान्यवर नागरिक उपस्थित असतात. विविध राज्याचे चित्ररथ राजपथावर संचलन करतात.

  • राष्ट्रपती आणि पंतप्रधान देशाला उद्देशून भाषण करतात.

  • भारतातील प्रत्येक राज्यात राजधानीच्या ठिकाणी राज्यपालांच्या हस्ते ध्वजवंदन आणि पथसंचलन केले जाते.

  • प्रजासत्ताक दिनी सर्व शाळा महाविद्यालय आणि सार्वजनिक ठिकाणी ध्वजवंदन केले जाते. तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.