https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

Research Paper Writing संशोधन पेपर लेखन


 

  • संशोधन म्हणजे काय?-

  • कुतूहल  वा जिज्ञासेला संशोधनाची जननी असे म्हणतात.

  • संशोधनाला इंग्रजीत Research असे म्हणतात हा शब्द Re आणि Search या दोन संज्ञा पासून बनलेला आहे. त्याचा अर्थ परीक्षण करणे, चाचणी करणे व कसून तपासणी करणे.

  • संशोधन ही ज्ञाननिर्मितीची प्रक्रिया असते. ज्ञाननिर्मिती सोबत व्यावहारिक उपयोगासाठी संशोधन केले जाते.

  • संशोधनाच्या माध्यमातून कार्यकरणात्मक संबंध आणि मूलभूत नियमांचा शोध घेता येतो. शास्त्रीय संकल्पना ची निर्मिती करता येते. आणि सिद्धांत मांडता येतात. 

  • Research is a Scientific, Systematic, Comparative and Evaluative study of the finding new fact and theories or testing old fact and theories

  • संशोधन म्हणजे जुने तथ्य किंवा सिद्धांताची चाचणी किंवा नवीन तथ्य आणि सिद्धांताचा शास्त्रीय, तुलनात्मक, व्यवस्थित आणि परीक्षणात्मक अभ्यास होय.

  • संशोधन कमीत कमी वेळेत, श्रम,पैसा आणि संसाधने खर्च करून पूर्ण करता आला पाहिजे.

  • संशोधन पेपर लेखन-

    • संशोधन पेपरचे लिखाण हे व्यावसायिक स्वरूपाचे नसते तर अकॅडमिक स्वरूपाची असते. संशोधन पेपर च्या माध्यमातून समस्या विश्लेषण, अर्थनिर्वचन आणि निष्कर्ष काढून शास्त्रीय विधाने केली जातात.

    • संशोधन पेपर हा अत्यंत दीर्घ आणि तपशीलवार स्वरूपात लिहावा लागतो. त्याचे लेखन करण्यासाठी संशोधन कौशल्य आणि विषयाचे सखोल ज्ञान असणे गरजेचे असते. संशोधनाचे मांडणी करतांना वर्णनात्मक लिखाणावर भर न देता ज्ञानाचे स्रोत आणि पुरावे सादर करणे आवश्यक असते.

    • संशोधन पेपर लिहिण्याच्या आधी शोधगंगा, गुगल स्कॉलरवर संबंधित विषयात कोण कोणते संशोधन झालेले आहे याची तपासणी करावी.

    • संशोधन ही दीर्घकालीन प्रक्रिया असल्याने संशोधकाकडे चिकाटी असणे आवश्यक असते.

    • संशोधन पेपर लिहिण्यासाठी डॉक्टरची डिग्री आवश्यक नसते. पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेले विद्यार्थी देखील संशोधन पेपर लिहू शकतात. उच्च शिक्षणात कॅरियर निवडणारे विद्यार्थ्यांना संशोधन पेपर लिहिणे आवश्यक असते.

    • संशोधन पेपर सुरुवातीला एकदम संशोधन मासिकाकडे न पाठविता संशोधन परिषदेत सादर करणे योग्य असते. काही उच्च दर्जाच्या संस्थांच्या राष्ट्रीय परिषदेत सादर केलेले दर्जेदार पेपर संशोधन मासिकात प्रसिद्ध केले जातात. अनेक नामांकित संस्थांचे संशोधन मासिकं बरोबर करार केलेले असतात. त्यामुळे अशा संस्थांच्या राष्ट्रीय परिषदेत पेपर सादर केल्यास आपला पेपर प्रसिद्ध होऊ शकतो. परिषदेत पेपर परिषदेची Theme or Topic आणि Organiser चा विचार करून पेपर पाठवावा.

    • पीएचडीच्या डिग्रीसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना एक नामांकित संशोधन मासिकात काय संशोधन पेपर प्रसिद्ध करणे आवश्यक असते. विद्यापीठात महाविद्यालयात आणि संशोधन संस्थेत काम करणाऱ्या व्यक्तींना देखील संशोधन पेपर लिहिणे आवश्यक असते.

    • संशोधन पेपर लिहिण्याच्या पायऱ्या-

      • Tittle & Affiliation

      • Abstract & Key words

      • Introduction

      • Literature Review

      • Metrology & Experimentation

      • Results& Discussions

      • Conclusions

      • References

      • या संशोधन पेपर लिहिण्याच्या प्रमुख आठ पायऱ्या आहेत.

      • Abbreviations, Acknowledgement, Appendices यांचादेखील काहीवेळा समावेश केला जातो.

      • Title& -शीर्षक-

      • संशोधन पेपरचे शीर्षक आकर्षक आणि विषयाशी संबंधित असावे.

      • शीर्षकाच्या माध्यमातून प्रभाव पडणे आवश्यक असते. संशोधन शीर्षक सामान्यीकरण करण्याजोगी असावे. संशोधन विषयाची निवड करताना इतरांशी चर्चा करावी. स्वतःच्या मनात आलेल्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याच्या प्रक्रियेतून गृहीतके निर्माण होत असतात.

      • शीर्षकाची शब्दमर्यादा दीर्घ किंवा फार लहान असू नये.

      • शीर्षकातून विषयाचा बोध होणे आवश्यक आहे.

      • शीर्षक व्याकरणदृष्ट्या शुद्ध असावे.

      • संक्षेपात शीर्षक लिहू नये. शीर्षकात शब्दांची पुनरावृत्ती करु नये.

      • शीर्षकाच्या खाली लेखक आणि सहाय्यक लेखकांची नावे नमूद करावी. मुख्य लेखक साठ किंवा सत्तर टक्के तर सहाय्यक लेखकांना उरलेले गुण दिले जातात.

      • संशोधन समस्येतून संशोधनाचे शीर्षक तयार होते. संशोधन समस्या आपल्या मनात निर्माण होणे आवश्यक असते. या समस्येचे उत्तर शोधण्याच्या प्रक्रियेतून शीर्षक आणि गृहीतके निश्चित होत असतात. संशोधन विषय संशोधकाचा आवडीचा असावा.

      • शीर्षकात विचार समाविष्ट नसावा. ते शोधनीय असावे. Subjective, editorial असावे. त्यात द्विअर्थी शब्द, संदिप्ता असता कामा नये. Single phase form असावे.

      • Affiliation संबध्दता-

      • संशोधन संस्था किंवा काम करत असलेल्या संस्थेचा उल्लेख करावा.

      • सध्या कार्यरत असलेल्या पद आणि हुद्द्याचा उल्लेख करावा.

      • संशोधन स्थळाचा उल्लेख करावा.

      • लेखकाचा संपर्क पत्ता आणि ईमेल नमूद करावा.

      • Dr, Prof, इत्यादी नामाभिधानाचा लेखकाच्या नावापुढे उल्लेख करू नये.

      • Abstract & Key word- सारांश आणि मुख्य शब्द-

      • संशोधन पेपरचा सारांश 150 ते 300 शब्दात लिहावा.

      • सारांश मध्ये Reference, Table, figure, Chart चा वापर करू नये.

      •  संक्षेप वा Abbreviation चा वापर करू नये.

      • शब्दांची पुनरावृत्ती टाळावी.Abstract मध्ये संशोधन पेपरचा उपयुक्तता आणि सारांश नमूद करावा. विषयाचे महत्त्व, परिचय, संशोधन पद्धती आणि संशोधनातून हाती आलेल्या रिझल्ट ची चर्चा करावी.

      • संशोधनातील महत्त्वपूर्ण शब्दांचा वापर करावा.

      • संशोधनाचा थोडक्यात परिचय करून मूळ निष्कर्ष आणि उपयोजनाची शास्त्रशुद्धपणे मांडणी करावी.

      • चांगले Key words संशोधन पेपर मध्ये टाकावे जेणेकरून संशोधनाचे Citation वाढण्यास हातभार लागतो. साधारणता चार ते आठ Key words समावेश असणे गरजेचे असते.Key words चांगले असतील तर पेपर लवकर सर्च होऊ शकतो.keyword हा संशोधनाचा महत्त्वपूर्ण भाग असतो.

      • Importantance & Introduction
        महत्व आणि परिचय-

      • एक किंवा दोन परिच्छेदात संशोधन समस्येचा परिचय करून द्यावा.

      • संशोधनाचे महत्त्व थोडक्यात स्पष्ट करावे. आपण केलेल्या कामाची माहिती द्यावी. संबंधित विषयावर आत्तापर्यंत झालेल्या संशोधनाची चर्चा करावी.

      • संशोधन समस्या निवडण्याची कारण मीमांसा करावी.

      • परिचयात्मक स्वरूपाच्या लेखनातील वाक्य एकमेकांशी जुळणारे किंवा विशेष स्वरूपाचे असावीत.

      • विषयाची व्याप्ती, मर्यादा आणि भौगोलिक क्षेत्र नमूद करावे.

      • संशोधन पेपर लिहिण्याचे उद्देश स्पष्ट करावेत.

      • संशोधन पद्धतीचा उल्लेख करावा. संशोधनाचे निष्कर्ष, Objective, Study importance, finding, Result, Implication of Research or Outcome नमूद करावे. संशोधनाच्या भविष्यातील वापराबद्दल इतरांना माहिती देता येईल.

      • Literature Review पूर्व संशोधन आढावा-

      • आपल्या विषयाशी संबंधित संशोधन लेख, प्रबंध आणि प्रकाशित साहित्याचे विश्लेषण करावे. आपण निवडलेल्या विषयावर आजपर्यंत झालेल्या कामाचा उल्लेख करावा. दोन ते तीन ओळीत प्रत्येक पेपरचे विवेचन करावे.

      • आपल्या संशोधनाला पूरक असलेला भाग आणि यापूर्वीच्या संशोधकांनी केलेल्या कामाची चर्चा करून आपले संशोधन इतरांपेक्षा वेगळे कसे आहे हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करावा.

      • आपला संशोधन पेपर Research Gap ची पूर्ती करणारा किंवा संशोधन खंड भरून काढणारा असावा.

      • दहा ते बारा संशोधन पेपरांचे 1 ते 2 परिच्छेदात Literature Review मांडवा. थोडक्यात पूर्व संशोधन आराखडा Fining आणि पैलू मांडून आपले संशोधन इतरांपेक्षा कसे वेगळे आहे हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करावा .

      • Methodology & Experimentation संशोधन पद्धती आणि प्रयोग-

      • या भागाचे दोन तीन भागात विभाजन करता येऊ शकते.

      • What you did काय काम केले आणि How you did काम कसे केले याची मांडणी करावी. Tests, Analysis, Techniques बद्दल थोडक्यात चर्चा करावी. सांख्यिकीय आणि संगणकीय पद्धतीचा वापर केला असेल तर स्वतंत्र प्रकरण तयार करावे.

      • संशोधन पेपर लिहिताना कोणत्या संशोधन पद्धतीचा वापर केलेला आहे याची चर्चा प्रस्तुत भागांमध्ये करावी.

      • प्रायोगिक पद्धतीचा वापर केलेला असेल तर त्याबद्दल सविस्तर माहिती द्यावी.

      • प्राथमिक साधनाचा वापर, नमुना निवड पद्धतीचा वापर, इत्यादीबद्दल सविस्तर माहिती द्यावी.

      • Result & Discussion परिणामांची चर्चा-

      • प्रस्तुत विभागात आपल्या संशोधनाच्या निष्कर्षांची इतर संशोधनाशी तुलना करावी लागते. Method & Expriment मिळालेल्या परिणामांची चर्चा करावी. प्रत्येक पद्धतीतून मिळालेल्या परिणामांची चर्चा करणे आवश्यक असते.

      • या भागात Chat, Figure सांख्यिकीय विश्लेषणासाठी आवश्यक गोष्टींचा वापर करू शकतो.

      • संशोधनाच्या विश्लेषणासाठी वापरलेल्या सांख्यिकीय किंवा संगणकीय पद्धतीच्या वापराबाबत सविस्तर चर्चा करावी.

      • निष्कर्षाची वैधता Validation तपासण्यासाठी वापरलेल्या पद्धतींची चर्चा करावी. आपण केलेले काम शास्त्राच्या चौकटीत बसणारे आहे किंवा नाही यांची चर्चा करावी

      • Result अनेक विधानांना लागू करून त्याच्या परिणामाची पडताळणी करणे. वारंवार केलेल्या पडताळणीत सिद्ध झाले Result चा स्वीकार करणे.

      • Discussion-

      • Recap- संशोधनास कुठून सुरुवात केली होती आणि आपण काय शोधले किंवा कुठपर्यंत पोहोचलो याची मांडणी करणे.

      • Compare- आपल्या संशोधन परिणामाची दुसऱ्या संशोधन परिणाम सोबत तुलना करणे.

      • Significance- संशोधन परिणामाची वैशिष्ट्ये आणि महत्त्व विशद करणे.

      • Strengths- संशोधनाची शक्तिस्थळे वा उपयुक्ततेची मांडणी करणे.

      • Limitations- संशोधनाच्या मर्यादांची चर्चा करणे.

      • Conclusions निष्कर्ष-

      • संशोधनाचे फलित म्हणजे निष्कर्ष होय. संकलित त्यांचे विश्लेषण करून निष्कर्ष काढले जातात. निष्कर्षाची अचूकता आणि विश्वसनीयता पारखण्यासाठी शास्त्रीय पद्धतींचा वापर करून वारंवार पडताळणी करणे आवश्यक असते.

      • सर्व चाचण्यांमध्ये सिद्ध झालेली आणि अपयशी ठरलेल्या निष्कर्षांचा उल्लेख संशोधन लेखात करणे आवश्यक असते. निष्कर्षाचे सिद्धांतात रूपांतर करण्यासाठी त्यांच्या पडताळा कोणत्या पद्धतीने घेतलेला आहे याचे स्पष्टीकरण द्यावे लागते. निष्कर्षांना आवश्यक पुरावे देण्यासाठी Value, Figure,Table,Result base इत्यादी संदर्भात माहिती देणे आवश्यक असते.

      • संशोधन पेपरचा शेवटचा टप्पा. संपूर्ण काम Summarize पणे मांडणे. संशोधनाची उपयोगिता आणि उपयुक्ता आणि भावी संशोधनाला दिशा देणाऱ्या गोष्टींची चर्चा करावी.

      • References संदर्भ सूची-

      • संशोधन लेखाच्या शेवटी संदर्भसूची द्यावी लागते. संदर्भ सुचित संशोधनासाठी वापरलेल्या प्राथमिक आणि दुय्यम स्त्रोतांची माहिती द्यावी लागते. संदर्भसूची लिहिण्याच्या अनेक अस्तित्वात आहेत. APA-American Psychological Association,  MLA-Modern English Language Association, Chicago, Harvard, Vancouver Method

      • या विविध पद्धतीत पुस्तके, मासिके, प्रबंध, संशोधन लेख, वेबसाइट्स इत्यादी चे संदर्भ कसे लिहावे याबद्दल विविध पद्धती अस्तित्वात आहेत. कोणत्या पद्धतींचा वापर करावा संशोधन पेपर प्रसिद्ध करणाऱ्या मासिकाच्या धोरणावर अवलंबून असते.

      • Review of Literature चर्चा केलेले पेपर संदर्भ सूचीत समाविष्ट करावे. संदर्भसूची बिनचूक असणे आवश्यक असते. संदर्भ लिखाणाशी संबंधित असावे अन्यथा आपला पेपर रिजेक्ट होऊ शकतो.

      • Optional Part- वैकल्पिक भाग-

      • Abbreviations- संशोधन पेपर मध्ये एकच संकल्पना वारंवार वापरायचे असल्यास Short form मध्ये वापरावी. या भागात म्हणजे पेपर च्या शेवटी संकल्पनेचा Full form द्यावा.

      • Acknowledge- संशोधन पेपर लिहिण्यास सहकार्य करणारे व्यक्ती, संशोधन संस्था आणि संशोधनासाठी निधी उपलब्ध करून देणाऱ्या संस्थेचे आभार व ऋण व्यक्त करण्यासाठी या भागाचा वापर केला जातो.

      • Appendise- हा संशोधन लेखाचा अंतिम भाग असतो. त्यात संशोधनाशी संबंधित आवश्यक आणि उपयुक्त गोष्टींचा समावेश केलेला असतो. ज्या गोष्टींचा पेपरमध्ये समावेश नसतो. पेपर मध्ये सुटलेला भाग नंतर जोडलेल्या भागाचा समावेश परिशिष्टात जोडलेला असतो.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.