धर्मनिरपेक्षता- Secularism
धर्मनिरपेक्षता ही संकल्पना युरोपातील प्रबोधन युगातून जन्माला आलेली आहे. युरोपमध्ये मध्ययुगात राज्य आणि चर्च यांच्यात सत्तेसाठी संघर्ष सुरू होता. चर्चचा राजकारण आणि समाजकारणावरील प्रभाव कमी करण्यासाठी युरोपीयन देशात ही संकल्पना जन्माला आली. युरोपीयन देशात धर्मनिरपेक्षतेचे दोन प्रमुख प्रवाह आहेत त्यातील पहिला प्रवाहावर जॉर्ज जेकब हॉलिओक यांनी मांडलेल्या विचारांचा प्रभाव आहे. त्यांच्या मते," धर्म आणि राजसत्ता यात फारकत करावी परंतु व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनात धर्माची मूल्ये, महत्त्व आणि स्थान कायम राहू द्यावे. वैयक्तिक जीवनात धर्म पालनाची मुभा देण्यात यावी." या विचारांचा प्रभाव लोकशाही देशांवर पडलेला दिसतो. हॉलिओकचा समकालीन जोसेफ ब्रॅडली हे धर्मनिरपेक्षतेच्या दुसऱ्या प्रवाहाचेप्रतिनिधित्व करतात. त्यांच्या मते, "धर्माची राजकारणापासून निव्वळ फारकत करून चालणार नाही तर राजकारणातून धर्म बाद केला पाहिजे. व्यक्तीची धार्मिक जोखडातून मुक्ती केली पाहिजे." त्यांच्या विचारांचा प्रभाव समाजवादी आणि साम्यवादी देशांवर पडलेला दिसतो.
धर्मनिरपेक्षता
म्हणजे काय-
धर्मनिरपेक्षता शब्दाच्या अर्थाबाबत भारतात अनेक मते
मतांतरे आहेत. निधर्मीपणा,
सर्वधर्मसमभाव, धर्मतटस्थता आणि पंथनिरपेक्षता इत्यादी अर्थाने हा शब्द व्यवहारात वापरला जातो. धर्मनिरपेक्षतेची व्याख्या आणि अर्थाबाबत अभ्यासकांमध्ये अनेक मतभेद आहेत. त्यामुळे धर्मनिरपेक्षतेची सर्वसमावेशक व्याख्या करणे शक्य नाही. परंतु विविध अभ्यासकांनी केलेल्या व्याख्यांचा आशय लक्षात घेऊन धर्मनिरपेक्षतेत पुढील आशयाचा समावेश करता येऊ शकतो.
धर्मनिरपेक्षता म्हणजे धर्माला विरोध करणे नव्हे तर, कोणत्याही धर्माला विशेष महत्व न देता सर्व धर्मीयांना समान मानणे.
धर्माच्या आधारावर भेदभाव न करता सर्व धर्मान सोबत समान व्यवहार करणे आणि राज्याचा अधिकृत असा धर्म नसणे होय.
वैयक्तिक जीवनात धर्म पाळण्याची मुभा देणे.
पाश्चिमात्य धर्मनिरपेक्षता आणि भारतीय धर्मनिरपेक्षता- पाश्चिमात्य
धर्मनिरपेक्षता आणि भारतीय धर्मनिरपेक्षतेची कल्पना ही वेगवेगळी दिसून येते. कारण पाश्चिमात्य देश राज्य आणि धर्म यांच्या विभाक्तिकरणाच्या माध्यमातून धर्म आणि राज्य यांची एकमेकांपासून फारकत करण्याचा प्रयत्न करतात याउलट भारतातील धर्मनिरपेक्षता धर्म आणि राज्य संस्थेमध्ये तात्विक अंतर राखण्याचा प्रयत्न करते म्हणजे धर्म आणि राज्य यांची पूर्णपणे फारकत करत नाही.
पाश्चिमात्य देश धर्म आणि पारलौकिक बाबींना महत्त्व न देता ईहलोकांवर विश्वास व्यक्त करतात. त्यामुळे पाश्चिमात्य धर्मनिरपेक्षता आणि भारतीय धर्मनिरपेक्षता संकल्पनेत भेद आहे. भारतात धर्मनिरपेक्षतेचा विकास धार्मिक विविधतेतून झालेला आहे. पाश्चिमात्य देशात चर्चचा प्रभाव कमी करण्यासाठी धर्मनिरपेक्षता उदयाला आली भारतात धर्म
सहिष्णुतेच्या हेतूने धर्मनिरपेक्षता जन्माला आली. भारतात धर्म ही संकल्पना नैतिकता आणि भावनेशी जोडली जाते. त्यामुळे पाश्चिमात्य देशांत सारखे धर्माबाबत तटस्थ राहणे भारताला शक्य नव्हते म्हणून भारतात धर्मनिरपेक्षतेचा अर्थ सर्वधर्मसमभाव,
कायद्यासमोर सर्व धर्मांना समान स्थान, धर्माच्या आधारावर भेदभाव न करणे, राज्याचा अधिकृत धर्म नसणे इत्यादी संकल्पनांवर आधारलेला आहे.
धर्मनिरपेक्षता आणि भारतीय राज्यघटना- भारताच्या मूळ राज्यघटनेत धर्मनिरपेक्ष शब्दाचा समावेश नव्हता. घटना समिती सदस्य श्री. के. टी. शहा यांनी हा शब्द समाविष्ट करण्याची मागणी केली होती मात्र त्याची आवश्यकता नाही असे सांगून की सूचना फेटाळण्यात आली. 1976 मध्ये झालेल्या 42 व्या घटनादुरुस्तीने धर्मनिरपेक्षता शब्दाचा समावेश केलेला आहे. भारताच्या मूळ राज्यघटनेत धर्मनिरपेक्ष शब्दाचा समावेश नसला तरी 14,15,16
या कलमात राज्य धर्माच्या आधारावर भेदाभेद करणार नाही ही तरतूद केलेली आहे.25 ते 28 कलमात भारतीय नागरिकांना वैयक्तिक जीवनात पूजाच्या करण्याचा धर्म बदलण्याचा अधिकार दिलेला आहे. धार्मिक कार्यासाठी संस्था स्थापन करण्याचा आणि देणगी गोळा करण्याचा अधिकार दिला आहे. सरकारी किंवा सरकारी अनुदानावर चालणाऱ्या संस्थेत धार्मिक शिक्षण दिले जाणार नाही किंवा त्याची सक्ती केली जाणार नाही. घटनेच्या 29 व 30 व्या कलमात अल्पसंख्यांक समाजाच्या संरक्षणाची संबंधित असलेल्या तरतुदींचा समावेश केलेला आहे. या धर्मनिरपेक्षतेची संबंधित तरतुदी केलेल्या आहेत.
भारतातील धर्मनिरपेक्षता- धर्मनिरपेक्षता शब्द
मूळ
घटनेत
नसला
तरी
त्याच्या
आशयाशी
संबंधित
अनेक
मुद्द्यांचा
घटनेत
समावेश
होतो
म्हणून
1994 मध्ये एस. आर. बोम्मई विरुद्ध भारत संघ
या
खटल्याचा
निकाल
देताना
सर्वोच्च
न्यायालयाने
धर्मनिरपेक्ष
तत्वाला
भारतीय
संविधानाच्या
मूलभूत
ढाचा
एक
भाग
मानला
आहे.
सर्व
धर्माप्रती
समान
व्यवहार,
भारताचा
अधिकृत
धर्म
नसणे,
सरकार
कोणतेही
असले
तरी
सर्व
समुदायाच्या
धार्मिक
सण, उत्सव मदत व
सहकार्य
करणे,
सार्वजनिक
सुट्टी
देणे,
धार्मिक
उत्सवात
राजकीय
नेत्यांनी
सहभाग
होणे,
धर्मावर
आधारित
वैयक्तिक
कायदे
असणे
इत्यादी
गोष्टी
भारत
धर्मनिरपेक्ष
असल्याचा
दाखला
देतात.
भारतीय राज्यघटनेने देश आणि नागरिकांच्या कल्याणात धर्म अडथळा ठरणार नाही आणि व्यक्तीला वैयक्तिक जीवनात धर्माचे पालन करता येईल या दोन्ही गोष्टींचा विचार धर्मनिरपेक्षता तत्वात केलेला आहे. भारतातील प्रसिद्ध घटना तज्ञ दुर्गादास बसू
सांगतात की, "धर्मनिरपेक्षता धर्मप्रसार, धर्मश्रद्धा आणि धर्माचरणाचे स्वातंत्र्य बहाल करतो मात्र या स्वातंत्र्याचा उपभोग घेताना राष्ट्राच्या कायद्याचे उल्लंघन होता कामा नये.""
याचा अर्थ घटनाकारांनी धर्मनिरपेक्षता आणि धार्मिक स्वातंत्र्याला मान्यता दिलेली असली तरी कायद्याच्या चौकटीत राहून त्याचा वापर करणे आवश्यक आहे. कारण सामाजिक सुधारणा आणि राष्ट्रहितासाठी धर्मात हस्तक्षेप करण्याचा अधिकार शासनाला दिलेला आहे.
धर्मनिरपेक्षता मार्गातील आव्हाने-
भारतीय राज्यघटनेने धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाला मान्यता दिलेली असली तरी या तत्वाच्या मार्गात अनेक गंभीर अडथळे आहेत.
समान नागरी कायद्याचा अभाव- भारत धर्मनिरपेक्ष देश असला तरी सर्व धर्मियांसाठी सारखे कायदे नाहीत. वैयक्तिक कायदे हे धर्मावर आधारलेले आहेत. या गोष्टीमुळे धर्मा धर्मातील लोकांमध्ये तणाव किंवा हेवा दावा होत असतो.
सांप्रदायिकतेत वाढ- भारत हा देश धर्मनिरपेक्ष असला तरी देशात राहणाऱ्या विविध धर्मीयांमध्ये सांप्रदायिक तणाव निर्माण होऊन अनेक दंगली घडल्याची उदाहरणे आहेत. उदाहरणार्थ भारतात मोब लिंचीगच्याअनेक घटना घडलेल्या आहेत.
राजकाराणाचे धार्मिककीरण- भारतात धर्म आणि राजकारण यांचे एकत्रीकरण झालेले दिसून येते. भारतात अनेक पक्ष धर्मावर
आधारित राजकाराण करतात.भारतातील अनेक राजकीय पक्ष धार्मिक भावनांचा उपयोग करून सत्तेवर आल्याची उदाहरणे आहेत.
बहुसंख्यवादाचा अनुनय,
अल्पसंख्याकाचे तुष्टीकरण इत्यादी गोष्टी राजकारणाचे धार्मिककरण झाल्याची साक्ष देतात.
धर्म आणि राजकारणाच्या अभद्र युतीमुळे धर्मनिरपेक्ष तत्वाला खीळ बसते.
अशा पद्धतीने धर्मनिरपेक्षतेच्या मार्गात अनेक आव्हाने उभी आहेत.
भारतात खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व आणावयाचे असेल तर धर्माचा राजकारणात केल्या जाणाऱ्या वापरावर अंकुश लावणे गरजेचे आहे. धार्मिकतेच्या
राष्ट्रवादाच्या कल्पनेला हाणून पाडण्यासाठी सर्वसमावेशक स्वरूपाच्या भारतीय राष्ट्रवादाची कल्पना समाजात रुजविणे गरजेचे आहे. सर्व धर्मातील अनिष्ट प्रथा, परंपरा आणि रूढी नष्ट करण्यासाठी शासनाने आणि स्वयंसेवी संस्थांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
विसाव्या शतकातील राजकीय विचारप्रवाह
https://amzn.to/36LU5rh भारतीय संविधान आणि राज्यव्यवस्था पुस्तक link https://amzn.to/3iwtpjt
प्रशासनhttps://amzn.to/3kMDY4U आधुनिक राजकीय सिद्धांत पुस्तक https://amzn.to/3BLcdQm महाराष्ट्रातील सामाजिक-राजकीय चळवळी आणि महाराष्ट्र प्रशासन https://amzn.to/3iG9wXl-(boya Mic for good voice Quality for lecture and video) https://amzn.to/3y3Qr7Z (Adjustable Tripod and Stand ) https://amzn.to/36ZtgQy (Sony Camera)
https://amzn.to/2UGoDbB (Dell MS116 1000DPI USB Wired Optical Mouse)
Redmi note 10 amazon link-https://amzn.to/3y3e8gU
DEAL of the DAY-link https://amzn.to/3C0h3JI
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.