https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

छाया वा सावली मंत्रिमंडळ अर्थ आणि कार्य Shadow Cabinet


 छाया वा सावली मंत्रिमंडळ  अर्थ Shadow Cabinet-

        लोकशाही व्यवस्थेत सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्ष दोन्ही महत्त्वपूर्ण असतात. सत्ताधारी पक्षाला सरकार चालवण्याचा आणि विरोधी पक्षाला विरोध करण्याचा जनादेश मिळालेला असतो. या जनादेशाचा वापर करून विरोधी पक्ष छाया मंत्रिमंडळाच्या माध्यमातून सरकारच्या कार्यावर  अंकुश ठेवू शकतात.

        छाया मंत्रिमंडळ इंग्लंडमधील वेस्ट मिनिस्टर प्रणालीच्या अंतर्गत करणारी एक राजकीय संस्था आहे. छाया मंत्रिमंडळातील सदस्य सत्ताधारी पक्षाच्या मंत्रिमंडळाच्या कार्यप्रणालीवर लक्ष ठेवणारी एक समिती असते.

        छाया मंत्रिमंडळात विरोधी पक्षातील ज्येष्ठ खासदारांचा एक गट विरोधी पक्षाच्या नेतृत्वाखाली सरकारच्या अधिकृत मंत्रिमंडळाच्या विरोधात एक पर्यायी मंत्रिमंडळ तयार करते. या मंत्रिमंडळातील प्रत्येक सदस्य सरकारच्या मंत्र्या प्रमाणे असतो याचा अर्थ सरकारच्या मंत्र्यांच्या विरोधात विरोधी पक्षाचा एक मंत्री अशी रचना असते या रचनेला छाया मंत्रिमंडळ असे म्हणतात.

        जग आणि छाया मंत्रिमंडळ-

        ब्रिटनमध्ये छाया कॅबिनेट हा प्रयोग अत्यंत यशस्वी झाला आहे.

        छाया मंत्रिमंडळाला वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते.

        कॅनडात आपोजीन क्रिटिक्स वा विरोधी टीकाकार

        न्युझीलंड मध्ये प्रवक्ता

        युकेत हाऊस ऑफ लॉर्डस

        छाया मंत्रीमंडळ कार्य-

        छाया मंत्रिमंडळातील प्रत्येक सदस्य त्याच्याकडे सोपविलेल्या मंत्रालयाचा आढावा घेऊन सरकारच्या धोरणावर हल्ला चढवतो किंवा सरकारच्या कामाबद्दल लोकांना जागृत करण्याचे काम करतो.

        भविष्यातील निवडणुकीत विरोधी पक्ष सत्तेवर आला तर छाया मंत्रिमंडळात कार्य केलेल्या मंत्र्यांना त्याच्या कार्याचा अनुभव लक्षात घेऊन त्या मंत्रालयाचे मंत्री म्हणून नेमले जाते. अर्थात अशाप्रकारची नेमणूक करणे बंधनकारक नसते.संसदीय  मंत्रिमंडळात मंत्र्यांची नेमणूक करण्याचा  अधिकार पंतप्रधानाला असतो

        छाया मंत्रिमंडळ सत्तापक्ष मंत्रिमंडळाच्या कार्यप्रणालीवर लक्ष ठेवणारी एक समिती असते.

        समितीतील सदस्य मंत्र्यांच्या विरोधात आघाडी उघडत असतात. सरकारी मंत्र्याच्या कामकाजाची समीक्षा करत असतात. सरकारी मंत्र्याच्या खात्याशी संबंधित सरकारी धोरणे आणि कामकाजावर बारकाईने नजर ठेवणे. सरकारी कारभारातील त्रुटी उघड करणे आणि पर्यायी धोरणे सादर करणे हि कामे करत असतात.

        सावली मंत्रिमंडळातील सदस्य मंत्रालयातील कामकाजाच्या चुका शोधून सर्वांसमोर मांडण्याचा कार्य करतात.

        सरकारच्या धोरणांना पर्याय सुचवणे हि सावली मंत्रीमंडळाची जबाबदारी असते.

        छाया मंत्रिमंडळ सामान्य मतदाराच्या मनात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यातील विचार आणि कार्य करण्याच्या पद्धतीच्या फरका बद्दल जाणीव विकसित करत असतात.

        भारत आणि छाया मंत्रिमंडळ-

        भारतात छाया मंत्रिमंडळाची परंपरा आढळून येत नाही.

        आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू आणि काँग्रेस पक्षाने छाया मंत्रिमंडळ समिती स्थापन करण्याची घोषणा केली होती. महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप युतीने 2005 मध्ये आणि मध्य प्रदेशात काँग्रेस पक्षाने शिवराजसिंग चव्हाण मंत्रिमंडळाला विरोध करण्यासाठी समित्या स्थापन केल्या होत्या परंतु त्या कार्यक्षमतेने काम करु शकले नाहीत.

        भारतात इंग्लंड सारखी मजबूत विपक्ष पद्धती अस्तित्वात नाही. भारतात विरोधी पक्ष विखुरलेले, कमजोर आणि गोंधळलेले आहेत. विरोधी पक्ष खूपच कमजोर आहेत. 2014 च्या निवडणुकीनंतर भारतात अधिकृत विरोधी पक्ष देखील अस्तित्वात नाही. विरोधी पक्ष कमकुवत असल्यामुळे सरकारवर त्यांचा फारसा प्रभाव पडत नाही.

        संख्येच्या अभावामुळे विरोधी पक्ष रचनात्मक कार्य ऐवजी विरोधासाठी विरोध करताना दिसतो.

        भारतातील सत्ताधारी देखील विरोधकांच्या विरोधाला फारशी किंमत देत नाही. बहुमताच्या जोरावर आपले निर्णय घेतात.

         भारतात विरोधकांच्या मतांचा आदर करण्याऐवजी त्यांना राष्ट्रविरोधी किंवा विकास विरोधी ठरवून विरोधी पक्ष मुक्त लोकशाहीची भलामण करतात. उदाहरणार्थ भाजपची काँग्रेसमुक्त भारताची घोषणा

        सत्ताधाऱ्यांच्या मनमानीमुळे अनेकदा विरोधी पक्ष हतबल होतात.

         भारताच्या लोकशाहीला मजबुती प्राप्त करून द्यायची असेल तर भारतातील विरोधी पक्षांनी छाया मंत्रिमंडळाचा प्रयोग गांभीर्याने राबवण्यास सुरुवात केली पाहिजे. या प्रयोगातून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी हातभार लागेल. सत्ताधारी पक्षावर अंकुश निर्माण करता येईल. लोकांपुढे योग्य विचार आणि पर्याय पोचविता येतील.


Green Background Product Link- (Purchase Removing Video Backgroud to use Chroma Key)


https://amzn.to/3eGUXSh (Tripod) https://amzn.to/3rBeqt3 आधुनिक राजकीय विचारवंत पुस्तक
Amazon Associate Product Link- विसाव्या शतकातील राजकीय विचारप्रवाह https://amzn.to/36LU5rh भारतीय संविधान आणि राज्यव्यवस्था पुस्तक link https://amzn.to/3iwtpjt https://amzn.to/3kMDY4U आधुनिक राजकीय सिद्धांत पुस्तक https://amzn.to/3BLcdQm महाराष्ट्रातील सामाजिक-राजकीय चळवळी आणि महाराष्ट्र प्रशासन https://amzn.to/3y3Qr7Z (Adjustable Tripod and Stand ) https://amzn.to/36ZtgQy (Sony Camera) Link Boya Mic- https://amzn.to/3zdpJds ( Purchase for Good Voice Quality for Youtube Video) Green Background Product Link- (Purchase Removing Video Backgroud to use Chroma Key) https://amzn.to/2VXNLuB https://amzn.to/3eGUXSh (Tripod) https://amzn.to/3rBeqt3 आधुनिक राजकीय विचारवंत पुस्तक

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.