घटना समिती- Constitution Assembly
कॅबिनेट मिशन योजनेनुसार जुलै 1946 मध्ये घटना समितीच्या अप्रत्यक्षपणे निवडणुका घेण्यात आल्या. प्रांताच्या कायदेमंडळाकडून घटना समिती सदस्य निवडण्यात आले. मूळ योजनेनुसार घटना समितीत 389 सदस्य होते. त्यात 296 सदस्य ब्रिटिश प्रांतातून आणि 93 सदस्य स्थानिकांकडून निवडायचे होते. बहुसंख्य संस्थानिक भारतात विलीन झाल्यामुळे संस्थानिकांच्या जागा भरल्या गेल्या नाहीत. घटना समितीच्या निवडणुकीत काँग्रेसला 208, मुस्लिम लीग 73, पंजाब युनियानिस्ट पक्ष 3, दलित उद्धार पक्ष 3, साम्यवादी पक्ष 1, शेतकरी प्रजा पक्ष 1, स्वतंत्र 8 असे एकूण 296 सदस्य निवडून आले.
घटना समिती सदस्य-
घटना समितीत काँग्रेस पक्षाला बहुमत मिळाले. मुस्लिमांसाठी राखीव 76 जागांपैकी 73 जागा मुस्लिम लीगला मिळालेल्या. घटना समितीत अनेक नामवंत व्यक्ती निवडून आल्या. डॉ.राजेंद्र प्रसाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेल, गोविंद वल्लभ पंत, मौलाना आजाद,
आचार्य कृपलानी इत्यादींचा समावेश होता. दुर्गाबाई देशमुख, हंसा मेहता, बेगम रसूल, विजयालक्ष्मी पंडित, सरोजनी नायडू, पोर्णिमा बॅनर्जी, राजकुमारी अमृतकौर इ
. 15 महिला सदस्य घटना समितीत निवडून आल्या
होत्या. काँग्रेसला बहुमत मिळाल्यामुळे आपल्याला
दुय्यम भूमिका स्वीकारावी लागेल. भयाने मुस्लिम लीगने घटना समितीच्या कामकाजावर बहिष्कार
टाकला, घटना समितीची बैठक स्थगित करावी ही
मागणी केली. काँग्रेस आणि मुस्लीम लीग मध्ये तडजोडीचे
अनेक प्रयत्न झाले परंतु ते यशस्वी झाले नाही.
घटना समिती सत्र-
मुस्लिम लीग सदस्यांच्या अनुपस्थित 9 डिसेंबर 1946 रोजी डॉ. सच्चिदानंद सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे बैठक झाली. या बैठकीला 207 सदस्य उपस्थित होते. या बैठकीत डॉ. राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.13 डिसेंबर 1946 रोजी पंडित नेहरू यांनी सार्वभौम, प्रजासत्ताक, गणराज्य निर्माण करण्याबाबत घटना समितीत उद्देश पत्रिकेचा ठराव मांडला. 13 डिसेंबर ते 23 डिसेंबर 1946 या कालावधीत घटना समितीचे पहिले सत्र समाप्त झाले.
घटना समितीतील समित्या-
दुसऱ्या सत्रात पंडित नेहरूंनी मांडलेल्या उद्देश पत्रिकेचे ठरावावर चर्चा होऊन संमत करण्यात आला. परंतु मुस्लिम लीगने टाकलेल्या बहिष्कारामुळे घटनेच्या कामाला गती येऊ शकले नाही. मात्र देशाच्या फाळणीनंतर घटनेच्या कामकाजाला गती आली. घटनेचे तिसरे सत्र 22 एप्रिल ते 2 मे 1947 पर्यंत चालले. या सत्रात विविध समित्यांची निर्मिती करण्यात आली. विविध कार्यासाठी 22 समिती आणि उपसमित्याची
निर्माण करण्यात आल्या. 14 जुलै ते 21
जुलै 1947 चवथे सत्र भरले.
• सुकाणू समिती-अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद
• संघ संविधान समिती-अध्यक्ष पंडित नेहरू-
• राज्य अधिकार समिती-अध्यक्ष पंडित नेहरू
• मूलभूत अधिकार व अल्पसंख्यांक समिती- अध्यक्ष सरदार पटेल,
• प्रांतीय संविधान समिती-अध्यक्ष सरदार पटेल
• कार्य संचालन समिति-डॉ.कन्हैयालाल मुन्शी अध्यक्ष
मसुदा समिती-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली 29 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली. या समितीत सात सदस्य होते. के.एम.मुन्शी,
डी.पी. खेतान, गोपालस्वामी अय्यंगार, सय्यद सादुल्लाह, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर,(बी.एल. मिल्लर
राजीनामामुळे) एन. माधवराव हे सदस्य बनले होते. डी.पी. खेतान यांच्या मृत्यूनंतर टी.टी. कृष्णमाचारी यांची निवड करण्यात आली. बी. आर. राव हे घटना समितीचे कायदेविषयक सल्लागार होते. मसुदा समितीने जगातील विविध देशांच्या घटनांचा अभ्यास करून घटनेचा कच्चा आराखडा प्रसिद्ध केला आणि या आराखड्यावर सूचना करण्यासाठी आठ महिन्याचा कालावधी भारतीयांना उपलब्ध करून दिला. या आराखड्यावर जवळपास 7725 सूचना जनतेकडून आल्या त्यापैकी 2473 सूचनांवर विचार करण्यात आला.
घटनेचा अंतिम टप्पा-
घटनेच्या मसुद्याची तीन वाचन करण्यात आले.
प्रथम वाचन- 4 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर 1948
दुसरे वाचन- 5 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर 1949
तिसरे वाचन- 4 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 1949
घटनेच्या आराखड्यावर 114 दिवस विस्तृत चर्चा झाली.तिसऱ्या वाचनानंतर 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी घटना समितीने घटना स्वीकृत केली. 26 जानेवारी 1950 पासून घटनेची अंमलबजावणी सुरू झाली. घटना तयार करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस इतका कालखंड लागला. घटना तयार करण्यासाठी जवळपास 63 लाख 96 हजार 729 रुपये खर्च आला. मूळ
घटनेत 395 कलमे 8 परिशिष्टे आणि 22 विभाग आहेत सध्या घटनेत 448 कलमे 12 परिशिष्टे आणि 24 विभाग आहेत.
विसाव्या शतकातील राजकीय विचारप्रवाह
https://amzn.to/36LU5rh भारतीय संविधान आणि राज्यव्यवस्था पुस्तक link https://amzn.to/3iwtpjt
प्रशासनhttps://amzn.to/3kMDY4U आधुनिक राजकीय सिद्धांत पुस्तक https://amzn.to/3BLcdQm महाराष्ट्रातील सामाजिक-राजकीय चळवळी आणि महाराष्ट्र प्रशासन https://amzn.to/3iG9wXl-(boya Mic for good voice Quality for lecture and video) https://amzn.to/3y3Qr7Z (Adjustable Tripod and Stand ) https://amzn.to/36ZtgQy (Sony Camera)
https://amzn.to/2UGoDbB (Dell MS116 1000DPI USB Wired Optical Mouse)
Redmi note 10 amazon link-https://amzn.to/3y3e8gU
DEAL of the DAY-link https://amzn.to/3C0h3JI
very informative
उत्तर द्याहटवा