समाजवाद- Socialism
समाजवाद ही राज्यशास्त्रातील अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे. ही संकल्पना समजण्यापूर्वी भांडवलशाही संकल्पना अभ्यासणे आवश्यक आहे. औद्योगिक क्रांतीतून भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा उदय झाला. भांडवलशाही अर्थव्यवस्थेतून मानवी विकासाला चालना मिळून दारिद्र्य आणि बेरोजगारी दूर होईल अशी अपेक्षा होती. ॲडम स्मिथ आणि अनेक अर्थशास्त्रज्ञांनी भांडवलशाहीचे गुणगान केले. भांडवलशाही अर्थव्यवस्थेने आर्थिक प्रगती साध्य केली मात्र श्रमिकांच्या शोषणाला आणि पिळवणुकीला हातभार लावला. समाजात विषमता निर्माण केली. मूठभर लोकांच्या हातात संपत्ती आणि उत्पादन साधनांचे केंद्रीकरण झाले. युरोपियन देशात अठराव्या शतकामध्ये भांडवलशाही व्यवस्थेने निर्माण केलेली विषमता, संपत्तीचे केंद्रीकरण आणि श्रमिकांचे शोषण नष्ट करण्यासाठी समाजवाद नावाचा नवा विचार पुढे आला. समाजवाद ही भांडवलशाही व्यवस्थेतून निर्माण झालेल्या समस्यांच्या विरोधातील एक प्रतिक्रिया मानले जाते.
समाजवाद म्हणजे काय-
समाजवाद हा शब्द sociare या लॅटिन शब्दापासून बनलेला आहे. त्याचा अर्थ to share, to combine असा होतो. समाजवाद शब्दाचा शब्दशः अर्थ समाजहिताचा विचार करणारा किंवा समाजाला महत्त्व देणारा विचार होय. समाजवाद हा श्रमिकांना न्याय देणारा आणि नव समाजरचनेची पायाभरणी करणारा विचार आहे.
समाजवाद म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी त्याच्या परिभाषा लक्षात घेणे आवश्यक आहे. परंतु समाजवादाची निश्चित स्वरूपाची परिभाषा अस्तित्वात नाही. सी.इ.एम.जोड यांनी 'समाजवाद वापरून वापरून गुळगुळीत झालेले एक नाणे आहे. किंवा वापरून वापरून आकार बदलणारी टोपी आहे.' असे मत व्यक्त केले
• बर्न- यांच्या मते, समाजवाद म्हणजे समाज हितासाठी प्रमुख उत्पादन व विनिमय साधनावरची खाजगी मालकी नष्ट करून त्यावर सामुदायिक मालकी प्रस्थापित करणे होय.
• बट्रोल रसेल- भूमी आणि संपत्तीची सामूहिक मालकी प्रस्थापित करणारा विचार म्हणजे समाजवाद होय.
समाजवादाची वैशिष्ट्ये-
• उत्पादन साधनावर समाजाचे स्वामित्व
• समान संधी आणि दर्जाचे समर्थन
• स्वार्थी व्यक्तिवाद आणि भांडवलशाहीला विरोध
• अनिर्बंध स्पर्धे आणि खाजगी उत्पादनावर लगाम
• समुदाय सहयोगावर भर
• समतामूलक समाजाची स्थापना
• मूलभूत गरजापूर्ती आणि समाज कल्याणावर भर
भारतातील समाजवादाचा विकास-
• भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील अनेक नेत्यांवर समाजवादी विचारांचा पगडा होता. पंडित नेहरूंवर फेबियन समाजवादाचा पगडा होता. त्यांनी रशियाला दिलेल्या भेटीतून समाजवादी विचारांवरील निष्ठा आणखी बळकट झाली. लाहोर अधिवेशनात समाजवादाला पूरक विचार मांडले. काँग्रेस अंतर्गत लोकशाही समाजवादी पक्ष स्थापनेला आपला पाठिंबा दिला.1936 मध्ये फैजपूर येथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशनात मानवी जीवनातील प्रश्न सोडविण्याची ताकद समाजवादात आहे. समाजवादाच्या माध्यमातून भारतातील दारिद्र्य, शोषण आणि विषमतेचा शेवट करता येईल असे मत व्यक्त केले.
भारतीय राज्यघटना आणि समाजवाद-
22 जानेवारी 1947 रोजी पंडित नेहरू यांनी मांडलेल्या उद्देश पत्रिकेचे ठरावात भारतात सामाजिक आणि आर्थिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी लोकशाही समाजवाद निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल करण्याचे आश्वासन देण्यात आले. अनंतशयनम
अय्यंगार आणि प्रा. के.टी. शहा यांनी समाजवाद
शब्द घटनेत समाविष्ट करण्याचा आग्रह धरला होता परंतु पंडित नेहरू यांनी या शब्दाच्या
समावेशाला विरोध केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय अर्थव्यवस्था राज्य समाजवादी
असावी हे मत व्यक्त केले आणि अर्थव्यवस्था प्रस्थापित करण्याचे कार्य विधिमंडळाच्या
इच्छेवर न सोडता घटनात्मक विधीनियमाद्वारे निश्चित करावे. ही अर्थव्यवस्था विधिमंडळ आणि
कार्यकारी मंडळाला कायदा करून बदलता येणार नाही असे मत मांडले परंतु डॉ. आंबेडकर यांची
योजना मूलभूत हक्काच्या क्षेत्रापलीकडे जाईल असा आक्षेप घेऊन घटना समितीने फेटाळून
लावली. समाजवाद शब्दाचा घटनेत समावेश नसला तरी मूलभूत हक्क, 36 ते 51 कलमामधील मार्गदर्शक
तत्त्वात समाजवादाला पूरक असलेले अनेक तत्त्वांचा समावेश आहे. उदा. उत्पादन
साधनांचे केंद्रीकरण करणारी अर्थव्यवस्था नसावी. काम धंदा व्यवसाय बाबत न्याय
व माणुसकीचे वातावरण तयार करावे. बेकारी वृद्धत्व आजारपण इत्यादींपासून रक्षण करण्यासाठी सरकारने
मदत करावी.
स्वातंत्र्योत्तर काळातील समाजवादाचा विकास-
पंडित नेहरू यांनी समाजवाद शब्दाला विरोध केलेला असला तरी मिश्र अर्थव्यवस्था, नियोजन आयोग आणि पंचवार्षिक योजनांची आखणी करून समाजवादाला पूरक कार्यक्रम अमलात आणण्यास सुरुवात केली
1955 साली काँग्रेसच्या आवडी येथील अधिवेशनात लोकशाही समाजवादी कार्यक्रम स्वीकारत असल्याची घोषणा केली. समाज वादावर आधारित समाजाची स्थापना करण्याचा मानस व्यक्त केला. पंडित नेहरू यांच्या नंतर इंदिरा गांधी यांनी बँकांचे राष्ट्रीयीकरण, संस्थानिकांचे तनखे बंद, गरीबी हटाव कार्यक्रम इत्यादींच्या माध्यमातून समाजवादी कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली. 1976 मध्ये 42 वी घटना दुरुस्ती करून समाजवाद शब्दाचा समावेश घटनेच्या उद्देश पत्रिकेत केला. मोरारजी देसाई सरकारने 44 वी घटना दुरुस्ती करून मालमत्तेचा हक्क मूलभूत हक्कतून वगळला.
1980 च्या दशकानंतर जागतिक परिस्थितीत झपाट्याने बदल होऊ लागला. समाजवादी अर्थव्यवस्था असलेल्या देशांच्या अर्थव्यवस्था कोसळू लागल्या. साम्यवादी
रशियाचे पतन झाले. भारतीय अर्थव्यवस्थेची बिकट अवस्था
झाली होती. जागतिक पतमापन संस्थेने भारताचा दर्जा घडवला होता. जागतिक बँकेने कर्ज देण्यास नकार दिला. त्यामुळे तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांनी रिझर्व बँकेचे राखीव सोने बँक ऑफ इंग्लंडकडे तारण ठेवून कर्जफेडीसाठी विदेशी चलन मिळवले होते. 1991 मध्ये निवडणुकी नंतर आलेल्या पी व्ही नरसिंह राव सरकारने जागतिक पातळीवरून येणारे दडपण आणि अर्थमंत्री मनमोहन सिंग यांच्या सल्ल्याने समाजवादाचा त्याग करून जागतिकीकरणाचा स्वीकार केला.
समाजवादी अर्थव्यवस्थेचे दुष्परिणाम-
• नोकरशाहीचे वाढते वर्चस्व, दप्तर दिरंगाई आणि अकार्यक्षमतेत वाढ
• परकीय गुंतवणुकीत आणि
उत्पादनक्षमतेत घट
• परवानाराजची सुरुवात, व्यवसाय स्वातंत्र्य संकुचित झाले.
• कर्मचाऱ्यांना अति संरक्षण
• मक्तेदारीमुळेच स्पर्धा नष्ट झाली
• नवनिर्मितीला खीळ बसला.
• आयात आणि निर्यात यावरील बंधनामुळे उद्योगांच्या विकासाला बाधा
• राज्याच्या वाढत्या अधिकारामुळे व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा
• शासनाकडे शासनाकडे झालेले सत्तेच्या केंद्रीकरणामुळे व्यक्तीचे महत्त्व कमी झाले.
• विसाव्या शतकातील राजकीय विचारप्रवाह
https://amzn.to/36LU5rh भारतीय संविधान आणि राज्यव्यवस्था पुस्तक link https://amzn.to/3iwtpjt
प्रशासनhttps://amzn.to/3kMDY4U आधुनिक राजकीय सिद्धांत पुस्तक https://amzn.to/3BLcdQm महाराष्ट्रातील सामाजिक-राजकीय चळवळी आणि महाराष्ट्र प्रशासन https://amzn.to/3iG9wXl-(boya Mic for good voice Quality for lecture and video) https://amzn.to/3y3Qr7Z (Adjustable Tripod and Stand ) https://amzn.to/36ZtgQy (Sony Camera)
https://amzn.to/2UGoDbB (Dell MS116 1000DPI USB Wired Optical Mouse)
Redmi note 10 amazon link-https://amzn.to/3y3e8gU
DEAL of the DAY-link https://amzn.to/3C0h3JI
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.