https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

उत्तर -आधुनिकतावादाचे स्वरूप आणि विचारधारेच्या उदयाची कारणे


 उत्तर -आधुनिकतावादाचे स्वरूप

उत्तर-आधुनिकतावाद संकल्पनेचे स्वरूप पुढीलप्रमाणे विशद करता येते.

१. महाकथांचा वा महान वृत्तान्ताचा अनादर वा अविश्वास.

२. द्वद्वभाव म्हणजे भेदाच्या आधारे भेद स्वतःत सामावून घेऊन भेद नष्ट करणे, याचा वापर करणे.

३. वर्ग, वंश, लिंग, राष्ट्रीयत्व, भिन्न वंशीयता, दुर्लक्षित आणि बिनमहत्त्वाचे हे उत्तर-आधुनिकतावादाचे चिंताविषय आहेत.

४. उत्तरला पोस्ट हा शब्द पूर्वप्रत्ययाचा पर्याय म्हणून वापरलेला आहे.

५. उत्तर-आधुनिकतावाद शब्दातून एक प्रकारच्या अंताची जाणीव आणि वेगळ्या युगात प्रवेशाची सुरुवात मानली जाते.

 ६. उत्तर आधुनिकतावाद ही संज्ञा चित्रपट, वाङ्मय, सामाजिकशास्त्र आणिसांस्कृतिक जीवनात वापरली जाते.

७. उत्तर-आधुनिकतावाद इतिहासाच्या संहितात्मक सुगमतेने निर्माण केलेल्या समस्या प्रतिरूपण आणि सत्यप्राप्तीच्या अशक्यतेवर लक्ष केंद्रित करतो.

८. इतर जगावर सत्ता गाजविण्याच्या पाश्चिमात्य जगाच्या आकांक्षेतून उत्तर आधुनिकतावाद सिद्धान्त मांडण्यात आला आहे.

९. उत्तर-आधुनिकतावाद ही संज्ञा मूल्यनात्मक नसून वर्णनात्मक आहे..

 

१०. उत्तर-वसाहतवाद हे उत्तर-आधुनिकतावादाचे मूल असून त्यांचा संबंध भांडवलशाहीशी आहे.

उत्तर- आधुनिकतावाद विचारधारेच्या उदयाची कारणे

१६व्या शतकातील ज्ञानोदय काळातून आधुनिकतेचा जन्म झाला. सामंतवादी समाजव्यवस्थेत आमूलाग्र परिवर्तन होऊन परंपरागत समाजाचे आधुनिक समाजात रूपांतर झाले. औद्योगिकीकरण, भांडवलशाही आणि साम्राज्यवादामुळे आधुनिकता तिसऱ्या जगातील वा विकसनशील देशांत पोचली. आधुनिकतेतून उत्तर-आधुनिकतेकडे झालेल्या प्रवासाबाबत जॉर्ज रिट्जर यांनी 'Post-Modern Social Theory, Sociology and Sociological Theory' यावर विवेचन केलेले आहे. आधुनिकतेच्या काळात समाजात सर्वत्र मुक्ततेची परिस्थिती असताना हिंसा, संघर्ष, मानवी हक्कांचे उल्लघन, मानवी जीवनातील भयग्रस्तता, मानवी संरक्षणाचे प्रश्न 'जैसे थे' राहिले याचा अर्थ आधुनिकतेच्या अवधारणेत निश्चित काही उणिवा या मर्यादा होत्या, याची जाण अभ्यासकांमध्ये विकसित झाली. •आधुनिकतेच्या काळात मांडण्यात आलेल्या विचारधारा आणि सिद्धान्ताचे •पुनस्पष्टीकरण करण्याच्या प्रयत्नातून उत्तर-आधुनिकतेचा जन्म झाला आहे. अभ्यासकांनी आधुनिकतेकडून कारणमीमांसा पुढील मुद्द्यांच्या माध्यमातून केलेली आहे. उत्तर -आधुनिकतेकडे झालेल्या प्रवासाची

१. आधुनिक समाजात आमूलाग्र परिवर्तन उत्तर -आधुनिकतेचे अभ्यासक असे मानतात की, आधुनिक समाजाची संपूर्ण संरचना सद्यकाळात बदलेली आहे म्हणजे आधुनिकतेत आलेल्या आमूलाग्र परिवर्तनातून उत्तर-आधुनिकतेचा उदय झालेला आहे. आधुनिकतेने अपेक्षित केलेले मानवी जीवन प्रत्यक्षात साकार होऊ शकले नाही. समाज विकासाच्या बाटेवर असताना मानवी जीवन हताशा, निराशा, असंतोषाने भरलेले आहे. समाजातील संघर्ष कमी होण्याऐवजी वाढत गेले. या समाजातील बदलत्या परिस्थितीची मांडणी आधुनिकतेच्या चौकटीत करणे अशक्य झाल्यामुळे उत्तर आधुनिकतेचा उदय ही अपरिहार्य घटना बनली.

२. उत्तर आधुनिकता म्हणजे आधुनिकतेचा विस्तार वा विकासक्रम आहे - काही अभ्यासकांच्या मते, उत्तर आधुनिकता नवीन प्रकारची जीवनशैली नाही तसेच नवीन प्रकारची विचारसरणीदेखील नाही. ती एक उत्क्रांतिवादी परंपरा आहे. आधुनिकता प्रक्रियेच्या उन्नत विकासातून उत्तर-आधुनिकतेचा जन्म झाला. औद्योगिकीकरण, नागरीकरण आणि बुद्धिसंगततेच्या अत्याधिक प्रमाणामुळे आधुनिकतेचे परिवर्तन उत्तर आधुनिक समाजात झाले. आधुनिकता आणि उत्तर-आधुनिकता यांचा संबंध पारस्परिक काळापासून चालत आलेला आहे. उत्तर आधुनिकता नेहमी आधुनिकतेत असलेल्या अभाव वा मर्यादांचा निर्देश करते. या परिस्थितीत उत्तर-आधुनिकतेचा उदय काही नवीन बाब नाही.

३. पर्यावरणावादी समस्या - आधुनिकतेतून विकसित झालेल्या औद्योगिकीकरण आणि नागरीकरणातून प्रदूषण आणि पर्यावरण हासाची समस्या निर्माण झाली. पर्यावरणाच्या हासाचे उत्तरदायित्व आपोआप आधुनिकतेकडे येते. युरोप आणि अमेरिकेत १९९० दशकात राजकीय नेते, समाजसेवक, बुद्धिवंत आणि सर्वसामान्य व्यक्तीदेखील पर्यावरणाच्या • बिघडलेल्या असंतुलनाने चिंतित होते. पर्यावरण संरक्षण आणि सुधार करण्यासाठी आधुनिकतेत व्यापक बदल घडवून आणण्याची गरज विशद केली जाऊ लागली. नैसर्गिक साधनसंपत्तीचा आपल्या फायद्यासाठी वापर करून आधुनिकतेने प्रकृतीचा अंत घडवून आणला. पर्यावरणाचा विनाश मानवी जीवनाच्या अस्तित्वाला प्रश्नांकित करू लागला, तेव्हा आधुनिकतेची धारणा आणि विचारधारेत क्रांतिकारी बदलाची आवश्यकता निर्माण झाली आणि त्यातून उत्तर आधुनिकतेचा जन्म झाला.

४. महान वृत्तान्तांना महत्त्व - आधुनिकतेच्या काळात सामाजिक शास्त्रातील सिद्धान्ताची उभारणी महान वृत्तान्तांनी केलेली आहे. हे महान वृत्तान्त मानवी जीवनातील सर्व समस्या सोडविण्यासाठी आवश्यक उपाययोजना • समाविष्ट आहेत, हा दावा करतात; परंतु महान वृत्तान्तांतील समाविष्ट सिद्धान्तातील मर्यादा उघड झाल्या. हे वृत्तान्त महान नाही तर समाजाच्या कार्यप्रणाली संदर्भात उभी केलेली मिथके आहेत, त्यांचा आधार समग्रता आहे. या वृत्तान्तांनी कधीही स्थानीय वृत्तान्तांचा विचार केला नाही. स्थानिक लोक आपल्या भूमीशी जोडलेले असतात त्यांच्या विशिष्ट अशा रूढी, परंपरा, राजकीय अवधारणा, संस्कृती असते याबाबत महान वृत्तान्तांनी नेहमीच मौन बाळगले. महान वृत्तान्त मानवी जीवनातील समस्या निराकरणात नाकाम ठरल्यामुळे त्यांचे निराकरण करण्यातच स्थानिक लोकांचे हित आहे, ही जाणीव निर्माण झाल्यामुळे उत्तर आधुनिकतेच्या उदयाला पोषक पार्श्वभूमी निर्माण झाली.

५. मानवी समस्यांत वृद्धी - उत्तर आधुनिकतेच्या विकासाला हे एक कारणदेखील महत्त्वाचे मानले जाते. ज्ञानोदय कालखंडापासून आधुनिक काळापर्यंत मानवी जीवनातील समस्या कमी होण्याऐवजी वृद्धी झालेली आहे. आधुनिकतेने मानवी जीवनाचे नरकात रूपांतर केलेले आहे. मानवी जीवनातील सुख, शांतता, आनंद नष्ट करून त्याला स्पर्धेत पळणारा अश्व बनविलेले आहे. आधुनिक सभ्यतेने विकसित झालेल्या नागरीकरणातून गलिच्छ वस्त्या, झोपडपट्ट्या, संघटित गुहेगारी, 'एकाकीपणा, व्यसनाधीनता या समस्यांना जन्म दिलेला आहे. आधुनि • विकसित झालेल्या तंत्रप्रगतीतून राष्ट्राराष्ट्रात स्पर्धा, संघर्ष, शस्त्रीकरणाची स्पर्धा, भयग्रस्तता, युद्धाचे सावट आदी समस्या मानवी सहनशक्तीच्या पलीकडे वाढल्या. त्यावर उपाययोजना सुचविणे आधुनिकतेच्या पलीकडची गोष्ट झाल्यामुळे उत्तर आधुनिकतावादाचा जन्म झाला, असे मानले जाते.

६. अनुशासनाला अवाजवी महत्त्व - आधुनिक समाजाचे संघटन अशा प्रकारे करण्यात आले की, प्रत्येक व्यक्ती, संस्थांना अनुशासनाच्या चौकटीत बंदिस्त करण्यात आले. खानपान, पेहराव, अभिवादन, इतरांशी संबंध आदी सर्व गोष्टी आधुनिकतेच्या मापदंडांनी बंदिस्त केल्या गेल्या, शैक्षणिक अनुशासन, संस्कृती, साहित्य, सिद्धान्त, नृत्य, कला इत्यादी असंख्य क्षेत्रांना आधुनिकतेच्या सीमांमध्ये बंदिस्त केले गेल्यामुळे नावीन्यता आणि प्रयोगाला बाव राहिला नाही. परिणामतः सर्व क्षेत्रात 'जैसे थे', स्थित्यंतरबादी प्रवृत्ती वरचढ राहिल्या. ही कोंडी फोडण्यासाठी उत्तर आधुनिकतेचा उदय होणे अनिवार्य बनले.

७. अतितार्किकता - समाजशास्त्र असो की विज्ञान असो की इतिहास असो, सर्व क्षेत्रांत तार्किकता आणि अनुशासनाच्या आधारावर आधुनिकता काम करते. आधुनिकतेच्या प्रत्येक विद्याशाखेत प्रस्थापित मान्यता आहेत. प्रत्येक विद्याशाखेत मठाधीश आहेत. मठाधीश, तार्किकता, अनुशासन यांना उत्तर आधुनिकता विरोध करते. अनुशासनहीनतेच्या वातावरणात स्वतंत्र आणि सर्जनशील विचारांची अवहेलना झाली. तार्किकतेपासून मानवी जीवनातील विविध क्षेत्रांची सुटका करण्यासाठी उत्तर-आधुनिकतेचा जन्म झाला.

८. चुकीचे भाकीतकथन - ज्ञानोदयाच्या कालखंडात सुखी मानवी जीवनाच्या कल्पना मांडल्या गेल्या. वैज्ञानिक क्रांतीमधून मानवी जीवनात सुख, आनंद आणि समृद्धी निर्माण होईल. मानवी जीवनातील सर्व समस्यांचे निराकरण विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करता येईल, हा भ्रम आधुनिकतेने सर्वत्र निर्माण केला; परंतु, वैज्ञानिक प्रगतीने मानवी जीवनातील समस्या कमी होण्याऐवजी भर पडली आहे. मानवी जीवनात सुखाऐवजी निराशेने घर केलेले आहे. आधुनिकतेत सत्ताधारी लोक शक्तिशाली बनले म्हणून फूकासारखा विचारवंत म्हणतो की, ज्याच्याकडे ज्ञान असेल ते शक्तिशाली बनतील. ज्ञान आणि सत्तेवर वर्चस्व असलेन्ड लोक सुदृढ बनतील, ही धारणा दृढ झाल्यामुळे ज्ञान आणि सत्ता मिळविण्यासाठी लोकांमध्ये चेतना निर्माण झाली आणि त्यातून उत्तर आधुनिकता विचार सदृढ होण्यास साहाय्य मिळाले.

0. सकलतेला महत्त्व - उत्तर-आधुनिकतेच्या उदयाला कारणीभूत गोष्ट म्हणजे सामाजिक शास्त्रातील सिद्धान्तामध्ये असलेली सकलतेची प्रवृत्ती (Totalizing) वा सकलतेला असलेले महत्त्व मानले जाते. मानवी जीवनातील विशालता, विविधता आणि गुंतागुंत लक्षात न घेता सामाजिकशास्त्रातील सिद्धान्त सकलतेचा आग्रह धरतात. सर्व प्रश्नांवर सर्वकालीन उपयोगी पडणारे तोडगे सुचवितात. यामध्ये प्रजातंत्र, औद्योगिकीकरण, आधुनिकीकरण, धर्मनिरपेक्षता आदी सिद्धान्त वा तत्त्वांचा समावेश होता. या सर्व सिद्धान्तांना उत्तर-आधुनिकतावादी महान वृत्तान्तांच्या श्रेणीत समाविष्ट करतात. ही सकलता आणि रचनेच्या प्रवृत्तीचे निराकरण करण्यासाठी उत्तर-आधुनिकतावादाचा जन्म झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.