https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

उत्तर आधुनिकतावाद अर्थ, व्याख्या ऐतिहासिक पार्श्वभूमी


 उत्तर आधुनिकतावाद अर्थ, व्याख्या ऐतिहासिक पार्श्वभूमी

 आधुनिक तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र आणि विविध ज्ञानशाखांच्या स्वरूप व रचनेत आमूलाग्र बदल घडवून आणणारे विचारप्रवाह २०व्या शतकाच्या उत्तरार्धात विकसित झाले. त्यातून उत्तर आधुनिकता ही संकल्पना जन्माला आली. आधुनिकतेसंबंधी सुरू झालेल्या विचारमंथनातून त्या प्रक्रियेची पुढची पायरी म्हणून उत्तर-आधुनिकतेसंबंधी चर्चेला सुरुवात झाली. सुरुवातीला कला, साहित्य व तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात आलेला हा नवा विचारप्रवाह सर्वच क्षेत्रांत अल्पावधीत पसरला. १६व्या शतकात आधुनिकीकरणाची सुरुवात पाश्चिमात्य देशांत झाली. आधुनिकतेचे विकसित रूप २०व्या शतकात निर्माण झाले. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे आधुनिकतावादाचे एक उदारमतवादी विकसनशील रूप आहे. औद्योगिक क्रांती व भांडवलशाहीतून आधुनिकीकरणाला चालना मिळाली. औद्योगिकीकरण आणि ईश्वर संकल्पनेवरील अविश्वासातून आधुनिकतेचा विकास झाला. आधुनिक, आधुनिकता आणि आधुनिकतावाद या तीन संकल्पना परस्परसंलग्न असल्या तरी त्यात सूक्ष्म भेद आहेत. आधुनिक हा शब्द ऐतिहासिक कालखंडासाठी वापरला जातो. आधुनिकता ही संकल्पना कलाक्षेत्र आणि कलावस्तूंसाठी वापरली जाते. आधुनिकतेचा अभ्यास सामाजिकशास्त्रात सामाजिक अंगाने केला जाऊ लागला तेव्हा 'आधुनिकतावाद'ही संकल्पना उदयाला आली; परंतु, अनेक अभ्यासक आजही आधुनिकता आणि आधुनिकताबाद ही संकल्पना एकाच अर्थाने वापरतात. त्याबाबत काही अभ्यासक असे मानतात की, आधुनिकता आणि उत्तरआधुनिकता परस्परांपासून भिन्न नसून काळ आणि परिस्थितीनुसार परंपरेत झालेल्या बदलांना आधुनिकता असे म्हणतात आणि आधुनिक विचारविश्धात झालेल्या बदलांना उत्तर आधुनिकता असे म्हणतात. उत्तर-आधुनिकतावाद आणि आधुनिकता यांचा संबंध स्पष्ट करताना असे म्हटले आते की, 'आधुनिकतेनंतर उत्तर-आधुनिकता येते आणि आधुनिकतेच्या विरोधातदेखील जाते. उत्तर आधुनिकतावाद आधुनिकतावादाच्या काही प्रमाणात विरोधात तर काही प्रमाणात प्रेमात आहे. आधुनिकतावादाचे वास्तववाद हे प्रमुख लक्षण मानले जाते. दुसऱ्या महायुद्धानंतर आधुनिकता संकल्पनेला अतिशय महत्त्व प्राप्त झाले होते. सर्वत्र तिचा 'उदो उदो' केला जात होता. आधुनिकतेमुळे मानवी विकासाला चालना मिळेल आणि मानवी जीवन सुखी होईल, हा आशावाद व्यक्त केला गेला; परंतु, प्रत्यक्षात आधुनिकतेमुळे भ्रमनिरास झाल्यामुळे उत्तर-आधुनिकतेचा उदय झाला, असे मानले जाते.

उत्तर आधुनिकता: परिभाषा आणि अर्थ -

दुसऱ्या महायुद्धानंतर आधुनिकतेच्या प्रवाहाविरुद्ध निर्माण झालेल्या व्यवहारवादी विश्लेषणातून उत्तर आधुनिकतावाद विकसित झाला. आधुनिकतेवरील प्रतिक्रिया म्हणजे उत्तर आधुनिकता मानली जाते. आधुनिकतेने मांडलेल्या संकल्पनांना पडताळून पाहण्याच्या प्रवृत्तीतून उत्तर-आधुनिकता उदयाला आली. उत्तर-आधुनिकतेने मांडलेल्या संकल्पनांचे विश्लेषण करून त्यांच्यातील फोलपणा मांडण्याचा प्रयत्न केला; कारण तंत्रज्ञानात्मक विकासातून विकास आणि आर्थिक प्रगती घडून आली असली तरी मानवी मूल्यांचे महत्त्व कमी झाले. समाजाच्या सर्वांगीण विकासाला हातभार लागण्याऐवजी मूठभरांचा विकास झाला. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शोषणाचे नवे आविष्कार निर्माण झाले. या सर्व बदललेल्या परिस्थितीचा नव्याने आढावा घेण्यासाठी उत्तर  आधुनिकता विचारांचा उदय झाला.

उत्तर-आधुनिकता संकल्पना आणि सिद्धान्ताबाबत असलेल्या अस्पष्टतेमुळे त्यांच्या अर्थाबाबत अभ्यासकांमध्ये एकमत नाही. अर्थ आणि परिभाषांबाबत सहमती नसल्यामुळे एक प्रकारची भ्रामक स्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे उत्तर आधुनिकतावादाची सर्वसंमत परिभाषा करणे सद्य परिस्थितीत अशक्यप्राय गोष्ट आहे. उत्तर आधुनिकतावादी अभ्यासकांमध्ये स्योतार, फूको, डेरिडा, बाडिलार्ड, नेसी फ्रेसर, लिंडा निकोलसन, जीन फ्रैंकॉइस, गिल्सलेस फोलिय बारटी आदी मोजकीच अभ्यासकांची नावे समोर येतात. त्या सर्व अभ्यासकांनी ही संकल्पना आपआपल्या संदर्भानुसार वापरलेली असल्यामुळे परिभाषानिर्मितीत अनेक अडचणी येतात; म्हणून या संकल्पनेची मांडणी करणाऱ्या प्रमुख अभ्यासकांनी अपेक्षित केलेली परिभाषा आणि त्यातील केंद्रीय तत्त्वाचा ऊहापोह करणाऱ्या परिभाषांचा उपरोक्त मुद्द्यांमध्ये विचार केला जाणार आहे.

१. जिम मॅकगूगन उत्तर आधुनिकताबाद एक सांस्कृतिक आणि ज्ञान मीमांसेची परिस्थिती असून त्यामुळे सामाजिक संस्था दुर्बल बनतात आणि त्यातून वैश्विक समाजाची निर्मिती होते.

२. रिजाई गोट- उत्तर-आधुनिकता आधुनिकतेपासून मुक्ती देणारी संकल्पना असून, ते एक विखंडित आंदोलन आहे. त्यामधून बहुसंस्कृतीचा उदय होतो.

३. रिटज़र - यांच्या मते, उत्तर आधुनिकता विशाल अवधारणा आहे.त्यात ऐतिहासिक काळ, नवीन सांस्कृतिक तत्त्वं आणि सामाजिक विश्वासाबाबत एक नव्या प्रकारचे सैद्धांतिकीकरण सम्मिलित आहे.

४. ल्योतार - यांच्या मते, उत्तर आधुनिकता महान वृत्तान्ताप्रती अविश्वास व्यक्त करते. सकलतेच्या विरोधात संघर्ष करून विशिष्टता वा विभेद तत्त्वाला महत्त्व देते.

. बाडिलाई उत्तर आधुनिकता दुसरे तिसरे काही नसून अतियथार्थता(Hyper Reality) आहे आणि ही अतियथार्थता प्रतिकृतिद्वारा निर्मित आहे. प्रतिकृतीचा आधार जनसंचार आहे.

. माइकल फूको - तार्किक ज्ञानावर आधारित समाजव्यवस्था म्हणजे उत्तर-आधुनिकतावाद होय.

७. गिडिस -उत्तर-आधुनिकतावादाचा विश्वास आहे की, समाजाचा इतिहास या प्रगती नियंत्रित होऊ शकत नाही. उत्तर आधुनिकतावादी समाजात बहुलवाद आणि विकेंद्रितता मोठ्या प्रमाणावर असते. या समाजाच्या विकासाचे मार्गदर्शन महान वृत्तान्ताकडून होत नसते.

उत्तर आधुनिकतावादऐतिहासिक पार्श्वभूमी-

उत्तर-आधुनिकतावाद शब्दाचा सर्वप्रथम वापर १८७० मध्ये ब्रिटिश कलाकार जॉन बाटकिन चापमन यांनी केला. १९१७मध्ये रुडाल्फ पेन्नीविझ यांनी वापरलेल्या उत्तर-औद्योगिकीकरण शब्दाच्या वापरापासून या 'उत्तर' शब्दाचा वापर रूढ झाला. 'उत्तर' हे पोस्टचे भाषांतर आहे. उत्तरदायित्व म्हणजे जबाबदार, ऋणी असणे, उत्तरदायी असणे हा अर्थ आहे. उत्तर-आधुनिकतावादी आपण ईश्वरोत्तर काळात जगतो, असे मानतात.उत्तर-आधुनिकतेचा अर्थ 'सांप्रतच्या नंतर म्हणजे आधुनिकतेच्या नंतरचा विचार असा केला जातो. उत्तर आधुनिकतावाद शब्दाच्या सुरुवातीच्या प्रयोगाबाबत चार्ल्स जॅक्सन यांनी आपल्या 'What is Post Modernism?' ग्रंथात म्हटले आहे की, 'इतिहासकार आरनोल्ड टॉयबी यांनी आपले पुस्तक 'A Study of History' मध्ये ऐतिहासिक कालखंडाच्या स्वरूपात उल्लेख केला आहे' उत्तर-आधुनिकतावाद हा शब्द सामाजिकशास्त्रात सर्वप्रथम डॅनियल बेल या अर्थतज्ज्ञाने वापरला. इहाव हसन जॉ, फ्रॉसच्या लीयोतरचे तत्त्वज्ञान वापरले आहे. या शब्दाला वैचारिक बैठक देण्याचे कार्य लोयोतर यांनी 'द पोस्ट मॉडर्न कंडिशन अ रिपोर्ट ऑन नॉलेज' पुस्तकात केले. त्यांनी उत्तर-आधुनिकता संकल्पना एक जातीय (Generic) आहे असे मानले, आधुनिकतेने सामाजिक विज्ञानात दोन चुकीची मिथके निर्माण झाली असे तो मानतो. प्रथम मिथक म्हणजे महान वृत्तात (Meta-Narratives) पाश्चिमात्य जगातील महान सिद्धान्त (मार्क्स, वेबर) त्यांच्या दृष्टीने सैद्धांतिक मिथक आहे. त्यांनी मानवी समाजातील सामाजिक, वैज्ञानिक आणि विविध क्षेत्रातील गतिविधींवर प्रभाव निर्माण केला. दुसरे मिथक म्हणजे उदारतेचे मिथक (Myth of Liberation) उदारतेशी जोडले गेलेले सत्याचे मिथक (Myth of the Truth) या दोन्ही मिथकांनी निर्माण केलेल्या गैरसमजुती सामाजिक शास्त्रातील सैद्धांतिक क्षेत्रातून दूर करण्यासाठी उत्तर-आधुनिकतावादाचा जन्म झाला असे तो मानतो. दुसऱ्या महायुद्धानंतर फ्रान्समध्ये हा शब्द सर्वांत जास्त वापरला गेला. अस्तित्ववाद आणि स्वयंसिद्ध अस्तित्व दृष्टिकोनाला प्रत्युत्तर देण्यासाठी वा नाकारण्यासाठी उत्तर-आधुनिकतावादाचा वापर केला गेला. उत्तर-आधुनिकतावादी मानतात की, आपण ईश्वरोत्तर काळात जगतो. आधुनिकतेतील अहंमन्यता, आधुनिकीकरणासाठी होणारा इतर समाजावरील अत्याचार, ज्ञानाच्या नावाखाली होणारे शोषण आणि भांडवलशाहीचा नव मार्क्सवादी समज यांच्या देवाणघेवाणातून उत्तर आधुनिकतावाद जन्माला आला असे मानले जाते. याशिवाय आंतरराष्ट्रीय श्रमविभागणी, नवविकसित तंत्रज्ञान, उत्पादन वाढ, सामाजिक आणि राजकीय हस्तक्षेपापासून मुक्तता, भांडवलशाहीचे युरोपपासून विकेंद्रीकरण आणि बहुसांस्कृतिकवाद इत्यादींमुळे उत्तर आधुनिकतावादाचा जन्म झाला असे मानले जाते. १९६० नंतर साहित्य, सामाजिक विचार, अर्थशास्त्र आणि धार्मिक क्षेत्रात हा शब्द नकारात्मक पद्धतीने वापरला गेला. 'उत्तर आधुनिकतावाद' सुरुवातीला एक फॅशनेबल संकल्पना मानली गेली. बुद्धिवंतांच्या दुनियेत या संकल्पनेचा गंभीरतेने विचार केला गेला नाही. कनिष्ठ दर्जाचे तत्त्वज्ञान म्हणून हेटाळणी केली गेली. जमिनी वास्तवाशी तिचा फारसा संबंध नाही उपहासात्मकरीत्या मानले गेले परंतु सद्यकाळात गंभीरपणे विचार केला जाऊ लागला. कला आणि साहित्य क्षेत्रात उत्तर-आधुनिकतावादाची चर्चा सुरू झाली.लाक, बार्थ, जॅक डेरिदा, लोयोतर, फूको हे प्रमुख उत्तरआधुनिकतावादी विचारवंत मानले जातात. १९६६मध्ये जॅक डेरिदा यांनी जाँस हॉपकिन्स विद्यापीठात 'स्ट्रक्चर, साईन अॅण्ड प्ले इन द हामन हा संशोधन निबंध वाचला आणि तेथून उत्तरआधुनिकतावाद चळवळीस सुरुवात झाली असे मानले जाते. त्याने ज्ञान आणि सत्य मान्यतांना काही स्वयंसिद्ध पायाभूत आधारशीला असते हा दृष्टिकोन नाकारला. त्याने 'Deconstructive Post-Modernism या सिद्धान्ताला वैचारिक रूप दिले. एडवर्ड सैद यांच्या 'ओरिएंटलिझम या ग्रंथाने उत्तर-आधुनिकतावादाला चालना दिली. अशक्राफट, गिफिक्स, टिफीन इत्यादींच्या लेखनामुळे १९७०च्या दशकात या संकल्पनेची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू होऊन ही संकल्पना प्रचारात आली आणि संकल्पना म्हणून विकसित झाली. उत्तर-आधुनिकतावाद सुरुवातीला नकारात्मक आणि Deconstruction संकल्पना मानली गेली. १९८०च्या दशकात नवनिर्मितीची चळवळ म्हणून ओळखली जाऊ लागली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.