आंतरराष्ट्रवादाच्या विकासाची कारणे-
१. महायुद्धे :- भांडवलशाही व्यवस्थेतून
उदयाला आलेल्या वसाहतवादामुळे १९९४ ते १९९८ या काळात पहिले महायुद्ध झाले. पहिल्या
महायुद्धाला जबाबदार राष्ट्रांना धडा शिकविण्यासाठी व्हर्सायचा तह करण्यात आला. व्हर्सायच्या तहाने पराभूत
राष्ट्रांना दिलेल्या अन्यायकारक वागणुकीतून दुसऱ्या महायुद्धाची बीजे रोवली गेली.
१९३९ ते १९४५ या कालखंडात दुसरे महायुद्ध झाले. या दोन्ही महायुद्धांत मोठ्या
प्रमाणावर मानवी व वित्तहानी घडून आली. पहिल्या महायुद्धापेक्षा दुसरे महायुद्ध
महाभयंकर स्वरूपाचे होते. दुसऱ्या महायुद्धात अणूबॉम्बसारख्या महाभयंकर अस्त्राचा
वापर झाला. या दोन्ही महायुद्धांमुळे अनेक गंभीर स्वरूपाचे प्रश्न निर्माण झाले.
मानवाचा सामाजिक, आर्थिक व औद्योगिक विकास थांबला. महागाई, बेरोजगारी, दारिद्र्य इ. प्रश्न निर्माण झाले. युरोपखंडाचा
नकाशा बदलला. अनेक राष्ट्रांचे तुकडे पडले. अनेक साम्राज्ये नष्ट झाली. वसाहतींना
स्वातंत्र्य द्यावे लागले. महायुद्धातून निर्माण झालेले प्रश्न लवकरात लवकर
सोडविले गेले नाही, तर मानवी अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकतो.
राष्ट्रा-राष्ट्रांतील तणावांचे निराकरण योग्य मार्गांनी झाले नाही, तर मानव जातीपुढे तिसऱ्या महायुद्धाचा धोका
निर्माण होऊ शकतो. तिसरे महायुद्ध झाले तर मानव जात शिल्लक राहणार नाही, ही जाणीव निर्माण झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय
संघटना प्रस्थापित करण्यासाठी वेगाने हालचाली होऊ लागल्या. भविष्यात मानवाला
युद्धाला तोंड द्यावे लागू नये म्हणून राष्ट्रा-राष्ट्रांतील प्रश्न सामोपचार आणि
शांततेच्या मार्गांनी सोडविण्यावर भर दिला जाऊ लागला. आंतरराष्ट्रीय शांततेसाठी
राष्ट्रांमध्ये परस्पर सहकार्य वृद्धिंगत करण्यास प्राधान्य दिले जाऊ लागले.
सहअस्तित्वाची तत्त्वे, परस्पर सार्वभौम आणि प्रादेशिक अखंडतेलामहत्व प्राप्त होऊ
लागले. या सर्व पडामोडींच्या परिणामांतून आंतरराष्ट्रवादाच्या विकासाला पोषक
वातावरण निर्माण होऊ लागले.
२. परस्परावलंबित्व:- राहणीमानाच्या दर्जात
झालेली वाढ आणि लोकसंख्या वाढीमुळे मानवाच्या गरजा दिवसेंदिवस वाढू लागल्या
वाढत्या गरजांची पूर्तता करणे कोणत्याही एकट्या राष्ट्राला शक्य नव्हते. आपल्या
राष्ट्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी इतर राष्ट्राच्या मदतीची नितांत गरज भासू
लागली उदा. अमेरिकेसारखा प्रगत देशदेखील खजिन तेलासाठी अरब राष्ट्रावर अवलंबून
आहे. गरजपूतीसाठी विविध राष्ट्र एकमेकाना आर्थिक, तांत्रिक सहकार्य करू लागली. प्रत्येक
राष्ट्राला उत्पन्न बावीसाठी कच्चा माल, खनिज संपनीचा पुरवठा इत्यादींची गरज होती. राष्ट्रांमधून
निर्माण होणान्या मालासाठी बाजारपेठांची आवश्यकता होती. परस्परांच्या गरजा पूर्ण
करण्यासाठी राष्ट्रे एकमेकांशी मैत्रीकार व तह करू लागली. उदा. रशिया व भारत
यांतील मैत्रीकरार राष्ट्रा-राष्ट्रातील जवळिकीमुळे आंतरराष्ट्रवादाच्या विकासाला
चालना मिळू लागली.
३. विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील क्रांती :- आधुनिक काळात
विज्ञान व तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे दळणवळणाच्या साधनांत क्रांतिकारी बदल झाले.
जलद संपर्क साधनामुळे राष्ट्राराष्ट्रातील भौगालिक अंतर कमी झाले. प्रसिद्ध
माध्यमे, सामाजिक माध्यमे, दूरदर्शन आणि इंटरनेट इ. मुळे एका ठिकाणाहून
दुसन्या ठिकाणी संपर्क साधणे सोपे व सुलभ झाले परस्पर संपर्काची वेगवान साधने
उपलब्ध झाल्यामुळे विचारांचे आदानप्रदान करणे सहज शक्य होऊ लागले. वाढत्या
संपर्कामुळे एकमेकांचे आचारविचार व संस्कृतीचा परिचय होऊन पूर्वग्रह दूर होऊ लागले.
तंत्रज्ञानाचा वापर विधायक होऊ लागला. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून राष्ट्रे
एकमेकांच्या जवळ येऊ लागली आणि त्यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध निर्माण होऊ लागले.
विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील क्रांतीमुळे आंतरराष्ट्रवादाला पूरक वातावरण
निर्माण होऊ लागले.
४. नैसर्गिक संकटे:- भूकंप, पूर, दुष्काळ इ. नैसर्गिक संकटे प्रत्येक देशावर येत
असतात. अशा संकटात सापडलेल्या राष्ट्राला इतर राष्ट्रांकडून मदत दिली जाते. उदा.
गुजरातमधील कच्छच्या भूकंपाच्या वेळेस अनेक देशांनी मदत केली. अशा विधायक
कार्यातून जगातील नागरिकांमध्ये आत्मीयता आणि आपलेपणाची भावना विकसित होऊ लागली.
भविष्यात आपल्या राष्ट्रावर संकट आल्यास इतर राष्ट्राकडून मदत मिळेल ही हमीदेखील
प्राप्त होऊ लागली. परस्पर सहकार्याच्या सकारात्मक वातावरणातून आंतरराष्ट्रवादाच्या विकासाला चालना मिळाली.
५. महाभयंकर शस्त्रांची निर्मिती :- दुसऱ्या महायुद्धानंतर अणूबॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब, न्युट्रान बॉम्ब, क्षेपणास्त्रे, रासानिक आणि जैविक अत्रे इत्यादी प्रकारची
महाभयंकरअसे विकसित होऊ लागली. प्रत्येक राष्ट्र आपल्या संरक्षणासाठी महाभयंकर
अखाच्या निर्मितीसाठी प्रयत्न करू लागले. त्यामुळे राष्ट्रांच्या संरक्षण खर्चात
बद होऊ लागली. परंतु या विनाशकारी अस्खांमुळे तिसन्या महायुद्धाची भीती निर्माण
झाली. ही भीती कमी करण्यासाठी निःशस्त्रीकरणाची चळवळ आकार घेऊ लागली. हो विनाशकारी
शस्त्रे आणि त्यासाठी केल्या जाणाऱ्या चाचण्यांवर व प्रयोगावर बंदी घालण्याची मागणी
पुढे येऊ लागली. मानवजातीला आपले अस्तित्व टिकवायचे असेल तर शस्त्रस्पर्धेला लगाम
घालणे गरजेचे होऊ लागले. राष्ट्राराष्ट्रातील शस्त्रास्त्र स्पर्धा कमी करण्यासाठी
शस्त्रकपात, शस्त्रास्त्र निर्मितीवर बंदी, शस्त्रास्त्रांवर नियंत्रण इत्यादीसाठी जागतिक
परिषदा व करार होऊ लागले. उदा. सर्वकष अणुचाचणी करार. या कराराच्या माध्यमातून
शस्त्रस्पर्धेला आळा घालण्याचा प्रयत्न होऊ लागला. शस्त्रास्त्र निर्मितीवर
होणाऱ्या खर्चाबाबत जनजागृतीदेखील केली जाऊ लागली. या सर्व घडामोडी
आंतरराष्ट्रवादाच्या विकासाला साहाय्यक ठरू लागल्या.
६. आंतरराष्ट्रीय प्रचार व प्रसार:- दुसऱ्या महायुद्धानंतर मोठ्या प्रमाणावर विकसित झालेल्या प्रसिद्धी
माध्यमांमुळे आंतरराष्ट्रीय प्रचार व प्रसाराला बळ मिळू लागले. वर्तमानपत्रे, रेडिओ, टी. व्ही., इंटरनेट, सोशल मिडियामुळे जागतिक शांततेचे महत्त्व पटवून
देणे सहज शक्य होऊ लागले. युद्धाच्या दुष्परिणामांचीदेखील जगाला चांगल्या प्रकारे
जाणीव करून देणे सहज शक्य होऊ लागले. भविष्यकाळात युद्ध घडले तर जगाच्या हानीची
कल्पनादेखील प्रचाराच्या माध्यमातून देणे शक्य होऊ लागले आणि युद्धाच्या
राष्ट्रविकासावर होणाऱ्या परिणामाबद्दलदेखील जनतेला अवगत करता येऊ लागले.
आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करण्यासाठी अनेक गट, स्वयंसेवी संस्था, आंतरराष्ट्रीय संघटना आणि प्रादेशिक संघटना
प्रयत्न करू लागल्यामुळे जागतिक पातळीवर तणावाचे वातावरण कमी होऊ लागले. जागतिक
लोकमताच्या वाढत्या दडपणामुळे युद्धखोर राष्ट्रावर दडपण येऊ लागले. आंतरराष्ट्रीय
प्रचार व प्रसारामुळेदेखील आंतरराष्ट्रवादाला मदत मिळू लागली.
८. आंतरराष्ट्रीय संघटनांची निर्मिती :- पहिल्या
महायुद्धानंतर स्थापन झालेला राष्ट्रसंघ आणि दुसऱ्या महायुद्धानंतर स्थापन
झालेल्या संयुक्त राष्ट्र संघटनेमुळे आंतरराष्ट्रीय शांतता निर्माण करण्याच्या
प्रयत्नाला संस्थात्मक आधार प्राप्त झाला. आज जगातील बहुसंख्य देश युनोचे सदस्य
बनले आहेत. आज युनो राष्ट्राराष्ट्रांतील प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडविण्याचा
प्रयत्न करते. जागतिक प्रश्नांवर चर्चा घडवून आणते. सदस्य राष्ट्रांना आपली बाजू
मांडण्यासाठी युनो हे हक्काचे कायमस्वरूपी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर राष्ट्राराष्ट्रांत परस्पर सहकार्य, मैत्रीची भावना, सहिष्णुता आणि सह-अस्तित्व भावना निर्माण
करण्यासाठी युनोने मोठ्या प्रमाणावर राष्ट्रांमध्ये जनजागृती घडवून आणण्यासाठी
प्रयत्न केलेले आढळतात. युद्धखोर राष्ट्रांवर युनोने कारवाईदेखील केलेली आहे. उदा.
इराकने कुवेतवर हल्ला केला होता, तेव्हा अमेरिकेच्या नेतृत्वाखाली युनोने शांतिसेना स्थापन
करून कुवेत इराकपासून मुक्त केला. युनिसेफ, युनेस्को, जागतिक बँक इ. युनोशी संलग्न संस्था सामाजिक व
आर्थिक क्षेत्रांत जगातील राष्ट्रांना मदत व सहकार्य करत असतात.
राष्ट्राराष्ट्रांत मानवविकास आणि मानवी कल्याण साधण्यासाठी जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना यांसारख्या संलग्न
संघटनांची निर्मिती केल्यामुळे मानवी विकास व कल्याणाला चालना मिळाली आणि त्यातून
आंतरराष्ट्रवादाचा विकास घडून आला.
अशा प्रकारे २० व्या शतकात आंतरराष्ट्रवादाच्या विकासात साहाय्यक ठरणारे घटक
निर्माण झाल्यामुळे आंतरराष्ट्रवाद संकल्पनेच्या विकासाला हातभार लागलेला दिसतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.