https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

आंतरराष्ट्रवादाच्या मार्गातील अडथळे वा समस्या : Hindrances and Problem of Internationalism


 आंतरराष्ट्रवादाच्या मार्गातील अडथळे वा समस्या : Hindrances and Problem of Internationalism

आंतरराष्ट्रवाद ही संकल्पना विसाव्या शतकात वेगाने पुढे आलेले असली तरी तिची वाट अद्यापही बिकट आहे. आंतरराष्ट्रवादाच्या विकासात अनेक घटक अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहेत. जोपर्यंत या अडथळ्यांवर योग्य पद्धतीने मात करता येत नाही, तोपर्यंत आंतरराष्ट्रवादाचा योग्य पद्धतीने विकास होऊ शकणार नाही. आंतरराष्ट्रवादाच्या मार्गांतील प्रमुख समस्या पुढीलप्रमाणे सांगता येतात.

१. प्रबळ राष्ट्रवाद:- प्रबळ राष्ट्रवादाचे अस्तित्व हे आंतरराष्ट्रवादाच्या मार्गातील प्रमुख अडथळा बनलेला आहे. आंतरराष्ट्रवाद यशस्वी होण्यासाठी जगातील नागरिकांमध्येसहकार्यवृत्ती निर्माण होणे गरजेचे आहे. त्यासाठी राष्ट्राराष्ट्रातील नागरिकांनी आमा वादाला तिलांजली दिली पाहिजे, वा राष्ट्रवादाला आणि राष्ट्रीय संबंधाना स्थान दिले पाहिजे. कारण जागतिक समाज निर्माण होण्यासाठी त्याची नित आहे. परंतु आजही राष्ट्रांमध्ये राष्ट्रवादाची प्रखरता कमी होताना दिसत न राष्ट्राराष्ट्रामध्ये राष्ट्रवादाचा विखार वाढविण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. राष्ट्रवादामुळे राष्ट्रांमधील आक्रमक आणि युद्धखोर वृत्ती वाढत चाललेली अ त्यामुळे राष्ट्राराष्ट्रामध्ये लहानसहान गोष्टींवरून तीव्र संघर्ष होत आहेत. उदा. डोक्लम पठारावरून भारत-चीनमधील संघर्ष.

 २. राष्ट्रहिताला महत्त्व :- आंतरराष्ट्रीय पातळीवर वावरताना प्रत्येक राष्ट्र राष्ट्रला केंद्रीय स्थानी ठेवून परराष्ट्र धोरणाची आखणी करत असते. आंतरराष्ट्रीय प्रश्नाकडे पाहण्याचा राष्ट्राचा दृष्टिकोन मानवतावादी स्वरूपाचा नसतो, तर राष्ट्रहिताया आधारलेला असतो. राष्ट्रे जगाच्या कल्याणाचा विचार करण्याऐवजी स्वतःच्या राष्ट्राचा स्वार्थ लक्षात घेऊन कृती करण्याचा प्रयत्न करत असतात. राष्ट्रीय हितासाठी चुकीच्या गोष्टींकडे डोळेझाक केली जाते. अयोग्य गोष्टींनादेखील पाठिंबा दिला जातो. उदा. शीतयुद्ध. अफगणिस्तानमधील रशियाचा हस्तक्षेप कमी करण्यासाठी अमेरिकेने इस्लामी मूलतत्त्ववादी संघटनांच्याकृती केलेले दुर्लक्ष वा पुरविलेली मदत,

३.सार्वभौमत्वाला महत्त्व :- प्रत्येक राष्ट्र आपल्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी अत्यंत जागृत वा सजग असल्याचे दिसून येते. राष्ट्राच्या सार्वभौमत्वावर मर्यादा आली की राष्ट्र आंतरराष्ट्रीय कायदे व नियमदेखील धुडकावयाला कमी करत नाहीत, तसेच आपले सार्वभौमत्व इतरांवर लादण्याचा प्रयत्न करतात. आपले सार्वभौमत्व प्रस्थापित करण्यासाठी आक्रमक वृत्ती धारण करतात. शेजारील राष्ट्राच्या भूमीवर आपल्या सार्वभौमत्वाचा दावा करताते. या आक्रमक कारवाईमुळे जगात युद्धसदृश्य वातावरण निर्माण होते. अशा वातावरणात आंतरराष्ट्रवादाचा विकास होणे शक्य नाही. उदा. दक्षिण चीन समुद्राच्या बेटे व सरहद्दीवरून चीनने अनेक राष्ट्रांशी शत्रुत्व पत्करले वा संघर्षाची भूमिका घेतलेली दिसते.

 ४.आर्थिक साम्राज्यवाद :- आधुनिक काळात राजकीय साम्राज्यवादाचे अवशेष नष्ट झालेले असले, तरी आर्थिक साम्राज्यवादाचे अस्तित्व आजही कायम दिसून येते. मांडवलशाही व्यवस्थेतून आर्थिक साम्राज्यवादाला बळ प्राप्त होत आहे. मांडवलशाही व्यवस्थेतील खाजगीकरणामुळे उत्पादन अफाट स्वरूपात वाढलेले आहे. हा उत्पादित झालेला माल खपविण्यासाठी हक्कांची बाजारपेठ असणे गरजेचे असते आर्थिक प्रबल राष्ट्र बहुराष्ट्रीय कंपन्यांची स्थापना करत आहेत. याकंपन्यांच्या माध्यमातून विविध राष्ट्रांच्या बाजारपेठेत शिरकाव करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आपल्या देशातील माल आणि कंपन्यांना शिरकाव करता यावा म्हणून अविकसित व विकसनशील देशांना आर्थिक मदत, कर्ज आणि पायाभूत सुविधांची उभारणी, तांत्रिक ज्ञान, लष्करी साहित्य इत्यादी उपलब्ध करून दिले जात आहे. राष्ट्रांवर आर्थिक वर्चस्व प्रस्थापित झाले की, राजकीय वर्चस्व व नियंत्रण प्रस्थापित करणे सहज शक्य होते. उदा. अमेरिकेचा डॉलर साम्राज्यवाद बाजारपेठेवर नियंत्रण मिळविण्यासाठी चाललेल्या स्पर्धेतून राष्ट्राराष्ट्रामध्ये संघर्ष वाढताना दिसतो आहे. आर्थिक कारणामुळेदेखील राष्ट्र एकमेकांना मदत वा सहकार्य करत नाहीत. आर्थिक साम्राज्यवादामुळे आंतरराष्ट्रवादाच्या मार्गात अडथळे निर्माण होतात.

५. वैचारिक मतभिन्नता:- आधुनिक काळात आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक आधारावर अनेक विचारप्रणाल्या निर्माण झालेल्या आहेत. या विचारप्रणाल्यांमध्ये असलेली टोकाची मतभिन्नता आंतरराष्ट्रवादाच्या मार्गातील प्रमुख अडचण ठरलेली आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर साम्यवाद आणि भांडवलशाही विचारप्रणालीच्या आधारावर जगातील राष्ट्रांचे दोन गटांत विभाजन घडून आले. अमेरिकेच्या नेतृत्वाखाली भांडवलशाही राष्ट्रांचा गट आणि रशियाच्या नेतृत्वाखाली साम्यवादी राष्ट्रांचा गट. या दोन्ही गटांतील राष्ट्रांनी केलेल्या कारवायांमुळे शीतयुद्धाचा जन्म झाला आणि जागतिक शांततेला गालबोट लागले. आधुनिक काळातदेखील मूलतत्त्ववादी विचारधारेच्या आधारावर निर्माण झालेल्या संघटना, राष्ट्रे आणि गटांनी जागतिक शांततेला हरताळ फासण्याचे कार्य केलेले आहे. उदा. इसिसचा उदय,

६. शस्त्रास्त्र स्पर्धा :- शस्त्रसामर्थ्याने राष्ट्राचे संरक्षण चांगल्या प्रकारे करता येईल हा विश्वास दुसऱ्या महायुद्धानंतर राष्ट्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर बळावू लागला. त्यामुळे प्रत्येक राष्ट्राने शस्त्रसंपन्न होण्याचा प्रयत्न सुरू केला. आपल्या राष्ट्रीय उत्पन्नातील प्रचंड पैसा शस्त्रनिर्मिती व संशोधनावर खर्च केला. शस्त्रनिर्मितीत आपले राष्ट्र मागे पडू नये, म्हणून राष्ट्रे उत्पन्नाचा मोठा भाग खर्च करून महाभयकर अस्त्रे निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. शस्त्रास्त्र स्पर्धेमुळे राष्ट्राराष्ट्रांत संशय आणि अविश्वासाचे वातावरण निर्माण होत आहे. या वातावरणामुळे जागतिक शांततेला धोका पोहचत आहे. त्यामुळे शस्त्रास्त्र स्पर्धा आंतरराष्ट्रीय शांततेस घातक ठरत असून, प्रत्यक्ष युद्ध होत नसले तरी युद्धसदृश्य वातावरण कायम राहते.

७. प्रभावी आंतरराष्ट्रीय संघटनेचा अभाव :- राष्ट्राराष्ट्रातील संघर्ष व मतभेद मिटविण्यासाठी युनो ही संघटना कार्य करीत आहे. आंतरराष्ट्रीय कायदेदेखील अस्तित्वात आहेत; पण युनोचे कार्य नैतिकतेच्या आधारावर चालत असते. युनोजवळ स्वतःचे लष्कर नाही. ही संघटना आर्थिकदृष्ट्या कमजोर आहे. युनोलानिधीच्या राष्ट्रांकडून मोठ्या प्रमाणावर मिळतो. त्यामुळे ते युनोला इमानत नाहीत सुनोने कारवाईचा प्रयत्न केल्यास बडी राष्ट्रे निधी गोठविण्याचा निर्णय घेतात. त्यामुळे युनोला आक्रमक राष्ट्रांवर कारवाई करता येत नाही. अमेरिका, चीन, रशिया, इंग्लंड व फ्रान्स या देशांना नकाराधिकार वा व्हेटोचा अधिकार आहे. से देश स्वार्थासाठी व्हेटोचा वापर करून युनोच्या कार्यात अडचणी निर्माण करतात युनो प्रभावशाली नसल्याने आंतरराष्ट्रवादात अडथळे निर्माण होतात. याशिवाय नाटो, सिटो, सिएन्टो, सार्क, अलिप्त राष्ट्रांचा गट, वार्सा करार इ. वेगवेगळ्या संघटना क्षेत्रीय पातळीवर निर्माण झालेल्या आहेत. या संघटनांमुळे राष्ट्रे पुनोला महत्त्व देत नाही.

आंतरराष्ट्रवाद ही संकल्पना कितीही आदर्श व आधुनिक काळात उपयुक्त मानली जात असली, तरी या संकल्पनेच्या विकासाच्या मार्गात अनेक अडचणी निर्माण झालेल्या दिसतात. जोपर्यंत या अडचणी नष्ट करण्यासाठी राष्ट्र व्यापक प्रयत्न करीत नाही, तोपर्यंत आंतरराष्ट्रावादाचा विकास होणार नाही. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.