https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

इतिहासाचा अंत संकल्पना- End of History Concept


 

इतिहासाचा अंत संकल्पना- End of History Concept

इतिहासाचा अंत ही संकल्पना फ्रांसिस फ्युक्युयामा यांनी १९८९ मध्ये 'The End of History' नावाच्या निबंधात मांडली. त्यांच्यामते, शीतयुद्धाच्या शेवटाला इतिहासाच्या अंताची सुरुवात आहे. सद्यकाळात मानवता वैचारिक विकासाच्या अंतिम टप्प्यात आहे. पश्चिमी लोकतंत्राचे सार्वजनिकीकरण मानवीय सरकारचे अंतिम स्वरूप आहे. सोव्हिएट रशियाच्या पतनामुळे भांडवलशाही लोकशाहीला वैश्विकता प्राप्त झाली आणि उदारवादी लोकतंत्र वैध पद्धती असे जगभर मानले जाऊ लागले. भांडवलवादी अर्थव्यवस्था सर्व अर्थव्यवस्थेत सर्वोत्तम आहे. भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या आर्थिक कुशलतेमुळे राज्याची सैनिकशक्ती बलवान होत असल्यामुळे सर्व राज्य भांडवलशाही व्यवस्थेला प्रोत्साहन देत आहेत. साम्यबाद आर्थिक कुशलता आणि व्यक्तीस ओळख व स्थान देण्यास अपुरी पडली. लोकशाही व्यवस्था नागरिकांना योग्य ओळख प्रदान करण्याचे काम करते. पूर्वी लोकशाहीत व्यक्तीची ओळख एकांगी स्वरूपाची होती. उदा, स्वामी- दास, राजा-प्रजा. आधुनिक लोकशाही समाजातील लोकांना समानतेच्या आधारावर ओळख प्रदान करते. लोकतंत्र आणि भांडवलशाही दोन्ही संकल्पना मानवतेच्या आकांक्षांची पूर्ती करण्याचे कार्य करतात. दोन्ही संकल्पना एकत्र आल्यास मानवाला उच्चतम पातळी गाठता येते. कारण साम्यवादातील शक्तीचे केंद्रीकरण फक्त अर्थव्यवस्थेला नष्ट करत नाही तर मानवी स्वातंत्र्याला व नागरी समाजाला नाकारण्याचे काम करते. लोकतांत्रिक भांडवलशाहीमुळे मानव इतिहासाच्या अंतापर्यंत म्हणजे विकासाच्या सीमेपर्यंत पोहचला. भांडवलशाही लोकतंत्राला रोखले जाऊ शकत नाही वा दडपले जाऊ शकत नाही.

आधुनिक काळात उदारवादी लोकतंत्र हे प्रत्येक देशाचे लक्ष्य बनलेले आहे. साम्यवाद एक अपयशी शासन प्रकार सिद्ध झाल्यानंतर जगातील बहुसंख्य देशांनी उदारवादी लोकतंत्राचा स्वीकार केला आहे. उदारवादी लोकशाहीमुळे मानवी जीवनातील तणावाचे प्रमाण कमी झालेले आहे. व्यापक दार्शनिक विवाद भविष्यात होणार नाहीत. समाज जीवनातील व्यापक संघर्षाचे प्रश्न निर्माण होणार नाहीत. जगात कोणत्या प्रकारच्या शासकीय व्यवस्थेची कल्पना केली जाईल तर ती उदारमतवादी लोकशाही आहे. उदारमतवादी लोकशाही हा शासनाचा सर्वश्रेष्ठ प्रकार ठरला आहे. त्यामुळे समाजाच्या प्रश्नांचे निराकरण होणार आहे, या अवस्थेला फ्रांसिस फ्युक्युयामा इतिहासाचा अंत मानतो.

साम्यवाद लोकशाहीला पर्याय होऊ शकला नाही तसेच तो योग्य पद्धतीने जनतेचे समाधान करू शकला नाही. सोव्हिएट संघाचे पतन व वार्सा समझोत्याचे अपयश हे साम्यवादी विचारधारेचे अपशय आहे. मार्क्सचा सिद्धांत व विचार वैश्विक पातळीवर अपयशी ठरले. या गृहीतकाच्या आधारावर फ्रांसिस फ्युक्युयामाची इतिहासाचा अंत संकल्पनेचे विश्लेषण करतो. इतिहासाचा अंत ही संकल्पना तीन गृहीतकांवर आधारलेली आहे.

·      १९ व्या शतकापासून लोकशाहीचा निरंतर विकास सुरू आहे. जगातील बहुसंख्य देशांनी सद्यकाळात तिचा स्वीकार केलेला आहे. उदा. १५० पेक्षा जास्त देशात लोकशाही आहे.

·      मार्क्सच्या मतानुसार इतिहासात परस्परविरोधी दोन वर्ग अस्तित्वात आहेत.उदा. शोषक व शोषित. हेगेलच्या द्वंद्ववादी विचारांचा आधार घेऊन फ्रांसिस फ्युक्युयामा सांगतो की, लोकतंत्रात बाद व प्रतिवाद संवादात प्रतिवर्तित होतात. त्यामुळे दोन्ही वर्गांचे अस्तित्व लोकतंत्रात टिकून राहते. लोकतंत्र संघर्ष व हिंसा प्रवृत्तीचे दमन करतो तसेच तणाव कमी करतो आणि युद्ध देखील रोखतो.

 

·      साम्यवादी विचार प्रातिनिधिक लोकशाहीशी मेळ खात नाही म्हणून भविष्यात लोकशाही व्यवस्था साम्यवादाचा त्याग करून बाजारव्यवस्थेला प्राधान्य देणाऱ्या भांडवलशाही, उदारवादी लोकशाहीचा स्वीकार करतील. 'इतिहास अंत' संकल्पनेचे परीक्षण

·      फ्रांसिस फ्युक्युयामा इतिहासाचा अंत संकल्पना मांडताना साम्यवादाच्या असफलतेवर जोर देतो. दुसऱ्या महायुद्धानंतर साम्यवादी प्रतिमान अपयशी होऊ लागले. साम्यवादाच्या पतनानंतर शीतयुद्धाची समाप्ती होऊन आंतर-राज्य संघर्ष कमी होऊ लागल्यामुळे राष्ट्रा-राष्ट्रातील सहकार्य भावनेचा विकास होऊ लागला. त्यातून आंतरराष्ट्रीय व्यापाराला उत्तेजन मिळू लागले. परिणामत: बाजार व्यवस्थेला प्राधान्य देणाऱ्या खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण संकल्पनेला बळ प्राप्त होऊन अनेक राष्ट्र त्यांचा स्वीकार करू लागले. उदारमतवादी भांडवलशाही लोकशाही आणि या संकल्पनामुळे जगातील मोठे प्रश्न व व्यापक संघर्ष व दार्शनिक चर्चांना पूर्णविराम मिळाला आणि ही स्थिती म्हणजे इतिहासाचा अंत आहे, असे फ्रांसिस फ्युक्युयामा मानतो. इतिहासाचा अंत संकल्पनेवर पुढील प्रकारचे आक्षेप घेतले जातात.

·      मूलतत्त्ववादी आणि इस्लामी कट्टरतावादी इतिहासाचा अंत संकल्पनेची खिल्ली उडवितात. इसिसचा इराक व सिरियातील उदय, ओसामा बिन लादेन आणि इस्लाम जगतातील दहशतवादी संघटनांच्या उच्छादामुळे जगावर आलेल्या संकटामुळे संघर्ष संपले आहेत वा दार्शनिक वादविवादांचा अंत झाला आहे. असे मानणे योग्य नाही. फ्रांसिस फ्युक्युयामा या टीकेला उत्तर देताना सांगतात की, इस्लामी कट्टरवादाचा पराभव झालेला आहे. इस्लामी कट्टरतावाद इस्लामी जगाबाहेर फारसा प्रभावी सिद्ध झालेला नाही. परंतु त्याचा हा दावा अनेक अभ्यासक मान्य करत नाहीत कारण आजही जगाला दहशतवादाचा विळखा बसलेला आहे. जगातील बहुसंख्य देश दहशतवादाने पीडित आहेत. उदा. अमेरिका, भारत, फ्रान्स. नवमार्क्सवादी अभ्यासक इतिहासाचा अंत संकल्पनेला नाकारतात. एंडरसनसारखा अभ्यासक भांडवलशाही लोकशाहीत दारिद्रय, जातीय तणाव, बेरोजगारी इत्यादी सारखे अनेक व्यापक व संघर्ष निर्माण करणारे वा लोकतंत्राला आव्हान देणारे प्रश्न निर्माण झाले आहेत, परंतु ही संकल्पना त्याकडे दुर्लक्ष करते हा आक्षेप घेतात. फ्रांसिस फ्युक्युवामा लोकशाहीत निर्धनता, नक्षलवाद, लिंगभेदभाव इत्यादी समस्या असल्याचे मान्य करतो. परंतु त्यातून व्यापक संघर्षाची शक्यता नसून त्यावर व्यवस्थातर्गत तोडगा काढता येईल हा विश्वास व्यक्त करतो.

·      आर्थिक प्रगती व भरभराटीच्या आधारावर पुढे आलेल्या इतिहासाचा अंत संकल्पनेला पर्यावरणवादी विरोध करतात. बाजार अर्थव्यवस्थेतून होणाऱ्या आर्थिक प्रगतीत फक्त नफ्याचा विचार केला जातो. पर्यावरणाचा विचार केला जात नाही. बऱ्याचदा पर्यावरणाचा न्हास व लूट करून प्रगती साध्य करण्याचा प्रयत्न केला जातो, म्हणून बाजारप्रणीत अर्थव्यवस्था चिरकालीन विकास संकल्पनेशी जुळत नाही. समाजाच्या आर्थिक प्रगतीचा बाजारप्रणीत विचार भविष्यात पर्यावरण प्रश्नाचा निर्माता ठरेल. पर्यावरणाच्या प्रश्नावरून संघर्ष तीव्र होतील हा धोक्याचा इशारा देतात.

·       क्रांतिकारी स्वतंत्रतावादी लोकतंत्र व्यवस्था वैयक्तिक अधिकारांचा सार्वजनिक हितासाठी बळी देऊन उदारवादी परंपरेला हानी पोहचवत आहेत. राजेशाहीपेक्षा लोकतंत्राचे वेगाने पतन होत असल्यामुळे व्यक्तिगत अधिकार संरक्षणासाठी सद्यकालीन लोकतंत्रात सुधारणेची आवश्यकता सांगून इतिहासाचा अंत संकल्पना नाकारतात,

·      फ्रांसिस फ्युक्युवामा हा अंतवादी सिद्धांताचा समर्थक आहे. अंतवाद म्हणजे जगातील सर्व बाईट गोष्टी या विचारांचा अंत होईल वा वाईट गोष्टी अंताकडे प्रस्थान करत आहेत असे मानतो. विश्वाची प्रगती आपआपल्या प्रक्रियेनुसार होत आहे. त्यामुळे लोकांची परिस्थिती उच्चतर वा चांगली होत आहे. बाईट गोष्टींचा अंत आणि विकास क्रम सातत्याने सुरू राहील असे मानतो. राजकीय विकासाचा अभ्यासक हर्टिग्टन हा अंतवादी दृष्टिकोन मान्य करत नाही. फ्रांसिस फ्युक्युवामा यांनी सांगितलेल्या मान्यतेनुसार व्यक्ती आपले जीवन व्यतीत करू शकत नाही. वाईट गोष्टी आर्थिक विकास व प्रगतीसोबत आपोआप नष्ट होतील, असा विचार करणे म्हणजे अयोग्य मार्गावर चालण्यासारखे आहे. प्रगतिवादाचे समर्थक अशा विचारावर चालू लागले तर प्रगतिविषयी उदासीनता, बेजबाबदारपणा व सुस्तपणा निर्माण होईल म्हणून अंतवादाची कल्पना राजकीय विकासाच्या मार्गात अनेक अडथळे निर्माण करेल. आपोआप प्रगती होणार आहे. जगाचे सर्व प्रश्न सुटणार आहेत हा विचार मानवाला कार्यविमुख बनविण्यास कारणीभूत ठरेल अशा पद्धतीने फ्रांसिस फ्युक्युवामा इतिहासाच्या अंत संकल्पनेला अभ्यासकांनी नाकारलेले आहे. कारण हा सिद्धांत साम्यवादाचे पतन ह्या एकमेव गृहीतकावर आधारलेला आहे.

1 टिप्पणी:

If you have any donuts. Lets me Know.