https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

संशोधन अर्थ, स्वरूप व प्रकार वस्तुनिष्ठ प्रश्न Research Meaning, Nature and Types MCQ


 

संशोधन अर्थ, स्वरूप व प्रकार वस्तुनिष्ठ प्रश्न –

Research Meaning, Nature and Types MCQ

१. ज्ञानासाठी शोध (Search of Knowledge) हा शब्द सर्वसामान्य व्यवहारात कोणत्या शब्दाशी संबंधित वापरला जातो.

अ) अवलोकन   क) विश्लेषण

ब) निरीक्षण    ड) संशोधन

उत्तर- ड

२. Research शब्दाचा खालीलपैकी नेमका अर्थ कोणता ते सांगा.

अ) पुन्हा पुन्हा शोध घेणे    ब) कारण मीमांसा करणे

क) तथ्य गोळा करणे  ड) भविष्य कथन करणे

उत्तर- अ

३. संशोधनात खालील कोणत्या घटकाचा समावेश होता.

अ) जुन्या ज्ञानाचे परीक्षण ब) नवीन ज्ञान संपादन

क) अ व दोन्ही ड)  अ व दोन्हीपैकी नाही.

उत्तर- k

४. संशोधन खालीलपैकी कोणत्या बाबींना प्रोत्साहन देते.

अ)निरीक्षण ब) चाचणी घेणे क) आकलन करणे ड) वरील सर्व

उत्तर- ड

५. स्लेसिजर व स्टीफेन्सनने संशोधन प्रक्रियेचे कोणते पैलू सांगितले आहेत

अ) सामान्यीकरणाच्या हेतूने संकल्पना व प्रतीके यांची हेतूपूर्वक हाताळणी

ब) प्रस्थापित ज्ञान कक्षा वाढविणे

क) प्रमाणित ज्ञानाचा सिद्धांत निर्मिती व व्यवहारात उपयोग करणे

ड) वरील सर्व

उत्तर- ड

६.-------- ही संशोधनाची जननी आहे.

अ) जिज्ञासा वा कुतूहल ब) बुद्धी

क) अनुभव  ड) यापैकी नाही

उत्तर- अ

७. मानव हा मर्त्य प्राणी आहे. (सामान्य विधान) राजेंद्र हा एक मानव आहे. म्हणून, राजेंद्र हा मर्त्य आहे.

वरील विधान खालील कोणत्या पद्धतींशी संबंधित आहे.

अ) आगमन पद्धती   ब) निगमन पद्धती

क) अनुभव प्रामाण्य पद्धती ड) निरीक्षण पद्धती

उत्तर- ब

८. पुन्हा पुन्हा पडताळा घेतल्यास सारखा सारखा अनुभव येणे म्हणजे------

अ) निगमन पद्धत    ब) आगमन पद्धत

क) सर्वेक्षण ड) अनुभव प्रामाण्य

उत्तर- ड

९. संशोधन संदर्भातील खालीलपैकी विधान निवडा ?

अ) संशोधन कोणत्याही ज्ञान शाखेत तथ्य शोधण्याची प्रक्रिया

ब) सिद्धांताचे पुनः परीक्षणासाठी सखोल अभ्यास

क) संशोधन ही ज्ञान प्राप्त करण्याची प्रक्रिया आहे.

ड) वरीलपैकी सर्व

उत्तर- ड

१०. खालीलपैकी चुकीचे विधान निवा?

अ) शास्त्र ही एक पद्धती आहे

ब) तथ्य संकलन करणे म्हणजे शास्त्र नव्हे

क) एखाद्या विषयाचा व्यवस्थाबद्ध ज्ञान समुच्चय म्हणजे शास्त्र

ड) वरीलपैकी कोणतेही नाही

उत्तर- ड

११. आगमनासाठी निगमन व दोन्ही सत्यान्वेषणासाठी आहेत हेच खरे आहे असे कोणी म्हटले आहे ?

अ) कार्ल पिअरसन  ब) लॅराबी

क) ऑगस्ट कॉम्त    ड) मोझर

उत्तर- क

१२. विवेक ही व्यक्ती विवेकशील आहे. सुनील विवेकशील आहे. म्हणून विवेक, सुनील, महेंद्र इत्यादी व्यक्ती ज्यात समाविष्ट आहेत असा समस्त व्यक्तींचा वर्ग म्हणजे, सर्व मानव विवेकशील आहेत.

वरील उदाहरण खालील कोणत्या पद्धतीशी संबंधित आहेत.

अ) आगमन पद्धती ब) निगमन पद्धती

क) निरीक्षण पद्धती ड) प्रक्षेपण पद्धती

उत्तर- अ

१३. बुद्धिप्रामाण्यावाद्यांच्या------------मते पद्धत ही शास्त्राचे सार आहे. 

अ) आगमन पद्धती ब) निगमन पद्धती

क) निरीक्षण पद्धती    ड) मुलाखत पद्धत

उत्तर- ब

१४. इंद्रिय ज्ञान, मनोत्पादिते व अनुभव यांच्या आधारावर बनविण्यात येणाऱ्या अमूर्त तत्त्वांना--------- असे म्हणता येईल.

अ) संकल्पना     ) प्रतीके   क) मूल्य   ड) वस्तुनिष्ठता

उत्तर- अ

१५. जोहॅन गॅल्टुगने वस्तुनिष्ठतेच्या कोणत्या दोन कसोट्या सांगितलेल्या आहेत.

१) एखाद्या विशिष्ट घटनेचा एकाच निरीक्षकाने पुनः पुनः केलेल्या अवलोकनावरून निघणारे निष्कर्ष सारखेच असले पाहिजे.

२) एखाद्या घटनेच्या निरनिराळ्या निरीक्षकांनी केलेल्या अवलोकनावरून त्यांनी काढलेले निष्कर्ष सारखेच असले पाहिजे.

अ) १ आणि २ दोन्ही ब) फक्त १

क) फक्त २ ड) १ आणि २ दोन्हीही नाही

उत्तर- अ

१६. नवतत्त्व साधन मंजरी (Ovum Organum) हे तत्त्व कोणी सांगितले आहे.

अ) कार्ल पिअरसन   ब) फ्रन्सिस बेकन

क) फेलिक्स  ड) जे. डब्लयू बेस्ट

उत्तर- ब

१७. आगमन पद्धती म्हणजे काय ?

अ) भिन्न भिन्न घटना व वस्तूत आढळणाऱ्या साम्यांच्या आधारे सामान्य विधान करणे

ब) सामान्य विधानातून विशिष्ट विधान करणे

क) वरील पैकी दोन्ही  ड) वरील पैकी एकही नाही

उत्तर- ब

१८. आदिम जातीच्या प्रतिमा, (Idol of the Tribe) गुहेच्या प्रतिमा, (Idol of Cave) बाजारपेठेच्या प्रतिमा (Idol of the Market Place) आणि रंगमंदिराच्या प्रतिमांचे विवेचन कोणी केलेले आहे.

 अ) फ्रन्सिस बेकन  ब) फेलिक्स कॉफमन

क) ऑगस्ट फॉम्त   ड) लगेबी

उत्तर- अ

१९. प्रामाण्य पुन्हा पुन्हा तपासून पाहणे ही शाखाची एक  गरज असते? अ) प्रक्षेपण    ब) प्रयोग क) निष्कर्ष ड) वरीलपैकी सर्व

उत्तर- क

२०. तथ्य हाताळण्याची पद्धत म्हणजे शास्त्र असे कोणी म्हटले आहे?

अ) कार्ल पिअरसन ब) फ्रन्सिस बेकन क) लंरोबी ड) मोझर

 उत्तर- क

२१. सामान्यत्वाकडून विशिष्टत्वाकडे ज्ञान प्रसारित करण्याची तर्कशास्त्रातील पद्धती कोणती आहे?

अ) आगमन पद्धती (Induction Method)

ब) निगमन पद्धती (Deduction Method)

क) निरीक्षण पद्धती (Observation Method)

ड) मुलाखत पद्धती (Interview Method)

उत्तर- ब

२२. विशिष्टत्वाकडून सामान्यत्वाकडे ज्ञान प्रसारित करण्याची पद्धती तर्कशास्त्रातील पद्धती कोणती आहे?

अ) आगमन पद्धती (Induction Method)

ब) निगमन पद्धती (Deduction Method)

क) निरीक्षण पद्धती (Observation Method)

ड) मुलाखत पद्धती (Interview Method)

उत्तर-

२३. निगमन पद्धती म्हणजे काय ?

अ) भिन्न भिन्न घटना व वस्तूत आढळणाऱ्या साम्याच्या आधारे विधान करणे

 ब) सामान्य विधानातून तर्क अंतर्भूत विशिष्ट विधान करणे

क) अ व ब दोन्ही  ड) अ व ब दोन्हीही नाही

उत्तर-ब

२४. इंद्रियजन्य ज्ञानाला अनुभवसंपन्न पुराव्याचे बळ देणे........होय.

अ) निष्कर्ष ब) सामान्यीकरण  क) अनुभवप्रामाण्यता ड) विश्वसनीयता

उत्तर-क

२५. विश्वसनीयता (Reliability) म्हणजे काय ?

अ) मापन साधनाच्या अचूकतेची मात्रा

ब) मापन साधनातील चुकांची मात्रा

क) मापन साधनातील पुनरावृत्तीची मात्रा

ड) वरीलपैकी नाही

उत्तर-अ

२६. शद्ध संशोधनाचे खालीलपैकी कोण समर्थक होते?

अ) रॉबर्ट लीड व यंग ब) हक्सले व फ्रन्सिस बेकन

क) फॅरडे व जोहन गॅल्टंग ड) वरीलपैकी नाही

उत्तर-ब

२७. व्यावहारिक संशोधनाचे खालीलपैकी कोण समर्थक होते?

अ) रॉबर्ट लीड व यंग ब) फॅरडे व जोहॅन गॅस्टंग

क) पिअरसन व सँराबी ड) यापैकी नाही

उत्तर-अ

२८. भारतीय नियोजन मंडळाच्या नियंत्रणाखाली १९५३ मध्ये कोणती समिती स्थापन करण्यात आली होती.

अ) शिक्षण समिती  ब) बाल हक समिती

क) संशोधन कार्यक्रम समिती ड) विद्यापीठ सुधार समिती

उत्तर-क

 २९. इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च (ICSSR) संस्था कोणत्या वर्षी स्थापन झाली होती?

अ) १९५९  ब) १९६८ क) १९६९ ड) १९७०

उत्तर-क

३०. सर्वेक्षण व संशोधन या दोन संज्ञेत कोणी फरक स्पष्ट केलेला आहे.

) किशन गिब्सन ब) कार्ल पिअरसन

क) रॉबर्ट लीड ड) मार्क माईक

उत्तर-क

३१. सत्यापनशीलता (Verifiability) म्हणजे काय ?

अ) वैज्ञानिक पद्धतीने काढलेल्या निष्कर्षाची कोणत्याही वेळी परीक्षा घेणे

ब) वैज्ञानिक पद्धतीने काढलेल्या निष्कर्षाच्या चाचण्या घेणे

क) अ व ब दोन्ही ड) अब ब दोन्हीपैकी नाही

३२. Knowledge for What हे पुस्तक कोणी लिहिले?

अ) ऑगस्ट कॉम्त क) रॉबर्ड लीड

ब) चार्लस डार्विन ड) गुड व हॅट

उत्तर-क

३३. शास्त्रीय संशोधनाची प्रथम पायरी कोणती असते?

अ) संशोधन आराखडा ) समस्या सूत्रण

क) तथ्य संकलन ड) सामान्यीकरण

उत्तर-ब

 ३४. कोणत्याही मापन साधनाद्वारे उद्देशांचे किंवा वैयक्तिकतेच्या वैशिष्ट्यांचे मापन करता येते.

अ) विश्वसनीयता (Reliability) ब) सप्रमाणता (Validity)

क) सत्यापनशीलता (Verifiability) ड) वरीलपैकी सर्व

उत्तर-ड

३५. सामाजिक घटना व समस्या याबाबतीत ज्ञान प्राप्त व्हावे म्हणून केलेल्या क्रमबद्ध संशोधनाला म्हणतात?

अ) सामाजिक संशोधन ब) सामान्य संशोधन

क) विशेष संशोधन ड) वरीलपैकी एकही नाही

उत्तर-अ]

३६. संशोधकाचे आवश्यक गुण खालीलपैकी कोणते आहेत.

अ) विषयाशी एकरूपता व जागरूक वृत्ती ब) मनोधैर्य व संयम

क) सर्वसामान्य निष्कर्ष ड) वरीलपैकी सर्व

उत्तर-ड

३७. सामाजिक संशोधनाची प्रमुख वैशिष्ट्ये खालीलपैकी कोणती आहेत.

अ) सामाजिक घटनांचा अभ्यास  ब) नवीन तथ्य शोध व जुन्या तथ्यांचे परीक्षण

क) कार्यकारण संबंधाचा शोध ड) वरीलपैकी सर्व

उत्तर-ड

३८. वस्तुनिष्ठतेच्या प्रमुख समस्या कोणत्या?

अ) पक्षपात      ब) पूर्वग्रह

क) विशेष संशोधन  ड) वरीलपैकी सर्व

उत्तर-ड

 .वस्तुनिष्ठता म्हणजे ..........

अ) पूर्वग्रहाचा प्रभाव पडू न देता विषयाचा यथार्थ अभ्यास करणे

ब) अनुभवाच्या आधारावर अभ्यास व संशोधन करणे

क) स्वमतानुसार संशोधन करणे ड) वरीलपैकी सर्व

उत्तर-अ

४०. व्यवहार (Practice) म्हणजे------

अ) अप्रत्यक्ष सामाजिक वास्तव  ब) प्रत्यक्ष सामाजिक वास्तव

क) वैश्विक सामाजिक वास्तव ड) अनुभवजन्य सामाजिक वास्तव

उत्तर-ब

४१. सामाजिक सर्वेक्षण आणि सामाजिक संशोधन यामध्ये फरक करण्यासाठी रॉबर्ट लिंडने कोणत्या घटकास महत्त्व देतो.

अ) साहचर्य  ब) सुसंगती क) कालबंधन   ड) तटस्थता

उत्तर-क

४२. शास्त्राची प्रमुख मूलतत्वे कोणती आहेत.

अ) अनुभवप्रामाण्यता  ब) वस्तुनिष्ठता

क) सामान्यीकरण ड) वरीलपैकी सर्व

उत्तर-ड

४३. शास्त्रीय संशोधन पद्धतीची मूलभूत तत्वे खालीलपैकी कोणती ?

अ) अनुभव प्रामाण्य व वस्तुनिष्ठता ब) संबंध संकल्पनाचा उपयोग व नैतिक तटस्थता

क) सामान्यीकरण व भविष्यकथन  ड) वरीलपैकी सर्व

उत्तर-ड

४४. खालीलपैकी योग्य विधान निवडा.

अ) एखाद्या विषयाचा व्यवस्थाबद्ध ज्ञान समुच्चय म्हणजे शास्त्र

ब) घटनांची सुसंगती लावण्याचा बौद्धिक प्रयत्न म्हणजे शास्त्र

क) तथ्य हाताळण्याची पद्धत म्हणजे शास्त्र ड) वरीलपैकी सर्व

उत्तर-ड

४५. खालील विधानातून अचूक विधान निवडा.

अ) तथ्याचा क्रम निर्धारित करणे हे संशोधकाचे कार्य असते.

ब) सामाजिक नियोजनास देणे हा सामाजिक संशोधनाचा उद्देश असतो.

क) अज्ञानाचा नाश करणे हा सामाजिक संशोधनाचा हेतू असतो.

ड) वरीलपैकी सर्व

उत्तर-ड

४६. खालील विधानातून चुकीचे विधान निवडा?

अ) तथ्ये प्रचितीला येतात.

ब) निरीक्षण पद्धतीद्वारा तथ्य संकलित केले जातात.

क) संशोधनात प्रत्येक तथ्याचा पडताळा घेतला जातो.

ड) वरीलपैकी एकही नाही.

उत्तर-ड

४७. सिद्धांताची खालीलपैकी वैशिष्ट्ये कोणती आहेत?

अ) सिद्धांत तथ्यापासून निर्माण होतात.

ब) सिद्धांत म्हणजे तथ्याच्या आधारावर निर्माण केलेला निष्कर्ष होय.

क) सिद्धांत अमूर्त स्वरूपात प्रकट होतो.

ड) वरीलपैकी सर्व

उत्तर-ड

४८. सिद्धांताचे संशोधनातील महत्त्व सांगा.

अ) सिद्धांतामुळे उपलब्ध ज्ञानातील त्रुटी,

ब) सिद्धांताच्या आधारे भाकीतकन करता येते.

(क) तथ्य सकलनाने सिद्धांताला चालना मिळते ड) वरीलपैकी सर्व

उत्तर-ड

४९. INFLIBNET म्हणजे काय?

अ) Information Liberty Work

) International Federation of Library Network

क) Information and Library Network

ड) वरीलपैकी नाही

उत्तर-क

५०. डिजीटल लायब्ररी कोणाकडून चालविली जाते.

अ) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगलोर

ब) जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली

क) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नालॉजी, मुंबई

) वरीलपैकी एकही नाही.

उत्तर-अ

५१. Directory of Open Access Journal (DOAJ) हे संशोधन मासिक कोणाकडून चालविले जाते.

अ) लुंड विद्यापीठ लायब्ररी, स्वीडन

ब) अमेरिकन काँग्रेस लायब्ररी, वॉशिंग्टन

क) नॅशनल लायब्ररी ऑफ जपान, टोकियो

ड) नॅशनल लायब्ररी ऑफ इंडिया, कलकता

उत्तर-अ

५२. ई- ज्ञानकोश खातील कोणत्या संस्थेकडून प्रायोजित

अ) जेएनयू, नवी दिल्ली

ब) यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नासिक

क) इग्नू, नवी दिल्ली ड) वरीलपैकी एकही नाही.

उत्तर-क

५३. Citation Index ही संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली.

अ) G.S. Cutter    ब) H. W. Wilson

क) Eugene Garfield    ड) Dr. S. G. Ramchandran

उत्तर-क

५४. Impact Factor कशाशी संबंधित आहे.

अ) लेखकांची गुणवत्ता ब) संशोधन मासिकाची गुणवत्ता

क) संशोधन मासिकांची विक्री    ड) वरीलपैकी सर्व

उत्तर-ब

५५. शोध गंगा म्हणजे-------------

) Open Journals Directory

) Open Access Book Directory

) Its Electronic Theses and Dissertation Repository

ड) वरीलपैकी एकही नाही.

उत्तर-क

५६. भारतात ISBN नंबर कोणती संस्था बहाल करते?

अ) राजा राममोहन रॉय नॅशनल एजन्सी

ब) नॅशनल लायब्ररी ऑफ इंडिया   क) भारतीय संसद गृह

ड) एशियाटिक सोसायटी, मुंबई

उत्तर-अ

५७. शास्त्रीय संशोधनाच्या पायऱ्या कोणत्या आहेत?

अ) समस्या सूत्रण व संशोधन आराखडा ) निरीक्षण व गृहीत कृत्य

क) तथ्य संकलन व सामान्यीकरण   ड) वरीलपैकी सर्व

उत्तर-ड

५८. सामाजिक संशोधनाचे प्रमुख प्रकार कोणते ते सांगा.

अ) तांत्रिक व व्यावहारिक संशोधन

ब) करणात्मक व अकरणात्मक संशोधन

क) मूलभूत व व्यावहारिक संशोधन

ड) व्यक्तिनिष्ठ व वस्तुनिष्ठ संशोधन

उत्तर-क

५९. सामाजिक घटना आणि समस्या याबाबत नवीन ज्ञान प्राप्तीकरिता करण्यात आलेल्या व्यवस्थित संशोधनाला...........असे म्हणतात.

अ) व्यावहारिक संशोधन ब) सामाजिक संशोधन

क) कार्यकारणात्मक संशोधन ड) वरीलपैकी एकही नाही

उत्तर-ब

६०. सामाजिक संशोधनाची वैशिष्ट्ये कोणती ?

अ) नवीन तथ्य शोध आणि जुनी तथ्य परीक्षण

ब) कार्यकारण संबंधाचा शोध  क) वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग

ड) वरीलपैकी सर्व

उत्तर-ड

६१. खालीलपैकी कोणत्या विचारवंताने मूल्यविरहित संशोधनावर टीका केलेली  आहे.

अ) फेयराबैंड   ब) ग्रे

 क) लेहमन आणि मोरी  ड) कार्ल पिअरसन

उत्तर-ब

६२. मूलभूत संशोधनाची उद्दिष्टे कोणती असतात..

अ) ज्ञानासाठी ज्ञान  

ब) प्रमेय मांडणी व संकल्पना निर्मितीसाठी नियम निर्मिती

क) पूर्वज्ञानाचे पुनर्परीक्षण  ड) वरीलपैकी सर्व

उत्तर-ड

६३. व्यावहारिक संशोधनाला प्रमुख उद्देश कोणता असतो.

अ) ज्ञानाचा व्यावहारिक समस्या सोडविण्याकरिता उपयोग

ब) सिद्धांत निर्मिती    क) ज्ञानासाठी ज्ञान

ड) यापैकी एकही नाही

उत्तर-अ

६४. आदर्श संशोधकाचे गुण कोणते असतात.

अ) शास्त्रीय पद्धतीवर विश्वास

ब) संशोधन विषयाशी पूर्ण तादात्मीकरण

क) पूर्वग्रहापासून दूर   ड) वरीलपैकी सर्व

उत्तर-ड

६५. मूलभूत आणि व्यावहारिक संशोधनात कोणी सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न केलेला होता?

अ) टी.एच. हक्सले ब) रॉबर्ट लिंड

क) ऑगस्ट कॉम्त ड) लॅरोबी

उत्तर-क

६६. नैसर्गिक शास्त्र आणि सामाजिक शास्त्रातील प्रमुख फरक कोणता?

अ) अभ्यासविषय ब) अध्ययन कार्यक्षेत्र

क) अभ्यासपद्धत व हेतू ड) वरीलपैकी सर्व

उत्तर-ड

६७. वैज्ञानिक अभ्यास पद्धतीचा प्रमुख गुण कोणता?

अ) पुराव्याची अचूक छाननी ब) प्रयोगाचा अभाव

क) विशिष्टीकरणाची प्रवृत्ती ड) अस्पष्ट स्वरूप

उत्तर-अ

६८. संशोधनाची प्राथमिक अवस्था कोणती असते.

अ) विश्लेषण ब) साहित्य सर्वेक्षण

क) सारणीकरण   ड) अहवाल लेखन

उत्तर-ब

६९. नियंत्रित स्थितीत निरीक्षण परीक्षणाद्वारे केल्या जाणाऱ्या सामाजिक घटनांच्या अभ्यासाला काय म्हणतात.

अ) प्रयोगात्मक पद्धती    ब) पॅनल पद्धती

क) व्यप्टी अभ्यास पद्धती ड) ऐतिहासिक पद्धती

उत्तर-अ

७०. अभिजात संशोधनाचा प्रमुख हेतू

अ) व्यावहारिक उपयोगब) उपाययोजन

क) ज्ञाननिर्मिती    ड) यापैकी नाही

उत्तर-क

७१. वैज्ञानिक पद्धतीची वैशिष्ट्ये खालीलपैकी कोणती नाही.

अ) वस्तुनिष्ठता ) व्यक्तिनिष्ठता

क) विश्वसनीयता ड) सप्रमाणता

उत्तर-ब

७२. का? कसे? कधी? आदी प्रश्नांची उत्तरे शोधण्याकरिता---------------प्रकारचे संशोधन केले जात असते.

अ) कृती संशोधन   ब) व्यावहारिक संशोधन

क) गुणात्मक संशोधन ड) शुद्ध संशोधन

उत्तर-अ

७३. प्रयोगकर्त्याला ज्या चलांचे परिणाम ठरवावयाचे असतात त्यांना------ चल असे म्हणतात.

अ) स्वाश्रयी चल क) अंतर चल

ब) बाह्य चल   ड) यापैकी नाही.

उत्तर-अ

७४. प्रयोगात अडथळा निर्माण करणाऱ्या चलांना------------ प्रकारचे चल असे म्हणतात.

अ) स्वाश्रयी चल    ब) बाह्य चल

क) अंतर चल   ड) यापैकी नाही.

उत्तर-ब

७५. प्राप्त माहितीच्या प्रमाणतेचा शोध घेण्याच्या चिकित्सेला म्हणतात.

अ) आंतरमीमांसा    ब) पूर्वमीमांसा

क) बाह्यमीमांसा   ड) कारणमीमांसा

उत्तर-क

७६. कृती संशोधनाचे मुख्य क्षेत्र-----------आहे.

अ) दवाखाने     ब) सरकारी कार्यालये

क) स्वयंसेवी संस्था ड) शाळा

उत्तर-ड

७७. प्रायोगिक संशोधन पद्धतीत-------- पेक्षा जास्त चलाची तुलना करता येते.

अ) एक चल     ब) दोन चल

क) दोनपेक्षा जास्त चल ड) एकापेक्षा जास्त चल

उत्तर-क

७८. प्रयोगाच्या बाह्य परिस्थितीवर खालीलपैकी कोणत्या घटकाचा प्रभाव असतो.

अ) नमुन्याचे प्रतिनिधित्व    ब) प्रायोगिक मृत्यता

क) वय व लिंगाचा प्रभाव    ड) वरीलपैकी सर्व

उत्तर-ड

७९. प्रायोगिक पद्धतीत प्रयोगाच्या आंतरिक परिस्थितीवर खालील कोणत्या घटकाचा प्रभाव पडत असतो.

अ) समकालीन घटना  ब) परिपकता

क) गुणांकातील बदलाचा परिणाम ड) वरीलपैकी सर्व

उत्तर-ड

८०. कृती संशोधनाच्या निष्कर्षाचे------------- करता येत नाही.

अ) प्रमाणीकरण     ब) सांख्यिकीकरण

क) सामान्यीकरण     ड) वस्तुनिष्ठीकरण

उत्तर-क

८१......... अभिकल्पात प्रायोगिक व नियंत्रित गटावर आलटून पालटून प्रायोगिक उपायाचा अवलंब केला जातो.

अ) आवर्तन गट     ब) कार्यात्मक गट

क) एक गट अभिकल्प    ड) घटकात्मक अभिकल्प

उत्तर-अ

८२. एका स्वाश्रयी चलाचा आश्रयी चलावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास करण्यासाठी ...........अभिकल्पाचा उपयोग केला जात असतो.

अ) आवर्तन अभिकल्प   ब) कार्यात्मक अभिकल्प

क) घटकात्मक अभिकल्प   ड) परिणामोत्तर अभिकल्प

उत्तर-ब

८३. बाह्य मीमांसेचा हेतू...... ची खात्री करणे असतो.

अ) माहिती सत्यता ब) माहितीचे आकलन

क) माहितीची विश्वसनीयता  ड) माहितीची प्रमाणता

उत्तर-अ

८४. प्राप्त माहितीच्या वैधतेचे मूल्यांकन करण्याच्या प्रक्रियेला--------- असे म्हणतात.

अ) बाह्य मीमांसा     ) आंतरिक मीमांसा

क) पूर्व मीमांसा ड) उत्तर मीमांसा

उत्तर-ब

८५. सामाजिक संशोधनाचे कारक घटक कोणते आहेत.

अ) अज्ञानासंबंधी जिज्ञासा   ब) कारणमीमांसा

क) अनपेक्षित परिस्थिती   ड) वरीलपैकी सर्व

उत्तर-ड

८६. शास्त्रीय चिकित्सा म्हणजे काय-------------------------

अ) वस्तुनिष्ठ पुराव्यावर आधारलेला बौद्धिक विचार

ब) व्यक्तिनिष्ठ पुराव्यावर आधारलेला बौद्धिक विचार

क) तथ्यसंकलन तंत्राद्वारे केलेले भाकीतकथन

ड) वरीलपैकी एकही नाही.

उत्तर-अ

८७. उत्कृष्ट संशोधकात-------- गुण आवश्यक असतात.

अ) शास्त्रीय विचार करण्याची पात्रता    ब) कल्पनाशक्ती

क) अंतर्दृष्टी   ड) वरीलपैकी सर्व

उत्तर-ड

८८. संशोधनात प्रभावी भूमिका कोण बजावत असतो.

अ) शासन     ब) स्वयंसेवी संस्था

क) संशोधन संस्था   ड) वरीलपैकी सर्व

उत्तर-ड

८९. Traditional Knowledge Digital Library कोणत्या संस्थेकडून चालविली जाते.

अ) Education development Centre (EDC), Bangalore

ब) Indira Gandhi National Centre of the Arts (IGNCA), New Delhi.

क) Cultural Informatics Laboratory, New Delhi.

) National Institute of Science Communication and Information Resources (NISCAIR) & Council of Scientific and Industrial Research (CSIR) New Delhi

उत्तर-ड




1 टिप्पणी:

If you have any donuts. Lets me Know.