https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

मुलाखत वस्तुनिष्ठ प्रश्न Interview Objective Questions


 

1. Interview वा मुलाखत शब्द खालील कोणत्या शब्दापासून बनलेला आहे?

अ) Inter म्हणजे अंत आणि View म्हणजे दृष्टी

ब) Inter म्हणजे अंतर आणि View म्हणजे पाहणे

क) Inter म्हणजे अंतर्गत आणि View म्हणजे दृष्टिकोन

ड) यापैकी नाही

उत्तर- अ

2. एक प्रकारची अंतर्दृष्टी देणारे तथ्य संकलनाचे प्रभावी-----------होय.

अ) निरीक्षण ब) प्रश्नावली क) मुलाखत  ड) अनुसूची

उत्तर- क

3. मुलाखतही मूलतः सामाजिक आंतरक्रियेची प्रक्रिया आहे

अ) पी. व्ही. यंग ब) गुड आणि हॅट क) लिंडमन ड) करलिंगर

उत्तर- ब

4. संदिग्धता हा असंरचित मुलाखतीचा खरा फायदा असे कोणी म्हटले?

अ) पी. व्ही. यंग ब) रॉबर्ट मटन क) जोहॅन गाल्टूग ड) मोझर

उत्तर- क

5. दोन वा अधिक व्यक्ती, समोरासमोरचा संबंध आणि तथ्य संकलन ही कोणत्या अध्ययन तंत्राची प्रमुख वैशिष्ट्ये सांगता येतात.

अ) निरीक्षण ब) मुलाखत क) प्रश्नावली ड) अनुसूची

उत्तर- ब

6. मुलाखतीची खालीलपैकी उद्दिष्ट कोणती ?

अ) गृहीत कृत्य निर्मितीस उपयुक्त ब) अतिरिक्त माहिती संपादन

क) परस्पर संपर्क ड) वरीलपैकी सर्व

उत्तर- ड

7. निदानात्मक, उपचारात्मक आणि संशोधनात्मक हे उद्दिष्टावर आधारलेले कशाचे प्रकार आहेत.

अ) नमुना निवड ब) प्रश्नावली क) मुलाखत ड) अनुसूची

उत्तर- क

8. उत्तरदात्यांच्या संख्येनुसार मुलाखतीचे प्रकार कोणते?

अ) औपचारिक मुलाखत ब) अनौपचारिक मुलाखत

क) अ व ब दोन्हीही ड) अ व ब दोन्हीही नाही

उत्तर- क

9. योग्य विधान निवडा.

अ) मुलाखत तंत्र आणि कलाही आहे.

ब) मुलाखतीपूर्वी संशोधकाला अध्ययन विषयाचे पूर्वज्ञान

क) मुलाखतकार बुद्धिवान, चतुर व प्रशिक्षित असावा.

ड) वरीलपैकी सर्व

उत्तर- ड

10. मुलाखतीत उत्तरदात्याने दिलेल्या माहितीची वस्तुनिष्ठता आणि वास्तवता पारखण्याच्या तंत्राला काय म्हणतात.

अ) सामान्यीकरण ब) प्रमाणीकरण

क) विश्लेषण ड) आशय विश्लेषण

उत्तर- ब

11. व्यक्तिगत पूर्वग्रह, खर्चिक पद्धत आणि प्रशिक्षणाची गरज हे कोणत्या तंत्राचे प्रमुख दोष आहेत.

अ) प्रश्नावली ब) अनुसूची क) मुलाखत ड) निरीक्षण

उत्तर- क

12. आदर्श मुलाखतकाराचे गुण कोणते?

अ) अध्ययन विषय ज्ञान व कौशल्य ब) प्रशिक्षित व निष्पक्षपाती

क) अ व ब दोन्हीही ड) अ व ब दोन्हीही नाही

उत्तर- क

13. अभ्यासविषय, पूर्वतयारी, आराखडा, निवेदकांशी संपर्क, मुलाखत, नोंदी व अहवाल मुलाखत प्रक्रियेचे आहेत.

अ) टप्पे ब) प्रमाणीकरण क) माननीकरण ड) यापैकी नाही

उत्तर- अ

14. मुलाखत तंत्राच्या परिणामकतेचे उपाय कोणते ?

अ) उत्साहवर्धक वाक्यांचा वापर

ब) स्मरण करून देणे व माहितीची नोंद

क) उचित व प्रसंगानुसार प्रश्न विचारणे

ड) वरीलपैकी सर्व

उत्तर- ड

15. उत्तरदात्यांच्या---------- नुसार व्यक्तिगत आणि सामूहिक मुलाखतीचे प्रकार अवलंबून असते.

अ) इच्छा ब) संख्या क) वेळ ड) मत

उत्तर- ब

16. संरचित वा नियंत्रित, अनियंत्रित वा असंरचित आणि केंद्रीय मुलाखती है प्रकार खालील कोणत्या पद्धतीवर पडतात.

अ) उत्तरदात्याची संख्या ब) औपचारिकता

क) अध्ययन पद्धती ड) यापैकी नाही

उत्तर- क

17. योग्य विधान निवडा.

अ) मुलाखत एक सामाजिक आंतरक्रियेची प्रक्रिया आहे.

ब) मुलाखतीपूर्वी संशोधकास पूर्वज्ञानाची गरज नसते.

क) मुलाखत तंत्र तथ्य संकलनास अनउपयुक्त आहे.

ड) मुलाखत घेणे हे अशास्त्रीय तंत्र आहे.

उत्तर- अ

1 टिप्पणी:

If you have any donuts. Lets me Know.