उत्तर-आधुनिकतावाद
तत्त्वज्ञानातील प्रमुख तत्त्वे आणि
उत्तर-आधुनिकतावाद
संकल्पनेची काही प्रमुख वैशिष्ट्ये विचारवंतांनी
विशद केलेली आहेत.
१. वास्तवतेच्या संदर्भात
ज्या लोकोत्तर संकल्पना प्रचलित होत्या त्या सर्व संकल्पनांवर उत्तर आधुनिकतावादी
जोरदार प्रहार करतात आणि त्या संकल्पनांबाबत मूलभूत प्रश्न उपस्थित करतात. त्याची
उत्तरे पारंपरिक सिद्धान्ताजवळ उपलब्ध नाहीत.
२. उत्तर आधुनिकतावाद्यांनी
सर्व पूर्वकल्पना, संकल्पनांना सैद्धांतिक
पातळीवरून आवाहन दिलेले आहे आणि एवढ्यावर न थांबता सहजबुद्धीच्या सत्तेलाही
प्रश्नांकित केले आहे. त्यांच्या मते, सहजबुद्धी (कॉमन सेन्स) ही
एक विचारधारात्मक निर्मिती आहे आणि ती ऐतिहासिक परिस्थितीवर आधारलेली असून,
सामाजिक नियामकांच्या
सहभागितेत कार्यान्वित होत जाते.
३. उत्तर-आधुनिकतावादी
वास्तववादाला नाकारतात. व्यक्तिनिष्ठा किंवा व्यक्तीचे स्वत्व हा अर्थप्रक्रियेचा
मूळ स्रोत आहे, असे ते मानतात. ४. भाषा हे माध्यम नाही तर ते वस्तुतः रूप
आहे. व्यक्तीचे विश्व करण्याचा आणि वस्तूंना विभेदात्मक संबंधांच्या माध्यमातून
ओळखण्याची शक्यता भाषा निर्माण करते.
५. उत्तर आधुनिकतावादी
विचारसरणीच्या सामान्य सुबोध संकल्पनेसदेखील आवाहन करतात. विचारसरणी एक सामाजिक
राजकीय स्थिती असते, यात आपण सर्व जण जगत असतो
आणि फारसा विचार न करता ती स्वीकारत असतो. विचारसरणी ही राजकीय आणि आर्थिक
व्यवहाराच्या समन्वयातून कार्यान्वित होत असते आणि या प्रकारे ती सामाजिक संघटनेत
अस्तित्वात येत असते.
६. उत्तर आधुनिकतावादी समाज
परिभाषेकडे वेगळ्या पद्धतीने पाहतात. 'समाज'
शब्दाऐवजी 'सामाजिक संघटन'
शब्दाचा वापर करतात.
सामाजिक संघटन शब्द मानवी संबंध आणि इतर प्रकारची गुंतागुंत यांच्या मौलिक
व्याख्येसाठी उत्तम संकल्पना उपलब्ध करून देते, असे मानतात.
७. उत्तर-आधुनिकतावादी
विचारप्रणालीची नवी व्याख्या सादर करतात. विचारसरणी शब्दास निसर्गत: काही अस्तित्व
नसते. ती भाषा विवेचनाच्या अंतर्गत लिहिली जाते. वक्ता आणि श्रोत्यांच्या संयुक्त
अशा पूर्व कल्पनांवर आधारित असते. उदा. राज्यशास्त्र व भौतिकशास्त्र संभाषण वेगवेगळे असते. दोघांच्या पूर्वकल्पना वेगवेगळ्या असतात.
विचारप्रणाली विचार, बोलणे, जगण्याची पद्धत असते,
ती भाषेमुळे अस्तित्वात येते.
८. प्रत्येक संकल्पना
कोणत्या ना कोणत्या सैद्धांतिक आधारावर उम् असतात. मानवी सहभावनेवर
आधारलेले वास्तवदेखील कोणत्यातरी संकल्पनेवर आधारलेले असते. उदा. आपले अनुभव व
ज्ञान यांच्या परिणामातून अनुभववादाचा जन्म झाला. ९. उत्तर-आधुनिकतावादाने शेकडो
वर्षांपासून चालत आलेल्या वैचारिक परंपरेस नाकारून समाजातील विविध ज्ञानाशाखांमधील
विचार करण्याची दिशा बदलून टाकली.
उत्तर-आधुनिकतावाद
संकल्पनेची काही मूलतत्त्वे
विचारवंतांनी विशद केलेली आहेत, ती खालीलप्रमाणे आहेत.
१. बौद्धिक आंदोलन - उत्तर-आधुनिकतावादास
बहुतेक विचारवंतांनी वैचारिक अस्ताव्यस्तेत
सुसंगती उत्पन्न करणारे बौद्धिक आंदोलन म्हटले आहे. २०व्या शतकातील मानवी चिंतन हे
विशेषीकरणाच्या नावावर इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रांत विभागले गेले. त्याचे असंख्य
तुकड्या तुकड्यांमध्ये रूपांतर झाल्यामुळे त्यात कोणत्याही प्रकारची सूत्रबद्धता
राहिली नाही. बिशेषीकरणातून उदयाला आलेल्या क्षेत्रविभाजनामुळे सर्व तत्त्वज्ञाने
एकांताची आणि माघाराची आश्रयस्थाने बनलेली आहेत. मानवाचे बौद्धिक जीवन विखुरलेल्या
अवस्थेत वा वेगवेगळ्या पूर्वकल्पनांवर आधारलले होते. ते एकमेकांच्या विरोधी
प्रवृत्तीचे वाहक झाले; म्हणून त्यांनी मानवाशी
संबंधित सर्व तत्त्वज्ञानांत सुसंगती करण्याचा प्रयत्न केला. पूर्वी मार्क्सवादाने
हा प्रयत्न केला होता; परंतु,
त्यात अनेक गंभीर
स्वरूपाच्या त्रुटी होत्या तसेच मांर्क्सवाद ही एक विचारसरणी आहे तर
उत्तर-आधुनिकतावाद केवळ तत्त्वज्ञानाचा एक सिद्धान्त आणि त्याची कार्यपद्धती आहे.
कार्यपद्धतीच्या आधारावर विज्ञानाच्या सर्व प्रकारांत सामंजस्य निर्माण करावयाचे
आहे. एखादे बौद्धिक आंदोलन हळूहळू सर्व विभागांस आपल्याकडे खेचून घेऊ लागते. सर्व
ज्ञानशाखा त्यांच्या प्रभावात येतात,
ही गोष्ट
उत्तर-आधुनिकतावादास लागू होते.
२. मार्क्सवाद आणि उत्तर - आधुनिकतावाद
-
मार्क्सवाद आणि उत्तर आधुनिकतावाद यातील काही समान मूल्ये आहेत. व्यक्ती आणि
तिच्या संकल्पनांत तंत्र, वस्तुनिष्ठ सल्ला आणि विचार
करण्याची प्रक्रिया याबाबत दोघांची कार्यप्रणाली आणि अपेक्षा वेगवेगळ्या आहेत.
मात्र,
मार्क्सवाद आणि
उत्तर-आधुनिकतावाद या दोन्हींमध्ये काही साम्यस्थळे आहेत. दोन्ही शास्त्रीय
वृत्तीचा आग्रह धरतात. परात्मभाव आणि निराशावादाच्या विरुद्ध आहेत. जग हे वास्तविक
असून मानव त्याला चिंतन आणि जाणिवांच्या आधारे समजू शकतो. जगाच्या प्रगट अराजकतेत
संकल्पनात्मक सुसंगती निर्माण करणारे सिद्धान्त आहेत. माणूस आणि जग या दोघांकडे एक
घटक म्हणून दोन्ही विचार पाहतात.
३. वैचारिक सुसंगती - मानवी बुद्धीच्या वैचारिक
संशोधनात आधारभूत सुसंगती निर्माण करणे ही २०व्या शतकातील तत्त्वज्ञानातील प्रमुख
समस्या होती. मानवाशी संबंधित सर्व तत्त्वज्ञानांत सुसंगती निर्माण करावी या
उद्देशाने उत्तर आधुनिकतावादाने कार्य केलेले आहे.
४. संबंधतंत्राचा अभ्यास - जग हे संबंधाच्या तंत्राने संयोजित आहे. संबंधाच्या
तंत्राशिवाय कोणत्याही वस्तूंचे अस्तित्व नसते. जग वस्तूंनी नव्हे तर तंत्राच्या
समूहाने बांधले गेले आहे. माणसाची संपूर्ण मानसिक प्रक्रिया ही मुळात सार्वभौम
नियंत्रणाच्या अधीन आहे. ती मानवी प्रतिक्रियात्मक प्रकार्यातून प्रकट होते.
माणसाच्या मनाचा, नेणिवांचा भागदेखील या
नियमांच्या अधीन असतो.
५. बूर्ज्या ज्ञानाला
विरोध- उत्तर-आधुनिकतावाद हे बूर्ज्या तत्त्ववेत्यांच्या विरोधात
आहे;
कारण हे सर्व तत्त्ववेत्ते
व्यक्तिवादाने प्रभावित आहेत. त्यांनीच स्वार्थलोलुप वर्गाच्या सत्तेस मजबूत केले
आहे. व्यक्तिवादाच्या प्रभावामुळे ज्ञान ही व्यक्तिमत्त्वाचा भाग राहिली नसून
बाजारात विकली जाणारी वस्तू बनली आहे. ज्ञान आता 'शासक'
नाही तर 'शासित'
आहे. ज्ञानाचा वापर
बाजारपेठीय अर्थव्यवस्थेत आर्थिक फायदा मिळविण्याचे हत्यार म्हणून केला जातो.
त्यामुळे माणूस प्रगतिपथावर आहे, केवळ संख्यात्मक दृष्टीने,
अवस्थांच्या दृष्टीने नव्हे.
६ संशयवादास महत्त्व - •उत्तर-आधुनिकतावादी
चळवळीकडे संदेहवाद वा सशयवादाचा एक प्रकार म्हणून पाहिले गेले. उत्तर-आधुनिकतावादी
कोणत्या तत्त्वज्ञानाच्या परंपरेवर विश्वास ठेवत नाहीत,
तर सर्व तत्त्वज्ञानाकडे
संशयाने पाहतात. अधिसत्ताप्राप्त ज्ञान, सांस्कृतिक व सामाजिक
मापदंड व आदर्श आदर्दीकडे संशयाने पाहिले जाते. पाश्चात्य ग्रीक तत्त्वज्ञान,
त्यानंतरचे तात्त्विक विचार
आणि त्या विचारांचे समर्थन करणारे विविध • संप्रदाय, बौद्धिक व्यवस्था व संरचना
यांविरुद्ध बंड करणारे वा संदेह व्यक्त करणारे हे तत्त्वज्ञान आहे. त्यांच्या मते,
मानवी चिंतनात कोणताही
मुक्काम हा शेवटचा मुक्काम नसतो. त्यामुळे कोणताही सिद्धान्त वा पूर्वकल्पना
पवित्र नसतात. विरचनावादाच्या आधारे तत्त्वज्ञानाच्या तात्त्विक आधारांना
निर्वासित करता येते.
८. राज्याच्या अवाजवी
सत्तेला विरोध - उत्तर आधुनिकतावाद्यांच्या
मते - राज्य हे सामाजिक व राजकीय दमनाचे सर्वांत मोठे केंद्रीय संस्थान असते.
राज्याकडून दिले जाणारे मानवी हक्क, वैयक्तिक स्वातंत्र्य आणि
राजकीय स्वातंत्र्य हा दृष्टिभ्रम आहे. खरे तर राज्य हे स्वातंत्र्याचे सर्वांत
मोठे शत्रू आहे. राज्य ही समाजातील सर्वांच्या भल्यासाठी निर्माण झालेली संस्था
आहे,
या तत्त्वालाही ते नाकारतात.
'समाजातील सर्वांच्या
कल्याणासाठी व्यवस्थानिर्माण' या तत्त्वावर विश्वास ठेवत
नाही. राज्याकडे असलेल्या अतिरिक्त सत्तेला विरोध करून सत्तेचे विकेंद्रीकरण,
स्थानिक स्वायत्ततेचे
समर्थन करतात.
९. व्यवस्थाबदलाला
प्राधान्य - उत्तर आधुनिकतावाद्यांच्या मते,
मानवी गरजा आणि त्या पूर्ण
करणारी साधने बदललेली आहेत. व्यक्तीच्या इच्छा आकांक्षादेखील बदलेल्या आहेत. या
सर्व बदल प्रक्रियेचा परिणाम राजकीय क्षेत्रावरदेखील
झाला आहे. त्या बदलांना अनुसरून प्रस्थापित व्यवस्थेत बदल करण्याची नितांत गरज
आहे. व्यवस्थाबदलाच्या माध्यमातून बदललेल्या मानवी मूल्यांना स्थान देता येईल,
असा दावा उत्तर
आधुनिकतावादी विचारवंत करतात.
१०. ज्ञानाच्या
वस्तुनिष्ठतेला विरोध - उत्तर-आधुनिकतावादी ज्ञानाच्या वस्तुनिष्ठतेबद्दल शंका
प्रदर्शित करतात. ज्ञान हे त्यांना 'बौद्धिक मृगजळ वाटते.
सामाजिक शास्त्रातील ज्ञान व अभ्यास ऐतिहासिक आणि मूल्याधिष्ठित कल्पनांवर आधारित
असतो. कोणतीही विचारप्रणाली सामाजिक घटनांचे आकलन व वस्तुस्थिती विचारवंतांच्या
व्यक्तिगत मतानुसार ठरवत असतो. परिस्थितीचे विश्लेषण व्यक्तिसापेक्ष असते. अनुभव व
वास्तवावर आधारित कोणतीही अभ्यासपद्धती व्यक्तिनिरपेक्ष,
स्वतंत्र वा तटस्थ राहू शकत
नाही. त्यामुळे वस्तुनिष्ठ सत्य हा भास किंवा भ्रम आहे. त्यामुळे सामाजिक
शास्त्रातील मानवी व्यवहारांशी संबंधित सर्व विचार, कल्पना,
सिद्धान्त हे व्यक्तिनिष्ठ
असतात. त्यामुळे त्यांचे सार्वत्रिकीकरण वा सामान्यीकरण फसवे आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.