https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

सामाजिक सर्वेक्षण आणि संशोधन आराखडा वस्तुनिष्ठ प्रश्न Social Survey and Research Design MCQ Questions


 सामाजिक सर्वेक्षण आणि संशोधन आराखडा वस्तुनिष्ठ प्रश्न

Social Survey and Research Design MCQ Questions 

........ हा संशोधन आराखड्याचा आत्मा मानला जातो.

अ) समस्या सूत्रण   ब) पूर्वनियोजन

क) भाकीतकथन   ड) गृहीत कृत्ये   

उत्तर-

२. संशोधन प्रक्रियेत हा प्रथम टप्पा मानला जातो.

अ) संशोधन समस्येची मांडणी ब) संशोधन आराखडा निर्मिती

क) संशोधन साधने निश्चिती ड) यापैकी नाही

उत्तर-अ 

. निर्णय क्रियान्वित करण्याची स्थिती येण्यापूर्वीच निर्णय निर्धारित प्रक्रियेला आराखडा असे म्हणतात असे कोणी म्हटले आहे

अ) सेल्टिज) ऐकॉफ   क) जहोडा    ड) एफ. करलिंग

उत्तर- ब

 ४.------------------म्हणजे जन्माला यावयाच्या संशोधनाचे प्रतिबिंध असने

अ) संशोधन आराखडा ब) सामान्यीकरण

क) भाकीतकथन ड) गृहीत कृत्ये

उत्तर- क

. खालीलपैकी योग्य विधान निवडा.

अ) संशोधन आराखडा म्हणजे संशोधनाचे पूर्वनियोजन होय,

ब) संशोधन आराखडा मानवी श्रम, वेळ व पैशाची बचत करतो

क) संशोधन आराखड्यात समस्या निर्धारणापासून ते अहवाल लेखन पर्यंतच्या पर्यायाचा समावेश असतो.

ड) वरीलपैकी सर्व

उत्तर- ड

६. संशोधन आराखड्यात आवश्यक घटक कोणते ?

अ) संशोधन विषय ब) गृहीतकृत्ये

क) नमुना निवड योजना व तंत्रे ड) वरीलपैकी सर्व

उत्तर- ड

. संशोधन आराखड्याचे उद्देश कोणते ?

अ) संशोधन समस्यांची उत्तरे पुरविणे ब) असंबद्ध चलांवर नियंत्रण

क) भिन्नत्वाच्या चुका कमी करणे ड) वरीलपैकी सर्व

उत्तर- ड

. परिचयात्मक आराखडा, निदानात्मक आराखडा, वर्णनात्मक व प्रयोग आराखडा इत्यादी संशोधन आराखड्यांचे प्रकार कोणी सांगितले होते.

अ) प्रा. सेल्टीझन   ब) एकॉफ क) चंपीन   ड) मॅकग्रॉट

उत्तर- अ

. संशोधन आराखड्याचे नियंत्रित, प्रयोग, अभ्यास, सर्वेक्षण, अन्वेषण, कृतीशील संशोधन असे संशोधनाचे पाच प्रकार खालील कुणी दिए केलेले आहेत.

अ) प्रा. सेल्टीझन ब) एकॉफ  क) प्रा. मॅकग्राट  ड) चॅपीन

उत्तर- क

१०. व्यवहार्य संशोधन आराखड्याचे प्रमुख घटक कोणते

अ) नमुना चाचणी संबंध आराखडा ब) निरीक्षण आराखडा

क) संख्याशास्त्रीय आराखडा ड) वरीलपैकी सर्व

उत्तर- ड

११. संशोधन आराखड्याची आवश्यकता का असते.

अ) अचूक निष्कर्ष काढणे     ब) तथ्य संकलन व त्यांचा अर्थ लावणे

 क) चौकशी तंत्र निर्माण करणे   ड) वरीलपैकी सर्व

उत्तर- ड

१२. संशोधन आराखड्याचे प्रमुख प्रकार कोणते?

अ) आदर्श संशोधन आराखडा ब) व्यवहार्य संशोधन आराखडा

क) अ व व दोन्हीही   ड) अ व व दोन्हीही नाही

उत्तर- क

१३. अन्वेषणात्मक आराखड्याचा हेतू कोणता असतो.

अ) सामाजिक घटनांच्या मुळाशी असलेल्या कारणांचा शोध घेणे

ब) वास्तविक तथ्यांच्या आधारावर वर्णनात्मक विवेचन करणे

क) समस्या सोडविण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे

ड) यापैकी एकही नाही

उत्तर- अ

१४. अन्वेषणात्मक आराखड्यात आवश्यक अटी कोणत्या ?

अ) साहित्य सर्वेक्षण ब) अनुभव सर्वेक्षण

क) आंतरदृष्टीस प्रेरणा देणाऱ्या घटना ड) वरीलपैकी सर्व

उत्तर- ड

१५. वर्णनात्मक संशोधन आराखडा म्हणजे?

अ) सामाजिक घटनांच्या मुळाशी असलेल्या कारणांचा शोध घेणे

ब) वास्तविक तथ्यांच्या आधारावर वर्णनात्मक विवेचन करणे

क) समस्या सोडविण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे

ड) यापैकी एकही नाही

उत्तर- ब

१६. निदानात्मक आराखड्याचे हेतू----------------------

 अ) समस्या अध्ययन ब) तथ्य संकलन

 क) निदानात्मक उपाय   ड) वरीलपैकी सर्व

उत्तर- ड

१७. लोकांच्या योग्य अयोग्य प्रतिक्रियांची नोंद करण्यासाठी कोणता आराखडा उपयुक्त असतो.

अ) प्रायोगिक आराखडा ब) वर्णनात्मक आराखडा

क) निदानात्मक आराखडा  ड) अन्वेषणात्मक आराखडा

उत्तर- ब

१८. व्यवहारी तर्क शुद्ध व शास्त्रीय गृहीतके कोणत्या सर्वेक्षणातून मांडणे सहज शक्य होते ?

अ) अनुभव सर्वेक्षण    ब) साहित्य सर्वेक्षण

क) अंतदृष्टीस प्रेरणा देणारे  ड) वरीलपैकी एकही नाही

उत्तर- अ

१९. पुस्तके, मासिके, वृत्तपत्रे, संशोधन पत्रिका लेख अभ्यास कोणत्या सर्वेक्षणातून करता येतो.

अ) अनुभव सर्वेक्षण ब) साहित्य सर्वेक्षण क) अंतदृष्टीस प्रेरणा देणारे ड) वरीलपैकी एकही नाही

उत्तर- ब

२०. वर्णनात्मक आराखड्यात कोणाच्या वैशिष्ट्यांचे वर्णन केलेले असत

अ) समूह व व्यक्ती वैशिष्ट्येचे वर्णन ब) साहित्य वैशिष्ट्यांचे वर्णन

क) कारण मीमांसा वर्णन ड) वरीलपैकी सर्व

उत्तर- अ

२१.प्रायोगिक संशोधन आराखड्याचे प्रकार कोणते?

अ) प्रयोगोत्तर पश्चात परीक्षण पद्धत  ब) प्रयोगपूर्व परीक्षण पद्धत

क) परिणामोत्तर कारण मीमांसा पद्धत    ड) वरीलपैकी सर्व

उत्तर- ड

२१. प्रयोगात्मक संशोधन आराखड्यातील प्रमुख अटी कोणत्या?

अ) प्रायोगिक व नियंत्रित गट  ब) परायत्त चल मापन पूर्वनिर्धारण

क) परायत्त चल सहानुवर्ती संबंध पुरावा   ड) वरीलपैकी सर्व

उत्तर- ड

२३. प्रायोगिक व नियंत्रित गटातील व्यक्तींच्या त्यांच्या समलक्षणांच्या आधारे जोड्या लावणे म्हणजे ?

अ) यादृच्छिकरण ब) अनुरूपता पद्धती  क) विश्लेषण   ड) आशय विश्लेषण

उत्तर- ब

२४. मिलरने आदर्श प्रारूपास कोणते नाव दिले होते ?

अ) आभासी मनोविकृती   ब) सामाजिक मनोविकृती

क) विकृत मनोविकृती ड) कालबंध मनोविकृती

उत्तर- अ

२५. शास्त्राची प्राथमिक स्थिती म्हणजे अन्वेषणात्मक अध्ययन हे कोणी म्हटले ?

अ) कांट्झ  ब) चॅपीन   क) प्रा. मॅकग्राट   ड) पी.व्ही. यंग

उत्तर- अ

२६. कोणत्या संशोधनात आराखड्यात सुरुवातीला गृहीत कृत्य मांडण्याची आवश्यकता नसते.

अ) वर्णनात्मक   ब) अन्वेषणात्मक   क) प्रयोगात्मक    ड) निदानात्मक

उत्तर- ब

२७. कोणत्या संशोधनात संशोधनाचा आधार गृहीत कृत्य नसतो.

अ) वर्णनात्मक  ब) अन्वेषणात्मक   क) प्रयोगात्मक ड) निदानात्मक

उत्तर- अ

२८. निदानात्मक आराखड्याचा हेतू-----------------

अ) समस्येचे ज्ञान करून समस्या सोडविण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे

ब) वास्तविक तथ्यांच्या आधारावर वर्णनात्मक विवेचन करणे

क) सामाजिक घटनांच्या मुळाशी असलेल्या कारणांचा शोध घेणे

ड) वरीलपैकी कोणतेही नाही

उत्तर- अ

२९. प्रायोगिक संशोधनात कोणते गट असतात..

अ) प्रायोगिक व नियंत्रित गट    ब) सामूहिक व वैयक्तिक गट

क) नियंत्रित व अनियंत्रित गट  ड) वरीलपैकी सर्व

उत्तर- अ

३०. सामाजिक सर्वेक्षण ही संज्ञा सर्वप्रथम कोणी उपयोगात आणली होती.

अ) जॉन हॉवर्ड ब) फ्रेडरिक ले प्ले  क) चार्लस बुथ  ड) पॉल केलॉग

उत्तर- ब

३१. Survey शब्दाचा खालीलपैकी कोणता अर्थ आहे.

अ) Sur म्हणजे ताल व Veoir म्हणजे पाहणे

ब) Sur म्हणजे सूर व Veoir म्हणजे दिसणे

क) Sur म्हणजे वरुन व Veoir म्हणजे पाहणे

ड) वरीलपैकी सर्व

उत्तर- क

३२. चिकित्सक पाहणी करणे म्हणजे------

अ) संशोधन   ब) सर्वेक्षण    क) निरीक्षण    ड) परीक्षण

उत्तर- ब

३३. गृहीत कृत्याची निर्मिती आणि परीक्षणासाठी खालील कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो.

अ) सामाजिक सर्वेक्षण   ब) प्रश्नावली   क) मुलाखत  ड) अनुमाप तंत्रे

उत्तर- अ

३४. सामाजिक सर्वेक्षणाचे कार्य कोणते ?

अ) सामाजिक तथ्य संकलन ब) कार्यकारण संबंधाचा अभ्यास

क) सामाजिक समस्या अध्ययन   ड) वरीलपैकी सर्व

उत्तर- ड

३५. सामाजिक सर्वेक्षणाचे सी.ए. मोझर यांनी अभ्यास विषय विश्लेषित केले.

अ) लोकसंख्या ब) लोकांचे वर्तन व क्रिया  क) लोक अभिवृत्ती ड) वरीलपैकी सर्व

उत्तर- ड

३६. सामाजिक सर्वेक्षणाचे प्रमुख प्रकार कोणते?

अ) सर्वसामान्य व विशिष्ट सर्वेक्षण ब) नियमित व नैमित्तिक सर्वेक्षण

क) नमुना व वैश्विक सर्वेक्षण  ड) वरीलपैकी सर्व

उत्तर- ड

३७. खालीलपैकी अयोग्य विधान निवडा.

अ) सामाजिक संशोधनाचे स्वरूप अधिक व्यापक असते. ब) सामाजिक संशोधन मूल्यनिरपेक्षता असते.

 क) सामाजिक संशोधन उपयुक्ततावादी असते. ड) वरीलपैकी एकही नाही.

उत्तर- ड

३८. जनगणना हे कोणत्या सर्वेक्षणाचे उदाहरण मानता येईल.

अ) नमुना सर्वेक्षण ब) सर्वसामान्य सर्वेक्षण  क) वैश्विक सर्वेक्षण  ड) विशिष्ट सर्वेक्षण

उत्तर- ब

३९. सामाजिक सर्वेक्षणाचे प्रमुख प्रकार कोणते सांगा.

अ) सर्वसामान्य सर्वेक्षण व विशिष्ट सर्वेक्षण  ब) नियमित व नैमित्तिक सर्वेक्षण

क) प्रारंभिक व अंतिम सर्वेक्षण  ड) वरीलपैकी सर्व

उत्तर- ड

४०. सर्वसामान्य व विशिष्ट सर्वेक्षणाचा कोणत्या सर्वेक्षणात अंतर्भाव होतो.

अ) नमुना सर्वेक्षण   ब) वर्णनात्मक सर्वेक्षण

क) सर्वसामान्य सर्वेक्षण     ड) वैश्विक

उत्तर- ब

४१. नैमित्तिक सर्वेक्षण केव्हा उपयुक्त असते.

अ) निर्माण होणाऱ्या प्रश्नांच्या अभ्यासासाठी ब) गटाची माहिती मिळविण्यासाठी

क) समुदायाच्या विशिष्ट अंगांच्या अभ्यासासाठी ड) वरीलपैकी सर्व

उत्तर- अ

४२. विशिष्ट समूह वा गटांच्या सामाजिक, आर्थिक पैलूंचे अध्ययन व विश्लेषण करून समन्वय घडवून आणण्याचा प्रयत्न म्हणजे--------------

अ) सामाजिक सर्वेक्षण  ब) निरीक्षण   क) मुलाखत   ड) प्रश्नावली

उत्तर- अ

४३. सर्वेक्षण पद्धतीच्या कोणत्या मर्यादा आहेत.

अ) खर्चिक पद्धत   ब) तथ्य संकलनात सारखेपणाचा अभाव

क) विलंबकारी  ड) वरीलपैकी सर्व

उत्तर- ड

४४. सर्वेक्षण पद्धतीचे गुण कोणते आहेत.

अ) वस्तुनिष्ठ अभ्यास  ब) विश्वसनीय निष्कर्ष

क) गृहीत कृत्य निर्मितीस साहाय्यक ड) वरीलपैकी सर्व

उत्तर- ड

४५. सामाजिक सर्वेक्षणाची उद्दिष्टये खालीलपैकी कोणती ?

अ) सामाजिक सिद्धांत तपासणी ब) नमूना निवड तपासणी क) गृहीत कृत्य तपासणी ड) चल नियंत्रण तपासणी

उत्तर- अ



 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.