स्वातंत्र्याचा अर्थ, व्याख्या,
स्वरूप, सकारात्मक आणि नकारात्मक स्वातंत्र्य संकल्पना-
स्वातंत्र्य ही राज्यशास्त्रातील अत्यंत महत्त्वपूर्ण
संकल्पना मानली जाते. संकल्पनेविषयी विविध विचारवंतांनी वेगवेगळ्या कालखंडात चिंतन
केलेले आहे त्या चिंतनावर समकालीन काळाची छाप स्पष्ट दिसून येते. लोकशाहीच्या
विकासासोबत स्वातंत्र्य संकल्पनेचा मोठ्या प्रमाणावर प्रचार-प्रसार झाला. व्यक्ती
समाज आणि राज्य तिन्ही घटकांसाठी स्वातंत्र्य संकल्पना आवश्यक मानली जाते.
स्वातंत्र्याशिवाय व्यक्तीविकासाची कल्पना करता येत नाही. समाजाच्या प्रगतीसाठी
स्वातंत्र्याची गरज असते तर आंतरराष्ट्रीय व्यवहारात राज्यांना समान दर्जा व
प्रतिष्ठा मिळविण्यासाठी स्वातंत्र्याची गरज असते. मानवी इतिहासात मानवाने
स्वातंत्र्य मिळविण्यासाठी फार मोठा संघर्ष केलेला आहे. त्यामुळे स्वातंत्र्य हे
मूल्य मानवी जीवनासाठी फार महत्त्वपूर्ण व आवश्यक मानले जाते. मानवी जीवनाची
जडणघडण करणाऱ्या स्वातंत्र्य संकल्पनेचा अधिक सखोल व सर्वांगीण विचार करणे
महत्त्वाचे असल्याने प्रस्तुत प्रकरणात स्वातंत्र्य संकल्पनेचे तपशीलवार विवेचन
करणार आहोत.
स्वातंत्र्याचा अर्थ-
'स्वातंत्र्य' हा शब्द राज्यशास्त्रात आणि प्रत्यक्ष व्यवहारात विविध
अर्थानी वापरला जात असल्यामुळे त्यांची व्याप्ती निश्चित करून अर्थ स्पष्ट करणे
अवघड बाब आहे. मानवाच्या प्रगतीसोबत स्वातंत्र्य संकल्पनेचे अर्थ बदललेले आहेत.
स्वातंत्र्य शब्दासाठी इंग्रजी Liberty आणि Freedom हे दोन शब्द वापरले जातात. स्वातंत्र्याची गुणवैशिष्ट्ये
स्पष्ट करण्यासाठी Liberty शब्दाचा तर स्वातंत्र्याच्या अवस्था स्पष्ट करण्यासाठी हा
शब्द वापरतात. शब्दाचा मराठी अर्थ बंधनमुक्तता तर चा अर्थ स्वातंत्र्य असा होतो.
परंतु दोन्ही शब्दामधील फरक अनेक अभ्यासकांना मान्य नाही. या दोन्ही शब्दाच्या
अर्थाबद्दल अभ्यासकांमध्ये तीव्र स्वरूपाचे मतभेद आहेत. विविध शब्दाकोशामध्ये
देखील दोन्ही शब्दाचे अनेक अर्थ दिलेल आहेत. शब्दाच्या अर्थावरून मतभेद असले तरी
त्यांच्या व्युत्पत्ती बद्दल अभ्यासकांमध्ये एकमत दिसून येते. Liberty
हा शब्द Liber नावाच्या लॅटिन शब्दावरून तयार झालेला आहे. त्याचा अर्थ
'स्वातंत्र्य' असा होतो. स्वातंत्र्य शब्दाचे सकारात्मक (Positive)
आणि नकारात्मक (Negative) असे दोन प्रकारचे अर्थ आहेत. नकारात्मक स्वातंत्र्य म्हणजे 'बंधनाचा अभाव' असा केला जातो. स्वातंत्र्यावर कोणत्याही प्रकारच्या
बंधनाना नकारात्मक स्वातंत्र्याचे समर्थक मान्यता देत नाहीत. सकारात्मक
स्वातंत्र्यात बंधनासह स्वातंत्र्याचा विचार केला जातो. स्वातंत्र्य शब्दाच्या
अर्थाची उकल जाणून घेण्यासाठी काही अभ्यासकांनी केलेल्या व्याख्या आपण पाहणार
आहोत.
प्रा. लास्की यांच्यामते,-स्वातंत्र्य म्हणजे व्यक्तीला आपला संपूर्ण विकास
करण्याची संधी मिळण्यासारखी परिस्थिती निर्माण करणे होय.
मॅकेनी यांच्यामते,
स्वातंत्र्य म्हणजे बंधनांचा अभाव नव्हे,
तर अनुचित बंधनांऐवजी उचित बंधनांची व्यवस्था होय.
मॅकफर्सन यांच्यामते,-
व्यक्तीला समृद्ध जीवन जगता यावे यासाठी आवश्यक अटी म्हणजे
स्वातंत्र्य
अशा प्रकारे स्वातंत्र्याच्या व्याख्येवरून ह्या संकल्पेनचा
आशय काळानुरूप बदलत गेलेला आढळतो. स्वातंत्र्य संकल्पनेच्या व्याख्येतून काही ठळक
बाबी नजरेसमोर येतात. त्यातील प्रथम म्हणजे स्वातंत्र्य म्हणजे बंधनांचा अभाव नसून
उचित बंधनांची व्यवस्था हे बहुसंख्य अभ्यासकांनी व्याख्येत नमूद केलेले आहे. परंतु
ही बंधने वा प्रतिबंध कमीत कमी असली पाहिजे हा देखील आग्रह धरलेला आहे. दुसरा
म्हणजे व्यक्ती आणि समाजाच्या विकासासाठी आवश्यक गोष्ट असल्याने अधिकाधिक स्वातंत्र्य
वा स्वातंत्र्य उपभोगण्यास योग्य वातावरण निर्माण करणे,
व्यक्ती आणि समाज हितासाठी आवश्यक आहे हा सूर अनेक
अभ्यासकांनी लावलेला आढळतो.
स्वातंत्र्यविषयक प्रमुख संकल्पना (Main
Concept of Liberty)
'स्वातंत्र्य' संकल्पनेचा अभ्यास करताना असे लक्षात येते की,
या संकल्पनेचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांचे दोन गटात
वर्गीकरण करता येते. स्वातंत्र्य शब्दाचा अर्थ सकारात्मक आणि
नकारात्मक या मागांनी घेतला जातो. नकारात्म स्वातंत्र्याचे समर्थक बंधनाचा अभाव
म्हणजे स्वातंत्र्य असे मानतात किया स्वातंत्र्यावर कमीत कमी बंधने असावीत यावर भर
देतात तर सकारात्मक स्वातंत्र्याचे समर्थक स्वातंत्र्यावर बंधन मान्य करतात.
बधनाशिवाय स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार होय. या दोन्ही स्वातंत्र्यविषयक प्रमुख
संकल्पना स्वतंत्रपणे पुढील मुद्यांमध्ये विचार करणार आहोत.
१) नकारात्मक स्वातंत्र्य (Negative Liberty)
नकारात्मक स्वातंत्र्य म्हणजे 'बंधनांचा अभाव असा घेतला जातो.
व्यक्तीला कृती करण्याचे स्वातंत्र्य असावे. त्याला कृती करण्यापासून रोखू नये हा
भाव नकारात्मक स्वातंत्र्यामध्ये असतो. उदारमतवाद्याच्या समर्थकांनी राज्याच्या
अधिकारक्षेत्रावर मर्यादा आणण्यासाठी नकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना मांडली.
त्यात जॉन लॉक, डेव्हिड ह्युम, अॅडम स्मिथ, थॉमस पेन, हर्बर्ट स्पेन्सर, बेन्थम, जे.एस. मिल इत्यादींचा समावेश
होता. आधुनिक काळात इसाय बर्लिन, रॉबर्ट नॉझिक, एम.ए. हायेक, मिल्टन फ्रिडमन, मायकेल ओकशॉट यांनी संकल्पना
मांडलेली आहे. नकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना व्यक्तिवादी विचारसरणीशी निगडित
असल्याचे दिसते. व्यक्तीवादी दृष्टिकोनानुसार प्रत्येक व्यक्तीला आपले चांगले-वाईट, हित-अहित कळत असल्यामुळे त्याला
त्यांच्या इच्छेप्रमाणे वागण्याची मुभा द्यावी. कोणत्याही बाह्य घटकाने त्यांच्या
वर्तनावर प्रतिबंध लादू नये वा हस्तक्षेप करू नये. नकारात्मक स्वातंत्र्याची
संकल्पना मांडणारे अभ्यासक राज्याची भूमिका मर्यादित करण्यावर भर देतात. राज्याने
व्यक्ती जीवनात हस्तक्षेप करू नये. राज्याचा हस्तक्षेप वाढू नये म्हणून राज्याकडे
मर्यादित जबाबदाऱ्या सोपविल्या जाव्यात यावर भर देतात. नकारात्मक स्वातंत्र्यात
व्यक्तीला अधिकाधिक स्वातंत्र्य देण्यावर भर दिला जातो तर राज्याची भूमिका कमीत
कमी कशी राहील यावर देखील भर दिला जातो.
नकारात्मक स्वातंत्र्याची वैशिष्ट्ये - वरील चर्चेवरून नकारात्मक स्वातंत्र्याची काही वैशिष्ट्ये सांगता येतात.
नकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना व्यक्तीच्या स्वायत्तेवर आधारलेली आहे. व्यक्तीला आपल्या हिताची पूर्ण जाणीव असल्यामुळे तिच्या मर्जीनुसार वागण्यासाठी मुक्त स्वातंत्र्य दिले पाहिजे.
· स्वातंत्र्य म्हणजे बंधनाचा अभाव वा कमीत कमी बंधन हा आशय नकारात्मक स्वातंत्र्यात आहे.
·
राज्याच्या निरंकुश सत्तेपासून व्यक्तीचा बचाव करण्यासाठी
राज्याकडे मर्यादित जबाबदाऱ्या आणि व्यक्तींच्या स्वातंत्र्य संरक्षणासाठी व्यापक
तरतुदीचे समर्थन करणे.
·
व्यक्तीचे स्वातंत्र्य कायद्याच्या आधारे काढून विरोध करणे.
घेण्यास वा नियंत्रित करणे करण्यास
·
आर्थिक क्षेत्रात व्यक्तीला पूर्ण स्वातंत्र्य देण्याचे
समर्थन करणे
·
समता संकल्पना स्वातंत्र्याचा विरोध मानणे.
सकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना उदारमतवाद्यांच्या
परीक्षणातून आणि समाजवादी विचारवंतांच्या विचारातून उदयाला आलेली आहे. टी. एच.
ग्रीन, हॉब्जहाऊस, लिंडसे, प्रा. लास्की, बार्कर, मॅकआयव्हर, बोसांक्यूट इत्यादी विचारवंतांनी
ही संकल्पना विकसित करण्यात मोलाचे योगदान दिलेले आहे. नकारात्मक स्वातंत्र्य
व्यक्ती जीवनाचा आधार बनू शकत नाही. बंधनाचा अभाव म्हणजे स्वातंत्र्य हा
स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचाराला निमंत्रण देणारा ठरेल. व्यक्तीचे हित एकमेव
स्वातंत्र्याचे स्वयं साध्य नसून समाजहित साधणे हे स्वातंत्र्याचे प्रमुख लक्षण
असल्यामुळे समाजहितासाठी स्वातंत्र्यावर योग्य बंधने ठेवणे आवश्यक ठरते. सामूहिक
हित साध्य करण्यासाठी व्यक्तीपेक्षा राज्याची भूमिका निर्णायक असल्यामुळे राज्याला
व्यक्ती जीवनावर प्रतिबंध लादण्याचा अधिकार असला पाहिजे. बंधनामुळे व्यक्तीच्या
स्वातंत्र्याचे अपहरण होत नाही तर स्वातंत्र्याच्या उपभोगास योग्य परिस्थिती
उपलब्ध होते. समाजातील सर्व व्यक्तींना स्वातंत्र्याचा अधिकार असतो.
स्वातंत्र्याचा योग्य उपभोग घेण्यासाठी काही कर्तव्ये किंवा बंधने पाळणे आवश्यक
आहे. उदा. प्रत्येक व्यक्तीला गाणे वाजविण्याचा वा ऐकण्याचा अधिकार आहे परंतु
त्याने ते गाणे मर्यादित आवाजात गायिले पाहिजे वा ऐकले पाहिजे अन्यथा त्यांच्या
गाणे वाजविण्यामुळे इतरांना त्रास होईल म्हणजे इतरांच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण
होईल आणि हे अतिक्रमण टाळण्यासाठी स्वातंत्र्यावर बंधने आवश्यक आहेत, असे सकारात्मक स्वातंत्र्यात मानले
जाते.
सकारात्मक स्वातंत्र्य संकल्पना दोन गृहीतकांवर आधारलेली
आहे. प्रत्येक व्यक्तीत चांगले किंवा वाईट गुण असतात. वाईट गुणांवर नियंत्रण
प्रस्थापित करण्यासाठी सकारात्मक स्वातंत्र्याची गरज असते. सकारात्मक स्वातंत्र्य
संकल्पनेत बंधनासह स्वातंत्र्याचा विचार केला जातो. परंतु ही बंधने अनुचित नसून
उचित असावी अशी अपेक्षा केली जाते. बंधनांच्या माध्यमातून स्वातंत्र्याचा न्हास न
होता त्यांचा उपभोग घेण्यायोग्य वातावरण निर्माण होत असते. आपल्याला जसे
स्वातंत्र्य असते तसे इतरांनादेखील स्वातंत्र्य असते. स्वातंत्र्याचा योग्यपणे
उपभोग घेतल्यास इतरांच्या स्वातंत्र्याचे देखील रक्षण होईल. सामूहिक जीवनावर
सामूहिक नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी सकारात्मक स्वातंत्र्य योग्य मानल जाते.
उदा. विशिष्ट डेसिबलपेक्षा जास्त आवाजात गाणे वाजविण्यास बंदी सर्वांच्या हितासाठी ही बंदी योग्य ठरते कारण बंदी, मुळे ध्वनी प्रदूषणाला आळा घालता
येतो. म्हणून सकारात्मक स्वातंत्र्यात बंधनासह स्वातंत्र्याचा विचार केला जातो.
सकारात्मक स्वातंत्र्याची वैशिष्ट्ये - सकारात्मक स्वातंत्र्याची काही वैशिष्ट्ये सांगितली जातात.
·
सकारात्मक स्वातंत्र्य ही नकारात्मक स्वातंत्र्यावरची प्रतिक्रिया
मानली जाते.
·
सकारात्मक स्वातंत्र्याचे व्यक्तीहिताऐवजी समाजहित हा
प्रमुख उद्देश असतो.
·
स्वातंत्र्याच्या उपभोगास योग्य परिस्थिती निर्माण
करण्यासाठी राज्याकडे जास्तीत जास्त जबाबदाऱ्या सोपविण्यावर भर देतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.