फॅसिझम अर्थ,व्याख्या व, स्वरूप आणि उदयाची कारणे
पहिल्या महायुद्धानंतर युरोपात सर्वकष सत्तावादी स्वरूपाच्या फॅसिझम व नाझीझम नावाच्या विचारसरणी अनुक्रमे इटली आणि जर्मनी देशांत निर्माण झाल्या. या
दोन्ही विचारसरणीनी समकालीन अनेक देश प्रभावित झाले होते. या विचारसरणींनी जगाच्या
इतिहासात घडवून आणलेला विध्वंसक लक्षात घेता त्यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. फॅसिझम व नाझीझम ह्या मार्क्सवाद, उदारमतवाद
विचारसरणीसारख्या विशिष्ट मूल्यांवर आधारलेल्या विचारसरणी
नाहीत, कारण यांच्या
प्रर्वतकांनी नेहमीच सोयीनुसार आपल्या मूल्यांमध्ये बदल घडवून आणला आहे. दोन्ही
विचारसरणींचा वैचारिक पाया निश्चित नसल्यामुळे काही अभ्यासक त्यांना विचारसरणी
मानत नाहीत, तर ती नीती असून कार्य वा क्रिया करण्याची एक पद्धत आहे असे सांगतात. कारण
त्यांच्यात सिद्धान्त कमी आणि व्यवहाराला अधिक महत्त्व दिलेले आहे. परंतु काही
अभ्यासकांच्या मते फैसिक्रम व नाझीझम या दोन्ही विचारसरणी आहेत. त्या विशिष्ट अशा
मूल्यांवर आधारित आहेत वा त्यांची विशिष्ट अशी तत्त्वे आहेत.
फॅसिझम अर्थ, स्वरूप-
फॅसिझम विचारसरणीचा उदय पहिल्या महायुद्धानंतर इटली देशात झाला. पहिल्या
महायुद्धानंतर निर्माण झालेल्या अस्थिर राजकीय आणि आर्थिक परिस्थितीतून फॅसिझमचा
उदय झाला होता. इटलीमध्ये फॅसिझमचा कार्यकाल १९१९ ते १९४४ हा मानला जातो. १९२२
साली मुसोलिनी यांनी इटलीमध्ये सत्ता हस्तगत करून फॅसिझमची तत्त्वे जबरदस्तीने
जनतेवर लादली. फॅसिझमचा उदय इटलीत झालेला असला तरी पहिल्या महायुद्धानंतर
युरोपखंडात निर्माण झालेल्या वातावरणातून फॅसिझमसारख्या सर्वकषशाहीचा पुरस्कार
करणाऱ्या विचारप्रणाली निर्माण झाल्या आणि त्या विविध नावांनी प्रचलितदेखील
झाल्या. या विभिन्न विचारप्रणाली आणि फॅसिझमच्या तत्त्वांमध्ये कमालीची समानता
आढळून येते. उदा. जर्मनीतील नाझीझम.
फॅसिझमची व्याख्या व अर्थ:-
Fascism हा शब्द Fasces' (फँसी वा फँसीओ) या लॉटन शब्दापासून बनलेला आहे.
त्याचा अर्थ लाकडांची जुडी वा मोळी (bundle of
Sticks) असा आहे. या
शब्दाच्या अर्थावरून फॅसिस्टांनी 'लाकडाच्या मोळीमध्ये अडकवलेली कुन्हाड' हे पक्षाचे चिन्ह निश्चित केले होते. प्राचीन रोमन
साम्राज्यात लाकडाची मोळी सत्तेचे व एकतेचे प्रतीक वा चिन्ह मानली जात होती. रोमन
सम्राटाच्या मिरवणुकीत सैनिक लाकडाच्या मोळ्या घेऊन सहभागी होत. या प्रतीकावरून
फॅसिझम हा एक प्रकारचा सत्तावाद मानला जातो. एकता व शिस्त यांतून निर्माण होणारे
सामर्थ्य व्यक्त करणारे तत्त्वज्ञान म्हणजे फॅसिझम होय. फॅसिझमची सविस्तर व्याख्या
स्पष्ट करणारे फारसे साहित्य उपलब्ध नाही. फॅसिझमच्या आधारभूत सिद्धान्ताची
अधिकारपूर्वक व्याख्या आढळून येत नाही. राजकीय नेता म्हणून मुसोलिनीचे
व्यक्तिमत्त्व अत्यंत प्रभावशाली होते; परंतु दार्शनिक पातळीवर त्यांनी फारसा सखोल
विचार केलेला नाही. आपल्या समर्थनासाठी
आवश्यक मुद्दे वा तत्त्वांची विचारवंतांकडून उसनवारी करून The
Political and Social Doctrine of Fascism' या ग्रंथात फॅसिझम तत्त्वज्ञानाची मांडणी केलेली आहे.
मुसोलिनी यांनी आपल्या पद्धतीने फॅसिझमची व्याख्या नमूद करण्याचा प्रयत्न केलेला
आहे. मुसोलिनीच्या मते, फॅसिझम हा पूर्व निश्चित गोष्टी मांडणारा सिद्धान्त नसून एक
व्यावहारिक सिद्धान्त आहे. फॅसिझम हा कोणत्याही निश्चित विचारधारेला मानत नाही.
परंपरागत राजकीय सिद्धान्तांनी निश्चित केलेल्या मान्यतांना तोडण्याचे धैर्य
दाखवतो. आमच्या मते राष्ट्र हे सर्वप्रथम असून त्यानंतर बाकी गोष्टी आहेत.
फॅसिझमच्या व्याख्येवरून असलेल्या संदिग्धतेमुळे काही अभ्यासक मानतात की, या विचारधारेला निश्चित स्वरूपाचा दार्शनिक आधार
उपलब्ध नाही. त्यामुळे ही विचारधारा शुद्ध व्यावहारिक स्वरूपाची विचारधारा आहे.
फॅसिझमने स्वीकारलेल्या बुद्धिनिरोधवाद (irrationalism) संकल्पनेचा विचार करता, ही विचारधारा कोणत्याही प्रकारचा सैद्धांतिक
आधार घेत नाही, तर व्यावहारिकतेच्या आधारावर नीतिनिर्धारण करते हे स्पष्ट होते. तरीदेखील काही
अभ्यासकांनी फॅसिझमची व्याख्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या व्याख्या
पुढीलप्रमाणे होत.
१. विल्यम : याच्या मते, फॅसिझम हा लोकशाही व व्यक्तिस्वातंत्र्य यांच्या
विरोधातील विचार आहे. साम्यवाद ही लोकशाहीच्या विरोधातील पहिली प्रतिक्रिया मानली
जाते, तर फॅसिझम ही
दुसरी प्रतिक्रिया मानली जाते.
२. वानेंस: याच्या मते, परंपरेवर आधारित सामाजिक व राजकीय रचना निर्माण
करण्याच्या उद्देशाने केलेली चळवळ किंवा कठोर राष्ट्रवादी वंशश्रेष्ठावर आधारलेले
लष्करी व वसाहतवादी तत्त्वज्ञान म्हणजे फॅसिझम होय.
फॅसिझम ही विचारसरणी सर्वकषशाहीला महत्त्व देणारी आहे. ही 'एक नेता, एकराष्ट्र एक पक्ष या प्रमुख त्रिसूत्रीवर
आधारलेली होती. निरंकुशतावाद, विस्तारवाद, साम्राज्यवाद, वंशश्रेष्ठत्वाला महत्त्व देणारी विचारसरणी
म्हणून फॅसिझम ओळखली जाते. फॅसिझमच्या उदयाची कारणे व विकास : फॅसिझमच्या उदयास
पहिले महायुद्ध कारणीभूत मानले जाते. या महायुद्धानंतर इटलीत निर्माण झालेल्या
समस्यांचे निराकरण करणे लोकशाही शासनाला अशक्य झाल्यामुळे फॅसिझमचा उदय झाला.
लोकशाही विचारसरणीला प्रतिकारात्मक
विरोधातून फॅसिझम विचारसरणी अस्तित्वात आलेली दिसते.
फॅसिझमच्या उदयाची कारणे- पुढीलप्रमाणे सांगितली जातात.
१. इटलीची फसवणूक : पहिल्या महायुद्ध काळात इटली प्रथम जर्मनीच्या
बाजूने होता. जर्मनीचे सामर्थ्य कमी करण्यासाठी इंग्लंड-फ्रान्स व रशिया ही मित्र
राष्ट्र एकत्र आली. त्यांनी जर्मनीचा प्रतिकार मोडून काढण्यासाठी इतर राष्ट्रांना
आपल्या गटांत ओहण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नाला यश आले आणि इटली दोस्त
राष्ट्रांच्या बाजूने युद्धात उतरला. इटलीने पहिल्या महायुद्धात प्रवेश
करण्यापूर्वी दोस्त राष्ट्रांशी लंडनचा गुप्त तह केला. या तहानुसार ट्रायरोल, ट्रेरीना, ऑस्टिया व जर्मनीतील इटालियन भाषिक प्रदेश आणि
उत्तर आफ्रिकेतील जर्मन वसाहती देण्याचे कबूल केले होते. पण महायुद्ध संपल्यानंतर
अमेरिकेचे अध्यक्ष विड्रो विल्सन यांनी महायुद्धकाळातील सर्व गुप्त तह रद्द केले.
त्यामुळे इटलीचा तहदेखील रद्द झाला. व्हर्सायच्या तहानुसार इटलीच्या वाट्याला ८९००
चौ. कि. मी प्रदेश मिळाला, दुसरे काहीही मिळाले नाही. युद्धापूर्वी झालेल्या
करारानुसार इटलीला प्रदेश मिळाला नाही. इटलीचा विजयी राष्ट्रांच्या गटात समावेश
असूनही पराभूत जर्मनीप्रमाणे अपमानास्पद वागणूक मिळाली. व्हर्सायच्या तहाने इटलीची
पूर्ण निराशा केली. इटलीच्या फसवणुकीला दोस्त राष्ट्र जबाबदार आहेत ही भावना
इटलीच्या जनतेत निर्माण झाली.
२. जनतेचा असंतोष :- पहिल्या महायुद्धानंतर
झालेल्या व्हर्सायच्या तहात इटलीचा विजयी राष्ट्रांच्या गटात समावेश होता. परंतु
युद्धानंतर झालेला व्हर्सायचा तह करण्यात इंग्लंड व फ्रान्समधील नेत्यांचा
सर्वाधिक सहभाग होता. त्या राष्ट्रांनी युद्धात खर्च झालेला सर्व पैसा जर्मनीकडून
वसूल करण्याचा प्रयत्न केला. इटली विजयी राष्ट्रांच्या बाजूने असला तरी
प्रत्यक्षात अपमानास्पद वागणूक देण्यात आली. महायुद्धात इटलीची प्रचंड हानी होऊनही
युद्धखंडणीत हिस्सा दिला गेला नाही. त्यामुळे इटलीची आर्थिक परिस्थिती हालाखीची
बनली. जनतेचा अपेक्षाभंग झाला. इटलीच्या जनतेने याबद्दल सरकारला दोष दिला.
फॅसिस्टांनी जनतेला संकटातून बाहेर काढण्याचे आणि या अपमानाचा बदला घेण्याचे
आश्वासन दिल्यामुळे जनतेने फॅसिस्टांना पाठिंबा दिला.
2. बिकट आर्थिक समस्या : पहिल्या महायुद्धानंतर इटलीची आर्थिक परिस्थिती अत्यंत
बिकट बनली महायुद्धामुळे उत्तर इटलीतील अनेक बेचिराख उद्ध्वस्त झाली लाख सैन्य
महायुद्धात मारले जवान अपंग जखमी झाले. महायुद्धामुळे कर्जबाजारी झाल्याने
उद्योगधंदे राष्ट्रीय कर्ज सहापटींनी वाढले. उद्योगांना देण्यासाठी बँकांजवळ
भांडवल उद्योग पडले, औद्योगिक क्षेत्रात कच्च्या मालाचा परदेशी बाजारपेठांचा
अभाव, टाळेबंदी
इत्यादी परिणाम जीवनावश्यक झाली. किरकोळ वस्तूंच्या भिडल्या जीवनावश्यक वस्तूंच्या
किमती चौपटीने वाढल्या. सामान्य माणसांना जीवन जगणे अशक्य इटलीच्या 'लिरा' चलनाला जागतिक बाजारपेठेत किंमत नाही. चलनाची
किंमत टक्क्यांनी कमी झाली. जनतेच्या प्रश्नांचे निराकरण करण्यास सत्ताधारी पक्ष
अपयशी ठरला. जनतेचे सोडविण्याऐवजी कराचे ओझे लादण्यात सत्ताधारी पक्षाने धन्यता
मानल्यामुळे जनतेच्या असंतोषात वाढ घडवून याच काळात फॅसिस्टांनी जनतेच्या आर्थिक
प्रश्नांची तीव्रता लक्षात आश्वासन दिले. जनतेला दिलासा दिल्यामुळे जनतेत
फॅसिझमबद्दल प्रेम झाले जनतेने निवडून दिले.
४. राजकीय परिस्थिती: महायुद्धानंतर इटलीने संसदीय लोकशाहीचा स्वीकार
होता. इटलीत समाजवादी, उदारमतवादी आणि जनता पक्ष हे प्रमुख ह्यांपैकी कोणत्याही
राजकीय पक्षाला इटलीत स्थिर शासन आले युद्धकाळानंतर लोकशाही मंत्रीमंडळापुढे अनेक
उभे पण कोणत्याही मंत्रीमंडळाला आर्थिक प्रश्न सोडविण्यात यश आले नाही. इटलीतील
कोणत्याही पक्षाला सार्वजनिक शांतता उद्योगधंद्यांच्या विकासासाठी कोणताही ठोस
देता नाही. १९१९ याकाळात मंत्रीमंडळे सत्तेवर आली गेली. अंतर्गत विरोध, गटबाजी, सत्तास्पर्धा, पक्षांतर आर्थिक क्षेत्रातील गोंधळाच्या
वातावरणामुळे राजकीय अराजकता निर्माण झाली. महायुद्धानंतर इटलीत निर्माण झालेले
सामाजिक व आर्थिक राज्यकर्ते शकले नाहीत. त्यामुळे लोकांच्या मनात लोकशाहीबद्दल
निर्माण झाला. परिस्थितीत इटलीला एकसंघ समर्थ सरकार निर्माण करून राष्ट्र
वाचविण्यासाठी फॅसिस्टांच्या सत्ता जनतेला
५. साम्यवादाचा वाढता प्रभाव : १९९७ ला रशियात साम्यवादी झाली
क्रांतीमुळे इटलीत साम्यवादी पक्षाचा प्रभाव वाढू लागला. रशियाप्रमाणे इटलीतदेखील
कामगारांची हुकूमशाही स्थापन होईल अशी स्वप्ने इटलीतील साम्यवादी पक्ष रंगवू
लागले. त्या स्वप्नांच्या परिपूर्तीसाठी शेतमजूर आणि कामगारांचे संघटन करण्यास
साम्यवादी पक्षाने सुरुवात केली. इटलीतील जनतेलादेखील साम्यवादाचा पर्याय आकर्षक
वाटू लागला. साम्यवादाच्या वाढत्या प्रभावामु इटलीतील भांडवलदारांमध्ये भय निर्माण
झाले. शेतमजुरांनी जमीनदारांवर करायला सुरुवात केली. शहरात साम्यवादी पक्षाने
कामगारक्रांतीची घोषणा क कारखाने ताब्यात घ्यायला सुरुवात केली. सरकार
साम्यवादाच्या कृतीपुढे हतबल ठरले. साम्यवाद्यांनी कारखाने ताब्यात घेतले; परंतु चालविण्याचा अनुभव नसल्यामुळे ते बंद
पडले. सामूहिक शेतीचा प्रयोगदेखील अपशयी ठरला. साम्यवादाचा प्रयोग इटलीच्या समस्या
सोडविण्यास उपयुक्त नाही, हे इटलीच्या जनतेच्या लक्षात येऊ लागले. मुसोलिनीने साम्यवादाच्या
विरुद्ध विखारी प्रचार | सुरू केला. साम्यवादापासून इटलीला वाचविण्याची ताकद फक्त
माझ्यात आहे असा मुसोलिनीने दावा केला. साम्यवादाच्या भीतीने भेदरलेल्या
भांडवलदाराना आणि जमीनदारांना मुसोलिनीचे नेतृत्व आश्वासक वाटू लागले. त्यांनी
पाठिंबा दिल्यामुळे तो अल्पकाळात सत्तेवर आला.
६. मनोवैज्ञानिक परिस्थिती : पहिले महायुद्ध सैनिकांच्या जोरावर लढले
गेले. संपल्यानंतर सैनिकांची संख्या कमी झाल्याने सैनिक बेरोजगार झाले. लष्करी
साहित्य निर्माण करणारे कारखाने बंद पडल्याने सैनिक व कामगारांना काम मिळत नव्हते
महागाई, संप, बेरोजगारी इ. मुळे सामान्य माणसांचे जीवन अस्थिर
झाले. संकटस्त परिस्थितीत जनतेला कोणताही मार्ग दिसत नव्हता. जनता संसदीय
लोकशाहीच्या माध्यमातून विविध पर्याय निवडून देत होती. परंतु इटलीतील कोणत्याही
राजकीय पक्षाला स्थिर सरकार देता आले नाही आणि जनतेचे प्रश्नदेखील सोडविता आले
नाही. साम्यवादीदेखील जनतेच्या विश्वासास पात्र ठरू शकले नाही. या अस्थिर
परिस्थितीत जनता मानसिकदृष्ट्या खचली, आपला कोणी वाली नाही हा समझ करून घेतला.
मानसिकदृष्ट्या गोंधळाच्या परिस्थितीत मुसोलिनीने आकर्षक घोषणा व कार्यक्रम जाहीर
करण्यास सुरुवात केली. इटलीला पुर्नवैभव प्राप्त करून देण्याचा दावा सुरू केला. या
परिस्थितीत मुसोलिनी व फॅसिस्ट पक्षाला एक संधी देण्यास हरकत नाही, असा जनतेचा कल झाला. याचा नेमका फायदा उठवून
मुसोलिनी सत्तेवर आला.
अशा पद्धतीने इटलीतील सामाजिक अस्थैर्य, आर्थिक अस्थिरता आणि अनिश्चिततेच्या
वातावरणात फॅसिस्ट पक्षाने लिबरल पक्ष आणि संसदीय लोकशाहीला जबाबदार मानले. भाषणे, मेळावे, सभा, अधिवेशने, मोर्चे आणि निर्दशनांच्या माध्यमातून जनसंघटन व
जागृती घडवून आणली. साम्यवाद्यांनी केलेल्या सार्वत्रिक क्रांतीच्या घोषणेमुळे
साम्यवादाचे विरोधक फॅसिस्टांच्या पाठीशी उभे राहिले. लोकशाही सरकार फॅसिस्टांनी
सार्वजनिक सेवा सुरळीत ठेवण्यात मदत केली. त्यांच्या या कृतीमुळे लोकमत
फॅसिस्टांना अनुकूल बनले. २७ ऑक्टोबर १९२२ ला मुसोलिनीने रोमवर मोर्चा नेला आणि
देशात फॅसिस्ट पक्षास सत्ता स्थापन करण्याची संधी देण्याची विनंती केली. फॅसिस्ट व
लिबरल पक्षाचे युती सरकार इटलीत सत्तेवर आले. या काळात फॅसिस्ट पक्षाने जनहिताच्या
योजना राबविल्यामुळे १९२४ च्या निवडणुकीत फॅसिस्ट पक्षाला बऱ्यापैकी जागा
मिळाल्या. समाजवादी पक्षाचा नेता 'मॅटिओनी'च्या खुनानंतर विरोधी पक्षांची शक्ती कमी होऊ
लागली. जनतेच्या दडपणामुळे इटलीचा राजा व्हिक्टर इमॅन्युअल तिसरा याने लिबरल
पक्षाचे लोकशाही सरकार बरखास्त करून फॅसिस्ट पक्षास सरकार बनविण्यास पाचारण केले.
१९२४ साली मुसोलिनी पंतप्रधान व संसदेचा नेता बनला. अशा पद्धतीने लोकशाही पद्धतीने
मुसोलिनी इटलीचा पंतप्रधान बनला. सत्तेवर आल्यानंतर त्याने राज्यसभा बरखास्त केली.
इतर पक्षांवर बंदी लादली आणि राष्ट्रपतीपद स्वतःकडे घेतले. लोकशाही मार्गाने
सत्तेवर येऊन मुसोलिनी इटलीचा सर्वसत्ताधीश बनला. दुसऱ्या महायुद्धात इटली पराभूत
होईपर्यंत तो सत्तेवर होता. आपण जिवंत सापडल्यास जनता आपल्याला माफ करणार नाही, आपल्या कृत्यांची कठोर शिक्षा दिली जाईल या
भीतीने मुसोलिनीने आत्महत्या केली आणि त्याबरोबर फॅसिस्ट विचारधारेचादेखील अंत
घडून आला. फॅसिस्ट विचारधारा फक्त इटलीपुरती मर्यादित नव्हती तर जर्मनी, तुर्कस्थान, स्पेन, पोतुर्गाल, ऑस्ट्रिया, ग्रीस, बल्गेरिया इत्यादी देशांतदेखील फैलावत चाललेली
होती. दुसऱ्या महायुद्धात फॅसिस्ट शक्तीचा पराभव झाल्यामुळे ही विचारधारा
इतिहासजमा झाली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.