फॅसिझमचे तत्त्वज्ञान, मूलतत्त्वे आणि वैशिष्ट्ये : (Philosophy,
Fundamental Principles and Elements of Fascism)
फॅसिझम हा सिद्धान्त आहे की व्यवहार याबाबत दार्शनिक
पातळीवर मतभेद आहेत. पहिल्या महायुद्धानंतर युरोप आणि विशेषतः इटलीमध्ये निर्माण
झालेल्या तात्कालिक समस्या सोडविण्यासाठी एक अस्थायी स्वरूपाचा व्यावहारिक
कार्यक्रम होता. तो युरोपियन तत्त्वज्ञानात अनेक वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या
अनेक तत्त्वांच्या मिश्रणातून निर्माण झालेला आहे. फॅसिझम आणि राष्ट्रीय समाजवाद
या दोन्ही विचारधामुसोलिनी आणि हिटलरच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षाचे परिणाम आहेत.
त्यांनी आपली विचारधारा दंडशक्तीच्या जोरावर आपआपल्या देशातील जनतेवर लादली, असे मानले जाते. परंतु हे मत आज फारसे ग्राह्य
धरले जात नाही; कारण ही विचारधारा मुसोलिनी आणि हिटलरच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपुरती
मर्यादित राहिली असती, तर तिचा प्रभाव हिटलर व मुसोलिनीच्या मृत्यूनंतर लगेचच
संपला असता. इतर देशांत ही विचारधारा फैलावली नसती. फॅसिस्ट विचारधारेचे मर्यादित
प्रमाणात अस्तित्व आजही अनेक देशांत • आढळून येते. फॅसिझम विचारधारेला प्रयोगसिद्ध
कार्यक्रमाचा आधार नसला, तरी काही ठळक तत्त्वे आणि कार्यक्रमांच्या आधारावर त्यांनी
इटलीवर जवळपास बीस वर्षे राज्य केले. फॅसिझमचे तत्त्वज्ञान प्रामुख्याने
मुसोलिनीने लिहिलेल्या The Political and Social Doctrine of
Fascism' या ग्रंथात
मांडलेले आहे. एल्फ्रेडो रोक्को, जिओवानी जेंडाइल यांनीदेखील फॅसिझम तत्त्वज्ञान विकसित
करण्यात मोलाची भूमिका बजावलेली आहे. फॅसिस्टांनी विशिष्ट प्रकारच्या तत्त्वज्ञानाशी
बांधिलकी स्वीकारली नाही. कालपरत्वे आपल्या कार्यक्रमात व विचारधारेत बदल केला.
व्यावहारिक पातळीवरील आचरण यशस्वी झाल्यानंतर त्याला त्यांनी नंतरच्या काळात
तात्विक झालर चढविण्याचा प्रयत्नदेखील केलेला होता. मुसोलिनी म्हणतो की, आमचा कार्यक्रम अगदी साधा, सरळ आहे. इटलीत आम्हाला सत्ता प्राप्त करावयाची
आहे. इटलीच्या जनतेवर आम्हाला अधिराज्य गाजवायचे आहे. त्यामुळे आम्ही कोणत्याही
तत्त्वांशी बांधील नाही. आम्हाला ज्याप्रमाणे मार्ग सुचतील त्याप्रमाणे आम्ही
कार्यक्रमाची आखणी करू. मुसोलिनीच्या मताचा आशय लक्षात घेतला तर असे दिसून येते की, फॅसिस्ट काळानुरूप कार्यक्रम बांधणीवर विश्वास
व्यक्त करतात. मुसोलिनी यांनी विविध विचारवंत वा विचारधारांनी मांडलेल्या
संकल्पनांचा फॅसिझमच्या विस्तारासाठी उपयोग करून घेतलेला दिसतो. मॅकियाव्हेली, हेगेल, फित्शे, नीत्शे, शोपन हाबर, बर्गसां, जॉर्ज सोरेल इत्यादी विचारवंतांकडून
संकल्पनात्मक उसनवारी करून मुसोलिनी यांनी फॅसिझमवादाची मांडणी केलेली आहे.
मुसोलिनी स्वतः मान्य करतो की, फॅसिस्टवादाने मॅकियाव्हेलीपासून संधीसाधूपणा, हेगेलकडून राजकीय निरंकुशतावाद सिद्धान्त, सोरेलाकडून हिंसक क्रांतिवाद, विल्यम जेम्सकडून फलप्रामाण्यवाद (प्रॅग्मॅटिझम)
घेतलेला आहे. या सर्व विचारधारांच्या संमिश्रणातून फॅसिझमची मांडणी केलेली आहे.
फॅसिस्ट विचारसरणी युद्धखोर वृत्ती, लष्करी शिस्त, प्रत्यक्ष कृती, वंशश्रेष्ठत्व, निरंकुशता, साम्राज्यवाद, विस्तारवाद, स्त्रियांना दुय्यम स्थान, आक्रमक राष्ट्रवाद, राष्ट्राला सर्वश्रेष्ठत्व इत्यादी तत्त्वांना
सर्वाधिक महत्त्व व प्राधान्य देते. लोकशाही आणि साम्यवाद या दोन्ही विचारधारांना
कट्टर विरोध करतात. एक राष्ट्र, एक पक्ष व एक नेता या त्रिसूत्रीवर भर देतात. त्यांनी
राजकीय, सामाजिक व
आर्थिक क्षेत्रांत अपयश दूर करण्यासाठी राष्ट्रवाद व विस्तारवादाच्या आधारावर
नागरिकांना संघटित करण्याची पद्धती विकसित केली. फॅसिझम सुसंगत विचारप्रणाली नाही.
तत्त्वज्ञानापेक्षा कृतींवर आणि भावनांवर अधिक भर देतात. परस्परविसंगत, चमत्कृतीयुक्त संकल्पना, मिथक प्रतीकांची निर्मिती राजकीय फायदा
उठविण्याचा प्रयत्न करतात.
फॅसिझमची प्रमुख वैशिष्ट्ये- अभ्यासकांनी नमूद केलेली आहेत. पुढीलप्रमाणे होत.
१.राष्ट्राला सर्वाधिक
महत्त्व-
राष्ट्र ह्या संकल्पनेला फॅसिस्ट
सर्वाधिक महत्व देतात. राष्ट्राला परमेश्वर मानतात. म्हणजे वर्तमान काळातील काही
समूह नसून, त्याला असते. त्यांचे अस्तित्व भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमानकाळातदेखील अस्तित्वात
असते. राज्याला फक्त राजकीय मानत नाहीत, तर आध्यात्मिक नैतिक संस्था मानतात. राष्ट्राला
स्वतंत्र व्यक्तिमत्व असते मुसोलिनी की, राज्याशिवाय काहीही राज्याबाहेर काहीही नाही, राज्यविरोधीदेखील काहीही सर्वश्रेष्ठत्व प्राप्त
करून देण्यासाठी फॅसिस्ट सेंद्रीय सिद्धान्ताला (Organic theory)
मान्यता देतात. राज्यसंस्था सजीव
प्राण्याप्रमाणे आहे. राज्याचे घटक ह्या सजीव अवयव असेपर्यंत अवयवांना असते, शरीर मृत की अवयव मृत पावतात; त्याप्रमाणे राज्याच्या अस्तित्वात अस्तित्व
अवलंबून असते. राज्याचे सर्वश्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी हेगेलच्या करतात.
हेगेलच्या सोयीनुसार अर्थ लावतात. राष्ट्राला दुर्बल करणाऱ्या व्यक्तिवादी
विचारसरणीला विरोध करतात. व्यक्तिवादामुळे व्यक्तीचे महत्त्व वाढते आणि राष्ट्र
दुर्बल बनते. राष्ट्र श्रेष्ठ असल्याने व्यक्तीने राष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण
करण्याची तयारी ठेवली पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने राष्ट्रावर अव्यभिचारी निष्ठा
ठेवली पाहिजे आणि राष्ट्रकल्याणासाठी सतत परिश्रमांसाठी तयार राहिले पाहिजे.
राष्ट्रवैभव वाढविण्यासाठी फॅसिझमने इतिहासाचा आधार घेतला. राष्ट्रगीत, राष्ट्रीय चिन्ह, लष्करी गणवेष, कवायत इ. राष्ट्रवादासाठी महत्त्व देतात.
राष्ट्राला सर्वोच्च स्थान मिळवून देण्यासाठी कोणत्याही मार्गाचा अवलंब करण्यास
मान्यता देतात. राष्ट्रविकास साध्य मानल्यामुळे इतर संस्थांना गौण स्थान देतात.
राष्ट्रीय निष्ठा व अस्मिता निर्माण करणाऱ्या कार्यक्रमांना विशेष प्राधान्य
देतात.
२. आत्यंतिक राष्ट्रवादी व वसाहतवादाचा पुरस्कार :-
फॅसिस्ट आत्यंतिक राष्ट्रवादी
विचारसरणीचे समर्थक होते. राष्ट्रविकासासाठी फॅसिस्ट आक्रमक कार्यक्रमावर भर
देतात. प्रखर राष्ट्रवादाचे आक्रमक राष्ट्रवादात रूपांतर करतात. मुसोलिनी म्हणत
असे की, इटलीने आक्रमण
करून दुर्बल राष्ट्रांवर वर्चस्व गाजविले पाहिजे, नाहीतरआत्मनाशाला तयार राहिले पाहिजे. लहान लहान
देशांवर विजय मिळवून इटलीच्या भूमीचा विस्तार करण्याला फॅसिस्ट नैसर्गिक मानत असत.
फॅसिस्टानी साम्राज्यवाद आणि वसाहतवादाचा उघड उघड पुरस्कार केला. त्यासाठी
आवश्यकता भासल्याम युद्ध करण्याचीदेखील तयारी दर्शविली. मुसोलिनीच्या मते, युद्धामुळे राष्ट्राची प्रगती होते.
व्यक्तींच्या कर्तृत्वाला वाव मिळतो. स्त्रियांना मातृत्व जसे नैसर्गिक आहे. तसेच
युद्ध हे पुरुषासाठी नैसर्गिक आहे. फॅसिस्ट नेहमी युद्धप्रवृत्तीला पाठिंबा देतात.
आक्रमक राष्ट्रवादाच्या आधारावर परराष्ट्रीय धोरणाची आखणी करतात. देशाचे सामर्थ्य
वाढविण्यासाठी शेजारील राष्ट्रांवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी युद्धाचा
पुरस्कार करतात. फॅसिस्ट प्राचीन रोमन साम्राज्याचा आदर्श प्रस्थापित करून जनतेत
युद्धखोर प्रवृत्ती विकसित करण्याला प्राधान्य देतात. युद्धाला नैतिक आधार प्राप्त
करून देण्याचा प्रयत्न करतात.
३. आंतरराष्ट्रीय शांततेला विरोध:-
आंतरराष्ट्रीय शांतता व सहकार्य फॅसिझमला मान्य नाही. व्यक्तीचे कर्तव्य आणि
व्यक्तीची जबाबदारी आपल्या राष्ट्रापुरती मर्यादित असते. जगाच्या बाबतीत त्यांना
देणेघेणे नसते. राष्ट्रविकासासाठी इतर राष्ट्रांवर आक्रमण करणे न्यायसंगत असते.
मुसोलिनीच्या मते, आंतरराष्ट्रीय शांतता भित्र्या लोकांचे स्वप्न आहे.
साम्राज्यवाद हा जीवनाचा अंतिम नियम आहे. राष्ट्रसंघ संघटनेवर मुसोलिनीचा विश्वास
नव्हता. फॅसिस्टांनी आंतरराष्ट्रीय कायद्यांना मान्यता दिली नाही. आंतरराष्ट्रीय
संधीचादेखील आदर केला नाही. सातत्याने युद्धाचा पुरस्कार करून आंतरराष्ट्रीय
शांततेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रसंघाच्या नियमांचे उल्लघंन करून
आपले साम्राज्य वाढविण्याचा प्रयत्न केला. मुसोलिनी आंतरराष्ट्रीय शांततेचा कट्टर
विरोधक होता. त्याला आंतरराष्ट्रीय शांतता हा भेकडपणा वाटत असे.
४. सर्वकष राष्ट्र :-
फॅसिस्टांचा राज्यविषयक सिद्धान्त
निरंकुशता वा सर्वकषशाहीवर भर देणारा आहे. फॅसिस्ट हे समूहवादी तत्त्वज्ञान आहे.
राज्यसंस्था आपल्या कार्याद्वारे समुदायाचा सामाजिक, आर्थिक, नैतिक व बौद्धिक विकास घडवून आणू शकते.
समुदायाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्याकडे सर्व प्रकारची सत्ता सोपवावी.
समाजजीवनाचा कोणताही भाग राज्य नियंत्रणापासून मुक्त असणार नाही. सामाजिक, आर्थिक व नैतिक क्षेत्रांचे नियमन व मार्गदर्शन
राज्याकडून केले जाईल. राज्य ही संस्था सर्वश्रेष्ठ आहे. मुसोलिनीच्या मते राज्य
केवळ राजकीय संस्था नसून एक आध्यात्मिक व नैतिक तथ्यदेखील आहे. राज्य फक्त
नागरिकांच्या आंतरिक आणि बाह्य संरक्षणाचे आश्वासन देत नाही, तर जनतेच्या आत्म्याचे संरक्षण वा
प्रतिनिधित्वदेखील करते. फॅसिस्ट विचारधारा राज्याच्या सर्वंकष स्वरूपाला
मान्यतादेतात रोकोदेखील मुसोलिनीप्रमाणे आपले विचार व्यक्त करतो. त्यांच्या मते, राज्य विचार आणि भावनेच्या अशा आध्यात्मिक
परंपरेचे प्रतीक आहे की, जी येणारी प्रत्येक पिछी आधीच्या पिढीपासून प्राप्त करत
असते आणि जाताना पुढच्या समर्पित करत असते. फॅसिस्ट विचारधारा समाज आणि राज्य यांत
कोणताही भेदभाव करत नाही. जेंटाईलसारखा फॅसिस्ट मानतो की, खरा फॅसिस्ट कुटुंब, समाजात आणि सर्व ठिकाणी फॅसिस्टच राहतो.
राष्ट्रहिताची जाण फक्त राज्याला असते. राज्याच्या मान्यतेशिवाय राजकीय पक्ष, कामगार संघटना, व्यावसायिक संघ स्थापन करण्यास परवानगी देत
नाही.
५. व्यक्तीला
दुय्यम स्थान-
फॅसिस्ट व्यक्तिस्वातंत्र्याची कल्पना
अमान्य करतात. राज्याच्या हितातच व्यक्तीच्या हिताचा समावेश करतात.
राज्यसंस्थेच्या शक्तीतच व्यक्तीचे स्वातंत्र्य सामावलेले आहे. व्यक्तीचे
स्वातंत्र्य हा व्यक्तीचा हक नसून राज्याप्रती पार पाडावयाचे कर्तव्य आहे. राज्य
हे साध्य असून व्यक्ती हे साधन आहे. हेगेलच्या विचारांचा आधार घेऊन राज्यसंस्थेला
सर्वश्रेष्ठत्व बहाल करतात आणि तिचा एक भाग या नात्याने व्यक्तीला दुय्यम स्थान
देतात. फॅसिस्ट पूर्णत्वाला महत्त्व देतात. राज्य ही पूर्णत्व प्राप्त झालेली
संस्था आहे आणि व्यक्ती ही तिचा एक भाग आहे असे मानतात. स्वातंत्र्याला राज्याकडून
मिळणारी सवलत मानतात. त्यांचा उपयोग राज्याची शक्ती वाढविण्यासाठी करावा असा सल्ला
देतात. मुसोलिनीच्या मते, 'राज्याने ज्या व्यक्तिवर्तनाला मान्यता दिली आहे, ते वर्तन म्हणजे स्वातंत्र्य होय'. फॅसिस्ट स्वातंत्र्यसंकल्पनेला महत्त्व देत
नाही. स्वातंत्र्याऐवजी आज्ञापालनाला महत्त्व देतात. स्वातंत्र्याचा विचार
व्यक्तिविकासासाठी करत नाहीत तर राष्ट्रविकासाशी स्वातंत्र्याची कल्पना जोडण्याचा
प्रयत्न करतात. एका अर्थाने आज्ञाधारक नागरिक निर्माण करणे हे फॅसिझमचे ध्येय
होते. हे ध्येय लक्षात घेऊन ते स्वातंत्र्याची कल्पना मांडतात.
६. विषमतेचे समर्थन:-
फॅसिस्ट विषमतेला योग्य, आदर्श आणि नैसर्गिक मानतात. बुद्धिमत्ता आणि
कार्यक्षमतेच्या बाबतीत नागरिकांमध्ये भिन्नता असणे नैसर्गिक आहे. ही भिन्नता
लक्षात न घेता सर्वांना समान मानणे समाजहितासाठी घातक आहे. विषमता ही निसर्गदत्त
असून ती कधी नष्ट होणार नाही. समाजातील काही लोक सत्ता वा वर्चस्व गाजविण्यासाठी
जन्माला आलेले असतात, तर काही आज्ञापालनासाठी आलेले असतात. सामान्य माणसांना
आपल्या जीवनाची सुरक्षितता महत्त्वाची वाटते. राज्य प्रशासनातील असामान्य व
गुंतागुंतीच्या प्रश्नांचे आकलन त्यांना होत नाही. समाजातील बुद्धिवान व शक्तिवान
लोकांनी राज्य करावे आणि सामान्यांनी आज्ञापालन करावे, यात समाजहित आहे असे सांगूनफेसिस्ट अभिजनवाद आणि
विषमतेचे जाहीर समर्थन करतात. समाजातील नैसि भेव टिकविण्यास प्राधान्य देतात.
विषमतेची कल्पना मान्य केल्यामुळे स्त्रिय पुरुष परराष्ट्रापेक्षा स्वराष्ट्र तर
नागरिकांपेक्षा सैनिकांना श्रेष्ठ मानतात. जन्म, शिक्षण व सामाजिक दर्जा आणि संपत्ती इ. बाबत
समाजातील मूठभर लोकांना अधिकार देतात इतरांनी फक्त आज्ञापालन करावयाचे आहे. मूठभर
लोक राज्यकर्ते होण्यासाठी आणि बहुसंख्य लोक अनुयायी होण्यासाठी जन्माला आले आहेत, असे मानतात.
७. स्त्रियांना दुय्यम
स्थान : फॅसिस्टांचे स्त्रियांविषयीचे विचार अत्यंत प्रतिगामी व परपरागत
स्वरूपाचे आहेत. ते स्त्रियांना दुर्बल मानतात. निसर्गानिच स्त्रियांना दुर्बल
बनवल्याने राजकारण हे त्यांचे क्षेत्र नाही. लष्करीदृष्ट्या स्त्रिया अनउपयुक्त
असल्याने त्याना दुय्यम नागरिकत्व देतात. पितृप्रधान कुटुंब व्यवस्थेचे समर्थन करत
असल्याने कुटुचप्रमुख पुरुष असणे निश्चित मानले जाते. कुटुंबप्रमुखाच्या आदेशाचे
पालन इतर सदस्यांनी करावे हे अपेक्षित केले जाते. राजकीयदृष्ट्या स्त्रिया अपात्र
असल्याने त्यांना मतदानाचा अधिकार फॅसिस्ट देत नाहीत. कुटुंब साभाळणे, उत्तम नागरिक निर्माण करणे हे स्त्रियांचे
प्रमुख कार्यक्षेत्र मानले गेले. फॅसिस्ट देशाला मातृभूमी न मानता पितृभूमी
म्हणावे असे सांगतात. स्त्रियांना शाळेत शिक्षिका म्हणून नेमू नये. स्त्रीवर्तनाचा
प्रभाव मुलांवर पडेल आणि ते कोमल अंतःकरणाचे बनतील. त्यांच्यान पुरुषी कठोरपणा
निर्माण होणार नाही. मुलांना भविष्यात सैनिकांची जबाबदारी पार पाडावयाची आहे.
सैनिक बनविण्यासाठी योग्य शिक्षण पुरुषच देऊ शकतात. फॅसिस्ट स्त्रियांचे
कार्यक्षेत्र चूल आणि मूल आहे हे गृहीत धरतात.
८. बुद्धिवादाला विरोध : फॅसिस्ट विचारसरणी बुद्धिवादाच्या विरोधात
मानली जाते. बुद्धिवादापेक्षा आज्ञाधारकतेला ते महत्त्व देतात. आपल्या विचारसरणीला
सैद्धांतिक आधार उपलब्ध करून देण्यासाठी हेगेल, कांट, शॉपेन हॉवर आणि नीत्शे या विचारवंतांच्या
विचारांचा आपल्या फायद्यासाठी वापर करून घेतात. बुद्धीपेक्षा हृदयाच्या प्रेरणा
म्हणजे भावनेला अधिक महत्त्व देतात. भावना ह्या मानवी प्रगतीसाठी उपयुक्त असतात.
भावनेच्या आधारावर जनसमूहावर राज्य करणे योग्य मानतात. युरोपियन प्रबोधन आणि
विवेकवादातून पुढे आलेल्या स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही, उदारमतवाद संकल्पनांचे मानवी जीवनातील महत्त्व
नाकारतात. आपल्या कल्पनांच्या पाठपुराव्यासाठी परंपरागत रोमन साम्राज्यातील
प्रतीकांचे अस्मितीकरण करतात. बुद्धिवादाचा प्रभाव कमी करण्यासाठी आपल्या कृतीला
राष्ट्रवादाची झूल चढविण्याचा प्रयत्न करतात.
9. लोकशाहीला विरोध :- फॅसिस्ट विचारधारा लोकशाहीच्या विरोधी मानली
जाते. लोकशाहीच्या अपयशातून फॅसिस्ट विचारधारेचा उदय झालेला आहे. लोकशाहीलाविरोध
करण्यासाठी फ्रेंच तत्वज्ञ सोरेल यांच्या तत्त्वज्ञानाचा आधार घेतात. 'संसदीय लोकशाहीची चैन इटलीला परवडणारी नाही', असे मुसोलिनी म्हणतो. लोकशाहीला. तो बडबड्याचे
दुकान म्हणतो. जे काम करण्यासाठी लोकशाहीला ४८ वर्ष लागतील, ते काम मी ४८ तासांत फॅसिस्ट विचारधारेद्वारा
करू शकतो असा विश्वास तो प्रकट करतो. लोकशाहीत जनतेची प्रगती होईल असे मानणे
मूर्खपणा आहे. लोकशाहीत सर्वसामान्यांच्या हातात सत्ता दिलेली असते. त्यांना
प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार दिलेला असतो. राजकीय प्रश्न सर्वसामान्यांच्या
आकलनापलीकडे असतात. सर्वसामान्य जनतेत निर्णय घेण्याची क्षमता नसते. समाजात काही
ठळक लोक राज्यकर्ते होण्यासाठी जन्माला आलेले आहेत. सर्वसामान्य व्यक्तींनी
राजकारणाच्या फंदात न पडता श्रेष्ठीजनांच्या हातात सत्तेची सूत्रे दिली पाहिजेत
आणि त्यांनी दिलेल्या आज्ञेप्रमाणे वागले पाहिजे. नैसर्गिक विषमतेला ते आदर्श
मानतात. राजकीय क्षेत्रातदेखील विषमतेचे समर्थन करतात. राजकीय सत्ता समाजातील
मूठभर श्रेष्ठीजनांकडे असावी असे अपेक्षित करतात. लोकशाहीच्या माध्यमातून राजकीय
सत्तेवर येणारे नियंत्रण त्यांना मान्य नव्हते. राजकीय नेत्यांचे दैवतीकरण
करावयाचे होते, त्यासाठी लोकशाही अडचणीची वाटत होती. म्हणून लोकशाहीला विरोध करून निरंकुशशाही
प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी उपरोक्त विचार व्यक्त केले आहेत.
१०. एकपक्षीय शासन-
विरोधी विचारांचे अस्तित्व
फॅसिस्टांना मान्य नव्हते. ते : समाजातील सर्व व्यक्ती वा वर्गांना एकाच चौकटीत
बांधण्याचा प्रयत्न करीत होते. विरोधकांचे अस्तित्व त्यांना धोकाची घंटी वाटत
होती. विरोधकांना नष्ट करण्यासाठी फॅसिस्ट एकपक्षीय राजवटीचे समर्थन करतात.
फॅसिस्ट पक्ष राष्ट्रहित जपणारा एकमेव पक्ष आहे असे त्यांना वाटते आणि त्यास विरोध
करणे म्हणजे राष्ट्राला विरोध करणे होय, विरोधकांचा नायनाट करणे व छळ करणे हे फॅसिझमला
नैतिकदृष्ट्या योग्य वाटत होते. सत्तेवर आल्यानंतर त्यांनी विरोधकांचा नायनाट करून
विरोधाला कायमची मूठमाती दिली. अनेक पक्ष अस्तित्वात असतील तर राज्यकारभारात गोंधळ
निर्माण होतो. राष्ट्रप्रगतीला खीळ बसते. त्यामुळे राष्ट्रविकासासाठी एकपक्षीय
शासन ते योग्य मानतात.
११. वंशिक श्रेष्ठत्व :-
अभिजनवाद आणि वंशवाद हा फॅसिस्ट
विचारधारेचा पाया मानला जातो. वंशश्रेष्ठत्वाच्या कल्पनेच्या आधारावर फॅसिस्ट
इटलीला सर्वश्रेष्ठ राज्याचा दर्जा देतात. इटलीत वास्तव्य करणारे नागरिक रोमन
वंशाचे आहेत. रोमन वंश हा जगात सर्वश्रेष्ठ वंश असल्याचा दावा ते करतात.
वंशश्रेष्ठत्वाच्या आधारावर जगावर राज्य करण्याचा आपला अधिकार आहे, असे पटवून देण्याचा प्रयत्न करतात. हीन
वंशीयांना गुलाम करण्यात काहीही चुकीचे नाही. इटलीने आपल्या शेजारीलहीन वंशाच्या
राष्ट्रावर आक्रमण जन्म ● आणि सामाजिक दर्जा इत्यादींचा विचार करता फारच थोडे लोकराज्य लायक असतात. म्हणून समाजातील श्रेष्ठ वंशात जन्माला आलेल्या नि लोकांच्या हातात सत्ता सोपविणे श्रेयस्कर असते. फैसिस्टांनी वंश आधारावर आपल्या सत्तेला वैचारिक कांदण लावण्याचा प्रयत्न
केलेला दिस
१२. एका व्यक्तीचे नेतृत्व :- सोरेलसारख्या विचारवंताच्या विधानाचा मुसोलिनी यांनी आपल्या नेतृत्वाची
अधिमान्यता बळकट केली होती. सरलत की, शंभर शेळ्यांपेक्षा एका सिंहाचे राज्य चांगले
असते. एकच नेत्यामुळे उत्तरदायित्व निश्चित होते. सामूहिक नेतृत्वात
उत्तरदायित्वाची निश्चिती नामुळे राजकीय अराजकता निर्माण होते. देशाच्या
विकासासाठी सत्तासूत्रे एकाच नेत्याकडे असणे केव्हाही श्रेयस्कर असते. एका
नेत्यामुळे देशाला स्थैर्य, शिस्त व जबाबदारी भावना निर्माण होते. लोकशाहीत सामूहिक
नेतृत्वामुळे सत्तास्पर्धा अनावश्य चर्चा आणि नेतृत्वाशी संघर्ष ह्या गोष्टी
राष्ट्रहितासाठी घातक सिद्ध होतात. फेस मते, 'एकरूपतेने जीवन संपन्न होते आणि मतभेदाने ते
कुजू लागते. सामूहिक नेतृत्व ह्या लोकशाही कल्पनेचा नायनाट करून एका व्यक्तीची
निरंकुश सत्ता प्रस्थापित करण्यासाठी मुसोलिनी यांनी नेत्याप्रती श्रद्धा निर्माण
करण्यासाठी नेतृत्वाचे दैवतीकरण करण्यावर भर दिला. नेतृत्वाच्या दैवतीकरणामुळे
लोकांच्या श्रद्धा बळकट होतील. ते एकाच नेत्यावर श्रद्धा ठेवण्यावर भर देतात.
नेत्याच्या आज्ञापालनातच भले आहे असे मानतात. राष्ट्राचा सर्वोच्च नेता कधीही चुकत
नाही; कारण हो देवाचा
पुत्र असतो. त्याच्या आज्ञा नेहमी योग्य असतात. फॅसिस्ट पक्षांनी शाळे सरकारी
कार्यालयात सर्वत्र मुसोलिनीचे फोटो लावले होते. मुसोलिनी हा देवाचा वंश आहे, तो नेहमी सत्य बोलतो असा प्रचार केला होता.
फॅसिस्टांना एका व्यक्तीचे नेतृत्व प्रस्थापित करावयाचे होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.