जागतिक सरकार वा विश्वराज्याची संकल्पना, रचना व स्वरूप आणि स्थापनेतील अडचणी वा समस्या
आज जगात सर्वत्र राष्ट्र
राज्याचे अस्तित्व आढळून येते. परंतु भविष्यात राष्ट्र राज्य ही संकल्पना
इतिहासजमा होईल. संपूर्ण जगाचे मिळून एक विश्वराज्य वा जागतिक सरकार निर्माण होईल.
जगात सुरुवातीला राज्य संकल्पनेचा विकास झाला. नंतरच्या काळात राष्ट्र राज्याची
संकल्पना उदयाला आली आणि भविष्यात राष्ट्र राज्य नष्ट होऊन विश्वराज्य निर्माण
होईल, अशी कल्पना अनेक
राज्यशास्त्रज्ञांनी मांडलेली आहे. राजकीय संघटनेचे स्वरूप हे नेहमीच मानवी गरजा
आणि वैचारिक प्रगतीवर आधारलेले असते. जशा गतकाळातील गणराज्य, साम्राज्यसारख्या संस्था
काळाच्या उदरात नष्ट झाल्या, त्याप्रमाणे राष्ट्र राज्यसुद्धा नष्ट होतील. कारण जगाकडे
पाहण्याच्या दृष्टीत बदल होत आहे. राष्ट्रापुरता विचार करणारे नागरिक दुसऱ्या देशात
आणि जगात घडणाऱ्या घटनांबद्दल रस घेऊ लागले आहेत. आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करू
लागले आहेत. राष्ट्राबद्दल विचार करणारे नागरिक आपल्या प्रेमाची आणि निष्ठेची
क्षितिजे व्यापक करू लागले. मानवतेच्या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय घटनांबाबत
विचार करू लागले. मानवी वर्तन आणि विचारात झालेला बदल हा विश्वराज्य स्थापन
करण्याचे सूचक चिन्ह मानावयास हरकत नाही. असे अनेक विचारवंतांना वाटते.
विश्वराज्यामुळे मानवी
जीवनावर होणाऱ्या सकारात्मक परिणामांची चचदिखीत अभ्यासक करतात. विश्वराज्याच्या
रचना आणि कार्याबाबत अभ्यासकांमध्ये एकमत नसले, तरी जगातील सर्व राष्ट्रांचे मिळून एक विश्वराज्य निर्माण
झाल्यास युद्धाचा प्रश्ननिकाली निघू शकतो. जगातील मानव शांततेच्या माध्यमातून आपली
प्रगती साध्य करू शकतात. प्रत्येक देश लष्कर, शस्त्रास्त्र आणि सीमा रक्षणासाठी खर्च करत असलेली विधायक
कार्यासाठी खर्च करता येईल. नैसर्गिक साधनसंपत्ती व तंत्रज्ञानाचा सर्वासाठी वापर करता येईल. अविकसित देशाचा विकसित
देशाच्या मदतीने विकास करता येईल. सर्व
राष्ट्रे जगातील सरकारच्या नियंत्रणाखाली असल्याने आपआपसांत संघर्ष होणार करता
नाही. सर्व राष्ट्र एका सार्वभौम मध्यवर्ती सत्तेकडे म्हणजे विश्वराज्याकडे
सार्वभौमत्वाचा त्याग करतील, त्यामुळे आपोआप जागतिक पातळीवरचे संघर्ष, मतभेद आणि तणाव संपुष्टात
येईल आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित होईल..
तंत्रज्ञानाचा विकास आणि युनोच्या स्थापनेमुळेदेखील विश्वराज्य स्थापनेला हातभार लागेल, असे अनेक अभ्यासकांना वाटते. दुसऱ्या महायुद्धानंतर युनोची
स्थापना झाली. जगातील बहुसंख्य देश युनोचे सदस्य झाले. युनोच्या व्यासपीठावर
राष्ट्रा राष्ट्रातील संघर्ष शांततेच्या मार्गाने सोडविण्याचा प्रयत्न केला जातो.
त्यात युनोला काही प्रमाणात यशदेखील आलेले आहे. युनोचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत
आहे. जगातील अनेक राष्ट्र प्रादेशिक पातळीवर एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झालेली
आहे. उदा. युरोपियन युनियन. भविष्यात या प्रक्रिया अधिक वेगाने आकार घेण्याची
शक्यता आहे. युनोने व्यापक स्वरूपात प्रयत्न केल्यास विश्वराज्य फारसे दूरचे
स्वप्न राहणार नाही तर ती हकिकत बनेल असे अभ्यासकांना वाटते. विज्ञान आणि
तंत्रज्ञान क्षेत्रातील क्रांतीमुळे जग जवळ येत चाललेले आहे. जगाला वैश्विक
खेड्याचे स्वरूप प्राप्त होत आहे. दळणवळण क्षेत्रातील क्रांतिकारी शोधांमुळे
भौगोलिक अंतर आणि राष्ट्रांच्या सीमांचा अडथळा गौण मुद्दा ठरला आहे. एका देशातील
नागरिकांना दुसऱ्या देशातील नागरिकांशी सहज संवाद साधणे शक्य होत आहे. त्यामुळे
सार्वभौमत्व, राष्ट्र, नागरिकत्व इत्यादी राष्ट्र राज्याशी निगडित संकल्पनांना
फारसा अर्थ राहिला नाही. हे सर्व परिवर्तन विश्वराज्याच्या निर्मितीसाठी योग्य आहे
असे अनेक अभ्यासकांना वाटते. परंतु राष्ट्रीयत्वाच्या भावनेचा वाढता प्रभाव, राष्ट्रांमधील
साम्राज्यवादी वृत्ती, राष्ट्राराष्ट्रांतील विविध बाबतीत विभिन्नता (सांस्कृतिक, आर्थिक) लक्षात घेता
सद्यःकाळात विश्वराज्य निर्माण होणे शक्य नाही, असे अनेक अभ्यासकांना वाटते. प्रा. जी. सी. फील्ड हे स्पष्ट
करतात की, 'आपण सर्व जगाचे अगर
मानवजातीचे भाग आहोत असे म्हणू शकतो, परंतु राष्ट्राचे आणि गटाचे भाग असे म्हणताना आपल्याला
जाणवणाऱ्या भावना आणि विश्वराज्याचा भाग म्हणून जाणवणाऱ्या भावना यांत
जमीन-अस्मानाचे अंतर आहे. ' याचा अर्थ विश्वराज्याविषयी आपल्या सद्भावना ह्या
मानवतावाद आणि कल्पनारम्य जगाच्या एक भाग वाटतात. वास्तवातील राजकीय संघटन वाटत
नाही. विश्वराज्याऐवजी जागतिक सरकारची कल्पना हा व्यवहार्य पर्याय ठरेल असे काही आभ्यसकांना वाटते. जागतिक सरकारमध्ये जगातील
सर्व राष्ट्रांना घटक राज्याचा दर्जा दिला जाईल. जागतिक सरकार एक मध्यवती
वा संघ स्वरूपाचे सरकार असेल.
विश्वसरकारमधील घटक राज्यांना सार्वभौम सत्ता दिली जाणार नाही, पण अंतर्गत पूर्ण
स्वायत्तता वा स्वातंत्र्य दिले जाईल. राष्ट्रीय भावना आणि वैश्विक भावनेवा समन्वय
साधता येईल राष्ट्राराष्ट्रांनी सहकार्याची भूमिका घेतली, तर भविष्यात कि सरकार
स्थापन करणे अवघड नाही. प्रा. गेटेल मानतात की, राष्ट्रवादाप्रमा दहा
आजच्या काळातील प्रमुख विचारप्रवाह आहे या विजागतिक आस्था निर्माण होत आहे. म्हणून
भविष्यात राष्ट्र राज्याच्या व विश्वराज्याची स्थापना होईल, परंतु ती नेमकी कधी होईल हे
पंजारा भविष्यकाळच आपल्याला सांगू शकेल. विश्वराज्य आणि जागतिक सरकारची संकल्पना
महत्त्वपूर्ण असली, तरी ती केव्हा प्रत्यक्षात येईल याचा निर्णय भविष्यावर सोड
ठरेल. सद्य:काळात वा नजीकच्या काळात स्थापन होण्याची शक्यता दिसून येत नाही.
विश्वराज्य वा जागतिक
सरकार-रचना व स्वरूप- विश्वराज्य आणि जागतिक सरकारची रचना व स्वरूप कशा प्रकारचे
राहील याबाबत अभ्यासकांनी विभिन्न मते व्यक्त केलेली आहेत. या मताच्या आधारावर
विश्वराज्याची रचना साधारणपणे पुढीलप्रमाणे राहील.
१. विश्वराज्य वा जागतिक
सरकार सर्वात शक्तिशाली राहील. विश्वराज्याला शक्तिशाली बनविण्यासाठी
सार्वभौमत्वाचे अधिकार दिले जातील.
३. विश्वराज्याचे स्वरूप
संघराज्याप्रमाणे असेल. मध्यवर्ती संस्था विश्वराज्याकडे असेल तर राष्ट्रांना
घटकराज्याप्रमाणे सत्ता व स्वायत्तता बहाल केली जाईल.
४. विश्वराज्याच्या
बळकटीसाठी राष्ट्रे आपले सार्वभौमत्व विश्वराज्याकडे विलीन करतील.
५. सार्वभौम सत्ता
विश्वराज्याकडे असल्यामुळे राष्ट्राराष्ट्रातील संघर्षाचे निराकरण करणे सहज शक्य
होईल.
६. विश्वराज्याकडे सार्वभौम
सत्ता असल्यामुळे राष्ट्राराष्ट्रातील सीमा प्रश्न वा इतर विवाद लवकरात लवकर
सोडविता येतील. लष्करी सत्ता विश्वराज्याकडे असल्यामुळे राष्ट्रांना
विश्वराज्याच्या आदेशाप्रमाणे वागणे भाग पडेल.
विश्वराज्याच्या स्थापनेतील
अडचणी वा समस्या: Hindrances of established of World State
"मानवातील युद्धखोर आणि
हिंसक वृत्तीचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी विश्वराज्याची कल्पना अभ्यासकांनी
मांडलेली आहे. विश्वराज्यामुळे जगातून युद्धे कायमची हदपार होतील. युद्धामुळे
मानवाची अपरिमित हानी झालेली आहे. युद्धामुळे मानवातील नैतिकता आणि मानवतेचा लोप
होतो. बदला घेण्याच्या भावनेला युद्ध चालना देत असते. विश्वराज्य प्रस्थापित झाले
तर युद्धाचा प्रश्न निकाली निघेल, म्हणून थॉमस हॉब्ज, मांगैन्थासारख्या अभ्यासकांनी विश्वराज्याची संकल्पना
मांडली होती. परंतु ही संकल्पना कितीही उदात्त व मानवी जीवनास योग्य असली तरी
प्रत्यक्षात येणे अत्यंत अवघड कार्य मानले जाते. विश्वराज्याच्या स्थापनेत पुढील
अडचणी येत असतात.
१. राष्ट्रनिष्ठेचे
अस्तित्व :- संकुचित राष्ट्रनिष्ठा वा राष्ट्रवादामुळे विश्वराज्य
निर्माण होण्यात अडथळे निर्माण झालेले आहेत. राष्ट्रनिष्ठेमुळे लोकांची निष्ठा व
प्रेम राष्ट्रापुरती मर्यादित असते. आपले राष्ट्र इतरांपेक्षा वेगळे आहे ही
राष्ट्रवादाची भावना नष्ट केल्याशिवाय विश्वराज्य निर्माण होणार नाही.
विश्वराज्यासाठी समान उद्दिष्टे असणारा समाज निर्माण करणे आवश्यक असते.
राष्ट्रवादाच्या उपस्थितीत असा समाज निर्माण करणे जवळपास अशक्य आहे. राष्ट्रनिष्ठेचा
त्याग करून नागरिक विश्वराज्यास अर्पण करण्यास तयार होणार नाहीत.
२. राष्ट्रांचे
सार्वभौमत्व :- अंतर्गत कारभारात सर्वश्रेष्ठत्व आणि बाह्य नियंत्रणापासून
मुक्त अशी सार्वभौम राष्ट्रे युनोची सभासद असली, तरी आपले सार्वभौमत्व
मर्यादित करायला तयार नाहीत. राष्ट्रे स्वार्थासाठी आरोप-प्रत्यारोप व युद्धाचा
वापर करतात. राष्ट्रहिताच्या आधारावर परराष्ट्र धोरण ठरवतात. राष्ट्रहित
संकल्पनेमुळे विश्वराज्य होऊ शकत नाही. राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचे अस्तित्व
असेपर्यंत विश्वराज्य हे कल्पनारम्य स्वप्न राहील. राष्ट्रे आपले सार्वभौमत्व
सोडण्यास तयार नसल्यामुळे नजीकच्या भविष्यकाळात विश्वराज्य स्थापन होण्याची शक्यता
दिसून येत नाही.
३. युनोचे अपयश :- जागतिक शांततेसाठी युनोची
स्थापना झालेली असली तरी युनोतील पाच बडचा राष्ट्रांना व्हेटोचा अधिकार आहे. ते
स्वार्थासाठी नकाराधिकाराचा वापर करतात. त्यामुळे अनेक प्रश्न युनोमध्ये 'जैसे थे' स्थितीत पडलेले आहेत. उदा.
काश्मीर प्रश्न. युनोजवळ स्वतःचे लष्कर नाही. त्यामुळे आक्रमक राष्ट्रांवर कारवाई
करता येत नाही. युनोच्या कायद्यामागे दंडशक्ती नसल्यामुळे ते कायदे कुणीही पाळत
नाही. युनोच्या अपयशामुळे विश्वराज्य स्थापन करणे शक्य नाही.
४. जागतिक सरकार अशक्य- अनेक कायदेशीर तांत्रिक आणि
व्यावसायिक अडचणी विश्वराज्य निर्माण करताना येणार आहेत. विश्वराज्यात
मध्यवर्ती व घटक राज्य सरकार यांत अधिकार विभागणी कोणत्या तत्त्वांच्या आधाराव
करावी याबाबत कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे उपलब्ध नाहीत. अधिकार विभागणीवरून
राष्ट्राराष्ट्रामध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे. बडी राष्ट्र जास्त अधिकारांची
माग करण्याची शक्यता आहे. अधिकार विभागणी करताना राष्ट्राराष्ट्रांत भेदभाव येईल
काय याबाबतही एकमत नसल्यामुळे, विश्वराज्य नेमके कशा स्वरूपाचे याचे चलचित्र उपलब्ध
नसल्यामुळे, विश्वराज्य ही एक फक्त कविकल्पना आहे असे अनेक अभ्यासकांना
वाटते.
५. राष्ट्राराष्ट्रातील
विभिन्नता:- जगातील विविध राष्ट्राराष्ट्रांमध्ये लोकसंख्या, भूप्रदेश साधनसामग्रीबाचत
मोठ्या प्रमाणावर विषमता वा विभिन्नता आढळून येते. काही राष्ट्र भूप्रदेश व
लोकसंख्येच्या दृष्टीने फार मोठी आहेत, तर काही अत्यंत लहान आहेत. नैसर्गिक साधनसामग्रीबाबतही
राष्ट्राराष्ट्रांमध्ये विषमता आढळून येते. काही राष्ट्रांमध्ये वाळवंट तर काही
ठिकाणी सुपीक जमीन, या विभिन्नतेमुळे राष्ट्राराष्ट्रांमध्ये आर्थिक व इतर
प्रकारची दरी निर्माण झालेली आहे. या विषय परिस्थितीतील राष्ट्रांमध्ये एकोपा कसा
निर्माण करावा हा यक्षप्रश्न आहे. राष्ट्राराष्ट्रातील विभिन्नता लक्षात घेऊन
अधिकार वाटप व दर्जा कसा निश्चित करावा यांबाबतही निश्चित मार्ग उपलब्ध नसल्यामुळे
विश्वराज्य निर्माण करता येणे शक्य नाही.
६. नेतृत्वाचा मोह :- विश्वराज्य निर्माण करताना
नेतृत्व कोणाकडे द्यावे हाही गहन प्रश्न आहे. कारण जगातील प्रत्येक राष्ट्रातील
नेते विश्वराज्याचे नेतृत्व आपल्याकडे असावे यासाठी प्रयत्न करतील. त्यामुळे
नेतृत्वावरून विश्वराज्यात एकमत होणे शक्य नाही.
७. विश्वराज्याला पोषक
वातावरण नाही:- जागतिक राजकारणातील सद्यःकालीन गटबाजी, सत्तास्पर्धा, आर्थिक नियंत्रणासाठी
चालेली चुरस पाहता विश्वराज्य निर्माण होणे सध्या तरी शक्य दिसत
नाही. जगातील काही राष्ट्रे आपल्या शक्तिसामर्थ्याचे प्रदर्शन करीत असतात. बलवान
राष्ट्र शक्तिसामर्थ्य वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रांचे उत्पादन
करीत आहेत. त्यांच्या भीतीतून इतर राष्ट्रेही शस्त्रास्त्रांची निर्मिती करतात.
त्यातून जागतिक पातळीवर शस्त्रस्पर्धेला ऊत आलेला दिसतो. त्यामुळे सद्यःकाळात
विश्वराज्याला पोषक वातावरण दिसून येत नाही.
विश्वराज्याच्या स्थापनेतील अडचणी लक्षात घेता
सद्यःकाळात विश्वराज्य निर्माण होणे ही अशक्य संकल्पना आहे. विश्वराज्य स्थापन
झाल्यास मानवी जीवनातीलअनेक समस्यांचे निराकरण होईल हा आशावाद योग्य असला, तरी त्यांच्या स्थापनेस
सद्यःकाळ पोषक नाही. परंतु भविष्यात राष्ट्राराष्ट्रांतील मतभेद व संघर्षांचे
प्रमाण कमी होऊन त्यांच्यात सहअस्तित्व आणि सहकार्याची भावना विकसित झाल्यास, विश्वराज्य वा जागतिक सरकार
स्थापन करणे अशक्य नाही एवढे मात्र निश्चितपणे सांगता येते. अर्थात हे नेमके कधी
घडेल हे निश्चित सांगता येत नाही. त्याबाबत येणारा काळ हाच उत्तर देईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.