https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

ॲडॉल्फ हिटलर आणि त्याचा उदय


 

ॲडॉल्फ हिटलर आणि त्याचा उदय- 

ॲडॉल्फ  हिटलरचा जन्म २० एप्रिल १८८९ मध्ये ऑस्ट्रिया बव्हेरिया यांच्या सीमेवर असलेल्या गावी एका सामान्य कुटुबात झाला. लहानपणी आईवडिलांचा मृत्यू झाल्याने त्यांचा सांभाळ काकाने केला. तहानपणापासून संघर्षरत जीवन जगत होता. उदरनिर्वाहासाठी विविध कामे करावी. लागत होती. पहिल्या महायुद्धात राष्ट्रप्रेमापोटी सहभागी झाला. युद्धातील चांगल्या कामगिरीमुळे 'आयर्नकास पुरस्काराने गौरविण्यात आले होते. युद्ध-समाप्तीनंतर राजकारणात सहभागी झाला. १९२० रोजी 'नॅशनल सोशॅलिस्ट जर्मन वर्कर्स पाटी (नाझी) पक्षाची स्थापना झाली. हिटलर हा नाझी पक्षाचा सातवा क्रियाशील सभासद वक्तृत्व बुद्धिमत्तेच्या जोरावर अल्प काळात नाझी पक्षाचा सर्वोच्च नेता बनला. हिटलरचे प्रचारतंत्र आणि जहाल भाषणांमुळे नाझी पक्ष दिवसेंदिवस लोकप्रिय होऊ लागला. नोव्हेंबर १९२३ मध्ये ल्युडेनडार्फच्या नेतृत्वाखाली सरकार उलथून टाकण्यासाठी हिटलरने बंड केले; पण ते यशस्वी झाले नाही. या प्रयत्नांबद्दल खटला दाखल करण्यात आला. या खटल्यात ५ वर्षांची शिक्षा झाली. या शिक्षेच्या काळात त्यांनी 'माझा संघर्ष' (Mein Kampt) आत्मचरित्र लिहिले. या आत्मचरित्रात नाझी विचारांची रूपरेखा हिटलरने मांडलेली आहे. तुरुंगातून सुटल्यानंतर क्रांतीच्या मार्गाऐवजी लोकशाही मार्गाने मता काबीज करण्याचा मार्ग अवलंबिला. आपला प्रभाव वाढविण्यासाठी पक्षाची सशस्त्र इसे (स्टॉम ट्रूप्स) निर्माण करणे, विरोधकांच्या सभा उधळून लावणे, विरोधकांचा काटा काढणे इत्यादी मार्गाचा अवलंब केला.

     १९२९ च्या जागतिक महामंदीत जर्मनीची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली. हजारो लोक बेरोजगार बनले. या परिस्थितीचा फायदा घेऊन बेरोजगारांना पक्षात मोठ्या प्रमाणावर प्रवेश दिला. महामंदीबद्दल दोस्त राष्ट्रांना जबाबदार मानले. १९३० च्या निवडणुकीत हिटलरच्या नाझी पक्षाला चांगले यश मिळाले. १९३२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत नाझी पला यश मिळाले. जर्मनीचा चॅन्सेलर हिँडेनबुर्गने हिटलरला सरकार बनविण्यास पाचारण केले; परंतु विरोधी पक्षांना मंत्रीमंडळात स्थान देण्याची अट टाकली. त्याने अट अमान्य केली. हिटलरचे सरकार सत्तेवर येऊ शकले नाही. चॅन्सलर ब्रूनिग यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले; परंतु हे सरकार दारिद्र्य, बेकारीचे प्रश्न सोडवू न शकल्यामुळे वरखास्त करून कॉन पॉपैन यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले आणि त्याही सरकारने अल्पकाळात राजीनामा दिला. १९३३ साली हिटलरच्या अटी मान्य करून चॅन्सलर हिंगेडबुर्ग यांनी हिटलरची पंतप्रधानपदी नेमणूक केली. हिटलर पतप्रधान बनल्यानंतर जर्मनीत झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत नाझी पक्षाला ४४% तर त्यांच्या मित्र पक्षाला ६१% असे दोन्ही मिळून ५०% मतदारांनी नाक्षी पक्षाला पाठिंबा दिला. दरम्यानच्या काळात जर्मन संसदेची इमारत आगीत भस्मसात झाली. या आगीचेखापर हिटलरने कम्युनिस्ट पक्षावर फोडून त्या पक्षाची मान्यता काढून घेतली. त्यानंतर •हिटलरने हळूहळू नाझी पक्षाच्या विरोधकांचे खच्चीकरण करून संपूर्ण जर्मनीची सत्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू केला. १९३४ मध्ये हिंडेनबुर्गचे निधन झाले. हिटलरने चॅन्सेलर पदाची निवडणूक न घेता कायदेमंडळाच्या परवानगीने चॅन्सेलर व पंतप्रधानपदाचे एकत्रीकरण केले आणि दोन्ही पदे स्वतःकडे घेऊन संपूर्ण जर्मनीची सत्ता आपल्या ताब्यात घेतली. जर्मनीतील सर्व विरोधी पक्षाचे समूळ उच्चाटन करून नाझी पक्ष एकमेव कायदेशीर पक्ष आहे, हे जाहीर केले. हिटलरने वायमर प्रजासत्ताक नष्ट करून एक पक्ष, एक राष्ट्र आणि एक नेता या त्रिसूत्रीचा अवलंब करून सर्व सत्ता आपल्या ताब्यात घेतली. हिटलर यांनी स्वतःला 'द फ्युरस (सर्वोच्च नेता) हे संबोधन लावून घेतले. अशा प्रकारे पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीचे पुनरुज्जीवन घडवून आणण्यासाठी एक पक्ष, एक कार्यक्रम व एक शासन या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी योग्य नेतृत्वाची नाझी पक्षाला गरज होती, तौ हिटलरच्या रूपाने पूर्ण झाली होती. हिटलरने बेधडकपणे जर्मनीच्या पुनर्वैभवाचा आराखडा तयार करून कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू केल्यामुळे त्याच्या लोकप्रियतेत वाढ झाली. लोक त्याला जर्मनीचा उद्गाता व सर्वेसर्वा मानू लागले.

     हिटलर हा प्रभावी वक्ता होता. वक्तृत्वाच्या जोरावर संपूर्ण जर्मनीवर त्याने पकड़ निर्माण केली. त्याच्या संमोहित व्यक्तिमत्त्वाने लोक भारावले गेले. त्याने अल्पकाळात विरोधकांचा नायनाट केला. तो ज्यूंचा कट्टर वैरी होता. त्यांच्या राजवटीच्या काळात ६० लाख ज्यू लोकांना यमयातना भोगाव्या लागल्या. अनेक ज्यूंना देश सोडून पलायन करावे लागले. काहींची रवानगी श्रमछावणीमध्ये करण्यात आली. काहींना गॅस चेंबरमध्ये कोंडून मारले. राष्ट्रवादाच्या जोरावर जर्मनीत मानसिक क्रांती घडवून आणली. जर्मनीच्या लोकांनी हिटलरला ‘जिझस' ही पदवी दिली. हिटलरचा सहकारी ग्लोरिंग म्हणतो की, 'हिटलर हा जर्मनीचा परममित्र आहे. तो जिथे असतो तिथे परमेश्वराचे अस्तित्व असते. तो चर्चा करीत नाही तर निर्णय घेतो, चालत नाही तर आक्रमण करतो'. जर्मनीने हिटलरच्या नेतृत्वाला उचलून धरले. त्याला विरोध करण्याची वा अडविण्याची हिंमत दाखविली नाही. परिणामत: मनमर्जीप्रमाणे तो निर्णय घेत राहिला. तो स्वत:ला जर्मनीचा भाग्यविधाता समजू लागला. आपली सत्ताकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्याने पोलंडवर हल्ला करून दुसऱ्या महायुद्धास सुरुवात करून दिली आणि महायुद्धात जर्मनीचा पराभव होणार हे दिसू लागताच स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली. स्वत:सह जर्मनीचा विनाश घडवून आणला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.