https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

नाझीवादाची मूलतत्त्वे, वैशिष्ट्ये वा तत्त्वज्ञान Philosophy of Nazism


 नाझीवादाची मूलतत्त्वेवैशिष्ट्ये वा तत्त्वज्ञान

नाझीवाद म्हणजे काय? :- नाझी शब्दाची व्युत्पत्ती मूळ जर्मन नानू-सी ओनाल आणि सोत्-सी-अलिझम शब्दांपासून झाली आहे. या शब्दांचा शब्दश: अर्थ हा समाजवाद असा होता. समाजवादाचा नाझीशी काहीही संबंध नाही. नॅशनल सोशालिस्ट वर्कर पार्टी या पक्षाच्या अद्याक्षरावरून नाझी हा शब्द तयार झालेला दिसून येतो. नाझी किंवा हिटलर विशिष्ट कार्यक्रम, मूल्य आणि तत्त्वज्ञानावर आपली श्रद्धा वा आपला विकास प्रकट करत नाही. १९३३ साली हिटलरची निवड झाल्यानंतर त्यांनी निश्चित स्वरूपाचा कार्यक्रम घोषित करण्यास नकार दिला होता. त्यांच्या मते, सर्व कार्यक्रम व्यर्थ असतात. मानवी इच्छा, श्रेष्ठ अंतदृष्टी, मानवी साहस, दृढ विश्वास आणि आंतरिक इच्छा ही निर्णायक असते. तिच्या आधारावर सर्व संकटांवर मात करता येते. नाझीवादाचे विशिष्ट असे कार्यक्रम वा तत्त्वज्ञान नव्हते. हिटलरच्या वैयक्तिक करिश्म्याच्या जोरावर नाझी पक्ष सत्तेवर बसला. नाझी पक्षाच्या कार्यक्रमावर हिटलरच्या वैयक्तिक विचारांच फार मोठा पगडा दिसून येतो. वंशश्रेष्ठत्व, लष्करीकरण, श्रेष्ठजनवाद, समष्टीवाद सर्वकषवाद, विस्तारवाद, साम्राज्यवाद इत्यादी विचारधारांशी संबंधित विचारवंतांनी मांडलेल्या विचारांतून आपल्याला अनुकूल असलेले विचार नाझींनी निवडून नाझीवादाच बांधणी केलेली आहे. मॅकियाव्हली, रूसो, नित्से, कांट, सोरेल, विल्यम जोन्स, मोस्का पेरॅटा इत्यादी विचारवंतांच्या विचारांतील सोईस्कर भाग निवडून हिटलर यांनी नाझीझमच विस्तार घडवून आणला आहे. हिटलर हा नाझीवादाचा जनक आहे. त्यांनी आपल्य माईन कॉम्त (Mein Kampf) आत्मचरित्रात व विविध ठिकाणी व्यक्त केलेल्या मतात नाझीवादाचा वैचारिक आवाका व तत्त्वज्ञानाची झलक पाहण्यास मिळते. कार्लश्मिट, एनसलर आणि आल्फेड रोझेनबर्ग इत्यादी नाझीवादी विचारवंतांच्या लेखनात वादाचे दर्शन होते.

नाझीवादाची मूलतत्त्वे, वैशिष्ट्ये वा तत्त्वज्ञान : नाझी तत्त्वज्ञानाची मांडणी हिटलरने आपले आत्मचरित्र 'माझा संघर्ष' (Mein Kampf) मध्ये केलेली आहे. हिटलर यांनी वेगवेगळ्या ठिकाणी दिलेल्या भाषणांमधून नाझीवादाच्या ध्येयधोरणांचा आणि तत्त्वज्ञानाचा परिचय होतो. अल्फ्रेड रोझेन्बर्ग, ग्लोरिंग, गोबेल्स इत्यादी हिटलरच्या सहकान्यांच्या लिखाणात नाझी तत्त्वज्ञानाची झलक पाहण्यास मिळते. हिटलर यांनी रूसो, हेगेल, नीत्शे, जॉर्ज सोरेल, काऊंटगोबिन, मुसोलिनी इत्यादी विचारवंतांच्या लेखनातील आपल्याला अनुकूल भाग उचलून नाझीवादाचा विस्तार घडवून आणला. समाजवाद आणि राष्ट्रवाद हे नाझीवादाचे सुरुवातीच्या काळातील दोन वैचारिक आधार होते. नाझींनी आपल्या ध्येयधोरणात परिस्थितीनुसार बदल केलेला दिसतो. १९३३ च्या निवडणुकीत निश्चित स्वरूपाचा कार्यक्रम घोषित करण्यास नकार दिला होता. नाझी है। संघांसाधू विचारांचे होते. नाझी नेता ड्रेस्डन यांनी १९३० साली उद्योगपतींना लिहिलेल्या पत्रात ते सांगतात की, 'आमच्या पोस्टरवरील घोषणांकडे लक्ष देऊ नका. त्यात पूंजीवादाचा नाश झाला पाहिजे, अशा आकर्षक घोषणांचा समावेश आहे. कामगाराचा पाठिंबा मिळविण्यासाठी आम्हाला उग्र समाजवादी भाषा बोलणे गरजेचे आहे. राजकीय कूटनीतीच्या गरजेपोटी आम्हाला समाजवाद स्वीकारावा लागतो. नाझी पक्षाचा प्रत्यक्षात कार्यक्रम जाहीर केलेल्या कार्यक्रमापेक्षा भिन्न स्वरूपाचा होता. नाझींनी नंतरच्या समाजवादी विचारधारेशी आपले नाते तोडलेले दिसते. आक्रमक राष्ट्रवाद, विस्तारवाद, साम्राज्यवाद, वंशश्रेष्ठत्वाला महत्त्व, एका नेत्याकडे नेतृत्व धुरा, अभिजनवाद इत्यादी संकल्पना नाझीवादाचे वैचारिक आधार मानले जातात. नाझी तत्त्वज्ञानाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे सांगता येतात.

 १. राज्याला सर्वश्रेष्ठत्व :- नाझी राज्य संकल्पनेला सर्वाधिक महत्त्व देतात. राज्याचे दैवतीकरण करण्याचा प्रयत्न करतात. नाझींच्या राज्यविषयक विचारांवर हेगेलच्या विचारांचा प्रभाव आहे. हेगेल राज्याला दैवी आविष्कार मानतो. राज्य म्हणजे पृथ्वीवरील परमेश्वराची वाटचाल होय. राष्ट्र-राज्य हा अतिमानवी शक्तीचा सर्वोच्च आविष्कार आहे. सत्ता आणि शक्तीची उपासना करणे हे राज्याचे प्रमुख लक्षण असते. नाझीवादाने राज्याला सर्वश्रेष्ठत्व बहाल केलेले असल्यामुळे व्यक्ती हा त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू नाही, तर राज्य हा केंद्रबिंदू आहे. राज्याला विरोध करण्याचा अधिकार व्यक्तीला देत नाही. राज्याचे महत्त्व वाढविण्यासाठी विविध कार्यक्रमांवर भर देतात. राज्याला दुर्बल बनविणाऱ्या विचारांना विरोध करतात. नाझींच्या मते, राज्याशिवाय काहीही नाही, राज्याबाहेर काहीही नाही आणि राज्यविरोधात काहीही असू शकत नाही. राज्य हा सर्वश्रेष्ठ समुदाय असून धर्म, कुटुंब व समाजातील सर्व संस्था राज्याच्या नियंत्रणाखाली व मार्गदर्शनाखाली कार्य करतात. व्यक्तीनेदेखील आत्मसमर्पणाच्या भावनेतून राज्याचे वैभव वाढविण्यासाठी तयार राहिले पाहिजे. राज्य हे व्यक्तीच्या दृष्टीने पूजनीय व वंदनीय आहे. हिटलरच्या मते, बहुसंख्य राष्ट्रांचे स्वरूप व त्यांचे दृष्टिकोन हे बायकी असतात. त्यामुळे बुद्धीऐवजी विचार व वर्तनावर भावनेचे राज्य असते. राज्ये भावनाशीलतेवर चालतात. याचा अर्थ सर्वसामान्य लोक भावनेच्या आधारावर चालतात. त्यांच्या भावना फारशा गुंतागुतीच्या नसतात, तर त्या बायनरी स्वरूपाच्या असतात. उदा. चांगल्या आणि वाईट भावनेच्या आधारावर राज्य करणे शक्य असते.

२. व्यक्तिस्वातंत्र्यास विरोध :- व्यक्तिस्वातंत्र्याची कल्पना नाझींना मान्य नाही. त्यांच्या दृष्टीने राज्य श्रेष्ठ आहे तर व्यक्ती दुय्यम आहे. राज्य हे साध्य आहे आणि व्यक्ती है राज्यापर्यंत पोहोचण्याचे साधन आहे. व्यक्तीने राज्यासाठी आपले सर्वस्व अर्पण केले पाहिजे. राज्याचा गौरव व आदर वाढविण्यासाठी त्याग व समर्पणाची वृत्ती ठेवली पाहिजे. राज्याचे कायदे पाळण्यातच व्यक्तीचे स्वातंत्र्य आहे. व्यक्तीने राज्यासाठी आपले जीवन समर्पित केले पाहिजे, तरच व्यक्तीचा विकास होईल. राज्य व्यक्तीसाठी नसून राज्यासाठी व्यक्ती आहे. राज्याला स्वतःचे मन, इच्छा व अस्तित्व असते आणि ते व्यक्तीच्या इच्छेपेक्षा श्रेष्ठ असते. म्हणून व्यक्तीच्या इच्छेपुढे मान झुकविण्याची राज्याला गरज नाही. हिटलरने व्यक्तिवादाचे महत्त्व नाकारून राष्ट्रासाठी त्याग करण्याची वृत्ती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी लष्करीकरण, आत्मघाती पथके, स्टॉर्म टूपर्स, विशेष पथके इत्यादी विशेष योजना राबविण्यात आल्या. या योजनांच्या माध्यमातून नाझीवादाच्या कार्यक्रमाची यशस्वीपणे अंमलबजावणी करणे हिटलरला शक्य झाले..

३. युद्धाचा पुरस्कार :- युद्ध हे नाझींचे अत्यंत आवडते क्षेत्र होते. युद्धातून पराक्रम दाखविण्याची संधी प्राप्त होते. युद्धाच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन करता येते. नाझी राजवट शक्तिसामर्थ्यला महत्त्व देणारी. नाझी सत्ता आणि सामर्थ्याला महत्त्व देत असल्याने ते युद्धाचे समर्थन करतात. डार्विनच्या सिद्धान्तानुसार, 'जो लायक असेल तोच जीवनकलहात टिकेल.' या तत्त्वाचा पुरस्कार करून हिटलर स्पष्ट शब्दांत सांगतो की, ज्याला जगावयाचे असेल त्याने लढले पाहिजे, जो लढू इच्छित नाही त्याला जगण्याचा अधिकार नाही. नाझी संघर्ष हा मानवी जीवनातील आवश्यक नियम मानतात. युद्धाला नैसर्गिक मानतात. युद्ध ही मानवी विकासाची अंतिम अवस्था आहे. युद्ध धांबविणे म्हणजे निसर्गाची क्रिया थांबविण्यासारखे आहे. युद्धखोर प्रवृत्ती वाढविण्यासाठी हिटलरने लष्करी शिक्षण सक्तीचे केले. अभ्यासक्रमात युद्ध-शिक्षणाला महत्त्व दिले. विद्यापीठाचे काम शास्त्र शिकवणे नसून लष्करी पराक्रम शिकविण्याचे काम करावे असे त्याला वाटे. नाझींनी युद्धाचे समर्थन करून आक्रमक राष्ट्रवाद व साम्राज्यवादी विचारांची पायाभरणी केली.

 ४.वंश श्रेष्ठत्वाचा पुरस्कार :- वंशाच्या आधारावर मानवाच्या कर्तृत्वाचे मूल्यमापन करण्याचा प्रयत्न जर्मन मानववंशशास्त्रज्ञ काऊंटगोबिनो यांनी केला होता. आपल्या सिद्धान्ताच्या आधारावर जगात प्रगत संस्कृती निर्माण करण्यात आर्य वंशाचा सर्वाधिक असल्याने वंश श्रेष्ठ आहे असा दावा त्यांनी केला होता. त्यांच्या वंशश्रेष्ठत्वाच्या सिद्धान्तानुसार वंश आणि वंश यांच्यात सातत्याने संघर्ष सुरू असतो. संघर्षात वंशाचा विजय होतो कनिष्ठ होन वशाचा पराभव या संघर्षातून मानवी विकासाला चालना मिळत असते. व वर्णात ट्यूटॉन गोबिनोच्या सिद्धान्ताचा आधार घेऊन नाझींनी आपल्या वंशश्रेष्ठत्वाच्या सिद्धान्ताचा विस्तार केलेला दिसतो. गोबिनोच्या सिद्धान्ताचा जर्मनी युरोपिय पडला होता. जर्मनीत हिटलरच्या आधीपासूनच आर्यन आर्यन भाषा आणि संस्कृतीबद्दल श्रेष्ठत्वाचे विचार मांडले होते. नाझींनी गोबिनोच्या सिद्धान्ताचा आधार घेऊन स्वतःला आर्यवंशीय असल्याचे जाहीर हिटरलने वंशश्रेष्ठत्वाच्या सिद्धान्ताला शत्रू-अस्तित्वाची जोड दिली. हिटलर वंश घटकाच्या आधारावर मानवाचे श्रेष्ठत्व मोजण्यावर भर देत असे. हिटलर सांगतो की, जगाच्या कल्याणाला विकासाला हातभार लावणाऱ्या आर्यवंशाला टिकविणे व त्यांचे संवर्धन करणे हे जर्मनीचे परमकर्तव्य वंश रक्तातून प्रवाहित होतो. म्हणून रक्त शुद्ध महत्त्वाचे आर्य वंशीयांचा देश शुद्ध आर्यवंशातील नार्डिक वंशातले लोक जर्मनी, नावें, इंग्लंड आणि अमेरिकेत राष्ट्रनिष्ठेचा त्याग करून वंशनिष्ठा आणि राज्य करावे असे सांगतो. जर्मनीत राहणाऱ्या नॉर्डिक वंश आणि जगावर करण्याचा नैतिक अधिकार आपोआप प्राप्त होता. परमेश्वरानेच अधिकार नार्डिक वंशाला दिलेला आहे. नॉडिक शुद्ध राहण्यासाठी इतर वंशीयांशी विवाह करण्यास हिटलरने बंदी घातली होती. वंशवादी तत्त्वज्ञानाला वैचारिक चौकट निर्माण करण्यासाठी आल्फ्रेड रोझेन्बर्ग या तत्त्वज्ञानाने हिटलरच्या आदेशाने पुस्तक लिहिले होते. आर्यवंशाचे श्रेष्ठत्व प्रदर्शित करण्यासाठी स्वस्तिक आर्यवंशाचे चिन्ह पक्षचिन्ह म्हणून स्वीकारले

 ५. ज्यूंचा द्वेष -हिटलरने 'माईन काम्फ' पुस्तकात आर्य ज्यू वंशीयांची तुलना ज्यू जर्मनीसाठी अत्यंत घातक आहेत, केलेल्या विश्वासघातामुळे पहिल्या महायुद्धात पराभव झाला होता. जर्मनीच्या जबाबदार आहेत, हिटलर मानत असे. जर्मन आर्य होणे अशक्य पण युद्धाच्या शेवटच्या टप्प्यात ज्यूनी जर्मन सैन्याच्या पाठीत खंजीर खुपसल्याने जर्मनीचा पराभव झाला. खापर फोडून त्यांच्याबद्दल द्वेष निर्माण केला. हिटलरच्या मते, जर्मन आर्य वंश हा सर्वश्रेष्ठ आहे. त्याला आजवर दडपण्याचे प्रयत्न झाले. त्यात सर्वाधिक पुढाकार ज्यूचा होता. त्यांनी जर्मनीला पंगू बनविले. ज्यू ही अत्यंत घातकी, क्रूर, धूर्त आणि लबाड जमात आहे. त्यांना ठेचलेच पाहिजे, तर जर्मनी सामर्थ्यशाली बनेल. हिटलरच्या मते, ज्यू म्हणजे राष्ट्रपुरुषाच्या शरीराला चिकटलेले बळू आहेत. सत्तेवर आल्यानंतर त्याने ज्यूवर प्रचंड अन्याय व अत्याचार केले हिटलर सत्तेवर आल्यानंतर १९३३ साली गोअरिंगच्या नेतृत्वाखाली नाझींनी स्टॉर्म टूपर्स निर्माण करून ज्यूंचा नायनाट करण्याचा प्रयत्न केला. अनेक ज्यूंना गॅसचेंबरमध्ये कोंडून मारण्यात आले. अनेकांना श्रमछावणीत राहावे लागले. भीतीपोटी अनेकांनी जर्मनीतून पलायन केले. नाझींच्या ताब्यात असलेल्या प्रदेशातील ६० लाख ज्यू लोकांना हिटलरने यमयातना दिल्या होत्या. ज्यूंना सरकारी नोकरीतून कमी करण्यात आले. शाळा व महाविद्यालयांतून काढून टाकण्यात आले. जर्मन व्यक्तीशी विवाह करण्यास ज्यूंना बंदी घालण्यात आली. वारसा हक्क नाकारण्यात आला. उंची कपड़े घालण्यावर निर्बंध लादण्यात आले. या निर्बंधांचा अनेक महान लोकांना सामना करावा लागला होता. अल्बर्ट आईनस्टाईनसारख्या जगप्रसिद्ध शास्त्रज्ञालादेखील ज्यू असल्यामुळे देशत्याग करावा लागला होता. जर्मनीतील ज्यू समाज हा कर्तबगार व कार्यक्षम होता. जर्मनीतील बहुसंख्य उद्योगधंद्यावर त्यांची मालकी होती. राजकीय क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. त्या समाजाचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी वंशश्रेष्ठत्व व ज्यू द्वेषाच्या संकल्पनेला आपल्या तत्त्वज्ञानात मध्यवर्ती स्थान दिले. बुद्धिवान ज्यूंचे अस्तित्व नष्ट करण्यासाठी नाझींनी त्यांना शत्रू ठरवून नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

 ६. स्त्रियांबाबत प्रतिगामी वृत्ती :- स्त्रियांबाबत नाझींचे विचार प्रतिगामी स्वरूपाचे होते. स्त्रियांना ते लोकसंख्यावाढीचे साधन मानतात. स्त्रियांनी चूल आणि मूल ह्या पारंपरिक कार्यक्षेत्रात कार्य करणे त्यांना अपेक्षित होते. नाझी विचारवंत फॉन पापेन यांच्या मते. मुलांना जन्मास घालणे हे स्त्रियांचे प्रमुख कार्य आहे आणि मुलाचे उज्ज्वल भवितव्य घडविण्यासाठी पुरुषांनी युद्धभूमीवर लढले पाहिजे. मातृत्व स्त्रीजन्माचे सार आहे असे नाझीला वाटते. मातृत्वाची जबाबदारी सार्थकतेने पार पाडण्यासाठी स्त्रियांच्या मानसिक व शारीरिक शिक्षण देण्यावर भर देतात. युद्धखोर वृत्तीला उत्तेजन देण्यासाठी नाझी सांगतात की, मुलगा रणांगणावर जातो, तो क्षण आईच्या आयुष्यातील सर्वश्रेष्ठ क्षण असतो. स्त्रियांकडे ते लोकसंख्यावाढीचे साधन म्हणून पाहतात. हिटलरच्या काळात नॉर्डिक वंशाची लोकसंख्या वाढविण्यासाठी कुटुंब कल्याणावर बंदी लादली होती. मोठ्या कुटुंबांना शिष्यवृत्त्या सुरू केल्या होत्या. शारीरिकदृष्ट्या स्त्रिया कमजोर असल्यामुळे नाझी त्यांना लष्करीदृष्ट्या अयोग्य मानतात. थोडक्यात स्त्रियांच्याविषयी नाझींच्या कल्पना प्रतिगामीत्वाच्या निदर्शक होत्या. स्त्रियांच्या पारंपरिक भूमिकांची तरफदारी करून नाझींनी त्यांच्या विकासाचा मार्ग बंद केला आणि त्यांनी निमूटपणे पारंपरिक भूमिकेत शिरावे, म्हणून त्या भूमिकांचे गौरवीकरण वा प्रतीकीकरण करण्याचा प्रयत्न केला. 

७. प्रखर व आक्रमक राष्ट्रवादाचे समर्थन :- नाझींच्या राष्ट्रवादावर नीत्यशेच्या विचारांचा प्रभाव आहे. नीत्शेच्या आक्रमक राष्ट्रवादी भूमिकेनुसार नाझी सांगतात की, राष्ट्र हे सर्वश्रेष्ठ आहे. राष्ट्राशिवाय व्यक्तिजीवनाला काहीही अस्तित्व नाही. राष्ट्रासाठी व्यक्ती आहे. म्हणून व्यक्तीने राष्ट्र प्रगतीसाठी सर्वस्व अर्पण करण्याची तयारी ठेवली पाहिजे. राज्याच्या प्रगतीत व्यक्तीची प्रगती सामावलेली आहे. व्यक्तींनी अधिकाराची मागणी न करता कर्तव्यपालनावर भर द्यावा. राष्ट्र हे परमेश्वराचे प्रतिरूप आहे. राष्ट्राची प्रगती हे मानवी जीवनाचे प्रमुख ध्येय असल्यामुळे, हे ध्येय साध्य करण्यासाठी कोणत्याही मार्गाचा अवलंब करण्यास हरकत नाही. लोकांना राष्ट्रवादी बनविण्यासाठी हिटलरने राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, राष्ट्रीय स्मारके, लष्करी गणवेष, लष्करी कवायत, लाकरी संचलने इत्यादींचा पुरेपूर वापर केला. इतिहासातील प्रतीकांना नवा अर्थ टेऊन राष्ट्रगौरव वाढविण्याचा प्रयत्न केला. आपल्या वक्तृत्वात सातत्याने राष्ट्र जागराला महत्त्व दिले. राष्ट्र-उन्नती हे माझ्या जीवनाचा अंतिम ध्येय आहे असे हिटलर म्हणत असे. नाझींनी प्रखर व आक्रमक राष्ट्रवादाच्या जोरावर जर्मनीत मानसिक क्रांती घडवून आणली.

 ८. एक चालकत्वाला महत्त्व :- एक पक्ष, एक कार्यक्रम, एक शासन आणि एक नेता हो नाझींच्या तत्त्वज्ञानातील प्रमुख चतुःसूत्री होती. लोकशाहीतील अनेक पक्षपद्धती, विरोधी मतांचा आदर, चर्चा व विचारविनिमय आणि निवडणुका ह्या मार्गांमुळेच जर्मनीचा सत्यानाश झाला असे नाझींना वाटते. हिटलरने सत्तेवर आल्यानंतर इतर सर्व पक्षांवर बंदी लादली. नाझी हा एकमेव पक्ष जर्मनीत राहील अशी घोषणा केली. नाझी राज्य आणि पक्ष यांत भेद करत नाही. राज्य हाच पक्ष आणि पक्ष हेच राज्य ही त्यांची घोषणा आहे. पक्षाला राज्य आणि समाज यांतील मधला दुवा मानतात. राज्यात एकच पक्ष राहू शकतो, हा दावा करतात. नाझी पक्षाच्या ध्वजाला राष्ट्रध्वज म्हणून मान्यता दिली. सर्व सत्ता नाझी पक्षाच्या हातात केंद्रित करण्यासाठी सत्तेवर आल्यानंतर सर्व प्रांतिक सरकारे बरखास्त केली. निवडणुकांऐवजी नेमणुकांचा मार्ग अवलंबून सर्व महत्त्वाच्या पदांवर नाझी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक केली. लोकशाहीतील सामूहिक नेतृत्व संकल्पना नाझी अमान्य करतात. सामूहिक नेतृत्वामुळे सत्तास्पर्धा, मतभेद, गटबाजीला उधाण येते. राष्ट्रहिताकडे दुर्लक्ष होते. नाझींनी एक चालकत्व वा एकाच नेत्याच्या हातात सत्तासूत्रे देण्यासाठी नेतृत्वाचे दैवीकरण केले, नेता व जनता यांचे संबंध गूढ तसेच बुद्धिवाद विरोधी असतात. रक्तसंबंधाने बांधलेला असतो. लोकांकडून त्याला शक्ती मिळालेली असते. नेत्याला चांगल्या-वाईटाची जाण असते. नेता विद्वान असण्याची गरज नसते. त्याला मानसशास्त्र आणि वक्तृत्वाची कला अवगत असली पाहिजे. जगाचा इतिहास अल्पसंख्याक लोकांनी घडवलेला आहे. लोकांनी एकाच नेत्यावर विश्वास ठेवला पाहिजे. त्यांच्या आज्ञेचे निमूटपणे पालन केले पाहिजे. हिटरल स्वतःला जर्मनीचा जिझस समजत असे. हिटलर कधीही चुकत नाही, तो देवाचा पुत्र आहे. त्याचे आदेश पाळण्यात समाजाचे कल्याण आहे. हिटलरशिवाय जर्मनीला पर्याय असे वैचारिक आभास निर्माण करून नाझींनी हिटलरचे नेतृत्व प्रस्थापित केले. 

९. प्रभावी प्रचारतंत्राचा पुरस्कार :- हिटलरच्या मते, पहिल्या महायुद्धकाळात ब्रिटिशांनी जर्मनीची क्रूर, हूण अशी प्रतिमा निर्माण केली. त्यामुळे जर्मनीचे मानसिकदृष्ट्या खच्चीकरण झाले. आपण पहिल्या महायुद्धातील प्रचारतंत्रापासून धडा घेऊन प्रभावी प्रचारतंत्र राबविले पाहिजे. प्रचारतंत्राचा उपयोग सामान्यांचे लक्ष आकर्षित करण्यासाठी केला पाहिजे. हिटलरच्या मते, प्रोपगंडा वा प्रचार लोकांच्या विवेकबुद्धी वा तर्कशक्तीला नव्हे, तर भावनांना भावला पाहिजे. त्यासाठी तो लोकप्रिय ढंगात सादर केला पाहिजे. त्यांची बौद्धिक पातळी फारशी उंच नको. सामान्यांची ग्रहणशक्ती कमी असते. विस्मरणशक्ती जास्त असते. प्रचारतंत्र हे मोजक्या मुद्यांपुरते मर्यादित असले पाहिजे. त्यात एकसाची प्रतिमांचा वापर केला पाहिजे. शेवटच्या माणसाला समजत नाही, तोपर्यंत आपली टिमकी वाजवत राहिले पाहिजे. एखादी घोषणा सतत लोकांच्या डोळ्यांसमोर राहील, याची काळजी घेतली पाहिजे. फिरवून फिरवून ती गोष्ट लोकांसमोर ठेवत राहावे. प्रचारात एक बाजू बरोबर असते आणि ती आपली असली पाहिजे. प्रचारात अर्धवटपणाला स्थान नसते. प्रचारातील छोटी चूकदेखील जनतेला गोंधळात पाडते. सामान्य जनतेला तर्कशुद्ध विचार करता येत नाही. हिटलरने 'बिग लाय' तंत्राचा वापर केला. हिटलरने मानसशास्त्रीय प्रचारतंत्राचा अवलंब करून जनतेचे मतपरिवर्तन घडवून आणले. हिटलरच्या मते, नेत्यांनी प्रचार अभियान व सभा शक्यतो रात्री घेतल्या पाहिजे; कारण लोक मानसिकदृष्ट्या थकलेले असतात, म्हणून त्यांची त्या काळात वैचारिक शक्ती कमी झालेली असते. नाझींनी जर्मनीला सामर्थ्यशाली राष्ट्र बनविण्यासाठी प्रभावी प्रचारतंत्राचा वापर केला. चित्रपट, शिक्षणसंस्था, वर्तमानपत्रे, आकाशवाणी, कला, शास्त्र आणि साहित्य इ. माध्यमांतून नाझींचा प्रचार करण्यात आला. मानसशास्त्रीय प्रचारतंत्राचा वापर करून जर्मनीतील जनतेत नाझीविचार रुजविण्यात हिटलर यशस्वी झाला. डॉ. गोबेल्स हे नाझींचे प्रचारमंत्री होते. त्यांच्या मते, प्रचारात सत्याचा संबंध नसतो. प्रचारात एखादी असल्य गोष्ट वांरवार सांगितल्यास ती काही काळानंतर खरी वाटू नाझींनी शिक्षणसंस्थांवर वर्चस्व प्रस्थापित करून आपल्याला अनुकूल अभ्यासक्रमाची आखणी केली. हिटलर हा कुशल मानसतज्ज्ञ होता. तो म्हणत असे की, श्रोत्याची ग्रहणशक्ती लक्षात घेऊन प्रचार कार्यक्रम आखावा. 

१०. विस्तारवाद व लष्करीकरणाचे समर्थन- नाझी ही शक्तिपूजक विचारसरणी होती ते सुद्धाला श्रेष्ठत्वाचे मोजमाप करण्याचे साधन मानतात. जगण्यासाठी लढणे भाग आहे. जो लहू इच्छित नाही त्याला जगण्याचा अधिकार नाही. युद्ध हा मानवी पराक्रमाचा परमोच्च बिंदू आहे. असे सांगून युद्धखोर व विस्तारवादी प्रवृत्तीचे ते समर्थन करतात. हिटलरच्या मते, देशाच्या सीमा नैसर्गिक नसतात. त्या मानवनिर्मित असतात. त्यात मानव बदल करू शकतो. जर्मनी वाढत्या लोकसंख्येचा देश आहे. त्यामुळे लोकांना वसविण्यासाठी जागेची गरज आहे, म्हणून इतरांवर आक्रमण करणे भाग आहे. पूर्वयुरोपातील लोक वांशिकदृष्ट्या हीन दर्जाचे असल्याने त्यांच्या साधनसंपत्तीचा विकास घडवून आणण्यासाठी त्यांच्यावर राज्य करणे जर्मनीचे वैसर्गिक कर्तव्य आहे. हिटलरने विस्तारवादाला पोषक विचारसरणी मांडून देशात सर्वत्र आक्रमकवादाचे विचार पेरले. विस्तारवादाच्या धोरणाला नैसर्गिक कार्याचा दर्जा दिला. विस्तारवादाचे ध्येय साध्य करण्यासाठी जर्मनीचे सामर्थ्य वाढविण्यावर भर दिला. सत्तेवर आल्यावर लष्करीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला. लष्करी सामर्थ्य वाढविण्यासाठी अत्याधुनिक शस्त्रास्त्रे व युद्धसामग्रीचे उत्पादन प्रचंड प्रमाणात बाढविले. संरक्षणखर्च तिपटीने वाढविण्यात आला. हिटलरने 'युथ' ही संघटना स्थापन करून तरुणांना लष्करी शिक्षणाचे धडे दिले. तरुणांमध्ये युद्धपिपासू वृत्ती आणि आक्रमकवादाचे बीजारोपण करून विस्तारवादी धोरणाचा अवलंब केला. लष्करी शिक्षण सक्तीचे केले. पोलंडवर आक्रमण करून दुसरे महायुद्ध घडवून आणले.

 ११. लोकशाही व साम्यवादाला विरोध : नाझी हे लोकशाहीचे कट्टर विरोधक होते. 'लोकशाहीच्या डबक्यात साम्यवादाचे जंतू वाढतात', अशी त्यांची धारणा होती. लोकशाहीतील बहुमत हे अडाणी व मूर्ख लोकांचे असते. एक शहाणा माणूस हा बहुमतापेक्षा श्रेष्ठ असतो. लोकशाही ही गोंधळपूर्ण आणि प्रगतीविरोधी व्यवस्था असते. तिच्यात कोणाचाच पायपोस कोणाच्या पायात नसतो. सत्तेसाठी नेत्यांमध्ये मारामारी वा गटबाजी सुरू असते. राष्ट्रहिताची कोणाला चिंता नसते. लोकशाहीप्रमाणेच नाझी साम्यवादाचे कट्टर विरोधक होते. साम्यवादामुळे माणसे कामचुकार बनतात. देशाच्या उत्पादनात घट येते. औद्योगिक क्षेत्रात अशांतता निर्माण होते. साम्यवाद खाजगी मालमत्ता नष्ट करून समतेची भाषा करतो. परंतु समता हे नैसर्गिक तत्त्व नाही. 'सक्षम असेल तोच टिकेल' हा नियमांचा नियम आहे. साम्यवादी विचारधारा निसर्गाच्या विरोधी आहे. हिटलरने साम्यवादाच्य विरोधात प्रभावी प्रचारतंत्र राबविले. जर्मनीला साम्यवादापासून वाचविणारा एकमेव नेता मी आहे, असा दावा त्याने केला. त्यामुळे भांडवलदार आणि जमीनदारांच पाठिंबा हिटलरला मिळाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.