नाझीझम (Nazism)- पहिल्या महायुद्धानंतर युरोपखंडात निर्माण
झालेल्या सर्वकष सत्तावादी विचारसरणीत सर्वांत आक्रमक विचारधारा नाझीझम मानली
जाते. इटलीतील फॅसिझम आणि जर्मनीतील नाझीझम विचारसरणींची मूलतत्त्वे आणि तत्त्वज्ञानातील
साम्यता लक्षात घेता, नाझीझम ही फॅसिझमची सुधारित आवृत्ती वा जर्मन आवृत्ती आहे
असे मानले जाते. नाझीझम विचारप्रणालीवर फॅसिझमचा व्यापक प्रभाव असला, तरी ही विचारधारा अतिशय आक्रमक, मूलगामी वा जहाल प्रवृत्तीची आहे. आक्रमकतेच्या
जोरावर नाझीवादाने आपला राजकीय दबदबा निर्माण केला. १९३३ ते १९४५ हा नाझीझमचा
उत्कर्ष काळ मानला जातो. दुसऱ्या महायुद्धातील जर्मनीच्या पराभवाने नाझीझमचे
अस्तित्व नष्ट झाले.
नाझीवादाच्या उदयाची कारणे : पहिल्या महायुद्धानंतर युरोपच्या राजकारणात
घडलेल्या घडामोडीच्या परिणाम आणि प्रतिक्रियांतून नाझीवादाच्या उदयाला पोषक
पार्श्वभूमी तयार होत गेली. पहिल्या महायुद्धात इंग्लंड आणि फ्रान्स या मित्र
राष्ट्रांना विजय मिळाला. जर्मनी पराभूत झाला. पराभूत जर्मनीला नष्ट करण्यासाठी वा
दुर्बल करण्यासाठी आखलेल्या रणनीतीतून हिटलरच्या उदयाला पूरक वातावरण निर्माण
झाले. महायुद्धानंतर जर्मनीवर अत्यंत अपमानास्पद अटी लादण्यात आला. जर्मनीची
कोणतीही बाजू ऐकून न घेता एकतफी व्हसायचा तह लादण्यात आला. पहिले महायुद्ध घडवून
आणण्यास जर्मनीला जबाबदार मानण्यात आले. महायुद्धाचा खर्च जर्मनीकडून वसूल
करण्याची बनविण्यात आली. जर्मन जनतेची मानसिकता लक्षात न घेता वायमर प्रजासत्ताक
निर्माण करून जर्मन जनतेवर संसदीय लोकशाही लादण्यात आली. नाझीझम उदयाला व्यूहरचना
पुढील कारणे कारणीभूत मानली जातात.
१. ऐतिहासिक पार्श्वभूमी : जर्मनीची भूमी ही सर्वकष
सत्तावादासाठी नंदनवन मानली जाते. सर्वकष सत्तावादी विचारांची परंपरा जर्मनीला
पूर्वापार काळापासून मिळालेली आढळते. उदा. हेगेल, कांट, नित्शे. पहिल्या महायुद्धाच्या
आधी जर्मनीची कैंसर घराण्याची राजवट सर्वकष सत्तावादाला महत्त्व देणारी होती,
जर्मनीच्या एकीकरणाचे शिल्पकार बिस्मार्क आणि एकीकरणानंतर निर्माण
झालेल्या पार्लमेंट (सैकड राईश स्टॅग) मधील बहुसंख्य सदस्य सर्वकष सत्तावादी
विचारधारेशी जवळीक ठेवणारे होते. लोकशाही विचारांना जर्मनीच्या भूमीत फारसे स्थान
नव्हते. जर्मनीत लोकशाहीला अनुकूल वातावरण नसतानाही दोस्त राष्ट्रांनी पहिल्या
महायुद्धानंतर वायमर प्रजासत्ताकाची स्थापना करून लोकशाही रुजविण्याचा प्रयत्न
केला. सर्वकषशाहीला अनुकूल वातावरणात लोकशाहीची व्यवस्था यशस्वी होऊ शकली नाही.
महायुद्धानंतर निर्माण झालेले प्रश्न सोडविणे लोकशाही शासनाच्या आवाक्यापलीकडची
गोष्ट ठरली. लोकशाहीच्या अपयशामुळे हिटलरच्या उदयाला योग्य वातावरण विकसित होत
गेले. जनता समस्याग्रस्त असताना राज्यकर्ते सत्तास्पर्धा, गटबाजी
आणि राजकारणात दंग होते. चाणाक्ष हिटलरने जर्मन जनतेची नाडी ओळखून लोकरंजनवादी
कार्यक्रम जनतेसमोर मांडले. समर्थ नेतृत्व देण्याचा विश्वास प्रकट केला. आपल्या
नेतृत्वाला राष्ट्रवादाची झूल चढविली. जनतेने प्रभावित होऊन हिटलरला पाठिंबा दिला.
२. पहिले महायुद्ध : नाझीझमच्या उदयाला पहिल्या
महायुद्धातील जर्मनीचा पराभव कारणीभूत मानला जातो. पहिल्या महायुद्धातील
जर्मनीच्या पराभवामुळे दोस्त राष्ट्रांनावरचढ होण्याची संधी प्राप्त झाली. या
संधीचा पुरेपूर फायदा मित्र राष्ट्रांनी उचलला महायुद्ध समाप्तीनंतर फ्रान्सच्या
पॅरिसमधील व्हर्साय उपनगरात बोलविलेल्या परिषदे जर्मनीला नेस्तनाबूत करण्याची
रणनीती आखण्यात आली. फ्रान्स आणि जर्मनीचे पुरातन वैर लक्षात घेऊन फ्रान्सचे
तत्कालीन पंतप्रधान क्लॅमेन्सो यांनी जर्मनीचे भद कमी करण्यासाठी जर्मनीचा न्हास
घडवून आणणाऱ्या अटी लादण्यावर भर दिला इंग्लंडचे पंतप्रधान लॉईड जॉर्ज जर्मनीचे
विरोधक होते. त्यांनी राजा विल्यम कैसरला फाशी द्यावी व जर्मनीवर युद्धखंडणी
लादावी यांवर जोर दिला. मित्र राष्ट्रात इंग्लंड आणि फ्रान्स ही प्रभावी राष्ट्रे
होती. युद्ध जिंकण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. अमेरिकेचे अध्यक्ष वुड्रो
विल्सन यांच्या जर्मनीविषयीच्या सहानुभूतीपूर्वक धोरणाचा फारसा प्रभाव पडला नाही.
परिषदेने जर्मनीला महायुद्ध घडवून आणण्याबद्दल जबाबदार मानून युद्ध भरपाई म्हणून
युद्धखडणी वसूल करण्याचा निर्णय घेतला. जर्मनीचे जास्तीत जास्त नुकसान होऊन तो देश
आर्थिक, राजकीयदृष्ट्या रसातळाला जाईल अशा अटी लादण्यात आल्या. जर्मनीशी चर्चा न
करता आणि संमती न घेता तहाच्या अटी लादण्यात आल्या. जर्मनीच्या वकिलाला अपमानास्पद
वागणूक देण्यात आली. या घटनांचा जर्मन जनतेवर विपरीत परिणाम झाला. जनतेत मित्र
राष्ट्रांविषयी संतापाची लाट पसरली. मित्र राष्ट्रांनी आपली फसवणूक केली. या
फसवणुकीचा बदला घेता पाहिजे ही भावना जनतेत तीव्रतेने निर्माण होऊ लागली जनतेच्या
मनातील भाव ओळखून हिटलरने प्रचार-यंत्रणा राबविली. मित्र राष्ट्रांविषयीच्या
असंतोषाला राष्ट्रवादाची जोड देऊन जनतेतील बदल्याची भावना तेवत ठेवली.
३. व्हर्सायचा तह : पहिल्या महायुद्धात जर्मनीत प्रचंड
मनुष्यहानी व वित्तहानी झाली होती. परंतु जर्मनीच्या हानीबद्दल सहानुभूतीपूर्वक
विचार न करता, महायुद्ध
घडवून आणल्याबद्दल जर्मनीस जबाबदार मानून व्हर्सायचा तह जर्मनीवर लादण्यात आला. या
तहाच्या अटी अत्यंत कठोर स्वरूपाच्या होत्या. जर्मनीवर साडेपाच अब्ज डॉलर
युद्धखंडणी लादण्यात आली आणि टप्प्याटप्प्याने ती द्यावी हे कबूल करून घेण्यात
आले. न्हाईन लॅन्ड प्रदेशाचे निमलष्करीकरण करण्यात आले. लष्कराची मर्यादा एक
लाखपर्यंत करण्यात आली. सक्तीचे लष्करी शिक्षण बंद करण्यात आले. शाले नष्ट करण्यात
आली वा त्यांच्या संख्येवर नियंत्रण लादण्यात आले. लष्करावर मित्र राष्ट्रांचे
नियंत्रण प्रस्थापित केले. नाविक दलावर नियंत्रण प्रस्थापित करण्यात आल कील कालवा
सर्व राष्ट्रांच्या वापरासाठी खुला करण्यात आला. जर्मनीच्या लष्करी शक्तीला कमजोर
करण्यात आले. जेणे करून भविष्यात जर्मनी हिंमत करणार नाही. ऑल्सेन्स-लॉरन्स आणि
सारखोरे फ्रान्सला देण्यात आले. वसाहती मित्र राष्ट्रांनी आपसात वाटून घेतल्या.
खंडणी वसुलीसाठी कठोर मार्गाचा अवलंब करण्यात आला. जर्मनीच्या कोणत्याही विनंतीला
भीक घालायची नाही, फ्रान्ससारखा देश तर जर्मनीचा अपमान करण्याची
कोणतीही संधी सोडत नव्हता. संधी मिळेल तेव्हा जर्मनीचा अपमान करत असे.
व्हर्सायच्या तहातील अपमानास्पद अटी आणि जर्मनीला नष्ट करण्याच्या मित्र
राष्ट्रांच्या धोरणामुळे जर्मनीत निराशा आणि असंतोषाचे वातावरण होते. हिटलर यांनी
व्हर्सायच्या तहाला विरोध केला. व्हर्सायचा तह रद्द करण्यासाठी मला सत्ता द्या,
असा प्रचार सुरू केला. व्हर्सायच्या तहाविरोधातील जनमत लक्षात घेता,
जनतेने हिटलर नेतृत्वाला आपला पाठिंबा दिला. लोकशाही मार्गाने हिटलर
सत्तेवर आला.
४. बिकट आर्थिक परिस्थिती : पहिल्या महायुद्धानंतर लादलेली
प्रचंड युद्धखडणी, समृद्ध भाग व वसाहती मित्र राष्ट्रांच्या ताब्यात गेल्यामुळे जर्मनीच्या
उद्योगधंद्याचा पाया ढासळला. दोस्त राष्ट्रांनी जर्मनीची आर्थिक नाकेबंदी
केल्यामुळे कच्चा माल आणि भांडवल मिळणे बंद झाले. परिणामत: अनेक उद्योगधंदे बंद
पडले. व्यापाऱ्यांनी नफा मिळविण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंची कृत्रिम टंचाई निर्माण
केली. वाढत्या महागाईमुळे चलन फुगवटा वाढला. वस्तूंच्या किंमती अनेक पटींनी
वाढल्या. वाढत्या महागाईमुळे जनतेची क्रयशक्ती घसरू लागली. सरकारने परिस्थितीत
सुधारणा करण्यासाठी कराचे प्रमाण वाढविले. डॉस योजनेखाली कर्ज काढून अनावश्यक
कामांवर कर्जाचा वापर करून देशाचे दिवाळे काढले. युद्धखंडणी आणि कर्जफेडीच्या
बोज्याखाली जर्मनीची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली. देशातील परकीय गंगाजळी समाप्त
होऊन देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा होता. १९२९ च्या जागतिक महामंदीने जर्मनीची
अर्थव्यवस्था अखेरच्या घटका मोजू लागली. बँका, उद्योगधंदे
बंद पडल्यामुळे ६० लाख लोक बेकार झाले. आर्थिक मंदीचा फटका जर्मनीतील सर्व
वर्गांना बसला. बिकट आर्थिक परिस्थितीमुळे लोक हवालदिल बनले ना पक्षाने नाजूक
आर्थिक परिस्थितीचा फायदा उचलला. देशाचा खरा शत्रू बर्लिनमध्ये बसलेला आहे असा
प्रचार करून सत्ताधाऱ्यांविषयीचा जनतेतील रोष वाढविला जर्मनीला आर्थिकदृष्ट्या
स्थिर आणि सामर्थ्यशाली बनविण्याचे आश्वासन जनते दिले. हिटलरच्या नेतृत्वाखाली
जर्मनीची विस्कटलेली आर्थिक घडी बसेल विश्वासातून हिटलरला पाठिंबा दिला.
५. राजकीय अस्थिरता
: पहिल्या महायुद्धानंतर मित्र राष्ट्रांनी वायमर प्रजासत्ताक निर्माण करून
जर्मनीत लोकशाही निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु जर्मनीतील लोकमताचा कल
लक्षात घेता, संसदीय
लोकशाही जर्मनीला सूट होण्यासारखी नव्हती. जर्मनी दीर्घकाल सर्वकष सत्तावादी
राजवटीखाली विकसित झालेलाहोता. संसदीय लोकशाहीची पाळेमुळे खोलवर रुजली नाही.
समाजवादी, उदारवादी आणि साम्यवाद्यांमध्ये सत्तेसाठी स्पर्धा
सुरू होती. वायमर प्रजासत्ताकाच्या घटनेत अनेक परस्परविरोधी तत्त्वांचा समावेश
होता. ही घटना मित्र राष्ट्रातील घटनामधील काही भाग निवडून तयार केली होती.
जर्मनीच्या परिस्थितीचा त्यात अजिवान विचार केला नव्हता. परकीय वा विजयी
राज्यकर्त्यांनी ही घटना निर्माण केलेली असल्यामुळे तिला जनमान्यता कधीच मिळू शकली
नाही. म्हणून १९२० मध्ये हिटलर व लुडेनडार्फने वायमर प्रजासत्ताकाच्या सरकार
विरोधात बंड केले; पण ते यशस्वी झाले नाही. १९९९ ते १९३३ ह्या कालखंडात
२० मंत्रीमंडळे सत्तेवर आली आणि गेली. मंत्रीमंडळाला जनतेच्या प्रश्नाचे निराकरण
करता आले नाही.. राजकीय अस्थिरतेच्या परिस्थितीत जर्मनीतील तत्कालीन नेतृत्व बदनाम
झाले. ही अत्यंत चागली संधी हिटलर व नाझी पक्षाला मिळाली. हिटलरने राजकीय
स्थिरतेचे आश्वासन जनतेला दिले. जनतेनेदेखील हिटलरला एक संधी द्यावी म्हणून
लोकशाही मार्गांनी सत्तेवर बसविले.
६.साम्यवादाचा प्रभाव : १९१७ मध्ये रशियन राज्यक्रांतीच्या
प्रभावाने जर्मनीत साम्यवादी विचारांचे आगमन झाले. जर्मनीतील साम्यवादी पक्षाचा
प्रभाव दिवसेंदिवस वाढू लागला. साम्यवादी पक्षाने जर्मनीत कामगार क्रांती करण्याची
भाषा सुरू केली. साम्यवादाच्या वाढत्या प्रभावामुळे भांडवलदार, जमीनदार आणि मध्यवर्ग भयग्रस्त बनले.
साम्यवादाचा प्रभाव कमी करण्यासाठी भांडवलदारांनी नाझी पक्ष व हिटलरला पाठिंबा
दिला. जर्मनीला साम्यवादाच्या तडाख्यातून वाचविण्याची ताकद फक्त नाझी पक्ष व
हिटलरमध्ये आहे असा दावा त्यांनी केला. नाझी पक्ष कम्युनिस्टांचा कट्टर विरोधक
होता. भांडवलदार व मध्यवर्गीयांच्या पाठिंब्याच्या जोरावर हिटलरने अल्पकाळात
जर्मनीवर आपला प्रभाव निर्माण केला, भांडवलदारांच्या
दिलेल्या देणग्यांच्या जोरावर पक्ष-संघटन मजबूत केले. साम्यवादाला प्रतिउत्तर
देण्यासाठी राष्ट्रवादाचा वापर केला.
पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीत निर्माण झालेल्या
परिस्थितीतून नाझीवादाच्या उदयाला पोषक परिस्थिती निर्माण झाली. जर्मनीच्या हासाला
वायमर नाकातील लोकशाही सरकार रोखू शकले नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर जर्मनीची कीस
मिळाली. जनतेत नैराश्याचे वातावरण निर्माण झाले. या वातावरणात हिटलरचा उदय झाला.
हिटलर यांनी जर्मनीला पुनर्वेभव प्राप्त करून देण्याची आणि जर्मनीच्या जबाबदार
असणाऱ्या दोस्त राष्ट्राचा बदला घेण्याची भूमिका मांडल्यामुळे जनतेचा पाठिंबा त्यांना मिळाला. लोकशाही
मार्गाने हिटलरने सत्तेवर येऊन नाझीवादाचे प्राबल्य निर्माण केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.