मुस्लीम सत्यशोधक चळवळीची उद्दिष्टे-
मुस्लीम सत्यशोधक चळवळ –
मुस्लीम सत्यशोधक चळवळ ही महात्मा फुलेंचा
सत्यशोधकी वारसा पुढे नेणारी चळवळ आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय जीवनात
हिंदू आणि मुस्लिमांमध्ये मोठ्या प्रमाणावर दरी निर्माण झाली. हिंदू समाजाला
समाजप्रबोधनाचा उदात्त वारसा मिळाल्यामुळे प्रगत बनला याउलट मुस्लीम समाजात
प्रबोधनाची चळवळ न रुजल्यामुळे धर्मांधतेचे प्रमाण वाढले. हिंदू-मुस्लिमांमध्ये
निर्माण झालेली दरी दोन्ही समाजात संशय व पूर्वग्रह वाढविण्यास कारणीभूत ठरली.
मुस्लीम सत्यशोधक चळवळीच्या उदयामागे असलेले प्रमुख कारण म्हणजे हिंदू मुस्लीम
समाजातील संबंधात सुधारणा घडवून आणणे आणि मुस्लीम समाजाचे राष्ट्रीय प्रवाहात
सामिलीकरण करणे हे होते. या चळवळीच्या माध्यमातून इस्लाममधील अनिष्ट प्रथा व
परंपरेच्या विरोधात रान उठविण्याचा प्रयत्न झाला. हमीद दलवाई यांनी इस्लामच्या
परंपरागत चौकटीची चिकित्सा केली. त्यांचा हा प्रयत्न इस्लामच्या इतिहासातील
क्रांतिकारी पाऊल मानले जाते. इस्लामच्या १३०० वर्षांच्या परंपरेत इस्लामच्या
मूलभूत चौकटीला आव्हान देण्याचा प्रयत्न कुणीही केला नाही हा प्रयत्न पहिल्यांदा
हमीद दलवाई यांनी सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून केला. त्यामुळे ही चळवळ
महाराष्ट्रातील सामाजिक व राजकीय जीवनातील क्रांतिकारी व परिवर्तनवादी चळवळ ठरली.
या चळवळीने इस्लाममधील प्रस्थापित मतांना हादरा देण्याचा प्रयत्न केला. मुस्लीम
समाजात आधुनिक सुधारणावादी मतांचे बीजारोपण करण्याचा प्रयत्न केला. इस्लाममधील
धर्मगुरू व मुल्ला मौलवींनी इस्लामची चिकित्सा करू दिली नाही. इस्लाममधील तत्त्वे
परमेश्वरनिर्मित आहेत त्यात बदल करण्याचा अधिकार मानवाला नाही या परंपरागत
इस्लामच्या भूमिकेला जाहीर आव्हान हमीद दलवाई यांनी केले. महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या
प्रभावाने कुराण व शरीयत यातील कालबाह्य गोष्टींना आव्हान देण्यास सुरुवात केली.
परंपरागत चालत आलेल्या जाचक व कालबाह्य रूढी वा प्रथेमधून मुस्लीम धर्मामध्ये जी
राजकीय व सामाजिक सुधारणेची कोंडी झाली होती. ती फोडण्याचे कार्य हमीद दलवाई यांनी
केले.
मुस्लीम सत्यशोधक मंडळाची उद्दिष्टे - मुस्लीम समाजात समाजप्रबोधनाच्या उद्देशाने
हमीद दलवाई यांनी २२ मार्च १९७० ला 'मुस्लीम सत्यशोधक मंडळा'ची स्थापना केली. इस्लाम धर्म आणि इस्लामच्या
ऐतिहासिक परंपरेची शास्त्रीय पद्धतीने चिकित्सा केल्याशिवाय खरे सत्य गवसणार नाही
या जाणिवेतून त्यांनी आपले कार्य सुरू केले. इस्लामचा खरा अर्थ जनतेपर्यंत
पोहचविण्याचा प्रयत्न केला. मुस्लिमांचे हित नेमके कशात आहे हे स्पष्ट करण्याचा
प्रयत्न त्यांनी केलेला आहे. मुस्लीम सत्यशोधक समाजाची पुढील उद्दिष्टे त्यांच्या
वेबसाईटवर दिलेली आहेत. ती पुढीलप्रमाणे होत
१)
मुस्लीम महिलांवरील अन्यायाचे निर्मूलन करणे आणि त्यांना समान अधिकार मिळवून देणे.
२) मुस्लीम वैयक्तिक कायद्यात (Muslim
Personal Law) सुधारणा घडवून आणणे.
३) समान नागरी कायद्याचा आग्रह धरणे.
४) मुस्लीम समाजाला स्थानिक वा प्रादेशिक भाषेत
शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करणे. शिक्षित तरुणांना शैक्षणिक आणि व्यवसायलक्ष्यी
मार्गदर्शन मिळवून देणे.
५) समाजात सुधारणा घडवून आणण्यासाठी
मुस्लिमांमध्ये इहवादी जीवनमूल्ये व वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे,
६) भारतीय संविधानातील मूल्याप्रति आपली आस्था
प्रकट करणे,
८) समाजाला कुटुंब नियोजन, आरोग्य आणि इतर सामाजिक प्रश्नांबाबत शिक्षित
करणे.
१०) धार्मिक सणांना समाजलक्ष्यी
कृतिकार्यक्रमांचा पर्याय देणे. उदाहरणार्थ, बकरी ईदच्या दिवशी रक्तदान शिबिराचे आयोजन.
११) सुधारक संघटनांच्या सोबतीने सामाजिक
कृतिकार्यक्रमाचे आयोजन करणे.
(१२)
मुस्लिमांमध्ये बुद्धिवादी, मानवतावादी आणि उदारमतवादी विचारप्रवाह विकसित करणे.
मुस्लीम सत्यशोधक चळवळीची उद्दिष्टे लक्षात
घेतल्यास त्यांची व्यापकता लक्षात येते. व्यापक उद्दिष्टे ठेवून
इस्लामसारख्या कर्मठ आणि कट्टर धर्मात कार्य करणे सोपे काम नव्हते. परंतु, या कार्याचा विडा हमीद दलवाई आणि त्यांच्या
सहकार्यांनी उचलला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.