मुस्लीम सत्यशोधक चळवळीच्या उदयाची कारणे वा पार्श्वभूमी आणि कार्य-
हमीद दलवाई यांनी हिंदू-मुस्लिमांचा पारंपरिक जैविक संबंध आणि सौहार्दावर
आधारलेल्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाची दंगलीसारख्या असामाजिक घटनेतून कशी
वाताहत झाली हे 'इंधन' नावाच्या कादंबरीतून मांडले. या कादंबरीत मांडलेले अनुभव
महाराष्ट्रभर दै. मराठा पत्रकार म्हणून केलेल्या भ्रमंतीतून उपजले आहेत. या
अनुभवातून हिंदू मुस्लीम संबंधात सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांनी मुस्लीम
सत्यशोधक चळवळीची स्थापना केली. या चळवळीला आवश्यक पार्श्वभूमीतून उदयाला पोषक
वाताबरण निर्माण झाले. या चळवळीच्या उदयाची पुढील कारणमीमांसा केली जाते –
१) मुस्लीम समाजाचे राष्ट्रीय प्रवाहात
संम्मिलीकरण करणे- स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील
मुस्लीम समाजाच्या वर्तनात झालेला बदल हा चळवळीच्या उदयाला कारणीभूत झाला.
स्वातंत्र्यपूर्व काळात मुस्लीम समुदायाने राजकीय चळवळीत मोठ्या प्रमाणावर सहभाग
घेतला. अनेक मुस्लीम नेत्यांनी हिंदूंच्या बरोबरीने स्वातंत्र्य लढा आणि
क्रांतिकार्यात सहभाग घेतला. राष्ट्राला स्वातंत्र्य मिळविण्याच्या सोबत शपथा
घेतल्या, प्रतिज्ञा
केल्या. परंतु, स्वातंत्र्योत्तर काळात झालेल्या चळवळीत मुस्लीम समाजातील लोकांनी फारसा सहभाग
घेतला नाही. समाजाला चळवळीपासून बाजूला नेले. उदाहरणार्थ, स्वातंत्र्योत्तर काळातील संयुक्त महाराष्ट्र
चळवळ, कामगार चळवळ, शेतकरी चळवळ व महिला चळवळीत मुस्लीम समाजातील
नेते व कार्यकत्यांचा सहभाग नगण्य स्वरूपाचा आढळून येतो. या चळवळीमधील नगण्य
सहभागाचा अर्थ असा होता की मुस्लीम समुदाय अजूनही राष्ट्रीय प्रवाहात संम्मिलीत
झाला नाही. फाळणीपूर्व मानसिकतेत जगत आहे. ही मानसिकता मुस्लीमधर्मिय आणि भारतीय
राष्ट्रवादासाठी अत्यंत घातक ठरू शकते त्यानंतर मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या स्थापनेला
चालना मिळाली. मुस्लिमांच्या या वृत्तीमुळे ते राष्ट्रीय प्रवाहापासून दूर फेकले
जाण्याची वा परिघाबाहेर ढकलेले जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. सर्वसमावेशक
राष्ट्रवादाच्या निर्मितीसाठी मुस्लीम समाजाला राष्ट्रवादात सहभागी करणे नितांत
गरजेचे होते. मुस्लिमांशिवाय भारतीय राष्ट्रवादाची कल्पना अपुरी आहे. मुस्लीम
समाजाला राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी महाराष्ट्रात मुस्लीम सत्यशोधक चळवळ सुरू
करण्यात आलेली होती.
२) मुस्लीम मानसिकतेत बदल घडवून आणणे-
मुस्लीम समाजाच्या मानसिकतेत बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने मंडळाची स्थापना
करण्यात आली. भारतीय इतिहासातील संघर्ष हा हिंदू-मुस्लीम धर्मातील संघर्ष नसून
राजसत्तेमधील संघर्ष आहे हे पटवून देणे आवश्यक होते. स्वातंत्र्यपूर्व काळात
हिंदू-मुस्लीम एकतेचे अनेक प्रयत्न केले गेले परंतु या प्रयत्नाला फार मर्यादित
स्वरूपात यश मिळालेले दिसते. उदाहरणार्थ, खिलाफत चळवळ ब्रिटिश राजवटीच्या काळात 'फोडा, झोडा आणि राज्य करा.' नीतीने दोन्ही धर्मातील लोकांमध्ये वैरभाव
निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. या प्रयत्नातूनच हिंदुस्थानच्या फाळणीला पूरक
वातावरण निर्माण झाले. धर्माच्या आधारावर देशाचे दोन तुकडे झाले. परंतु, फाळणीनंतरही हिंदू मुस्लीम प्रश्न सुटला नाही.
पाकिस्तानपेक्षा जास्त मुस्लीम भारतात राहतात. हिंदू मुस्लिमांचे ऐक्य ही भारतीय
राष्ट्रवादाची आवश्यकता होऊन बसली. या दोन्ही समाजातील ऐक्याशिवाय राष्ट्रीय
एकात्मतेला बहर येणार नाही. भारताच्या विकासाच्या मार्गातील अडथळे दूर करता येणार
नाही हे सर्व घडवून आणण्यासाठी मुस्ली समाजाची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. मुस्लीम
समाज आजही इतिहास काळा वावरत आहे. स्वतःला राज्यकर्ता वर्ग समजतो. इस्लाम
राजवटीच्या पुनर्स्थापि स्वप्न काही धर्माधि मुस्लीम नेते मांडत आहेत. या
परिस्थितीत सर्वसामान्य मुस्लिमांच अडचण होत आहे. त्यांना या गैरसमाजातून बाहेर
काढून हिंदू-मुस्लीम ऐक्य निर्माण करण्यासाठी मंडळाची स्थापना करण्यात आली. भारतीय
समाजाची उभारणी धर्मांच्या आधारावर न करता लोकशाही, धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी तत्त्वाका करण्यासाठी
मंडळाची स्थापना करण्याची आवश्यकता निर्माण झाली. भारतीय राज्यघटनेतील
३) समान नागरी कायद्याची आवश्यकता- मार्गदर्शक तत्त्वातील ४४ व्या कलमात समान
नागरी कायद्याची तरतूद करण्यात आली. मार्गदर्शक तत्त्वांना न्यायालयाचे संरक्षण
नसल्याने सरकारने आजपर्यंत समा नागरी कायद्याच्या अंमलबजावणीबाबत टाळाटाळ केली.
धर्माच्या आधारावर काय निर्मितीला प्रोत्साहन दिले. हिंदू धर्मांमधील व्यक्तीसाठी
वेगळा कायदा आहे त मुस्लिमांसाठी स्वतंत्र कायदा आहे. धर्माच्या आधारावर असलेल्या
कायद्यामुळे धार्मिक तणाव आणि द्वेषाला वाव मिळतो. धर्मावर आधारलेल्या कायद्यामुळे
मुस्लीम धर्मातील स्त्रियांना अनेक प्रकारच्या अन्यायाला सामोरे जावे लागते.
उदाहरणार्थ, हिंदू स्त्रीला घटस्फोटानंतर उदरनिर्वाहासाठी पोटगी मागण्याचा अधिकार आहे.
मुस्लीम स्त्रीला (Muslim Personal Law) नुसार पोटगी मिळत नाही फक्त मेहेरची रक्कम
मिळते. धर्माच्या आधारावर आधारलेल्या व्यक्तिगत कायद्यामुळे मुस्लीम समाजाला अनेक
अडचणींना सामोरे जावे लागते. शाहबानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल
राजीव गांधी यांनी घटनादुरुस्ती करून बदलला. धर्मांच्या आधारावर संरक्षण
देण्याच्या सरकारच्या भूमिकेमुळे इतर धर्मांतील लोक नाराज झाले. धार्मिक
कायद्यामुळे मुस्लिमांच्या तुष्टीकरण वा अनुनयांच्या धोरणामुळे मुस्लिमांविषयी
अनेक गैरसमज निर्माण झाले. वैयक्तिक कायद्याच्या आधारावर मिळालेल्या
विशेषाधिकारामुळे मुस्लीम समाज टीकेचे लक्ष्य बनला. मुस्लीम सत्यशोधक चळवळीने
धर्माच्या आधारावर असलेले सर्व वैयक्तिक कायदे रद्द करून सर्व भारतीयांसाठी समान
नागरी कायद्याच्या अंमलबजावणीचा आग्रह
४) प्रादेशिक भाषेतील शिक्षणाला प्रोत्साहन- भाषा हा मानवाला जोडणारा घटक आहे. भाषेच्या
आधारावर वैचारिक देवाणघेवाण सुलभ होते. राष्ट्रउभारणीसाठी भाषा घटकाला महत्त्वाचे
स्थान असते. मुस्लीम समाजातील परंपरावादी आणि सनातनी घटक उर्दू भाषेचा अनाठायी
आग्रह धरतात. मुस्लीम मुलांनी उर्दू भाषेत शिक्षण घेतले पाहिजे अशी जबरदस्ती
करतात. मुस्लीम वस्तीत उर्दू शाळा सुरू करावी ही मुस्लीम नेत्यांची नेहमीची मागणी
असते. उर्दू भाषेच्या माध्यमातून होणारी समाजाची कोंडी लक्षात घेतली जात नाही.
उर्दू भाषा राज्यकारभाराची वा प्रशासनाची भाषा नाही. उर्दू भाषेतून शिक्षण
घेतलेल्या मुलांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होत होता. उर्दू ही भाषा ऐतिहासिक
आणि साहित्यिकदृष्ट्या श्रेष्ठ आहे. उर्दू भाषेचा विकास करण्यावर आक्षेप घेण्याचा
प्रश्नच नाही. उर्दू भाषेत शिक्षण देण्याची भूमिका अनेक प्रकारच्या अडचणी उभ्या
करते हे धर्मांध नेते लक्षात घेत नाही. धर्माचा भाषेशी संबंध जोडणे अव्यवहार्य
आहे. हिंदूधर्मिय विविध भाषा बोलतात. धर्म आणि भाषा यात जैव संबंध आढळून येत नाही.
भारतातील प्रत्येक राज्यात प्रादेशिक भाषेचे महत्त्व वाढत आहे. राज्यकारभार
प्रादेशिक भाषेत होत असताना, राष्ट्रीय भाषा हिंदी आणि आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून
इंग्रजीचे महत्त्व वाढत असताना मुस्लिमांनी उर्दू भाषेचा आग्रह धरणे योग्य नाही.
उर्दूसोबत प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय भाषेचे ज्ञान संपादन करण्याचा
प्रयत्न मुस्लीम समुदायाने करावा तर हा समुदाय जगाच्या बरोबरीने वाटचाल करू शकेल.
५) मुस्लीम समाजात प्रबोधन घडवून आणणे- भारतीय मुस्लीम राजकारण पुस्तकात हमीद दलवाई
यांनी मुस्लीम समाजाबद्दल पुढील निरीक्षण नोंदविलेले आहे. ते लिहितात की, भारतीय मुस्लिमांची अशी धारणा आहे की, त्यांचा समाज निर्दोष असून ते भारतातील इतर
समुदायांपेक्षा श्रेष्ठ आहेत. त्यांची ही धारणा काही गृहीतकांवर आधारलेली आहे.
त्यातील एक महत्त्वाचे गृहीतक असे आहे की, "इस्लाममध्ये निर्दोष समाजाची कल्पना सामावलेली
आहे, धर्मातच तशी
दृष्टी अंतर्भूत असल्याने सच्चा निर्दोष मुसलमान असण्याचा अर्थ असा होतो की, त्याला प्रगतीसाठी अधिक काही करण्याची गरजच
स्वीकारार्ह ठरत नाही." भारतीय मुस्लीम समाजाच्या मानसिकतेबद्दल हमीद दलवाई
यांनी केलेल्या कथनातून मुस्लीम समाजातील प्रबोधनाची स्थिती स्पष्ट होते.
मुस्लीमसमाज प्रबोधनकल्पनेला अजिबात महत्त्व देत नाही. परिणामतः इस्लामच्या १३००
वर्षांच्या इतिहासात समाजातील प्रबोधनाला पाठिंबा मिळू शकला नाही. मुस्लीम
समाजातील लोक प्रत्येक गोष्टींचा अर्थ धर्माच्या आधारावर लावत गेल्यामुळे समाजात
अनेक रूढी, प्रथा आणि परंपरा विकसित झाल्या. या सर्व रूढी आणि परंपरा धर्माचा भाग मानून
सर्वसामान्य मुस्लीम त्यांचे नित्यनियमाने पालन करत राहिला. तोंडी तलाक, बहुविवाह, पडदा पद्धती मुस्लीम समाज जीवनाचा एक भाग बनला.
त्यांच्या विरोधात जाणाऱ्याला धर्माचे शत्रू मानण्यात आले. वरील परिस्थितीत बदल
घडवून आणण्यासाठी मुस्लीम सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात आली. या समाजाने
मुस्लीम समाजात समाजप्रबोधनाची चळवळ सुरु करून त्यांच्या मानसिकतेत बदल घडवून
आणण्याचा संकल्प केला.
६) धर्मनिरपेक्ष वृत्तीचा प्रसार -
मुस्लीम समुदायात धर्म या घटकाला सर्वाधिक महत्त्वाचे स्थान आहे. मुस्लीम
व्यक्तीच्या जीवनविषयक सर्व कल्पनांवा धर्माचा प्रचंड प्रमाणात पगडा आहे.
सार्वजनिक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण प्रश्नांचा विचार धर्माच्या चौकटीतून करतात.
धर्माच्या प्रचंड नियंत्रणामुळे संपूर्ण समुदाय धर्माच्या अधीन बनलेला आहे. या
स्थितीचा फायदा इस्लाममधील धर्मगुरू, मुल्ला मौलवींनी उठवलेला आहे. ते धर्माच्या
आधारावर समुदायाला भडकविण्याचा प्रयत्न करतात. मुस्लीम धर्मात नसलेल्या अनेक
कल्पनांना धर्माचा भाग बनवितात. धर्माच्या आधारावर इतर धर्मियांना आपले शत्रू
मानतात. राष्ट्रावर निष्ठा व्यक्त करण्याऐवजी धर्मांवर निष्ठा व्यक्त करतात.
धर्माच्या अतिप्राबल्यामुळे मुस्लीम समुदायात अनेक रूढी, परंपरा व अंधश्रद्धा निर्माण झाल्या. मुस्लीम
समुदायावरील धर्मांचा प्रभाव कमी करण्यासाठी धर्मनिरपेक्ष वृत्तीची रुजवण करण्याची
आवश्यकता होती. मुस्लीम सत्यशोधक समाजाने धर्मनिरपेक्ष तत्त्वाला आपल्या
विचारसरणीत महत्त्वपूर्ण स्थान दिले. मुस्लीम समाजात धर्मनिरपेक्ष वृत्ती निर्माण
करण्याचा प्रयत्न केला. धर्मनिरपेक्षता धर्म आणि राजकारणाची फारकत करते. धर्म आणि
राजकारणात तात्त्विक अंतर निर्माण करते. धर्मनिरपेक्षता धर्म नाकारात नाही.
वैयक्तिक जीवनात धर्माचरणाला। मान्यता देते. धार्मिक स्वातंत्र्य बहाल करते.
धर्मामध्ये सुधारणा करण्यासाठी राज्याला हस्तक्षेप करण्याचा अधिकारदेखील देते.
धर्मनिरपेक्ष वृत्ती निर्माण केल्याशिवाय मुस्लीम समाजातील परंपरेचे प्राबल्य कमी
होणार नाही हे मंडळ जाणून होते.
८) लोकसंख्या नियंत्रणाचा प्रयत्न- भारतात लोकसंख्या वाढीचा सर्वाधिकवाढता दर
मुस्लीम समाजात आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे समाजातील दारिद्र्य आणि बेरोजगारीत
सातत्याने वाढ होत आहे. कुटुंब नियोजन आणि धर्म यांचा एकमेकांशी काहीही संबंध
नाही. अनेक मुस्लीम देशांमध्ये कुटुंबनियोजला मान्यता आहे. परंतु, भारतातील काही धर्मांध आणि सनातनी मुस्लीम
धर्माच्या आधारावर कुटुंब नियोजनाला विरोध करतात. इस्लामला कुटुंब नियोजन मान्य
नाही हा प्रचार करतात. 'संतान ही अल्लाची देणगी आहे' असा प्रचार करतात. परिणामतः इस्लाम समाजात
मुला-मुलींची संख्या अमर्याद प्रमाणात वाढलेली आहे. वाढत्या कुटुंबामुळे सर्व
सदस्यांच्या गरजा पूर्ण करणे शक्य नसल्यामुळे लहान मुलांचे शिक्षण बंद करून
त्यांना कामाला लावले जाते. मुस्लीम समाजात बालमजुरीचे सर्वाधिक प्रमाण आहे.
इस्लाममधील वाढत्या आर्थिक मागासलेपणाला वाढते कुटुंब जबाबदार आहे. कुटुंब
नियोजनाला असलेला विरोध इस्लामच्या अधोगतीला पूरक ठरत आहे. इस्लाममधील खरी तत्त्वे
समाजापर्यंत पोहचविणे आवश्यक आहे. इस्लाम हा जगातील सर्वाधिक पुरोगामी धर्म आहे.
हा धर्म अश्या प्रकारे चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन देणार नाही हे समाजाला पटवून
देण्यासाठी मुस्लीम सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात आली.मुस्लीम सत्यशोधक
समाजाच्या स्थापनेची कारणे पाहिल्यानंतर चळवळीची आवश्यकता लक्षात येते. चळवळी
पुढील आव्हानांचा आपल्याला परिचय होतो. इस्लामसारख्या मागासलेल्या समाजात समाज
प्रबोधनाचे कार्य करणे किती कठीण आहे. हे कठीण आव्हान हमीद दलवाई आणि त्यांच्या
सहकार्यांनी उचलले. मुस्लीम समाजाच्या मानसिकतेत आमूलाग्र परिवर्तन घडवून
आणण्यासाठी ही संस्था स्थापन केली.
मुस्लीम सत्यशोधक समाजाचे
कार्य - मुस्लीम सत्यशोधक चळवळीच्या उद्दिष्टांवरून
चळवळीच्या कार्यांची व्यापकता लक्षात येते. महंमद पैगंबरांच्या जीवनावर चर्चा व
चिकित्सा करण्याचा प्रयत्न इस्लाममध्ये कोणत्याही समाजसुधारकांनी केला नाही. हमीद
दलवाई यांनी पैगंबरांच्या जीवनावर सार्वजनिक चर्चा व्हावी अशी सूचना केली.
पैगंबरांच्या जीवनाबद्दल आपली मते प्रकट केली. इस्लाममधील कुराण आणि हदीस मधील
विचारांची कालानुरूप चिकित्सा करण्याचा आग्रह त्यांनी धरला. इस्लाममधील साचलेपणा
दूर करण्यासाठी हे आवश्यक होते. मुस्लिमांसारख्या पुरोगामी विचारांच्या धर्मांत
शिरलेली जळमटे दूर करण्याचा प्रयत्न मुस्लीम सत्यशोधक समाजाने केला. मुस्लिमांच्या
आचारविचारांत उदारता निर्माण करण्यासाठी समाजाने कार्ये केलेली आढळतात -
१)
स्त्री-पुरुष समानता निर्मितीचा प्रयत्न - 'स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित करणे' हे सत्यशोधक चळवळीचे प्रमुख ध्येय व कार्य होते.
इस्लाम धर्मात अत्यंत अमानुष पद्धतीने वागविले जात होते. पैगंबर साहेबांनी स्त्रियांना
अत्यंत मान स्थान दिले होते. स्त्रियांच्या मालमत्तेच्या अधिकाराची चर्चा करणारा 'इस्लाम', पहिला धर्म होता. इस्लाम धर्मातील तत्त्वे
स्त्रियांना अनुकूल असूनही प्रत्यक्षात त्यांच्य मानखंडना करणाऱ्या अनेक वाईट
प्रथा सुरू झाल्या होत्या. धर्माच्या आधाराक स्त्रियांचे स्वातंत्र्य संकुचित केले
होते. पडदा पद्धत, तोडी तलाक, बहुविवाह पद्धती, कन्या भ्रूणहत्या इत्यादी रूढींमुळे मुस्लीम
स्त्रियांचे जीवन नरकमय बनले होते. या नरकातून सुटका करण्यासाठी हमीद दलवाई यांनी
१८ एप्रिल १९६६ रोजी तलाक पीडित स्त्रियांचा मुंबईतील कौन्सिल हॉलवर मोर्चा नेला
होता, तोंडी तलाक, बहुपत्नीत्व रूढींमुळे मुस्लीम स्त्रियांची
होणारी कुचंबणा सरकारपुढे मांडण्यासाठी मोर्चा आयोजित केला होता. मुस्लीम
स्त्रियांवर होणान्या अन्यायाचे निर्मूलन करून त्यांना समान अधिकार मिळवून
देण्यासाठी मुस्लीम सत्यशोधक समाजाने २३ नोव्हेंबर १९९५ मध्ये तलाकपीडित मुस्लीम
स्त्रियांची परिषद बोलविली. १९७५ मध्ये सत्यशोधक मंडळाचे सरचिटणीस सय्यदभाई
यांच्या नेतृत्वाखाली 'जेहाद-ए-तलाक' चळवळ सुरू करण्यात आली. या चळवळीद्वारे
तलाकपीडित स्त्रियांना कायदेशीर संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. मुस्लीम
समुदायातील स्त्रियांच्या विकासासाठी जबानी तलाकवर बंदी लादावी, सवतबंदी, घटस्फोटीत महिलांचे पुनर्वसन, पडदा पद्धतीवर बंदी, समान नागरी कायद्याची अंमलबजावणी इत्यादी
मागण्यांसाठी मुस्लीम सत्यशोधक समाजाने व्यापक प्रयत्न केले. या समाजाने केलेल्या
प्रयत्नातून मुस्लीम समाजातील स्त्रियांच्या जीवनात परिवर्तन येण्यास सुरुवात
झाली.
२)
समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न - राज्यघटनेने समता संकल्पनेला समाज आणि राष्ट्रीयजीवनात
प्रमुख स्थान दिले. समतेच्या प्रस्थापनेसाठी घटनेत अनेक तरतुदी केल्या. समान नागरी
कायदा हा समता प्रस्थापनेच्या मार्गातील एक प्रमुख पाऊल मानले जाते. परंतु, घटनाकारांनी समान नागरी कायद्याचा समावेश राज्य
धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वातील कलम ४४ मध्ये केला. भविष्यात समान नागरी कायदा
अस्तित्वात येईल अशी अपेक्षा व्यक्त केली. भारतात समान नागरी कायद्याची अंमलबजावणी
होऊ शकली नाही. वारसा हक्क, विवाह आणि घटस्फोटाबद्दलचे कायदे धर्मांवर आधारित आहे.
मुस्लीम पर्सनल लॉ वा मुस्लीम वैयक्तिक कायदा इस्लाम धर्मातील तत्त्वांवर आधारलेला
आहे. घटनाकारांनी इहवादी तत्त्वांना मान्यता दिलेली असताना धार्मिक आधारावर कायदे
अस्तित्व हे विसंगतीपूर्ण चित्र आहे. धर्मांबर आधारित कायद्यांमुळे पुरुषांना काही
विशेषाधिकार प्राप्त होतात. उदाहरणार्थ, मुस्लीम पुरुषाला बहुविवाह करण्याचा म्हणजे चार
बायका करण्याचा अधिकार मुस्लीम वैयक्तिक कायदा देतो. तोंडी तलाकचा अधिकार बहाल
करतो. धार्मिक कायद्यामुळे मुस्लीम स्त्रिया समानतेच्या अधिकारापासून वंचित आहेत.
मुस्लीम वैयक्तिक कायद्यामुळे तलाक पीडित स्त्रियांचा प्रश्न, बहुपत्नीत्वाचा प्रश्न, पोटगीचा प्रश्न पडदा पद्धत इत्यादी प्रश्न
मुस्लीम समाजात निर्माण झालेले आहेत. धर्मांवर आधारित वेगवेगळ्या कायद्यांमुळे
विभिन्न धर्मांमध्ये परस्परांबद्दल संशयवृत्ती व तणाव वाढत आहे. मुस्लीम समाजासाठी
असलेला वेगळा कायदा धार्मिक तुष्टीकरणाचा एक भाग आहे असे जाहीरपणे बोलले जाते.
त्यामुळे मुस्लीम सत्यशोधक मंडळाने १९७१ साली 'ऑल इंडिया फॉर्वर्ड-लुकिंग मुस्लीम कॉन्फरन्स' दिल्ली येथे भरविली. या परिषदेत महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, प. बंगाल आणि दिल्ली येथील प्रतिनिधी उपस्थित
होते. परिषदेत समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी करणारा ठराव संमत
करण्यात आला. मुंबई येथे भरलेल्या 'मुस्लीम सामाजिक परिषदे' त समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणीचा
पुनरुच्चार करण्यात आला.
३)
सुधारणावादी आणि धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाची निर्मिती- भारतात सुधारणावादी आणि धर्मनिरपेक्ष
राष्ट्रवादाची स्थापना करणे मुस्लीम सत्यशोधक समाजाचे प्रमुख ध्येय होते. डोनाल्ड
युनेज स्मिथ यांच्या मते, "धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे जे सर्वांना व्यक्तिगत आणि
सामुदायिक स्वातंत्र्य बहाल करते. घटनात्मकरीत्या कोणत्याही विशिष्ट धर्माला
धर्मनिरपेक्ष राष्ट्र बांधलेले नसते. त्याचप्रमाणे ते कुठल्याही विशिष्ट धर्मास
उत्तेजन देत नाही किंवा कोणत्याही धर्मात हस्तक्षेप करीत नाही.” धर्मनिरपेक्ष
राज्याची मूलभूत वैशिष्ट्ये भारतीय संविधानात समाविष्ट आहेत. परंतु, भारतातील धर्मवादी संघटना आणि नेते सुधारणावादी
आणि धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाला विरोध करतात. धर्माच्या आधारावर जाणीवपूर्वक तेढ
निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजतात. धर्माधर्मांत तणाव घडवून आणण्यासाठी दंगली
घडवून आणतात. धार्मिक तणावात सर्वाधिक नुकसान अल्पसंख्याक समुदाय आणि समाजातील
सर्वसामान्य लोकांना भोगावे लागते. एका धर्मातील धर्मांधता दुसऱ्या धर्मातील
धर्मांधतेला बळ देते. मुस्लीम धर्मातील धर्मांधतेमुळे हिंदुत्वाच्या राजकारणाचा
जोरात प्रचार व प्रसार झाला. धर्मांध राजकारण करणारे पक्ष आपल्याला एकमेकांच्या
विरोधात वाटतात. मात्र, ते प्रत्यक्षात कट्टरतावादाला खतपाणी घालण्याची भूमिका
सारख्याच पद्धतीने पार पाडतात. धर्मांची चिकित्सा करणाऱ्या प्रबोधनवादी सर्व
संघटना आणि संस्थांनी सुधारणावादी आणि धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाचे बीजारोपण
करण्याचा प्रयत्न करावा. मुस्लीम सत्यशोधक समाजाने विविध उपक्रमांतून हा प्रयत्न
सातत्याने केलेला आढळतो.
४)
मुस्लीम समाजात शैक्षणिक व वैज्ञानिक दृष्टिकोनाची निर्मिती करणे- शैक्षणिक दृष्टिकोनातून मुस्लीम समाज हा
सर्वाधिक मागासलेला आहे. शैक्षणिक मागासलेपणातून आर्थिक मागासलेपणा जन्माला आलेला
आहे. शिक्षणाच्या अभावामुळे मुस्लीम समुदायातील तरुणांना अत्यंत लहानसहान व कमी
मजुरी मिळणारी कामे करावी लागतात. उदाहरणार्थ, भंगार वेचणे, गॅरेजमध्ये काम करणे, बालमजुरी शिक्षण हा मानवी प्रगतीचा मूलमंत्र
मानला जातो. शिक्षणातून विचारांत परिपक्वता येते. शिक्षणातून युरोपिअन देशात
क्रांती घडवून आणली. मुस्लीम समाजातील निरक्षरतेमुळे हा समाज सर्व क्षेत्रात मागे
पडला. शिक्षणाच्या अभावामुळे मुस्लीम समाजात वैज्ञानिकदृष्टी रुजू शकली नाही.
वैज्ञानिकदृष्टी निर्माण न झाल्यामुळे समाजात अनेक अंधश्रद्धा व रूढी आणि परंपरा
निर्माण झाल्या. या रूढी परंपरेच्या दलदलीत फसलेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी
शिक्षणाची नितांत आवश्यकता आहे. मुस्लीम सत्यशोधक समाजाने ३० व ३१ डिसेंबर १९७३ ला
कोल्हापूर येथे 'मुस्लीम शिक्षण परिषद' घेतली. या परिषदेत मुस्लीम समुदायाचे शिक्षण
प्रसाराच्या मुद्द्याबद्दल विचारमंथन करण्यात आले. शिक्षणाच्या माध्यमातून मुस्लीम
समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करता येईल.
५)
मुस्लीम समाजाच्या कल्याणाला प्राधान्य - कट्टरता, बंदिस्तता आणि चिकित्सेचा अभाव इत्यादींमुळे मुस्लीम समाज
हा वैचारिक, आर्थिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून मागे पडला. इस्लामने उदारमतवादी प्रवाहाचा
स्वीकार केला नाही. काळानुरूप आपल्या धर्मात बदल करण्याची आवश्यकता लक्षात घेतली
नाही. इस्लाम धर्म हा जगातील सर्वाधिक पुरोगामी धर्म आहे. जगातील सर्व प्रश्नांची
उत्तरे कुराण आणि इस्लाममधील धर्मग्रंथांमध्ये समाविष्ट आहेत. धर्मग्रंथ सोडून इतर
सर्व आधार कुचकामी आहेत अशी धारणा विकसित केल्यामुळे समाजाची काळानुरूप प्रगती
झाली. मुस्लीम समुदायाचा विकास होऊ शकला नाही. परिणामतः समाज दारिद्र्य, बेरोजगारी, सामाजिक मागासलेपणा, गुन्हेगारीकरण इत्यादी दुष्टचक्रात तो अडकला.
मुस्लीम समुदायाच्या विकासातील अडसर दूर करून कल्याणाला प्राधान्य देण्याची गरज
आहे हे मुस्लीम सत्यशोधक समाजाच्या लक्षात आले. या मंडळाने मुस्लिमांच्या विकासाला
गती देणारे अनेक उपक्रम आखले. मुस्लीम समाजात जनजागृती घडवून आणण्याचा प्रयत्न
केला. समाजाचे प्रश्न निर्णयकेंद्रापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला. मुस्लीम
स्त्रियांच्या प्रश्नासंदर्भात मंडळाने अनेक मोर्चे, संमेलने, परिषदा घेऊन जनजागृतीचा प्रयत्न केला.
मुस्लिमांच्या विकासासाठी आवश्यक उपाययोजना सूचविण्याचे कार्यदेखील केले.
६)
इस्लामचा खरा अर्थ लोकांपर्यंत पोहचविणे - पुरोगामित्व
लोकांच्या नजरेस आणून देण्याचा फारसा प्रयत्न झालेला दिसून येत इस्लाम धर्माचे
नाही. इस्लाममध्ये हिंसाचारी, मागासलेला व रानटी लोकांचा धर्म ही प्रतिमा सव समाजामध्ये
रुजलेली आहे. पाश्चिमात्य देशांनी अनेक वैज्ञानिक कल्पना इस्लाममधून घेतलेल्या
आहेत. विज्ञानातील अनेक संकल्पना अरबी भाषेतील आहेत. पौर्वात्य देशातील ज्ञान
इस्लाममार्फत पश्चिमेत पोहचले. बगदाद येथील विद्यापीठ जगप्रसिद्ध होते. मानवी
जातीचे जगाशी असलेल्या संबंधाबद्दल इस्लाम मार्गदर्शन करतो. स्त्रियांची प्रतिष्ठा
आणि मालमत्तेच्या अधिकारांची इस्लाममध्ये चर्चा झालेली आहे. मूळातच पुरोगामी
असलेल्या धर्मात काळानुरूप बदल न घडवून आणल्यामुळे अनेक अयोग्य गोष्टी इस्लामच्या
नावावर खपविण्यात आल्या. इस्लाम धर्माचे खरे स्वरूप लोकांपर्यंत पोहचविणे आवश्यक
होते. या उद्देशाने मुस्लीम सत्यशोधक समाजाने आपले कार्य सुरू केले. मुस्लीम
समाजाला उदारमतवादी बनविण्याचा प्रयत्न केला. धर्मातील कालबाह्य मूल्ये नाकारून
मानव निर्मित आधुनिक मूल्ये आत्मसात करण्यास मुस्लीम व्यक्तीला तयार करणे हा
मंडळाच्या कार्यामागील मूलगामी हेतू होता. तुर्कस्थाना • मुस्लीम राष्ट्राने
पुरोगामी जीवनशैलीचा विचार करून आपला विकास घडवून आणला. त्याचप्रमाणे भारतीय
मुस्लीम समुदायाने इस्लामचे खरे वास्तव जाणून आपल्या जीवनशैलीत बदल घडवून आणावा
आणि आपली प्रगती करावी यासाठी मंडळ कार्य करत होते.
७)
प्रादेशिक भाषेतून शिक्षण प्रसार व
लोकसंख्या नियंत्रणावर भर- उर्दू भाषेबद्दल मुस्लीम समाजात आत्मीयतेची भावना आहे. धार्मिकतेच्या आधारावर
उर्दू भाषेला ते आपल्या जीवनात व शिक्षणात महत्त्वपूर्ण स्थान देतात. परंपरावादी
मुस्लीम समाजात उर्दू माध्यमातून शिक्षण घेण्यासाठी विशेष प्रोत्साहन दिले जाते.
परंतु, उर्दू भाषेतून
शिक्षण घेतलेल्या मुलांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होतो. उदं ही प्रशासकीय
क्षेत्रात वापरली जाणारी भाषा नाही. धार्मिक कार्यासाठी तिचा वापर केला जातो.
उर्दू भाषेसोबत प्रादेशिक भाषेत शिक्षण घेतल्यास मुस्लीम तरुणांना रोजगाराची संधी
मिळू शकते. मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष हमीद दलवाई हे मराठी भाषेचे अभ्यासक
होते. त्यांनी 'इंधन' ही कादंबरी आणि 'लाट' हा कथासंग्रह मराठी भाषेत लिहिलेला आहे.
मुस्लिमांना राष्ट्रीय प्रवाहात सामील करून घेण्यासाठी प्रादेशिक भाषेतील शिक्षण
उपयुक्त ठरू शकते. मंडळाने प्रादेशिक भाषेतील शिक्षणासाठी आग्रह धरला. सच्चर
समितीने मुस्लीम समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक परिस्थितीचा अभ्यास करताना
मत व्यक्त केले आहे की, "मुस्लिमांमध्ये प्रादेशिक भाषेतून शिक्षण व व्यवसाय
शिक्षणाचे प्रमाण वाढले असते तर ही शैक्षणिक व आर्थिक दुरवस्था निर्माण झाली
नसती." यावरून हमीद दलवाई यांच्या विचारांचे महत्त्व लक्षात येते. त्यांनी
वक्फ बोर्डाकडील निधी शैक्षणिक कार्यासाठी खर्च करण्याचा सल्ला दिला. दलवाईंच्या
शिक्षणासोबत लोकसंख्या वाढीचा फार मोठा प्रश्न मुस्लीम समुदायाला भेडसावतो आहे.
वाढत्या लोकसंख्येमुळे मुस्लीम समुदायातील लोकांच्या जीवनमानात व दर्जात मोठी घट
झालेली आहे. वाढत्या अपत्य संख्येमुळे सर्वांना सुखसुविधा आणि शिक्षण उपलब्ध करून
देणे पालकांना शक्य नसते. लोकसंख्या बाढीमुळे मुस्लीम समुदायात दारिद्र्य, बेरोजगारी, बालमजुरी, आर्थिक मागासलेपणा इत्यादी प्रश्न निर्माण झाले
आहेत. कुटुंबनियोजनाची संकल्पना इस्लामला मान्य आहे. परंतु, काही लोक धर्माच्या आधारावर कुटुंबनियोजनाला
विरोध करतात. कुटुंबनियोजनाअभावी मुस्लिमांची लोकसंख्या वाढत आहे. मुस्लीम
समुदायाच्या लोकसंख्या वाढीवर नियंत्रण आणण्यासाठी मुस्लीम सत्यशोधक मंडळाने
कुटुंबनियोजनाचा पुरस्कार केला. शेख वजीर पटेल यांच्या पुढाकाराने अमरावतीत १९८४
साली कुटुंबनियोजनाची शिबिरे आयोजित करून शस्त्रक्रिया घडवून आणल्या.
अशा प्रकारे
मुस्लीम सत्यशोधक समाजाने मुस्लीम समाजात प्रबोधनाची ज्योत पेटविण्याचा प्रयत्न
केला. १९६९ साली पुण्यात मुस्लीम समुदायापुढे भाषण करताना हमीद दलवाई म्हणाले होते
की, "प्रत्येक नव्या
धमने आपल्या अनुयायांनी पाळायचे काही कायदे आणि वर्तनाचे नियम आणले आहेत. शेकडो
वर्षांपूर्वी केले गेलेले नियम आजच्या परिस्थितीला लागू पडत नसतील तर त्यांचा
पुनर्विचार करायला हवा. कायद्यामुळे, अगदी धार्मिक कायद्यामुळे समाजात न्यायाची
प्रस्थापना होत नसेल तर ते बदलले पाहिजेत." त्यांच्या वरील विधानांवरून
मुस्लीम सत्यशोधक समाजाचे कार्य आपल्याला ज्ञात होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.