भारतीय राज्यघटना निर्मिती प्रकिया स्वरूप आणि विशेषत:-
26 जानेवारी 1950 या दिवशी घटनेचा स्वीकार करून भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश बनला. घटना समितीतील सदस्यांच्या सामर्थ्य आणि इच्छाशक्तीचा तो परिणाम होता. गेल्या दीडशे वर्षांपासून असलेल्या गुलामगिरीच्या बेड्या झटकून भारत ताठमानेने उभा राहिला. घटना समितीचा स्वतःवरचा विश्वास आणि राष्ट्रावरच्या विश्वासामुळे हे शक्य झाले. म्हणून घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांगतात की," आता स्वतंत्र झाल्यामुळे, काही चुकीचे घडत असल्यास त्याचा दोष ब्रिटिशावर टाकण्याची निमित्त आपण गमावले आहे. यापुढे काही चुकीचे घडल्यास तो दोष दुसऱ्या-तिसऱ्या कोणाचा नसून आपलाच असेल."
घटना निर्मितीतील महत्त्वपूर्ण तत्वे-
भारतीय घटनेच्या यशस्वितेचे श्रेय घटनाकारांच्या अमाप मेहनती सोबत स्वातंत्र्य मिळण्याची आधीपासून ब्रिटिशांनी भारतीय जनतेला उपलब्ध करून दिलेला संसदीय लोकशाहीचा अनुभव मानला जातो. घटना निर्मितीच्या काळात देशाला मिळालेले दूरदृष्टी असलेले नेते, अंतर्गत लोकशाही व्यवस्था राबविणारा भक्कम राजकीय पक्ष आणि बुद्धिवान घटना निर्मितीतील सहभाग मानला जातो. घटनेवर विविध देशांच्या घटनांचा आणि ब्रिटिश राजवटीचा प्रभाव असला तरी भारतीयांनी ती स्वतः रचलेली आहे आणि तिचे निर्मितीचे पद्धत अस्सल भारतीय आहे. घटने मधून देशाच्या जनतेच्या इच्छा आकांक्षा प्रतिबिंबित होतात. इतर देशांच्या घटनेतून निवडलेल्या तरतुदी अत्यंत कौशल्याने घेतलेले आहेत त्यासाठी तज्ञ व्यक्तींची मदत घेतलेले आहे.
घटना निर्मितीतील प्रमुख संकल्पना-
एकमताने निर्णय प्रक्रिया- एक मत ही संकल्पना भारतात फार पूर्वीपासून रुजलेली आहे. प्राचीन काळापासून गाव पंचायती आणि जात पंचायती एक मताने निर्णय घेत असत. घटना समितीत देखील प्रत्येक तरतुदी वर साधक-बाधक चर्चा होऊन एकमताने मान्यता दिली जात असत. घटना समितीचे बहुसंख्य सदस्य काँग्रेस पक्षाचे असले तरी डॉ.आंबेडकर, एन. जी. अय्यंगार सारख्या अभ्यासू काँग्रेस बाहेरचे नेत्यांची मदत घेतली. घटना समितीत मतैक्य आणि कमीत कमी मुद्द्यांवर एक मत निर्माण करण्यासाठी प्रचंड कष्ट करावे लागले. उदाहरणार्थ राष्ट्रभाषा संदर्भातला प्रश्न सोडविण्यासाठी सतत तीन वर्ष चर्चा करून सर्वांना मान्य होईल असा पर्याय शोधण्यात आला.
सर्वसमावेशतेचे तत्व- घटना तयार करताना घटनाकारांनी सर्वसमावेशकता तत्त्वाला महत्त्व दिले.वरवर सुसंगत न वाटणाऱ्या आणि संघर्षात न कल्पनांची आपसामध्ये सांगड घातली. सर्वसमावेशकता तत्वाच्या उपयोगाचे उत्तम उदाहरण म्हणजे संघराज्य पद्धत आणि बळकट केंद्र सरकारची योजना या दोन्हीपैकी एकच सांगू शकेल परिस्थितीचा विचार करून दोन्हींचा एकत्रपणे वापर केला. पंचायत राज व्यवस्थेला गांधीवादी व्यवस्थेपासून वेगळे करून घटनेत समाविष्ट करण्याची कृती पंचायतराजला पाठिंबा देणारे आणि गांधी वादाला पाठिंबा देणाऱ्यामधील संघर्ष टाळता आला. घटना समितीने सध्याच्या घटनेचा केलेला स्वीकार हे सर्वसमावेकतेचे सर्वात मोठे उदाहरण आहे. नव्याने स्वतंत्र झालेल्या देशाला स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची गरज होती तसेच राष्ट्रीय ओळखीची देखील गरज होती या दोन्ही गरजा घटनाकारांनी लक्षात घेऊन घटना निर्माण केली. घटना निर्माण करताना भारतीय तत्त्वांचा स्वीकार करताना प्राचीन भारताच्या इतिहासाला काळीम मा लागणार नाही याची दक्षता घेतली.
निवड कौशल्य- भारतीय घटनेत मोठ्या प्रमाणावर इतर देशांच्या घटनेतील तरतुदींचा समावेश असला तरी त्या तरतुदी भारतीय गरजेला सुयोग्य होतील अशा बनवण्याची अवघड काम घटना समितीने पार पडले. त्यासाठी समितीने आपल्या निवड कौशल्याचा वापर करून घटनेची गुणवत्ता कायम राहील यासाठी सातत्याने प्रयत्न केले. घटना समितीच्या असामान्य निवड पद्धतीमुळे घटनेत एक प्रकारची लवचिकता निर्माण झाली. त्यामुळे एकाच वेळेस देशात संघराज्य शासन पद्धती आणि संसदीय लोकशाही एकत्र नांदू लागल्या.
भारत एक राष्ट्र म्हणून उभे राहावे म्हणून समितीने शक्य तेवढे उपाय करून धार्मिक आणि अल्पसंख्यांकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. धार्मिक आणि जातीय मागण्यांपासून भविष्यात होणारा त्रास नष्ट करण्यासाठी स्वतंत्र मतदार संघ नष्ट केले आणि राखीव जागांची तरतूद कायम ठेवली. इतर घटनेतील तरतुदी निवडून ते सुधारण्याचे काम घटना समितीने व्यवसायिक तज्ञांकडून करून घेतले. उदा. बी. एन. राव घटनेचे सल्लागार काँग्रेसचे नसलेले तज्ञ लोकांवर घटना समितीत महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सोपवल्या. उदा. डॉ. आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष सार्वजनिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि मंडळांचा देखील घटना तयार करताना विचार केला गेला, घटनेबद्दल जनतेकडून आलेल्या प्रतिक्रियांचा देखील विचार करून घटनेत समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न केले गेले. घटनेतील साधनांचे मूळ परकीय असले राष्ट्राचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केलेला असामान्य वापर घटना समितीतील निवड कौशल्य दर्शन देतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.