https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

मुस्लीम सत्यशोधक चळवळ मूल्यमापन व सद्य:स्थिती-Evalution of Muslim Satyshodhak Movement


 

मुस्लीम सत्यशोधक चळवळ मूल्यमापन व सद्य:स्थिती- भारतीय मुस्लीम समाजाचे प्रबोधन घडवून आणण्यासाठी हमीद दलवाई यांनी ही चळवळ सुरू केली. मुस्लीम समुदायात इहवादी मूल्यांचा प्रसार करणे, राष्ट्रीय एकात्मता व वैज्ञानिक वृत्ती रुजविणे, अलगतावादी प्रवृत्ती नष्ट करून समुदायाला राष्ट्रीय प्रवाहात आणणे, मुस्लीम समाजातील अनिष्ट रूढी नष्ट करणे आणि स्त्रियांना समान अधिकार मिळवून देणे इत्यादी उद्दिष्टे नजरेसमोर ठेवून २२ मार्च १९७० ला मुस्लीम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली. या मंडळाच्या कार्य व विचारांवर महात्मा फुले, गो.ग. आगरकर, महर्षी कर्वे आणि डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव होता. 

 या मंडळाने तलाकपीडित स्त्रियांचा प्रश्न हातात घेऊन कार्य सुरू केले. तलाकसोबत बहुपत्नीत्व, पोटगी, पडदा पद्धती इत्यादी स्त्रियांशी संबंधित प्रश्नांच्या सोडविण्यासाठी कौन्सिल हॉलवर मोर्चा नेला. १९७१ साली दिल्ली येथे परिषद बोलविली. कोल्हापूर येथे शिक्षण परिषद बोलविली. मंडळाचे सरचिटणीस सय्यदभाई यांच्या नेतृत्वाखाली 'जेहाद-ए-तलाक' चळवळ सुरू केली. तलाकपीडित महिला व त्यांच्या मुलांना संरक्षण व कायदेशीर कवच उपलब्ध करून द्यावे यासाठी मंडळाने प्रयत्न केले. जबानी तलाक व सवतबंदीच्या विरोधात लढा चालू ठेवला. तलाकपीडित महिलांची पुणे येथे २३ नोव्हेंबर १९७५ तापरिषद बोलविली. १९८० साली हसेन जमादार यांनी तलाकपीडित महिलांच्या मुलींसाठी वस्तिगृह सुरू केले. अमरावती येथे वजीर पटेल यांनी कुटुंबनियोजन शिबिरे भरविली. पुण्यात मुस्लीम महिला मदत केंद्र सुरू केले. श्रीमती अख्तरून्निसा सैय्यद यांनी दत्तक प्रश्नावरून न्यायालयात दाद मागितली. हमीद दलवाई यांच्या मृत्यूनंतर पत्नी श्रीमती मेहरून्निसा दलवाई यांनी पतीचे कार्य पुढे सुरू ठवेले. 'आधुनिक व्हा, कालबाह्य आचारविचार सोडा' हा दलवाईचा संदेश आजही मंडळाच्या कार्याला मार्गदर्शक ठरत आहे. मेहरून्निसा दलवाई, हुसेन जमादार, सैय्यद भाई, बाबूभाई बँडवाले, शमसुद्दीन तांबोळी, रजिया पटेल इत्यादींनी मंडळाचे कार्य चालू ठेवलेले आहे. मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे कार्य महाराष्ट्रभर तुरळक प्रमाणात सुरू अस तरी मुस्लीम समाजातून अपेक्षित पाठिंबा मिळताना दिसत नाही. मूठभर कार्यकत्यांच् जोरावर ही चळवळ जिवंत आहे. पहिल्यासारखा जोश चळवळीत राहिलेला दिस येत नाही. हमीद दलवाईनंतर इस्लामच्या तत्त्वज्ञानाची जाहीरपणे चिकित्सा करण्या धाडस कोणीही दाखविले नाही. मंडळाच्या कार्यक्रमाचे स्वरूप अत्यंत मर्यादित आहे. इस्लामच्या चौकटीला हादरा दिल्याशिवाय समाजप्रबोधनाचा मार्ग प्रशस्त होणार नाही हे वास्तव मंडळ जाणत नाही तोपर्यंत चळवळीला मर्यादित यश प्राप्त होईल. समाजाच्या चौकटीत समाजसुधारणेचा मार्ग प्रशस्त करण्याचा चळवळीचा सध्याचा मार्ग उरलासुरला प्रभावदेखील कमी करत आहे. चळवळीची भूमिका सुधारणावाद आणि पुरोगामित्वाला पूरक आहे. राष्ट्रीय हित व कल्याणासाठी चळवर पूरक आहे. परंतु, चळवळीची राजकीय भूमिका सुस्पष्ट नसल्यामुळे सर्व राजकीय पक्ष चळवळीपासून अंतर ठेवून आहेत. राजकीय पाठिंब्याअभावी चळवळींच्या मागण्यांना निर्णय केंद्राकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या दहशतवादाच्या पार्श्वभूमीमुळे मुस्लीम जगतावर वैचारिक हल्ले सुरू आहेत. दहशतवादाचा उदय इस्लाममधील 'जिहाद' संकल्पनेतून झाल्याचे प्रतिपादन केले जात आहे. या परिस्थितीत मुस्लीम समाजात प्रबोधनाचे कार्य चालू ठेवण्याचे अग्निदिव्य मुस्लीम सत्यशोधक समाजाला करावे लागत आहे. चळवळीचे संस्थापक हमीद दलवाई यांच्या निधनानंतर चळवळीत शिथिलता आलेली दिसते. चळवळीच्या कार्य व उद्देशात मवाळपणा आलेला दिसतो. कार्यकर्त्यांचा ओघदेखील कमी झालेला दिसतो. परंतु, चळवळ नष्ट झाल्याचे दिसून येत नाही. चळवळीच्या ध्येय व उद्दिष्टांत नेतृत्व व काळानुरूप काही बदल झालेले असले तरी मुस्लीम समुदायातील प्रश्न संपले नाहीत. 

    हिंदू समुदायापेक्षा मुस्लीम समुदायात प्रबोधनाची आवश्यकता जास्त आहे. मुस्लीम सत्यशोधक चळवळीने हा प्रबोधनाचा झेंडा आपल्या खाद्यांबर घेऊन वाटचाल चालू ठेवलेली आहे. या वाटचालीत अनेक अडथळे येत आहेत. महाराष्ट्र नव्हे तर भारतभर चळवळीचे मर्यादित प्रमाणात कार्य सुरू आहे. चळवळीची उद्दिष्टे मानव मुक्तीची ध्येय साधणारी आणि मुस्लीम समुदायाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणारी आहेत. चळवळीचे कार्य निव्वळ मुस्लीम समुदायास उपकारक नसून भारतीय राष्ट्रवादाला पूरक आहे. हिंदू-मुस्लिमांमध्ये सुसंवादाचा पूल बांधण्याचे कार्य चळवळीच्या माध्यमातून सुरू आहे. चळवळीची वैचारिक व तात्त्विक भूमिका समर्थ भारताच्या निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण आहे. हमीद दलवाई यांच्या मार्गानुसार चळवळीची होत असलेली वाटचाल मुस्लीम समुदायाच्या विकासाला चालना देण्यास साहाय्यक ठरेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.