विनोबा भावे यांचे भूदान व सर्वोदयी विचार:
भारत हा कृषिप्रधान देश आहे. बहुसंख्य लोकांचे जीवनमान कृषीवर
अवलंबून आहे. परंतु भारतात जमिनीची वाटणी असमान पद्धतीने
झालेली आहे. जमिनीच्या विषम वाटणीमुळे समाजातील मूहमा लोकांच्या वाट्याला प्रचंड
जमीन आलेली आहे. तर बहुसंख्य लोकांच्या वाट्याला अत्यंत अल्प स्वरूपाची जमीन आलेली
आहे. अत्यंत कमी जमीन वा भूमिहीन असलेल्या लोकांकडे उदरनिर्वाहाची पुरेशी साधने
नसल्यामुळे त्यांना दारिद्र्यात खितपत राहावे लागते. काम करण्याची इच्छा आहे; परंतु
जमीन नसल्यामुळे काम मिळत नाही. काम नसल्यामुळे दारिद्र्य आणि कर्जबाजारीपणाच्या
समस्येला सामोरे जावे लागते. याउलट भारतातील मूठभर लोकांकडे प्रचंड जमीन आहे.
त्यांना जमीनदार असे म्हणतात जमीनदारांकडे जमीन कसण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध
नाही. त्यामुळे जमीन पडीक राहते. जमीनदारवर्ग स्वतः जमीन कसत नाही. त्यांच्या
जमिनीवर भूमिहीन लोक व शेतमजूर श्रम करतात. त्यांच्या श्रमावर जमीनदार जगत असतो.
इतराच्या श्रमातील वाट्याच्या आधारावर जमीनदार श्रीमंत बनत असतो. मात्र श्रम
करणारा मजूर गरीब राहतो. अशा गुंतागुंत आणि विरोधाभासाच्या वातावरणात भारतातील
कृषिजीवन व कृषी अर्थव्यवस्था अडकलेली होती.
भूदान चळवळीच्या उदयाची
पार्श्वभूमी : स्वातंत्र्योत्तर काळात भारतात कम्युनिस्ट पक्षाने मार्क्स, लेनिन
आणि माओच्या विचारांच्या आधारावर शेतकऱ्यांमध्ये जागृती घडवून आणण्याचा प्रयत्न
सुरू केला. चीनमध्ये ज्या पद्धतीने शेतकऱ्यांनी क्रांती घडवून आणली, त्याप्रमाणे
भारतात शेतकऱ्यांनी जमीनदारांविरुद्ध उठाव करून क्रांती घडवून आणावी. यासाठी
पक्षांनी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन, पाठिंबा
दिला. तेलंगणा प्रांतात कम्युनिस्ट पक्षाच्या सहकार्याने शेतकऱ्यांनी १९५१ मध्ये
जमीनदारांविरुद्ध हिंसक चळवळ सुरू केली. या चळवळीमुळे तेलंगणा प्रांतात अस्थिरतेचे
वातावरण निर्माण झाले. या हिंसामय वातावरणातील तणाव कमी होऊन परिस्थिती सर्वसाधारण
पातळीवर यावी, यासाठी विनोबा भावे यांनी पदयात्रा सुरू केली. या
पदयात्रेचा मुक्काम पंचमपल्ली गावात असताना काही अस्पृश्य शेतकरी विनोबांना भेटले
आणि त्यांनी आपली परिस्थिती कथन केली. (१८ एप्रिल १९५१) आम्हाला उदरनिर्वाहाची
साधने उपलब्ध करून दिल्यास आमची दारिद्र्यातून मुक्तता होईल, अशी
कळकळीची विनंती केली. कष्ट करून पोट भरण्याची तयारी आहे, म्हणजेच
श्रम करावयास तयार आहोत; पण काम मिळत नाही. आम्हाला
जमीन मिळवून दिल्यास आम्हाला श्रम करता येतील आणि श्रमांच्या आधारावर आमचे
दारिद्र्य दूर होईल. विनोबांनी भूमिहीन अस्पृश्यांचा प्रश्न नीट समजून घेतला आणि
त्यांना जमीन मिळवून देण्याचे आश्वासन दिले. सर्वप्रथम पंचमपल्ली गावातील
जमीनदारांना भूमिहीन शेतकऱ्यांसाठी जमीन दान देण्याचे आव्हान केले. या आव्हानास
पंचमपल्ली गावचे जमीनदार श्री. रामचंद्र रेड्डी यांनी सर्वप्रथम प्रतिसाद दिला आणि
आपली काही जमीन विनोबांना दान दिली. विनोबा भावे यांनी ती जमीन भूमिहीन अस्पृश्य शेतकऱ्यांना दान दिली. या घटनेतून भूदान
संकल्पनेच्या बीजारोपणास मदत मिळाली. भूदान संकल्पनेतून भूमिहीन शेतकन्यांचे
दारिद्र्य दूर करता येईल आणि शांततेच्या माध्यमातून जमीन पुनर्वाटणीचा कार्यक्रम
पार पाडता येईल. हिंसेची गरज राहणार नाही हे लक्षात आल्यानंतर विनोबा भावे यांनी
आपले जीवन भूदान चळवळीसाठी वाहून घेण्याचा निश्चय केला. भूदान मिळविण्यासाठी
जमीनदारांना भावनिक स्वरूपाची आव्हाने केली. विनोबा भावे सांगत की, जमिनीचा
हिस्सा आनुवंशिक पद्धतीने वाटला जात असेल, तर मला तुमचा मुलगा समजा.
तुमच्या मुलांना जेवढी जमीन देणार आहात, तेवढी जमीन मला तुमचा मुलगा
मानून दान करा. या दानाचा उपयोग मी भूमिहीनांचे जीवन सुधारण्यासाठी करेल.
विनोबांनी सुरू केलेल्या भूदान चळवळीला भारतभर पाठिंबा मिळू लागला. जमीनदार लोक
आपल्याकडील काही जमीन भूदानासाठी दान करू लागले. तेलंगणा प्रांतात जवळपास ५० दिवस
विनोबा फिरले. त्यांना जमीनदारांनी १२२०१ • एकर जमीन दानात दिली. तेलंगणातील
यशामुळे भारावलेल्या विनोबांनी भूदान चळवळ भारतभर सुरू केली. दोन वर्षांच्या कालावधीत
जवळपास साडेतीन लाख एकर जमीन विनोबांनी दानात मिळविली. १९६७ पर्यंत ४२.७ लाख एकर
जमीन भूदान मिळाली आणि त्यांपैकी १२ लाख एकर भूमिहीनांमध्ये वाटली गेली. ५ कोटी
एकर जमीन भूदान मिळविण्याचे विनोबांचे स्वप्न होते. ग्रामदान चळवळीत जवळपास ३९६७२
गावांनी सहभाग घेतला. याशिवाय संपत्तिदानात लाखो रुपये जमा झाले. अनेक व्यक्तींनी
भूदान चळवळीसाठी आपले आयुष्य समर्पित केले.
२.ग्रामदान- भूदान आणि संपत्तिदानाची पुढची पायरी म्हणजे ग्रामदान होय माध्यमातून वैयक्तिक स्वामित्व नष्ट होऊन संपत्तीवर सामूहिक स्वामित्व निर्माण केले जाऊ शकते. ग्रामदानात संपूर्ण गावाची जमीन दानात मिळणे अपेक्षित आहे. सर्व जमीन दानात मिळाली की, जमिनीवर गावातील सर्वांची मालकी प्रस्थापित होईल. संपूर्ण गाव एक कुटुंब बनेल. ग्रामदानाच्या माध्यमातून मिळालेल्या जमिनीवर सामूहिक शेती केली जाणार नाही, तर गावातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या कार्य करावे लागेल आणि आवश्यकतेनुसार संपत्ती प्रदान केली जाईल. विनोबाच्या मते, शिक्षक, गायक, कास्तकार, शेतकरी आपआपले व्यवसाय करतील. संपूर्ण गावाच्या वार्षिक उत्पन्नातून सर्वांना समान हिस्सा मिळेल. त्यामुळे परस्पर आत्मीयता निर्माण होईल आणि सामूहिक जीवनाचा आनंद सर्वांना उपभोगता येईल. विनोबांची ग्रामदानाची संकल्पना साम्यवादातील सामूहिक शेती वा कम्यून पद्धतीपेक्षा भिन्न स्वरूपाची आढळून येते. प्रत्येक गावाला एक स्वयंपूर्ण खेड बनविण्यासाठी ग्रामदानाची संकल्पना उपयुक्त आहे. ग्रामदानाच्या माध्यमातून ऐक्य. बंधुभाव, आत्मीयता, प्रेम, सेवा, त्याग इत्यादी वृत्तींचा विकास करून गावाचे रूपांतर कुटुंबात करण्याचा प्रयास आहे. विनोबा म्हणतात की, ग्रामदानाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्ती आपले सर्वस्व समाजाला अर्पण करेल. ग्रामदान म्हणजे बलिदान नसून चांगल्या व समान जीवनासाठी केला जाणारा प्रयोग आहे. अशा प्रकारे विनोबा ग्रामदानाच्या माध्यमातून सामूहिक जीवनाची संकल्पना आणण्याचा प्रयत्न करतात.
४. जीवनदान :- विनोबा भावे यांनी ग्रामदान, ग्रामस्वराज्यासोबत जीवनदान ही संकल्पना मांडली आहे. जीवनदान म्हणजे गावातील लोकांच्या कल्याणासाठी आपले जीवन अर्पण करणे होय. सर्वोदयी समाज निर्माण करण्यासाठी निःस्वार्थी, त्यागी, समाजसेवेची आवड असलेल्या, प्रामाणिक कार्यकर्त्यांची आवश्यकता आहे; त्याशिवाय सर्वोदयी समाजाची स्थापना होणे अशक्य आहे. विनोबा भावे यांनी तरुणांना आवाहन केले होते की, त्यांनी राष्ट्रसेवेसाठी आपले जीवन अर्पण करावे. गावाच्या विकासासाठी अनेक क्रांतिकारी उपक्रमांची आखणी व अंमलबजावणी करावी लागेल. त्या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी चांगल्या व निष्ठावान कार्यकर्त्यांची आवश्यकता आहे, ही गरज ओळखून विनोबांनी जीवनदानाची कल्पना मांडली.
५. स्वराज्य: विनोबा भावे
यांनी राज्य आणि स्वराज्य यांत भेद स्पष्ट केलेला आहे. राज्य हे शक्ती व
दंडशक्तीवर आधारलेले असते, तर स्वराज्य हे
स्वयंप्रेरणा आणि स्वयंनियंत्रणावर आधारलेले असते. सर्वोदयी आपल्या राज्यविषयक
विचारांत राज्याच्या केंद्रीकरणाला विरोध करतात. राज्यविरहित समाजाची संकल्पना
प्रत्यक्षात शक्य नसल्यामुळे सर्वोदयी अहिंसात्मक स्वराज्याची संकल्पना मांडतात.
अहिंसात्मक स्वराज्यात राज्याचा मानवी जीवनात कमीतकमी हस्तक्षेप, विकेंद्रित
सत्ता, स्वयंनियंत्रणाला
महत्त्व, सोपी
व सुटसुटीत प्रशासनव्यवस्था, प्रशासनात जनतेचा वावर वा
प्रतिनिधित्व, सामाजिक ऐक्याला महत्त्व, जनतेत
परस्पर बंधुभावाचे अस्तित्व, कमीतकमी खर्चावर चालणारी
प्रशासनव्यवस्था, ग्रामराज्याला सर्वाधिक
अधिकार, जनतेच्या
मतानुसार राज्यकारभार आणि सर्वांना विकासाची संधी इत्यादी गोष्टींना प्राधान्य
असेल. विनोबा स्वराज्याच्या माध्यमातून मानवी विकासाला प्राधान्य देणाऱ्या आणि
शोषण, अन्याय, अत्याचाराला
नष्ट करणाऱ्या नव्या व्यवस्थेचे बीजारोपण करण्याचा प्रयत्न करतात.
भूदान चळवळीचे मूल्यमापन :
भूदान चळवळ ही अहिंसात्मक मागनि जमिनीची पुनर्वाटणी करणारी एक क्रांतिकारी चळवळ
मानली जाते. या चळवळीच्या संदर्भात ऑस्ट्रेलियाचे प्रसिद्ध विद्वान जे. एम.
प्रेन्टिस लिहितात की, भूदान ही महान भूदानाच्या
रक्तहीन क्रांती आहे. विनोबा भावे हे भारतातील एक असाधारण समाजसुधारक आहेत.
महात्मा गांधींचे प्रिय असून गांधींच्या पावलावर पाऊल ठेवून आपली वाटचाल करीत
आहेत. अशा महान व्यक्ती फार कमी आढळून येतात. विनोबा भावे यांनी. माध्यमातून लाखो
एकर जमीन मिळविली. कोट्यवधी रुपये जमा केले आणि त्या पैशांचा विनियोग निर्धनांच्या
कल्याणासाठी होऊ शकला. पक्षविरहित लोकतंत्र, अहिंसात्मक राज्य, स्वावलंबी
ग्रामराज्य, वर्गविहीन समाज इत्यादी अनेक क्रांतिकारी संकल्पना त्यांनी
मांडल्या. भूदान चळवळीच्या माध्यमातून जमिनीच्या असमान वाटणीची समस्या काही
प्रमाणात कमी होण्यास हातभार लागला, भूमिहीनांना
उदरनिर्वाहासाठी जमीन मिळाली. ग्रामदानाच्या माध्यमातून सहकारी शेतीला उत्तेजन
मिळाले. कायदेशीर मार्गाने जमीन सुधारणेचा प्रश्न हाताळता येईल, परंतु
जमिनीची लालसा कमी करता येणार नाही. भूदान चळवळीने जमिनीची लालसा कमी करून
जमीनदारांचे हृदयपरिवर्तन घडवून आणले. जमीनदारांकडील अतिरिक्त जमीन दानात मिळवून
राष्ट्रीय संपत्तीत वाढ घडवून आणण्याचे कार्य भूदान चळवळीने केले आहे.
जमीनदारांकडील अनेक एकर जमीन पडीक होती. ती भूमिहीनांना मिळाली आणि त्यांनी श्रम
करून त्यातून उत्पादन काढण्यास सुरुवात केली. भूदान चळवळ अहिंसात्मक मार्गाने
चालणारी आहे. या चळवळीमुळे भारतात वर्गसंघर्ष कमी होण्यास हातभार लागला. शोषणविरहित
समाज निर्माण करण्यासाठी ही चळवळ उपयुक्त आहे, असे अनेक गांधीवादी
अभ्यासकांना वाटते.
अशा प्रकारे भूदान चळवळीवर
काही अभ्यासकांनी टीका केलेल्या आहेत. उपरोक्त टीकेमध्ये काही प्रमाणात तथ्य दिसून
येत असले, तरी
मर्यादित प्रमाणात भूदान चळवळीला मिळालेल्या यशाकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
भूदान चळवळीमुळे शासनाला जमीन सुधारणा कायदे करण्यास प्रोत्साहन मिळाले. जमिनीची
असमान विभागणी ही भारतातील ग्रामीण भागातील प्रमुख समस्या आहे, हे
निदर्शनास आणून देण्याचे कार्यदेखील चळवळीने केले. चळवळीत मर्यादित जमीन प्राप्त
झालेली असली तरी तिचे वाटप भूमिहीनांमध्ये झाले. भूमिहीनांना हक्काचे
उदरनिर्वाहाचे साधन प्रा झाले, हे दुर्लक्षित करता येणार
नाही. भूमिहीनांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्या कार्यदेखील चळवळीने केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.