सर्वोदय तत्त्वज्ञान वा मुख्य तत्त्वे वा वैशिष्ट्ये Sarvodaya
गांधींच्या विचारांची मूळ प्रेरणा अध्यात्म आहे.
सर्वोदय विचारधारा त्याला अपवाद नाही. सर्वोदय विचारधारेवर गांधींच्या आध्यात्मिक
विचाराचा व्यापक प्रभाव पडलेला आहे. गांधींनी सर्वोदयाचा तात्त्विक आधार आपली
आध्यात्मिक आस्था असल्याचे जाहीरपणे नमूद केलेले आहे. ते म्हणतात की, सर्वोदयाचे सामान्य आणि शाश्चत रूप निर्विवाद
स्वरूपात अद्वैत आणि अध्यात्मवादाचा स्वीकार करते. सृष्टीच्या अंतर्गत असलेल्या
शाश्वत नैतिक व्यवस्थेप्रती सर्वोदय अखंड विश्वास प्रकट करतो सर्वोदय हे वस्तुत:
गांधी तत्त्वज्ञानाचे व्यावहारिक रूपांतर किंवा स्वातंत्र्योत्तर आविष्कार मानला
जातो. सर्वोदयाच्या माध्यमातून सर्वांचे कल्याण एकसाथ करण्याचा निर्देश व्य केला
जातो. सर्वांचे कल्याण वा उदयाचा विकास करण्याचा सर्वोदयी राजकीय तत्त्वज्ञानाचा
आग्रह एक विलक्षण प्रयोग मानला जातो. जगातील कोणतीही विचारधारा वा तत्त्वप्रणाली
मानवी हिताच्या एकरूपतेची वा सर्व मानवांच्या एकसाथ विकासाची कल्पना माइन नाही.
राजकीय चिंतन करणाऱ्या विविध विचारधारा विशिष्ट वर्गहिताच्या विकासाची कल्पना
मांडतात. उदा. मार्क्सवाद कामगार वर्ग. सर्वोदय विचारसरणी एका विशिष्ट वर्ग, गट वा समुदायाच्या विकासाचा विचार मांडत नाही, तर संपूर्ण मानवजातीला केंद्रबिंद मानून विचार
प्रस्तृत करते. हा वेगळेपणा सर्वोदयाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातो. सर्वोदय
चिंतनाच्या माध्यमातून मानवी हितात एकरूपता आणि विलक्षण स्वरूपाचे अद्वैत
प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जातो.
१. राज्यविरहित समाज :-महात्मा गांधी अराज्यवादी विचारवंत
होते. ते राज्याच्या अस्तित्वाविषयी शंका प्रदर्शित करतात. राज्याचा आधार हा
दंडशक्ती असते. राज्य व्यक्तीच्या जीवनात हस्तक्षेप करत असते. राज्याची सत्ता
दंडशक्तीवर आधार असते. राज्य हे संघटित आणि केंद्रीय स्वरूपात हिंसेचे
प्रतिनिधित्व करते. राज्य आत्मा नसलेले यंत्र आहे. राज्याचे अस्तित्व हिंसेवर
आधारलेले आहे. राज्य असलेली हिंसात्मक प्रवृत्ती आणि सत्तेचे केंद्रीकरण
करण्याच्या वृत्तीमुळे गांधी राज्याला विरोध करतात. राज्यविषयक विचार व्यक्त
करताना गांधी धोरांच्या ऐतिहासिक वक्तव्याचे समर्थन करतात. थोरोच्या मते, कमीतकमी शासन करणारे सरकार म्हणजे चांगले सरकार
होय. आदर्श समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी सर्वप्रथम शासनाचा मानवी जीवनातील
हस्तक्षेप कमी करणे हे प्रथम पाऊल आहे. गांधी म्हणतात की, सर्वोदयात राज्य अहिंसात्मक स्वरूपाचे असेल, ज्यात जनतेवर कमीतकमी शासन केले जाईल. शासकीय
नियंत्रणापासून व्यक्तीला मुक्त करून स्वशासनाच्या दिशेने वळविण्याचा प्रयत्न केला
जाईल. राज्यसंस्थेच्या दडपशाही, हिंसा आणि नियंत्रणापासून मुक्त करण्यासाठी गांधी
अहिंसात्मक राज्यावर भर देतात. अहिंसात्मक राज्यावर शासनाचे कमीतकमी नियंत्रण
असते. व्यक्ती स्वशासन व स्वनियंत्रणाच्या माध्यमातून आपल्या दोषांवर नियंत्रण
प्रस्थापित करतात. गांधी त्याग, सत्य, प्रेम, सहकार्याच्या आधारावर समाजाची पुनर्रचना करून सर्वोदयी
समाजाची स्थापना करण्याचा प्रयत्न करतात.
२. प्रातिनिधिक लोकशाहीला विरोध :- सर्वोदय विचारधारा प्रातिनिधिक लोकशाहीला
विरोध करते. प्रातिनिधिक लोकशाहीचा मुख्य आधार निवडणुका असतात. निवडणुकीच्या
माध्यमातून राज्यकर्ते वर्ग सत्तेवर येतात. निवडणुकीत बहुमतप्राप्त पक्ष सत्तेवर
येतो. सत्ता मिळविण्यासाठी अनेकदा नीती-अनीतीचा विचार केला जात नाही. अयोग्य
मार्गांचा उपयोग करून अनेकदा सत्ता मिळविली जाते. लोकशाहीत बहुमतप्राप्त पक्ष
अनेकदा बहुमताच्या जोरावर अल्पमताच्या मताकडे लक्ष देत नाही. आपली मते लादण्याचा
प्रयत्न करतो. सर्वोदयी लोकशाहीचा अर्थ बहुमताचे सरकार हा घेत नाही, तर सर्वांचे सरकार हा घेतात. संपूर्ण समुदायातील
व्यक्तींनी शासनव्यवस्थेत भाग घेणे हे प्रजातंत्र वा लोकशाही संकल्पनेत अभिप्रेत
आहे. प्रातिनिधिक लोकशाही व्यवस्थेत मतदानापुरता जनतेचा सहभाग असतो. शासनव्यवस्था
बहुमतावर आधारलेली असते. अल्पमतवाद्यांना तेथे कोणत्याही प्रकारचे स्थान नसते.
गांधी निवडणुकांना विरोध करतात. गांधी उदारमतवादी लोकशाहीतील प्रातिनिधिक
संस्थांच्या प्रचलित स्वरूपाला विरोध करतात भारतासाठी एक नव्या स्वरूपाच्या
लोकशाही तंत्राची मांडणी करतात. लोकशाहीचा अर्थ स्पष्ट करताना गांधी म्हणतात की, लोकतंत्र म्हणजे समाजव्यवस्थेतील सर्वात
शेवटच्या स्तरावरील व्यक्ती आणि सर्वांत वरच्या स्तरावरील व्यक्ती यांना विकासाची समान संधी मिळणे होय.
लोकशाही व्यवस्थेतील निवडणुका आणि प्रतिनिधित्वाविषयी गांधी समाधानी नव्हते.
निवडणुकांच्या मार्गाऐवजी अप्रत्यक्ष पद्धतीने निवडणुका घेऊन प्रतिनिधी निवडीच्या
पद्धतीला गांधी मान्यता देतात..
३. पक्ष-पद्धतीला विरोध :- गांधींच्या सर्वोदयी समाजात
राजकीय पक्षांना कोणतेही स्थान असणार नाही. सत्ता हस्तगत करण्यासाठी राजकीय पक्ष
अनैतिक मार्गाचा अनेकदा वापर करतात. सत्तास्थानी असणारा पक्ष देशहितापेक्षा
पक्षहिताला जास्त महत्त्व देतो. सत्ता मिळविण्यासाठी कोणत्याही स्तरापर्यंत
जाण्याची राजकीय पक्षांची तयार असते. सत्तेसाठी वाटेल त्या तडजोडी करणे हे राजकीय
पक्षांचे प्रमुख लक्षण असते. राजकीय पक्षांच्या अस्तित्वामुळे समाजात वेगवेगळे गट
निर्माण होतात. सत्तेसाठी संघर्षरत राहण्याची शिकवण राजकीय पक्ष जनतेला देत असतात.
सर्वोदयी पक्षविरहित राजकीय लोकशाहीची कल्पना मांडतात. सर्वोदयी समाजात राजकीय
पक्ष बरखास्त केले जातील आणि सर्व व्यक्तींच्या मत आणि विचारांना महत्त्व देऊन
राज्यकारभार चालविला जाईल. पक्ष-पद्धती बरखास्त केल्यानंतर निर्माण केल्या
जाणाऱ्या पर्यायी व्यवस्थेत गांधी अप्रत्यक्ष निवडणुकांना प्राधान्य देतात.
गावातील जनता ग्रामपंचायतीचे सदस्य निवडतील, पंचायतीचे सदस्य जिल्हा पंचायतीचे सदस्य निवडतील, जिल्हा पंचायतीचे सदस्य राज्य पंचायतीचे सदस्य
निवडतील आणि राज्य पंचायतीचे सदस्य मध्यवर्ती वा संसद सदस्य निवडतील. या
अप्रत्यक्ष निवडणुकीमुळे पक्ष-पद्धती आणि निवडणूक यंत्रणेची आवश्यकता राहणार नाही.
गांधी लोकसंमतीच्या माध्यमातून राज्यकारभार चालविणाऱ्या व्यवस्थेचे समर्थन करून
निवडणुका आणि राजकीय पक्षाला लोकशाही व्यवस्थेपासून दूर ठेवू इच्छित होते.
लोकतांत्रिक व्यवस्थेत व्यक्तीची स्वायत्तता गांधी अबाधित ठेवू इच्छित होते.
६. राजकीय विकेंद्रीकरणाचा पुरस्कार वा समर्थन :- गांधींनी राजकीय क्षेत्रात विकेंद्रीकरणाचा आग्रह धरलेला आहे. राजकीय
विकेंद्रीकरणासाठी गांधींनी पंचायतराज संकल्पनेला महत्त्व दिलेले आहे. पंचायतराज
व्यवस्थेत सर्व व्यक्ती समान असतील आणि लोकमताला महत्त्वपूर्ण स्थान असेल. लोकशाही
सिद्धान्त आणि व्यवहार या दोन्ही दृष्टीकोनांत वास्तविक सत्ता लोकांच्या हातात
असली पाहिजे. केंद्रीकरणाच्या माध्यमातून सत्तेचा दुरुपयोग होऊ शकतो. शक्तीच्या
दुरुपयोगाची शक्यता कमी करण्यासाठी वास्तव सत्ता जनतेच्या हातात देण्यासाठी
गांधींनी ग्रामस्वराज्याची संकल्पना मांडली आहे. गांधींच्या मते, ग्रामस्वराज्याच्या माध्यमातून संपूर्ण
लोकशाहीची स्थापना करता येईल. या व्यवस्थेत प्रत्येक व्यक्ती स्वयंपूर्ण आणि
स्वावलंबी असेल आणि ती आपल्या गरजपूर्तीसाठी दुसऱ्यावर अवलंबून नसेल, तरीही दुसऱ्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी परस्पर
सहकार्याने काम करेल.
ग्रामस्वराज्य व्यवस्थेत प्रत्येक ग्राम आपल्या गरजा पूर्ण करून स्वावलंबी
स्वायत्त बनण्याचा प्रयास करेल. गावातील सर्व कार्य परस्पर सहकार्याने केली जातील.
गावात कोणत्याही प्रकारचा जातिभेद, अस्पृश्यता आणि वंशभेदाला स्थान नसेल. सर्वांना
बुनियादी तालीम वा शिक्षण उपलब्ध करून दिले जाईल. गावाच्या संरक्षणासाठी एक दल
निर्माण केले जाईल. या दलात प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला स्थान दिले जाईल.
गावाचे प्रशासन चालविण्यासाठी पंचायत निवडली जाईल. निवडणुकीऐवजी गावातील ज्येष्ठ
लोकांच्या हातात पंचायतीच्या राज्यकारभाराची सूत्रे दिली जातील. पंचायतीला कायदेविषयक, न्यायविषयक आणि कार्यकारीविषयक व्यापक अधिकार
असतील. पंचायतीच्या कारभारात हस्तक्षेप करण्याचा अधिकार शासनाला नसेल. पंचायतीला
गावाच्या विकासाच्या दृष्टीने व्यापक अधिकार दिलेले असतील. गावाचा व्यवहार
कायद्याऐवजी स्वनियंत्रणावर आधारलेला असेल. स्वयंनिर्णय पद्धतीच्या आधारावर लोक
आपले व्यवहार पाहतील. ग्रामस्वराज्य हे वैयक्तिक स्वातंत्र्याला महत्त्व देऊन काम
करणारे संपूर्ण लोकशाहीचे नवे मॉडेल आहे. या प्रतिमानाचे वैशिष्ट्य म्हणजे व्यक्ती
हेच शासन आहे. ग्रामस्वराज्य हे व्यक्तीला उत्तरदायी आहे. व्यक्तीदेखील ग्रामस्वराज्याचा
निष्ठावान पाईक असेल. या प्रकारच्या व्यवस्थेतून राज्याची गरज हळूहळू कमी करून
राज्यविरहित समाजाकडे मानवी समाजाला नेण्याचा गांधी प्रयत्न करतात. त्यासाठी
राजकीय विकेंद्रीकरणावर भर देतात. विकेंद्रीकरणाच्या माध्यमातून स्वयंनियंत्रणावर
आधारलेली प्रशासन व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.
७. आर्थिक
विकेंद्रीकरणावर भर :- गांधींनी विकेंद्रित अर्थव्यवस्थेवर भर दिलेला आहे.
केंद्रीकृत अर्थव्यवस्थेतून विषमता आणि शोषणाला वाव मिळतो. गांधींच्या मते, 'केंद्रीकरण अहिंसक समाजरचनेच्या विरुद्ध
संकल्पना आहे'. केंद्रीकरण स्वयंशासनाला महत्त्व देत नाही. अधिकारपिपासू वृत्तीचे समर्थन करतो
आणि मानवाची नैतिकता अवगुंठित करतो. गांधीवादी सर्वोदयी अर्थरचना राज्यातील विविध
संस्थांना स्वावलंबी बनविण्याचा प्रयास करते. प्रत्येक गावाने आपल्या गरजेपुरते
पर्याप्त उत्पादन केले पाहिजे. गाव हा आर्थिक कार्याचा प्रमुख घटक बनविण्यासाठी
छोटे छोटे लघुउद्योग, हस्तउद्योग आणि शेतीपयोगी उद्योग गावात सुरू केले पाहिजेत, जेणेकरून गावातील लोकांना स्थानिक पातळीवर
रोजगार उपलब्ध होईल. रोजगारासाठी स्थलांतराची गरज भासणार नाही. सर्वोदयी
विचारधारेत समाजातील आर्थिक विषमता नष्ट करण्यासाठी खाजगी संपत्ती न करण्याचा
प्रयत्न न करता तिचे सार्वजनिक संपत्तीत रूपांतर केले जाते. प्रत्येक गावाला
स्वावलंबी बनविण्यासाठी गरजहिनतेच्या तत्त्वाला महत्त्व असेल व्यक्तींना आवश्यक असलेल्या वस्तू जवळ बाळगल्या जातील. गरज नसलेल्या
वस्तूची साठवण केली जाणार नाही. अनावश्यक गरजामधून क्लेष वा संघर्ष निर्माण होतात.
व्यक्तींना मन व भावनांवर विजय मिळविण्यास शिकविले जाईल. गरजहनते महत्त्व लोकांना
पटल्यास कुणालाही काहीही कमी पडणार नाही. महात्मा गांधी समानता प्रस्थापित
करण्यासाठी राजकीय क्षेत्रासोबत आर्थिक क्षेत्रात विकेंद्रीकरणावर भर देतात.
मोठ्या उद्योगांचे उच्चाटन करून ग्रामउद्योगांवर आधारित विकेंद्रित अर्थव्यवस्था
निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.
९.शारीरिक श्रमांवर भर:- गांधी प्राचीन भारतीय वर्णव्यवस्थेला
आदर्श मानतात. परंतु वर्णव्यवस्थेने केलेल्या असमान श्रमविभागणीला मान्यता देत
नाहीत. वर्णव्यवस्थेत शारीरिक श्रमांची जबाबदारी विशिष्ट वर्णांवर टाकल्यामुळे
शारीरिक श्रमांना हीन
लेखले गेले. शारीरिक श्रम करणारे कनिष्ठ दर्जाचे लोक असतात हा आभास निर्माण झाला.
परिणामतः शारीरिक श्रमांचे महत्त्व कमी होऊन बौद्धिक श्रमांचे महत्त्व वाढले.
टालस्टॉय यांनी शारीरिक श्रम आवश्यक मानले आहेत. रस्क्रिन यांनीदेखील शारीरिक श्रम
करणारे श्रेष्ठ जीवन जगतात असे म्हटले आहे.. गीतेतदेखील मेहनत करणाऱ्याला भाकर
खाण्याचा अधिकार आहे असे म्हटले आहे. गांधींच्या मते, अन्नासाठी मानवाने श्रम केले पाहिजेत हे
ईश्वरी विधान आहे. गीतेत असे सांगितले आहे की, श्रमाशिवाय जो
अन्न खातो, तो चोरीचे अन्न खातो. गांधींनी आपल्या वैयक्तिक
जीवनातदेखील शारीरिक श्रमाला महत्त्व दिले. दररोज एक तास सुतकताई करणे, संडास साफ करणे, बागबगिच्याची साफसफाई करणे इत्यादी
कामे गांधी करत असत. श्रमाच्या माध्यमातून श्रमप्रतिष्ठेचा विचार रुजविणे हा
गांधींचा प्रयास होता. गांधी दररोज एक तास तरी शारीरिक श्रम केले पाहिजेत, यावर भर देतात. गांधींनी शारीरिक श्रमाला महत्त्व दिलेले असले, तरी बौद्धिक श्रमांकडे दुर्लक्ष केलेले नाही. ते म्हणतात की, 'शारीरिक श्रमाचे महत्त्व विशद करताना बौद्धिक श्रमाचे मूल्य कमी करत नाही.
समाजव्यवस्था चालविण्यासाठी शारीरिक श्रमांसोबत बौद्धिक श्रमांची गरज आहे. परंतु
शारीरिक श्रम हे बौद्धिक श्रमांपेक्षा श्रेष्ठ आहेत. शारीरिक श्रमाच्या माध्यमातून
अनेक फायदे होत असतात.' गांधींनी शारीरिक श्रमाला सर्वोदयी
विचारधारेत अत्यंत महत्त्वाचे स्थान दिलेले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.