सत्यशोधक समाज- आपल्या
प्रयत्नाला संघटनात्मक कार्यांची जोड देण्यासाठी त्यांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी
पुणे या ठिकाणी आपल्या अनुयायींची सभा भरविली. या सभेला महाराष्ट्रातून साठ
कार्यकर्ते हजर राहिले. या सभेत भाषण करताना फुल्यांनी आपल्या चळवळीला योग्य दिशा व मार्गदर्शन करण्यासाठी
मध्यवर्ती संस्थेची स्थापना करण्याचा मनोदय व्यक्त केला. त्यांच्या विचारांवर
सविस्तर चर्चा होऊन सर्वानुमते २४ सप्टेंबर १८७३ रोजी 'सत्यशोधक समाज संस्था' स्थापन केली. संस्थेचे पहिले अध्यक्ष व
कोषाध्यक्ष महात्मा फुले बनले. नारायणराव कडलक यांची संस्थेच्या कार्यवाहपदी निवड
करण्यात आली. सत्यशोधक समाजाचा सभासद होणाऱ्या प्रत्येक सभासदाला पुढील प्रतिज्ञा
घ्यावी लागत होती- "सर्व मानव प्राणी एकाच देवाची लेकरे आहेत. सबब ती भावंडे
आहेत, अशा बुद्धीने मी
त्यांच्याशी वागेन. परमेश्वराची पूजा, भक्ती अगर ध्यानधारणा करतेवेळी अगर धार्मिक
विधीचे वेळी मी मध्यस्थाची गरज ठेवणार नाही; दुसऱ्यांनाही तसेच वागण्याबद्दल मी उपदेश करीन.
मी माझ्या मुला-मुलींना सुशिक्षित करीन. मी नेहमी राजनिष्ठेने वागेन. परमेश्वरास व
सत्यरूपी परमेश्वरास साक्ष ठेवून मी प्रतिज्ञा करीत आहे. या प्रतिज्ञेप्रमाणे
वागण्यास मला सामर्थ्य येईल अशा प्रकारे आयुष्यक्रम गुदरण्यास योग्य प्रकारे मदत
तो मला करो.” ब्रिटिशा राजवटीशी एकनिष्ठ वागण्याची हमी शपथेद्वारे घेण्यात आली
होती. शपथ खंडेराव देवतापुढे बेलपत्र उचलून घ्यावी लागत असे.
सत्यशोधक समाज स्थापनेचा उद्देश- ब्राह्मणी धर्मातून उदयाला आलेल्या वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्थेतून होणाऱ्या शोषणावर वैचारिक हल्ला करण्याचे श्रेय फुल्यांना जाते. त्यांनी वर्णव्यवस्थेचे सैद्धांतिक स्वरूप
उघड पाडून अस्पृश्य निवारणाच्या कार्याला सुरुवात केली. भारतातील विषमताप्रधान
समाजरचना करून सामाजिक समता निर्मितीचा प्रयत्न केला. त्यांच्या
विचार व कृतीत एक वाक्यता होती. सुधारणेच्या कार्याला कृतीची जोड
देण्यासाठी इ.स. १८४८ साली मुलींची शाळा सुरू केली. इ.स. १८५२ साली नानापेठेत
महार-मांग मुलांसाठी शाळा केल्या. इ.स. १८६८ साली आपल्या घरातील पाण्याचा
हौद महार-मांगांसाठी खुला केला. सत्यशोधक
चळवळीच्या माध्यमातून बहुजनांचे प्रश्न मांडण्याचे कार्य केले. ब्राह्मण वर्गांनी
हिंदू धर्मामधील धर्मग्रंथांचा आधार घेऊन इतर वर्गांना शूद्र ठरविले. ब्राह्मणी
धर्माचा कावेबाजपणा उघडकीस आणून शूद्रांना गुलामगिरीपासून मुक्त करण्यासाठी
सत्यशोधक समाजाची स्थापना केल्याचे फुले सांगतात. महात्मा फुल्यांनी स्थापन
केलेल्या सत्यशोधक समाजाचे पुढील उद्देश सांगता येतात
१. चातुर्वर्ण्य व्यवस्था आणि या व्यवस्थेवर आधारलेल्या जातीव्यवस्थेचा नायनाट
करणे.
२. धार्मिक कर्मकांडातील मध्यस्थांचा नाश करणे.
३. एकेश्वरवादाचा प्रचार व प्रसार करणे.
४. मूर्तिपूजेला विरोध करणे.
५. अस्पृश्यांचा उद्धार करणे.
६. स्त्री-पुरुष समता निर्माण करणे.
७. सर्वांना धार्मिक क्रियाकर्म करण्याचा अधिकार मिळवून देणे.
८. धर्मातील अनिष्ट रूढी, कर्मकांड वा अयोग्य प्रथा व परंपरा नष्ट करणे.
९. स्वातंत्र्य, समता व बंधुता या तत्त्वांचा पुरस्कार करणे.
१०. सामाजिक न्यायावर आधारित समाजाधिष्ठित समाजाची स्थापना करणे. आपल्या

१०. सामाजिक न्यायावर आधारित समाजाधिष्ठित समाजाची स्थापना करणे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.