सत्यशोधक समाजाच्या उदयाची कारणे, कार्ये व तत्त्वे – सामाजिक दृष्टिकोनातून
वंचित वा उपेक्षित ठरविल्या गेलेल्या वर्गांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि
सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी फुल्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
बुद्धिप्रामाण्यवादाचा आधार घेऊन हिंदू धर्मातील अनिष्ट गोष्टींची चिकित्सा केली.
त्यांची चिकित्सा पद्धती निर्दोष स्वरूपाची नसली तरी बहुजनांच्या हक्कांची सनद
ठरली. महात्मा फुल्यांच्या मृत्यूनंतर १९११ साली सत्यशोधक समाजाने संमत केलेल्या
ठरावात तीन प्रमुख तत्त्वे नमूद केलेली आहेत
१. सर्व माणसे एकाच देवाची लेकरे आहेत व देव त्यांचा आहे.
२. आईला भेटण्यास अगर बापाला प्रसन्न करण्यासाठी ज्याप्रमाणे मध्यस्थाची जरुरी
नसते त्याप्रमाणे देवाची प्रार्थना करण्यास पुरोहित वा गुरू यांची आवश्यकत नसते.
३. वरील तत्त्व कबूल असल्यास कोणासही समाजाचे सभासद होता येते. सत्यशोधक
समाजाची तत्त्वे समाजाच्या विचारधारेशी पूरक आहेत. सत्यशोध समाज संकल्पनेत
ईश्वराऐवजी 'निर्मिक' ही संकल्पना मांडली आहे. निर्मिक हा निर्गुण व निराकार स्वरूपाचा असल्याने त्यांची मूर्ती स्वरूपात
पूजा करता येत नाही. समाज मूर्तिपूजेला मानत नाही. निर्मिक हे अनेक नसून एक आहेत.
मानव हा निर्मिकांचा पुत्र आहे. निर्मिक हा सर्वांचा असल्यामुळे त्यांची पूजा
करण्याचा अधिकार हा सर्वांना आहे. प्रत्येक व्यक्ती ही निर्मिकांची निर्मिती
असल्यामुळे त्यांची भेट घेण्यास वा पूजाविधी करण्यास मध्यस्थाची आवश्यकता नाही.
निर्मिक निर्गुण, निराकार असल्यामुळे त्यांनी कोणतेही धर्मग्रंथ निर्माण
केलेले नाहीत म्हणून सर्व धर्मग्रंथांचा कर्ता मनुष्य आहे. मनुष्याने आपल्या
सोयीनुसार धर्मग्रंथ तयार केलेले आहेत. धर्मग्रंथांचा स्वीकार विचारपूर्वक केला
पाहिजे असा आग्रह फुले धरतात. धर्मातील कल्पना पुनर्जन्म, कर्मकांड, जपजाप्य या मानवांनी आपल्या स्वार्थासाठी, इतरांची पिळवणूक करण्यासाठी निर्माण केलेल्या
आहेत. धर्माच्या आधारावर पुरोहित वर्गांकडून केल्या जाणान्या पिळवणुकीला पायबंद
बसावा. समाजातील वंचित व उपेक्षित वर्गांत हक्कांची जाणीव व्हावी या हेतूने
सत्यशोधक समाजाची तत्त्वे निश्चित करण्यात आली.
सत्यशोधक समाजाचा व्यापक प्रचार-प्रसार करण्यासाठी संघटनेचे
सभासदत्व सर्व जाती धर्मातील लोकांसाठी खुले ठेवण्यात आले. संघटनेच्या आठवडा सभा
होत असत. सभेत विविध विषयांवर विचारविनिमय केला जात असे. संघटनेच्या पुण्याबाहेरही
शाखा सुरू करण्यात आल्या होत्या. सत्यशोधक समाज हा ब्राह्मणांविरुद्ध नव्हता तर
ब्राह्मणवृत्तीच्या विरोधात होता. त्यामुळे संघटनेचे अनेक सदस्य हे ब्राह्मण होते.
सत्यशोधक चळवळ परितर्वनवादी सामाजिक चळवळ होती. चातुर्वर्ण्यावर आधारलेल्या
जन्माधिष्ठित जातीसंस्थेमुळे होणाऱ्या विषमता आणि अन्यायाच्या विरोधात संघर्षाची
प्रेरणा ही संघटना देते. सत्यशोधक चळवळीच्या वैचारिक बैठकीचा अभ्यास केल्यानंतर या चळवळीची पुढील प्रमुख तत्वे सांगता येतात.
१)
भारतीय समाज हा चातुर्वर्ण्यावर आधारित होता. या वर्णव्यवस्थेचे जातिव्यवस्थेत
आणि जातीचे पोटजातीत रूपांतर झाले. जातीव्यवस्थेत असलेल्या पदसोपान वा उतरंडीची
व्यवस्था आणि पदसोपानानुसार झालेल्या विशेषाधिकार आणि व्यवसायाच्या वाटपामुळे
समाजव्यवस्थेत श्रेष्ठ-कनिष्ट निर्माण झाला. वरिष्ठ जातींना मिळालेल्या
विशेषाधिकारामुळे त्या स्वतःल श्रेष्ठ मानू लागल्या. कनिष्ठ जातीच्या वाट्याला
आलेला हीन व्यवसाय आणि सामाजिक अधिकाराच्या अभावामुळे ते शोषणाला बळी पडले. कनिष्ठ
वर्गांच्या विकासाच्या सर्व संधी जातीव्यवस्थेमुळे हिरावल्या गेल्या. जातीचे
सभासदत्व जन्माने मिळ असल्यामुळे व्यक्तीचे अस्तित्व असेपर्यंत तिला त्याच
परिस्थितीत राहणे भाग पड असे. आंतरजातीय विवाहाला बंदीमुळे जातीव्यवस्था हजारो
वर्षांपासून आपले अस्तित्व टिकवून ठेवून राहिली. या व्यवस्थेमुळे हिंदू समाजाचे असंख्य तुकड्या
तुकड्यांमध्ये विभाजन झाले. समाजाची एकता भंग झाल्यामुळे परकीय आक्रमणाला समाज बळी
पडला. आपल्याला गुलामगिरीत दिवस काढावे लागले. भारतीय समाजाची मानसिकता निश्चित
करणारी जातीव्यवस्था नष्ट केल्याशिवाय समाजाचे कल्याण होणार नाही, या व्यापक उद्देशाने महात्मा फुले यांनी
जातिअंतासाठी संघर्षाला सुरुवात केली. जातिअंतासाठी त्यांनी अनेक ग्रंथ, पुस्तके व लेखन केले. वंचित व उपेक्षित महार
मांग जातींच्या मुलांसाठी पाण्याचा हौद खुला केला. सत्यशोधक समाजाच्या वतीने
जातिअंत घडवून आणण्यासाठी आंतरजातीय विवाह केला. सत्यशोधक चळवळ हा जातिअंताच्या
संघर्षातील पहिले पाऊल मानला जातो.
२) अस्पृश्यता निवारण-
भारतात फार प्राचीन काळापासून अस्पृश्यतेची रूढी पाळली जात होती. अस्पृश्य
वर्गांना कोणत्याही प्रकारचे सामाजिक अधिकार नव्हते. समाजातील इतर जाती व वर्गांची
सेवा करण्यासाठी त्यांचा उपयोग केला जात असे. समाजातील मुख्य प्रवाहापासून तोडून
टाकण्यासाठी अस्पृश्यांवर अनेक बंधने लादण्यात आली होती. त्यांना विद्या धारण
करण्याचा, शस्त्र धारण करण्याचा अधिकार नव्हता. गावाबाहेर वस्ती करून
राहावे लागत असे. गावात विशिष्ट वेळी प्रवेश करावा लागत असे. मंदिराच्या गाभाऱ्यात
प्रवेश नव्हता. पाणी पिण्यासाठी स्वतंत्र विहिरींची व्यवस्था होती. या समाजावर
होणाऱ्या अन्यायाचे निवारण करण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात आली होती.
सत्यशोधक समाजाने केलेल्या अस्पृश्यता निवारण कार्यामुळे डॉ. बाबासाहेब
आंबेडकरांनी त्यांना तिसऱ्या गुरूचा दर्जा दिला होता. आम्हाला माणुसकीचे धडे
ज्योतिबांनी दिले. त्यांनी सूचविलेल्या मार्गांनी आम्ही जाणार आहोत. 'Who
were the Shudras' हा ग्रंथ डॉ.
आंबेडकरांनी महात्मा फुल्यांना अर्पण केला होता. त्यांच्या कार्याबद्दल डॉ. आंबेडकर
लिहितात की, "जोतिबा फुले हे आधुनिक युगातील सर्वांत मोठे शूद्र होत. त्यांनी हिंदूतील
खालच्या वर्गांना वरिष्ठांनी लादलेल्या गुलामगिरीसंबंधी जागृत केले. परकी
साम्राज्यापासून स्वातंत्र्य मिळविण्यापेक्षा भारताला प्रथम सामाजिक लोकशाहीच
आत्यंतिक आवश्यकता आहे या फार मोठ्या तत्त्वांची शिकवण त्यांनी दिली.
आंबेडकरांच्या विधानावरून अस्पृश्यता निवारण कार्यातील फुल्यांच्या योगदाना कल्पना
येते.
३) गुणानुसार स्थाननिश्चितीचा आग्रह- भारतीय समाजव्यवस्थे जातीव्यवस्थेचे प्राबल्य होते. जातीचे
सभासदत्व जन्मावर आधारित होते. ज्या जातीत
जन्म झाला त्या जातीत आयुष्यभर राहावे लागत होते. जातीतील जन्माच्या
आधारावर व्यक्तीची योग्यता निश्चित केली जात होती. उदाहरणार्थ, ब्राह्मण जातीत जन्माला आलेल्या व्यक्तीकडे
कोणतेही गुण नसले तरी त्याला सर्व प्रकारचे सामाजिक अधिकार, प्रतिष्ठा व विशेषाधिकार प्राप्त होत असे. एखादा
बुद्धिवान व्यक्ती कनिष्ठ जातीत जन्माला आलेला असला तरी त्याला आयुष्यभर कनिष्ठ
जातीत राहावे लागत असे. व्यक्तीच्या गुणवत्तेला महत्त्व देण्याऐवजी जातीव्यवस्था 'जन्म' या घटकाला महत्त्व देत असे. त्यामुळे समाजातील
गुणवानांना काहीही महत्त्व राहिले नाही. जन्म घेणे ही गोष्ट मानवाच्या हातात
नसल्यामुळे व्यक्तीचा दोष नसताना त्याला हीन परिस्थितीत जीवन जगावे लागत असे.
जातीव्यवस्थेच्या अस्तित्वामुळे व्यक्तीचे स्थानबदल होण्याची शक्यता नव्हती.
सत्यशोधक समाजाने जातीव्यवस्थेवर प्रहार करण्यास सुरुवात केली. जातीव्यवस्था नष्ट
केल्याशिवाय व्यक्तीच्या गुणाला स्थान मिळणार नाही. गुणानुसार स्थाननिश्चितीसाठी
जातीव्यवस्था नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
४) अनिष्ट रूढींचा नायनाट- भारतीय
समाजव्यवस्थेत विविध प्रकारच्या अनिष्ट रूढी व परंपरेचे प्राबल्य होते. केशवपन, बालविवाह, जरठविवाह, विधवाविवाहावर बंदी, अस्पृश्यता, अंधश्रद्धा, कर्मकांड आणि अधार्मिकतेमुळे समाजाचे नैतिक जीवन
रसातळाला पोहचले होते. अनिष्ट प्रथांच्या माध्यमातून समाजातील स्त्री आणि शूद्र या
वर्गांचे शोषण सुरू होते. रूढी व परंपरेत गुरफटलेल्या बहुजन समाजाची प्रगती
थांबलेली होती. अनिष्ट रूढींना धर्माचे कवच उपलब्ध करून दिल्यामुळे सर्वसामान्यजन
विरोध करू शकत नव्हते. सत्यशोधक समाजाने सर्वप्रथम धर्मग्रंथातील लबाडी उघड
करण्याचा प्रयत्न केला. फुले म्हणतात की, "मूळ भटांच्या (इराणी) पूर्वजांनी या देशात मोठा
बंडावा करून येथील आमच्या मूळ क्षेत्रवासी पूर्वजास युद्धप्रसंगी जिंकल्यामुळे, त्यास आपले दास केले. पुढे जसजशी संधी सापडत
गेली तसतशी भटांनी आपल्या सत्तेच्या मदतीने अनेक तऱ्हेतऱ्हेने मतलबी ग्रंथ काढून
त्या सर्वांचा एक मजबूत कोट बांधून त्यामध्ये या सर्व दासास वंशपरंपरागत अडकवू
ठेवले तेथे त्यास नाना तऱ्हेच्या पीडा देऊन हा काळपावेतो मोठ्या मौजा करी
आहे." भारतातील अनेक रूढींमध्ये धार्मिक आधार उपलब्ध करून देण्याचा प्रय
ब्राह्मणी धर्मांनी धार्मिकग्रंथांची रचना केल्याचे फुल्यांनी सिद्ध करून दाखवि
धर्मग्रंथांमधील चलाखी समाजव्यवस्थेसमोर आणल्याशिवाय अनिष्ट रूढींचे प्राव कमी
होणार नाही हे लक्षात घेऊन त्यांनी सातत्याने अनिष्ट रूढींच्या विरोधात आ उठविला.
अनिष्ट रूढी नष्ट करण्यासाठी निव्वळ भाषण व लेखन करून ते था नाहीत तर प्रत्यक्षात
कृतीदेखील घडवून आणली. उदाहरणार्थ, केशवपनाची रूढीकरण्यासाठी पुण्यात नाभिकांचा संप
घडवून आणला होता. सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून अनेक कल्पना त्यांनी प्रत्यक्षात
उतरवल्या. त्यामुळे सत्यशोधक समाजाचे कार्य इतर सामाजिक सुधारणा करणाऱ्या
संघटनेपेक्षा जास्त उठून दिसते. बहुजन समाजातील अनिष्ट रूढी नष्ट करण्याचा प्रयत्न
केला. सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून पर्यायी धर्मसंहिता लोकांना उपलब्ध करून
दिली.
५) स्त्री-पुरुष समानता - ब्राह्मणशाहीला विरोध आणि
स्त्रीशूद्रातिशूद्राचे संघटन ही दुहेरी जबाबदारी जोतिबांनी पार पाडली. विधवांचे
केशवपन, विधवा
पुनर्विवाहाला बंदी, स्त्रियांना हीन दर्जा, स्त्री शिक्षणाला बंदी आणि त्यांच्या शारीरिक व
मानसिक शोषणाच्या विरोधात पहिला आवाज देशात फुल्यांनी उठविलेला आहे. स्त्री
प्रश्नाबद्दल ते फक्त वैचारिक मंथन वा शाब्दिक टीका, शाब्दिक सहानुभूती व्यक्त करून थांबले नाहीत तर
ठोस कृतिकार्यक्रमाची अंमलबजावणी केल्याची अनेक उदाहरणे त्यांच्या जीवनात घडलेली
दिसतात. जोतिबांनी शूद्रातिशूद्र आणि स्त्रियांच्या दुर्दशेचे 'अविद्या' हे कारण मानले. ते दूर करण्यासाठी १ जानेवारी
१८४८ मध्ये शूद्र मुलींच्या शिक्षणासाठी पुण्यामधील भिडे यांच्या वाड्यात शाळा
काढली. सनातन्यांच्या रोषामुळे शाळेला शिक्षक मिळत नसल्यामुळे स्वतःची पत्नी
सावित्रीबाईंना शिकवून शिक्षिका बनविले. १८५१ साली मुलींसाठी स्वतंत्र शाळा काढली.
लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या विधवा स्त्रियांना आत्महत्येपासून वाचविण्यासाठी 'बालहत्या प्रतिबंधक गृहा'ची स्थापना केली. अशाच अत्याचाराला बळी पडलेल्या
काशीबाई नावाच्या विधवेचा यशवंतराव नावाला मुलगा दत्तक घेतला. १८६४ मध्ये
पुण्यातील गोखले बागेच्या शेजारी शेणवी जातीत त्यांच्या प्रेरणेने पहिला
पुनर्विवाह पार पाडलेला होता. या उदाहरणांतून ते बोलके सुधारक नसून कृतिशील सुधारक
होते, त्याचा प्रत्यय
जोतिबांच्या जीवनात घडलेल्या अनेक उदाहरणांतून आल्याशिवाय राहात नाही. स्त्री
दास्यत्वाच्या कारणांचा खोलात जाऊन शोध घेऊन स्त्री शिक्षण, स्त्रियांवरील अन्यायनिवारण, स्त्रियांबद्दलच्या अनिष्ट रूढींचे निर्मूलन
इत्यादी क्षेत्रात भरीव कार्य करून इतर समाजसुधारकांपुढे आदर्श उभे केले. हिंदू
संस्कृतीचा अविभाज्य भाग म्हणून स्त्री गुलामगिरीचा विचार केला. सामाजि पर्यावरणात
व्यापक परिवर्तन आणि कुटुंबसंस्थेची अधिसत्तावादी चौकट मोडल्याशिवाय स्त्री
गुलामगिरी नष्ट होणार नाही असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यांनी बालविवाह हे
स्त्री अरिष्टांचे मूळ मानले. शिक्षणाला प्रस्थापित वर्गाकडून विरोधाची कारणे
स्पष्ट करताना सांगतात की, "स्त्रियांच जात अबला असल्यामुळे लोभी पुरुषांनी त्यास मानवी
हक्क समजू नये या इराद्यत्यांस विद्या शिकविण्यास प्रतिबंध केला. "स्त्री
शिक्षणातून स्त्री-पुरुष समानता आणि श्रीमध्ये हकाविषयी जागृती होईल या ठाम
विश्वासातून त्यांनी श्री शिक्षण आणि त्यांच्या प्रश्नांना आपल्या कार्यात
महत्त्वाचे स्थान दिलेले होते. स्त्री आणि मुद्राना गुलामगिरीतून बाहेर
काढण्यासाठी शिक्षणाला महत्त्व दिले. भारतीय समाजातील यांचे दुय्यमत्व नष्ट करून
स्त्री-पुरुष समता निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
६) धार्मिक कार्यामधील मध्यस्थाचा नाश- ब्राह्मणी धर्मामधील मुख्य वैशिष्ट्य म्हणजे परमेश्वराची पूजा करण्यासाठी 'ब्राह्मण' नावाच्या मध्यस्थाशिवाय करता येत नव्हती. या
गोष्टीचा लाभ उठवून ब्राह्मणांनी आपले महत्त्व वाढवून घेतले. धार्मिक गोष्टींचा
वापर करून बहुजनसमाजाचे मानसिक व आर्थिक शोषण केले. कायमस्वरूपी शोषण करता यावे
म्हणून बहुजन समाजाला रूढी, परंपरेच्या जाळ्यात अडकवून ठेवले. आपले वर्चस्व कायमस्वरूपी
टिकवून ठेवण्यासाठी ब्राह्मणी धर्मानी आपल्या अनुकूल स्वरूपाच्या प्रथा व परपरा
सुरू केल्या. या प्रथा व परंपरा ईश्वरनिर्मित आहेत हा कांगावा केला. परिणामतः
कोणतेही कार्य ब्राह्मणाच्या उपस्थितीशिवाय करता येणे शक्य नव्हते. धार्मिक
संस्कार करण्याचा आणि पूजाविधी करण्याचा अधिकार ब्राह्मणांनी आपल्या हातात
घेतल्यामुळे समाजाला त्यांच्या कायमस्वरूपी सांस्कृतिक गुलामगिरीत राहावे लागले.
महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून धार्मिक कार्यामधील मध्यस्थाचा
नाश करण्याचा प्रयत्न केला. देव व भक्त यात मध्यस्थांची आवश्यकता नाही यावर जोर
दिला. २५ डिसेंबर १८७३ रोजी आपल्या विधुर नातेवाइकांचा विवाह ब्राह्मणाशिवाय पार
पाडला. सत्यशोधक समाजाने निव्वळ प्रचारकी थाटाचे काम केले नाही तर सत्यशोधक
समाजातर्फे सोप्या पद्धतीने धार्मिकविधी करण्याचे प्रशिक्षण कार्यकर्त्यांना दिले.
सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते मोफत धार्मिकविधी करू लागले. फुल्यांनी धार्मिकविधी
करण्यासाठी मंत्रोच्चार रचले. सत्यशोधक समाजाच्या कार्याबद्दल 'ज्ञानोदय' मासिकात एक वाचक लिहितो की,
"ज्ञानोदय होऊ लागल्यामुळे
मतलबी ग्रंथकारांचा लोप होऊ लागला आहे. आपले हक कोणते, परस्परांशी कोणत्या नात्याने वागावे, चांगले काय वाईट काय, हे लोकांना कळू लागले आहे. असे जे काम करतात
त्यांपैकीच सत्यशोधक समाज हा होय." सत्यशोधक समाज तात्त्विक वाङ्मय निर्माण
करून थांबला नाही तर वर्चस्व निर्माण करण्याच्या पद्धतीविरुद्ध पर्यायी कार्यक्रम
देत राहिला.
७) शेतकऱ्यांची गुलामगिरीतून मुक्तता करणे - फुल्यांनी शेतकऱ्यांच आसूड' या ग्रंथात शेतकऱ्यांच्या दुःखद स्थितीचे वर्णन
करून शेतकऱ्यांचे चार श सांगितले.
अ) ब्राह्मण-
ब्राह्मण हे धर्माच्या नावाखाली शेतकऱ्यांचे शोषण करतात. ब) सावकार- यात मारवाडी, गुजर, पारशी
यांचा समावेश असून शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जाबद्दल जबरदस्त व्याज आकारून
शेतकऱ्यांचे शोषण करतात.
क) इंग्रज सरकारचे नोकर- इंग्रज सरकारचे काळे व गोरे नोकर खोटी कामे करण्यासाठी
शेतकऱ्यांकडून लाच घेतात व त्यांची लूट करतात.
ड) दलाल- दलाल हे
शेतकऱ्यांचा कच्चा माल कमी किमतीत खरेदी करून भरपूर नफा करून विकतात.
शेतकऱ्यांच्या शोषणाचे शास्त्रशुद्ध
विश्लेषण करण्याचा प्रयत्न महात्मा फुले यांनी केला. शेतकन्यांच्या पिळवणुकीचे
वास्तव नजरेस आणून दिल्याशिवाय शोषणाचा अंत होणार नाही. शेतकऱ्यांच्या विकासाच्या
आड येणाऱ्या गोष्टी नष्ट करण्यासाठी 'सत्यशोधक समाजाची स्थापना केली. ड्यूक ऑफ कनॉट पुणे भेटीवर
आलेले असताना शेतकरी वेशात हजर राहिले. त्या समारंभाप्रसंगी भाषणात बजावले की,
या कार्यक्रमातील झगमगाटावरून देशाच्या परिस्थितीबद्दल मत बनवू नये.
पाहुण्यांनी शूद्रातिशूद्रांच्या वस्त्या आणि आजूबाजूच्या खेड्यांना प्रत्यक्ष
भेटी देऊन येथील दैन्य, दारिद्र्य पाहावे आणि राणी
व्हिक्टोरियाला जाऊन सांगावे की त्यांनी आपल्या गरीब प्रजाजनाच्या शिक्षणासाठी काहीतरी
करावे. शेतकऱ्यांच्या समस्या निर्मितीचे कारण हे अज्ञान आहे. हे अज्ञान दूर
केल्याशिवाय शेतकऱ्यांच्या जीवनातील समस्यांचा नायनाट होणार नाही. शेतकऱ्यांची
गुलामगिरीतून मुक्तता करणे हे सत्यशोधक समाजाचे प्रमुख ध्येय होते.
८) शिक्षणाच्या अधिकाराचे समर्थन- भारतीय समाजव्यवस्थेतील ब्राह्मणी वर्चस्वाचा अंत करणारे साधन
म्हणून फुले शिक्षणाकडे पाहात होते. शिक्षणाच्या माध्यमातून भारतीय समाजव्यवस्थेत
मूलगामी परिवर्तन घडवून आणता येईल. शिक्षणाच्या अभावातून शूद्र वर्गाला वरिष्ठ
वर्गाची गुलामगिरी स्वीकारावी लागली. विद्येच्या मक्तेदारीच्या जोरावर वरिष्ठ वर्ग
वरचढ ठरला. कनिष्ठ वर्गाला शिक्षणाचा अधिकार नाकारून ब्राह्मणी व्यवस्थेने आपले
आसन बळकट केले. इंग्रज आल्यानंत परिस्थितीत बदल होण्यास सुरुवात झाली. त्यांनी
बहुजन वर्गातील लोकांना शाळेत प्रवेश दिला. परंतु, इंग्रजांनी
झिरपणाऱ्या शिक्षण सिद्धांताची अंमलबजावणी सु केल्यामुळे शिक्षणातून वरिष्ठ
वर्गांचे हितसंबंध जपले. इंग्रजांच्या या कृतीच्या विरोधा त्यांनी आवाज उठविला.
शूद्र आणि स्त्री शिक्षणाच्या हक्काप्रती असलेल्या आस्थेत जोतिबांनी व्हॉइसरॉय
लिटन भेटीप्रसंगी पुणे शहर सजावटीच्या निर्णयाचा निषे करताना जोतिबा म्हणाले की,
"करदात्यांचा पैसा वृत्त स्वातंत्र्याचा गळा
घोटणापाहुण्यांच्या स्वागतासाठी उधळण्यापेक्षा शहरातील गोरगरिबांच्या शिक्षणावर तो
सार्थकी लावावा. भारतात शिक्षणविषयक प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या
कमिशनला दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले की, "उच्चवर्णियांच्या शिक्षणावर खर्च करण्यामागे
सरकारची अपेक्षा होती की हे लोक खालच्या स्तरातील लोकांपर्यंत लाभ पोहचवतील परंतु
ही अपेक्षा व्यर्थ होती म्हणून त्यांनी सरकारने पददलित वर्गाच्या शिक्षणाची
जबाबदारी स्वीकारावी, त्यांना व्यवहारोपयोगी शिक्षण द्यावे, ग्रामीण भागात शिक्षण प्रसार करावा, त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीस
प्राधान्य द्यावे. हे मत व्यक्त करून जोतिबांनी वंचित वर्गाच्या शिक्षणाची
जबाबदारी घ्यावी हे प्रत्यक्षपणे सुचविले होते. यावरून वंचित वर्गाच्या
शिक्षणाप्रती त्यांची असलेली आस्था स्पष्ट होते. हंटर आयोगाने जोतिबांनी व्यक्त
केलेल्या अपेक्षांची परिपूर्ती न केल्याने टीका करताना ते म्हणाले,
"हिंदू धर्मातील आर्यांना
ब्राह्मणांखेरीज शूद्रातिशूद्र, भिल्ल, कोळी बगैरे लोकांविषयी बिलकूल ज्ञान नाही म्हणून ते तसा
वाचाळपणा करीत आहे." अशी हंटर साहेबांबर परखड टीका करण्यासही त्यांनी
मागेपुढे पाहिले नाही. जोतिबांनी फक्त हंटर साहेबांवर टीका केली नाही. उच्च
वर्गांमधील लोक शूद्रांमध्ये शिक्षणप्रसार करणार नाहीत. शूद्रांनी शिक्षण घेतल्यास
त्यांच्या हितसंबंधांना धक्का पोहचेल. सरकारने शूद्रांसाठी शाळा सुरू करून शूद्र
शिक्षकांची शाळेत भरती करावी ही सूचना केली. शिक्षणाबद्दलचा फुल्यांचा विचार पुढील
कवनातून चांगल्या पद्धतीने व्यक्त होतो.
विद्येविना मती गेली
मतीविना नीती गेली
नीतिविना गती गेली
गतीविना वित्त गेले
वित्ताविना शूद्र खचले
इतके अनर्थ एका अविद्येने केले।
जोतिबांच्या शिक्षणविषयक दृष्टिकोनाबाबत डॉ. गेल ऑम्व्हेट लिहितात की, "शिक्षण म्हणजे बहुजन समाजाच्या स्त्रियांच्या दलितांच्या
मुक्ती लढ्याचे पहिले पाऊल, शिक्षण म्हणजे समाजक्रांतीची तयारी असा त्यांचा
दृष्टिकोन होता."
९) समताधिष्ठित नव समाजाची स्थापना - समताधिष्ठित नव समा स्थापना करणे
हे महात्मा फुल्यांच्या सत्यशोधक चळवळीचे मुख्य तत्त्व होते. भारतीय समाजव्यवस्थेत अस्पृश्यता, स्त्रियांना दुय्यम स्थान, वरिष्ठ वर्गांना अस विशेषाधिकारामुळे विषमतेला
बळ मिळाले होते. 'सर्व माणसे देवाची लेकरे त्यामुळे त्यांनी आपला बंधुभाव
जोपासावा. सत्यधर्माचा संबंध मृत्यूनंतरच्या पारसार्थकी जीवनाशी नसून ऐहिक जीवनाशी
आहे. ऐहिक जीवनात व्यक्तीला आत्मिक व मानसिक समाधान मिळवून देण्यासाठी न्याय, समता, स्वातंत्र्य व बंधुता तत्त्वावर आधारलेला समाज
निर्माण करण्याची तळमळ जोतिबांची होती.' हिंदू धर्मातील मूळावर घाव घालून समतावादी
व्यवस्था निर्माण करण्याचा कार्यक्रम दिल्याशिवाय समताधिष्ठित नवसमाजाची स्थापना
करणे शक्य होणार नाही हे लक्षात घेऊन त्यांनी 'सत्यशोधक समाजाची' स्थापना केली. या समाजाच्या माध्यमातून
अस्पृश्यता निवारणाला प्राधान्य दिले. स्त्रियांचे दुय्यमत्व नष्ट करण्यासाठी
स्त्री शिक्षणासाठी प्रयत्न केले. स्त्रियांविषयीच्या अनिष्ट रूढी नष्ट करण्याचा
प्रयत्न केला. समाजातील अनिष्ट रूढी, अंधश्रद्धा व कर्मकांड नष्ट करण्याचा प्रयत्न
केला. सर्व माणसे ही देवाची लेकरे आहेत. त्यामुळे जाती, वर्ग, धर्म आणि लिंगाच्या आधारावर केला जाणारा भेदभाव
अयोग्य आहे. परमेश्वराने प्रत्येक व्यक्तीला जन्मजात काही. अधिकार बहाल केलेले
आहेत. त्यामुळे सर्वांना विकासाची समान संधी देणे आणि सर्वांना समान वागणूक मिळणे
हा हक्क आहे.
१०) सर्वसमावेशक राष्ट्रीयत्वाचा पुरस्कार - सत्यशोधक समाजाच्या
राष्ट्रीयत्वाची कल्पना सर्वांना सामावून घेणारी होती. राष्ट्रीयत्वाचा दावा
करणाऱ्या वा स्वतःला राष्ट्रीय मानणाऱ्या ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, राष्ट्रीय सभा या संस्थेवरदेखील टीका केली.
राष्ट्रीय सभेबद्दल पुढील शब्दांत मत मांडतात की, "बलिस्थानातील एकंदर शूद्रातिशूद्रासह, भिल्ल, कोळी, वगैरे सर्व लोक विद्वान होऊन विचार करण्यास लायक
होईतो ते सर्व सारखे एकमय लोक झाल्याशिवाय 'नेशन' होऊ शकत नाही असे असता एकट्या उपन्या आर्यभट्ट
ब्राह्मण लोकांनी नॅशनल काँग्रेस स्थापिली तर कतिला कोण विचारतो. या संस्था खऱ्या
अर्थाने राष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत नाही. शूद्रातिशूद्र, स्त्रिया आणि सर्वसामान्यांना या संस्थांनी जवळ
न केल्यामुळे त्या खऱ्या अर्थाने राष्ट्रीय संस्था नसल्याने समताधिष्ठित समाज
निर्मितीच्या दृष्टीने अनुपयुक्त आहेत असे परखड मत व्यक्त केले. तसेच १८८९ मध्ये
मुंबई येथे भरलेल्या पाचव्या अधिवेशनाच्य मंडप प्रवेशद्वारासमोर तीस फुटी
शेतकऱ्याचा गवती पुतळा उभा करून राष्ट्रीय सभे लक्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे आणि
त्यांना प्रतिनिधित्व द्यावे याकडे वेधले. यातून जोतिबांच्या या संस्थांप्रति
असलेल्या योग्य निरीक्षण वृत्तीचा प्रत्यय येतो. महात्मा फुले सांगतात की,
"सर्व मानवाचा निर्माणकर्ता
एक निर्मिक आहे. या निर्मिका प्रत्येक व्यक्तीस मानवी अधिकाराचा यथायोग्य उपभोगाचा
अधिकार दिलेला आहे परंतु, तसे घडून येत नसल्यामुळे पृथ्वीवरील लोकांमध्ये वैरभाव
निर्माण झालेल आहे." सत्यशोधक समाजाने पृथ्वीतलावरील सर्व मानवांच्या
अधिकारांचे समर्थन केलेले आहे. राष्ट्रीयत्व संकल्पनेत सर्व जाती, धर्म, वंश आणि लिंगांच्या लोकांचा समावेश केलेला आहे.
लिंग, वर्ग आणि जातीच्या
आधारावर राष्ट्रीयत्वाच्या कक्षेतून बाहेर ठेवणाऱ्या संस्थांचा समाचार घेतला आहे.
सत्यशोधक समाजाच्या राष्ट्रीयत्वाची संकल्पना तत्कालीन काळातील संस्थांपेक्षा फार
व्यापक स्वरूपाची होती.
अशा प्रकारे सत्यशोधक समाजाने समाजातील अनिष्ट रूढी, अंधश्रद्धा, सामाजिक गुलामगिरी व विषमता नष्ट करण्यासाठी
व्यापक प्रयत्न केलेले आढळतात. समाजातील वंचित वर्गाला शिक्षणाचा हक, समान संधी आणि दर्जा मिळवून देण्यासाठी कार्य
केलेले दिसते. त्या कार्यास अनुसरून या समाजाची ध्येये, उद्दिष्टे आणि तत्त्वे सांगितलेली आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.