• मतदान यंत्र रचना आणि
कार्यपद्धती
(EVM Electric Voting Machine)- भारतीय निवडणूक आयोगाने
मतदान करण्याच्या प्रक्रियेत क्रांतिकारी बदल घडवून आणण्यासाठी मतदान यंत्राचा
वापर सुरू केला. या वापराला कायदेशीर कवच उपलब्ध करून देण्यासाठी १९८९ मध्ये
लोकप्रतिनिधित्व कायद्यात १९५९ मध्ये बदल करण्यात आला. आयोगाने मतपत्रिका व
मतपेट्याऐवजी मतदान मंत्राचा वापर करणारी सुधारणा १५ मार्च १९८९ पासून लागू केली. भारतीय निवडणूक आयोगाने मतदान करण्याच्या
प्रक्रियेत क्रांतिकारी बदल घडवून आणण्यासाठी मतदान यंत्राचा वापर सुरू केला. या
वापराला कायदेशीर कवच उपलब्ध करून देण्यासाठी १९८९ मध्ये लोकप्रतिनिधित्व कायद्यात
१९५९ मध्ये बदल करण्यात आला. आयोगाने मतपत्रिका व मतपेट्याऐवजी मतदान मंत्राचा
वापर करणारी सुधारणा १५ मार्च १९८९ पासून लागू केली. मतदान यंत्र व मतदान
पडताळणीयोग्य कागदी परीनिरीक्षण निशाणी यंत्राची निर्मिती इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन
ऑफ इंडिया, हैद्राबाद व भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, बंगलोर या दोन सार्वनिक
क्षेत्रातील उपक्रमाद्वारे केली जात असते. सध्या मतदान यंत्राचे एम २ मॉडेल व एम ३
मॉडेल उपलब्ध आहेत. व्हीव्हीपीएटीचे देखील दोन मॉडेल आहेत. एक व्हीव्हीपीएटी
स्थितीदर्शक युनिट की, जे इव्हीएम एम २ मॉडेलसोबत वापरले जाते तर दुसरे
स्थितीदर्शक युनिट व्हीएसडीयुरहित व्हीव्हीपीएटी इव्हीएमच्या एम ३ मॉडेल सोबत
वापरले जाते. इलेक्टॉनिक
यंत्र ७.५ व्होल्टच्या बॅटरीवर चालते. बॅटरीवर चालत असल्यामुळे कुठेही आणि
कोणत्याही परिस्थितीत त्याचा वापर करता येतो. हे यंत्र दोषरहित आणि हाताळणीसाठी
सुलभ व सोपे यंत्र आहे. मतदान यंत्राचे नियंत्रण युनिट व मतदान युनिट असे दोन भाग
असतात. हे दोन्ही भाग केबलने एकमेकांशी जोडली जातात. केबलचे एक टोक मतदान यंत्राला
कायमस्वरूपी जोडलेले असते. या यंत्राची दोन्ही युनिटे स्वतंत्रपणे पेटयांमध्ये
ठेवलेली असतात. या यंत्रात नोंदविलेली माहिती बॅटरी काढून टाकली तरी टिकून राहते. मतदान युनिटवर निवडणुकीचा तपशिल, निवडणूक लढविणार्या उमेदवारांचे अनुक्रमांक, त्यांची नांवे व छायाचित्रे
व त्यांचे अनुक्रमे त्यांना देण्यात आलेल्या निवडणूक चिन्हे आदिचा समावेश असलेली
मतपत्रिका असते. प्रत्येक उमेदवाराच्या नावासमोर एक निळे बटन असते. हे बटन दाबून
मतदान आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मत देऊ शकतो. निळा बटनाच्या बाजूला एक दिवा
असतो. जेव्हा निवडणुकीत मतदान यंत्राचा मतदार मत नोंदवितो तेव्हा हा दिवा तांबडा
प्रकाश दर्शविते. उमेदवाराचा अनुक्रमांक, नाव आणि स्थानिक स्वराज्य व तत्संबंधीत चिन्हे याचा समावेश
असणाऱ्या कागदी चिठ्ठीवर मतदाराची निवड व्हीव्हीपीएटी मुद्रीत करते, आणि ते ७ सेकंदाकरिता
पारदर्शक वापर (दर्शनी) खिडकीवर दिसते त्यानंतर 'बीप' असा आवाज येतो. मतदाराने
कितीही वेळा बटन दाबले एकच मत नोंदविले जाते हे मतदान यंत्राचे निर्मिती
वैशिष्ट्ये आहे.
• मतदान यंत्राची रचना-
एका मतदान युनिटमध्ये सोळा उमेदवारांच्या नावांचा
समावेश होता. त्यात पंधरा उमेदवार आणि वरीलपैकी कोणीही नाही (NOTA None of the
above) याचा
समावेश असतो. एम २ इव्हीएमला कमाल चार मतदान युनिट जोडता येऊ शकतात. नियंत्रण
युनिट एम २ इव्हीएममध्ये नोटासहित६४ उमेदवाराचा समावेश करता येतो. एम ३ इव्हीएमध्ये
चौबीस मतदान युनिटे जोडता येऊ शकतात. एम इव्हीएममध्ये नोटासहित ३८४ उमेदवाराचे
मतदान नोंदवू शकतो. मतदान युनिट हे नियंत्रण युनिटला जोडलेली असतात. नियंत्रण
युनिटच्या वरील भागात यंत्रात नोंद झालेल्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची
संख्या, मतदान झालेल्या मतांची संख्या प्रत्येक
उमेदवाराला मिळालेली मते इत्यादी सारखी विविध माहिती व आकडेवारी दर्शविण्याची
तरतूद असते. नियंत्रण युनिटच्या या
भागाला दर्शनी विभाग असे म्हणतात. दर्शनी भागाच्या खालच्या बाजूला यंत्र
चालविण्यासाठी आवश्यक बॅटरी बसविण्याची जागा असते. या विभागाच्या उजव्या बाजूला
विशिष्ट निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या देण्यासाठी मांडण्यात आलेला बटण
असलेला आणखी एक भाग असतो. या बटणाला 'कॅन्डसेट' बटण म्हणतात आणि या दोन विभागांसह संपूर्ण नियंत्रण विभागास
कॅन्डसेट सेक्शन म्हणतात. कॅन्डसेट संक्शनच्या खालच्या बाजूस नियंत्रण
युनिटचा 'निकाल विभाग वा रिझल्ट सेक्शन' असतो. या विभागात डाव्या बाजूला मतदान बंद
करण्याचे 'बंद' बटन मध्यभागी दोन बटणे 'निकाल' व 'मुद्रण' असते. निकालाच्या निश्चितीसाठी 'निकाल' बटण आहे. तपशीलवार निकालाच्या मुद्रणासाठी 'मुद्रण' हे बटन असते. मतदान यंत्रात आवश्यक नसलेली वा
आधीची माहिती पुसून टाकण्यासाठी 'क्लिअर' बटण आहे. नियंत्रण युनिटच्या तळ भागात दोन बटणे
असतात. एक म्हणजे 'बॅलेट' आणि दुसरा म्हणजे 'टोटल' होय. बॅलेट बटण दाबल्यावर मतदान युनिटमध्ये मत
नोंदविण्यासाठी तयार होते तर टोटल बटणाच्या आधारे मतदान यंत्रात नोंदविलेल्या
मतांची संख्या जाणून घेता येते.
• मतदान यंत्राचे महत्त्व व
वैशिष्टये-
• मतदान यंत्राच्या वापरामुळे
निवडणूक प्रक्रियेत व्यापक बदल झालेले आहेत. ते बदल पुढीलप्रमाणे होत.
• १. मतदार यंत्राच्या
वापरामुळे मतदान करणे अत्यंत सोपे बनलेले आहे.मतदाराला उमेदवाराच्या नावापुढील बटन
दाबणे आवश्यक असते. निरक्षर व्यक्ती देखील सहजपणे मतदान करू शकते.
• २. मतदानाआधी आणि
मतदानानंतर उमेदवाराच्या प्रतिनिधिसमोर मशिन सील बंद केले जात असल्यामुळे तो
छेडछाड करणे शक्य होत नाही.
• ३. 'क्लिअर बटन दाबून यंत्रात आधी उपलब्ध असलेली माहिती नष्ट
करता येते.
• ४. मतदान यंत्र हे बॅटरीवर
चालत असल्यामुळे सर्व ठिकाणी आणि सर्व वेळी त्यांचा वापर करता येऊ शकतो.
• ५. मतदान यंत्राच्या
वापरामुळे मत बाद होण्याची समस्या संपलेली आहे. मतदाराने कितीही वेळा वा कितीही
बटने दाबली तरी एकच मत नोंदविले जाते.
• ६. यंत्राच्या वापरामुळे
एकाच वेळेस लोकसभा आणि विधानसभा निवडणुका घेणे सहज शक्य होते.
• ७. मतदान यंत्रामुळे
मतदानाची टक्केवारी लगेच काढता येते.
• ८. मतदान यंत्रामुळे
आयोगाला नोटाचा पर्याय उपलब्ध करून देता आला.
• ९. मतदान यंत्रामुळे मतमोजणी
अत्यंत कमी वेळात व अचूकपणे करतायेते.
• १०. मतदान यंत्रामुळे मतदान
प्रक्रियेतील वादविवाद आणि मतमोजणी प्रक्रियेतील वादविवादाचे लवकरात लवकर निवारण
करणे सहज शक्य होते.
• ११. मतदान यंत्राचा वापर
सुरू झाल्यामुळे मतपत्रिका तयार करणे आणि मतपेटयाची निर्मिती करण्यासाठी होणारा
खर्च वाचला. मतपत्रिका तयार करण्यासाठी मोठया प्रमाणावर झाडे तोडावी लागत
असल्यामुळे ही यंत्रे पर्यावरणाला पूरक ठरली आहेत.
• अशा प्रकारे मतदान
यंत्राच्या वापर हा निवडणूक सुधारणेतील एक क्रांतिकारी पाऊल मानले जाते. या
यंत्राच्या वापरामुळे निवडणूक प्रक्रिया व मतदान प्रक्रिया सुटसुटीत व सोपी
होण्यास मदत झालेली आहे. या प्रक्रियेवर पर्यवेक्षण व नियंत्रण ठेवणे देखील सोपे
बनलेले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.