https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

धर्म आणि राजकारण परस्पर संबंध Relation of Religion and Politics


 

धर्म आणि राजकारण परस्पर संबंध-

भारतीय राज्यघटनेत धर्मनिरक्षेप तत्त्वाचा समावेश करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे धार्मिक उन्मादाची तीव्रता कमी करणे, धर्माधर्मातील द्वेष वा तणाव कमी करणे आणि धार्मिक भावनांचा पगडा कमी करून देश विकासाला चालना देणे हा होता. परंतु स्वातंत्र्योत्तर काळात धर्म घटकाचा पगडा कमी होण्याऐवजी वाढताना दिसून येत आहे. राजकारणात सर्वच पक्ष कमी अधिक प्रमाणात धार्मिक भावनांना खतपाणी घालण्याचे काम करत आहेत. भारतातील काही पक्ष तर उघड उघड धार्मिकतेच्या आधारावर निर्माण झालेले आहे. उदा. हिंदू महासभा, मुस्लीम लीग निवडणुकीच्या राजकारणात धार्मिक गटाना कुरवाळण्याचा वा एकमेकाविरुद्ध भडकाविण्याचा उदयोग करताना काही राजकीय पक्ष आढळतात. भारतात धर्मावर आधारित राजकीय वा गैर संघटनांचे मोठ्या प्रमाणावर अस्तित्व आढळून येते. उदा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू सभा, बजरंग दल, जमाते इस्लामी, सीमी, मजलिसे मशावरत किवा जमायते उलेमा या संघटना धार्मिकतेच्या आधारावर लोकांच्या भावना भडकाविण्याचे काम करतात. त्यामुळे विशेषतः हिंदू मुस्लीम आणि हिंदू-ख्रिश्चनांमध्ये धार्मिक दगली होतात. राजकीय पक्ष तत्कालीन राजकीय फायद्यासाठी धार्मिक मूलतत्त्ववाद्यांशी युती करतात वा पाठिंबा देतात. उदा. इंदिरा गांधींनी सुरूवातीला भिंद्रानवाल्यांना केलेली छुपी मदत, केरळमधील काँग्रेसची मुस्लीम लीगशी युती. भाजप आणि पीडीपी यांच्यातील काश्मीरमधील युती धार्मिक मूलतत्त्ववाद्यांना खूष करण्यासाठी न्यायालयीन निर्णय देखील बदलण्याचा प्रयत्न करतात. उदा. शहाबानो खटल्यातील निकाल रद्द करण्यासाठी राजीव गांधी यांनी घटना दुरूस्ती केल्याचे उदाहरण आहे. धर्माध लोकांना खूष करण्यासाठी राजकीय निर्णय घेतले जातात. उदा. राजीव गांधींच्या काळात अयोध्येतील राममंदिराचे दरवाजे उघडण्याची राजीव गांधींची कृती. राजकीय पक्षांनी सुरू केलेल्या धर्मांधतेच्या राजकारणामुळे धर्मनिरपेक्ष तत्त्वाच्या अंमलबजावणीत अनेक अडथळे येऊ लागलेले आहेत. धर्मनिरपेक्ष तत्त्वाच्या मार्गात पुढील काही अडवळे असल्याचे सांगता येते.

१. मूलतत्त्ववादी - मूलतत्त्ववादी खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्षतेच्या मार्गातील प्रमुख अडचण मानली जाते. मूलतत्त्ववादी कोणत्याही धर्म वा पंथाचे असले तरी धर्मनिरपेक्षतेचे कट्टर विरोधक असतात. ते धार्मिक तत्त्वांचा टोकाचा अर्थ घेतात. धर्मातील कोणत्याही बदलाला मान्यता देत नाही. धर्मातील जुनी तत्त्वे समाज व राज्यव्यवस्थेने अंगीकारावी यासाठी सातत्याने निर्णय केंद्रावर दडपण आणत असतात. उदा. भारतातील मुस्लीम मूलतत्त्ववादी शरीयतच्या नियमाने न्यायदान करावे वा कायदे करावेत हा आग्रह धरतात. मूलतत्त्ववादी प्रतिगामी व स्थितीवादी धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आग्रह धरत असतात. त्यामुळे मूलतत्त्ववाद धर्मनिरपेक्षतेच्या मार्गातील प्रमुख अडथळा मानला जातो.

२. धार्मिक व जातीय संघटना- भारतातील धर्मांधता वाढविण्यास धार्मिक व जातीय संघटना कारणीभूत मानल्या जातात. बहुसंख्याकांच्या संघटना अल्पसंख्याकांविषयी द्वेष व बदल्याची भावना रुजविण्याचा प्रयत्न करतात तर अल्पसंख्याकांच्या संघटना बहुसंख्याकांविषयी द्वेष पविण्याचा प्रयत्न करतात. धार्मिक संघटनांमुळे अल्पसंख्याक व बहुसंख्याक यांच्यात तणाव व परस्पर विश्वासाचे वातावरण निर्माण झालेले आहे. धार्मिक गटातील असहिष्णू आणि अविश्वासाच्या वातावरणामुळे लहानसहान कारणांवरून जातीय दंगली उद्भवतात. जातीय दंगलीमुळे जाळपोळ, लूटमार, बलात्कार, खून असे प्रकार घडून येतात. त्यामुळे समाज जीवनात अस्थिरतेचे वातावरण निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मतेच्या मार्गात अडथळे निर्माण होतात.

३. अल्पसंख्याक समाजात भीतीचे वातावरण- धार्मिक अल्पसंख्याकामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्यामुळे हे घटक राष्ट्रीय प्रवाहात सामील होत नाही. बहुसंख्य समाजापुढे आपला निभाव लागणार नाही या अनामिक भयामुळे स्वधर्म समूहाची एकजूट करण्यातच आपली सुरक्षा आहे हा विचार प्रबल झाल्यामुळे अल्पसंख्याक समाज इतर समाजाशी एकरूप होताना दिसत नाही. राष्ट्रीय प्रवाहापासून अलग फेकल्या गेल्यामुळे अल्पसंख्याक आपल्याच कोशात बाबालाना दिसलाई परिणामत: त्या समूहाच्या विकासाचे अनेक प्रश्न निर्माण झालेले दिसतात.

४. बहुसंख्याकांची नाराजी- राज्यकर्ता वर्ग हा नेहमीच अल्पसंख्याकांचा अनुनय करती ही बहुसंख्याकांची नेहमीची तक्रार आहे.अल्पसंख्याकाचे संरक्षण व विकासासाठी   घेतलेले निर्णय बहुसंख्यांकाना अल्पसंख्यांकांचा अनुनय आणि तुष्टीकरण धोरणाचा एक भाग वाटतो. अल्पसंख्यांकांचे करत असलेल्या फाजील लाडामुळे आपली अधोगती होत आहे असे बहुसख्याकांना वाटत असल्यामुळे ते राज्यकर्त्यांच्या धोरणाविरुद्ध नाराजी प्रदर्शित करतात. बहुसख्याकाच्या मनातील अल्पसंख्याकाविषयीच्या भावनेमुळे  धर्मनिरपेक्षतेच्या अमलबजावणीत समस्या निर्माण होतात.

५. धार्मिक दंगली- भारतात सातत्याने छोट्या मोठ्या कारणावरून विविध धर्मीयामध्ये तणाव निर्माण होतात. या तणावाचे रूपांतर धार्मिक दंगलीमध्ये होताना अनेकदा दिसते. भारतात विशेषत: हिंदू-मुस्लीम समाजामध्ये अनेक दंगली झाल्याची उदाहरणे आहेत. जातीय दंगलीमुळे मोठ्या प्रमाणावर वित्तहानी व जीवितहानी होत असते. दंगलीचे निवारण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय शक्ती खर्च करावी लागते. धार्मिक दंगलीमुळे विकासाच्या प्रश्नावरून सरकारचे शक्ती व लक्ष दुसरीकडे वेधले जाते. जातीय दंगलीमध्ये अनेक निरपराध लोक मारले जातात. अनेक लोकाना विस्थापितासारखे छावण्यामध्ये आयुष्य काढावे लागते. दंगली धर्माधर्मामध्ये तणाव निर्माण करणाऱ्या आणि धर्मनिरपेक्षता तत्त्वाला हानिकारक मानल्या जातात. उदा. रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद प्रश्नावरून भारतातील अनेक भागात दंगलीचे लोण पसरले होते.

६. राजकारणात धर्माचा वापर- धर्म व राजकारणाची फारकत धर्मनिरपेक्ष तत्त्वात अभिप्रेत आहे. परंतु भारतातील बहुसंख्य राजकीय पक्ष राजकारणात सत्ताप्राप्तीसाठी धर्माचा वापर करतात निवडणूक प्रचारात धार्मिक घोषणा करतात. उदा. इस्लाम खतरे में है, गर्वसे कहो हम हिंदू है, या घोषणा त्याच्या निर्देशक मानल्या जातात. निवडणूक जाहीरनाम्यात धार्मिक कार्यक्रम वा घोषणांचा समावेश, धर्मगुरू व धर्मपीठाचे आशीर्वाद घेणे, महापूजा व धार्मिक कार्यक्रमांना राजकीय नेत्याची उपस्थिती, धार्मिक स्थळाच्या विकासासाठी शासकीय निधीतून मदत, विधानसभेत धार्मिक प्रवचने आयोजित करणे (हरियाना विधानसभेत धार्मिक संत तरुणसागर यांचे प्रवचन), राजकीय पदाधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानात धार्मिक गुरूचा दरबार भरविणे, (अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना शासकीय निवासस्थानात सत्य साईबाबाचा दरबार भरवविणे.) राजकीय पक्ष सत्ता मिळविण्यासाठी वा टिकविण्यासाठी धार्मिक प्रश्नाचा आधार घेतात. धार्मिक प्रश्नाचे राजकीय भांडवल करून सत्ता मिळविण्याचा प्रयत्न करतात. राजकारणातील धर्माच्या वापरामुळे खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्षतेसाठी योग्य वा पूरक वातावरण निर्माण करणे अनेकदा अयशस्वी होते.

७. समान नागरी कायद्याचा अभाव- भारतासारख्या बहुधार्मिक देशात धर्मनिरपेक्षतेच्या अंमलबजावणीसाठी समान नागरी कायद्याची नितांत आवश्यकता होती. घटनेत देखील समान नागरी कायद्याचा मार्गदर्शक तत्त्वात (कलम ४४) समावेश केलेला आहे. न्यायालयांनी देखील अनेकदा समान नागरी कायदा लागू करावा अशी इच्छा जाहीर केली. परंतु भारतात आजपर्यंत समान नागरी कायदा लागू झालेला नाही. कारण भारतात धर्माच्या आधारावर कायदे निर्माण केलेले आहे. उदा. हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन व इतर धर्मीयासाठी स्वतंत्र व खास कायदे, विवाह, वारसा हक्क, घटस्फोट इत्यादीसाठी केलेले आहेत. धार्मिकतेच्या आधारावर केलेल्या कायद्यामुळे काही धर्मियांना विशेष -अधिकार व सवलती बहाल केलेल्या आहेत. उदा. मुस्लिमांना मुस्लीम वैयक्तिक कायद्यानुसार चार विवाह करण्याचा अधिकार या सवलती व सोयीमुळे इतर धर्मीय त्यांचा हेवा करतात किंवा या जवलती अल्पसंख्याकाचे फाजील लाड वा तुष्टीकरणाचा एक भाग आहे असे बहुसंख्याकांना वाटते. नार्मिक गटाकडून अल्पसंख्याकांचा दर्जा मिळावा म्हणून होणारे प्रयत्न, धार्मिकतेच्या आधारावर दल्या जाणाऱ्या सोयी व सवलतींमुळे देखील धार्मिक गटांमध्ये निर्माण झालेल्या संशयाच्या वातावरणामुळे देखील धर्मनिरपेक्षतेच्या मार्गामध्ये अडथळे निर्माण होतात.

८. दहशतवादी घटना- भारतामध्ये होणाऱ्या दहशतवादी घटनांमुळे देखील धर्मनिरपेक्षतेच्या गति अडथळे निर्माण होत असतात. दहशतवादी घटनांमध्ये सातत्याने एकाच धर्मातील लोकाचा भाग दिसून आल्यामुळे इतर धर्मीय लोकांमध्ये त्या समुदायातील लोकाबद्दल संशयाचे वातावरण निर्माण झालेले आहे. उदा. भारतातील बॉम्बस्फोट व इतर हिंसाचाराच्या घटना मुस्लीम समुदायातील मोठ्या प्रमाणावर सहभाग तसेच दहशतवादी घटना घडल्यानंतर सुरक्षा यंत्रणा मोठ्या प्रमाणावर निरपराध लोकांची धरपकड करते आणि कोणताही पुरावा नसताना अनेक दिवस कारागृहात डवून ठेवते या छोट्या चकमकी घडवून आणून त्यांना मारण्याचा प्रयत्न करते. उदा. दहशतवादी कारवाईतील सहभागावरून अनेक मुस्लीम तरुणांना केलेली अटक वा चकमकीत मारले गेलेले तरुण दहशतीच्या वातावरणात मूलतत्त्ववाद आणि अतिरेकी राष्ट्रवादाच्या वातावरणाची लागण होत असते. त्यामुळे अशा तणावपूर्ण वातावरणात धर्मनिरपेक्षता राबविणे हे एक आव्हानात्मक काम ठरते.

भारतात बहुसंख्य राजकीय पक्ष धार्मिक व जातीय भावनांच्या आधारावर मतपेट्या निर्माण ताप्राप्तीचा प्रयत्न करतात. राष्ट्रहितापेक्षा धर्माला जास्त महत्व देतात, जनता देखील धार्मिक रांना लवकर बळी पडते. सर्वच राजकीय पक्ष धर्मनिरपेक्षतेचे आम्ही पुरस्कर्ते आहोत असा करतात. मात्र प्रत्यक्ष राजकारणात पतेचा वापर करतात. राजकारणातील धर्मापतेच्या वापरातून धार्मिक विवाद निर्माण होतात आणि या विवादाचे रूपांतर पुढे धार्मिक दंगलीमध्ये होत असते. धार्मिक तणाव आणि दंगली हे भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेला फार मोठे आव्हान मानले जाते. धर्मवाद्यांमुळे धर्मनिरपेक्षता तत्व आणि राष्ट्रीय एकात्मतेला निर्माण होणारे अडळे दूर करण्यासाठी काही उपाय सुचविले जातात.

१.            धर्मनिरपेक्ष तत्वांची सर्वच राजकीय पक्षांनी प्रामाणिकपणे अंमलबजावणी केली पाहिजे. धर्मनिरपेक्ष विचारांचा जनतेत जास्तीत जास्त प्रचार व प्रसार केला पाहिजे कारण जनतेच्या मनात तिचे बीजारोपण झाल्यास राजकीय पक्षांच्या धार्मिक आव्हानांना ते बळी पडणार नाहीत.

२.             धार्मिक व जातीय आधारावर राजकारण  करणाऱ्या राजकीय पक्ष व उमेदवारांवर बंदी लादली पाहिजे.

३.            धार्मिक मूलतत्ववादाचा प्रचार व प्रसार करणाऱ्या संघटनांवर बंदी लादली पाहिजे,

४.             निवडणुकीत केल्या जाणाऱ्या धार्मिक आधारावरील प्रचारावर देखील बंदी लादली पाहिजे.

५.            धार्मिक प्रतिष्ठानांना व धार्मिक कार्यासाठी शासनाकडून दिले जाणारे अनुदान बंद केले पाहिजे.

६.             धार्मिक कार्यक्रम, महापूजा, इत्यादी सार्वजनिक कार्यक्रमात सत्ताधारी व राजकीय  पदाधिकाऱ्यांनी सहभागी होऊ नये.

७.             धार्मिकतेच्या आधारावर राबविल्या जाणाऱ्या योजना व कार्यक्रम त्वरित बंद केले जावेत

८.            धर्माच्या आधारावर कोणत्याही प्रकारच्या सवलती दिल्या जाऊ नयेत.

९.            समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करावी, जेणेकरून धर्माच्या आधारावर असलेले विविध कायदे रद्द होतील.

१०.        आर्थिक विकासासाठी शासनाने व्यापक प्रयत्न केल्यास दारिद्रय व अज्ञानाचे प्रमाण कमी होईल आणि त्यामुळे धर्माचा प्रभाव देखील कमी होईल.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.