https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

सर्वोदय अर्थ, व्याख्या पार्श्वभूमी, धारणा वा गृहीतके Sarvodaya Meaning, Historical Background and Principles


 सर्वोदय अर्थ, व्याख्या   पार्श्वभूमी, धारणा वा गृहीतके:

सर्वोदय अर्थ आणि पार्श्वभूमी :- सर्वोदय गांधीवादी दर्शनाचे मर्म आहे. सर्वोदय हा शब्द सर्व + उदय = सर्वोदय असा बनलेला आहे. सर्वोदय शब्दाचा अर्थ 'सर्वांचा उदय वा समाजातील प्रत्येक व्यक्तीचा सर्वांगीण विकास होय'. सर्वोदय संकल्पनेत समाजातील सर्व घटकांच्या विकासाचा विचार संम्मिलित आहे. जगातील सर्व विचारधारांपेक्षा सर्वोदय विचारधारा ही व्यापक स्वरूपाची आहे. सर्वोदय विचारांना आधुनिक संदर्भ प्राप्त करून देण्यासाठी गांधी सांगतात की, सर्वोदय शब्दाचा सारांशमध्येअर्थ असा आहे की, सर्व जीवनातील क्षेत्राच्या प्राप्तींना एकसाथ सुनिश्चित करणे होय. मानवी जीवनातील सर्व क्षेत्रांत मानवी प्रगतीची घोडदौड सारख्या पद्धतींनी झाली पाहिजे आणि त्या सर्व मानवांना विकासाची एकसारखी संधी मिळाली पाहिजे, अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करणे हा सर्वोदयाचा उद्देश आहे. जॉन रस्किनच्या 'Un to the last' ग्रंथाच्या प्रभावातून गांधींनी सर्वोदयाची कल्पना मांडलेली आहे. या पुस्तकात येशू ख्रिस्त प्रवचन संपल्यानंतर प्रसाद देताना आपल्या अनुयायांना म्हणतो की, हा शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचवा. रस्किन या आध्यात्मिक ॐ प्रसंगाचा अर्थ सामाजिक संदर्भात लावतो. मानवी जीवनातील प्रगतीपासून कोणती व्यक्ती वंचित राहता कामा नये. गांधींनी रस्किनच्या पुस्तकाचे गुजराती भाषांतर केले. या पुस्तकाच्या शीर्षकाचे शब्दश: भाषांतर 'अंत्योदय' असे होते. परंतु गांधींनी शब्दशः अर्ध न स्वीकारता सर्वोदय' हा नवा विचार वा शब्द प्रस्तुत केला. या नवविचारांच्या माध्यमातून गांधी एका अद्भुत राजकीय संकल्पनेची मांडणी करून आधुनिक भारताच्या उभारणीसाठी नावीन्यपूर्ण तत्त्वदर्शन करत होते.

सर्वोदयाची रूपरेखा विशद करताना गांधी म्हणतात की, सर्वोदयाचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांनी आपली मने साफ केली पाहिजेत. जातीपातीचा भेदभाव नष्ट करून सर्वांना बरोबरीचे स्थान दिले पाहिजे. मानसिक आणि शारीरिक श्रमांत फरक करता कामा नये. स्वदेशीचे व्रतपालन केले पाहिजे. नशिले पदार्थ आणि वासनेपासून दूर राहणे गरजेचे आहे. सर्वोदयाची सिद्धी अहिंसेवर आधारलेली आहे. सर्वोदयाची रूपरेखा मांडताना गांधींनी अप्रत्यक्षपणे सर्वोदयाच्या कार्यक्रमाची मांडणी केलेली आहे. गांधींनी आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात सर्वोदय विचारधारेची मांडणी केली. गांधीमार्गावर निष्ठा असणाऱ्या विनोबा भावे, जयriप्रकाश नारायण, भारतन कुमारप्पा, नारायणभाई देसाई, दादा धर्माधिकारी, काका कालेलकर इत्यादींनी सर्वोदयाचा प्रचार व प्रसार करण्याचे व्रत अंगीकारले. विनोबा भावे यांनी १९४८ मध्ये सर्वोदय तत्त्व प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वोदयी समाजाची स्थापना केली. फेब्रुवारी १९४८ मध्ये गांधीमार्गांवर निष्ठा असणाऱ्या सर्वोदयी कार्यकर्त्यांची वर्धा येथे एक आर्थिक परिषद भरविण्याचे निश्चित केले होते. परंतु गांधीहत्येमुळे ही परिषद होऊ शकली नाही. २२ व २३ डिसेंबर १९४८ ला काका कालेलकरांच्या अध्यक्षतेखाली एक परिषद झाली. त्यात गांधीजींच्या आधुनिक भारताविषयीचे स्वप्न साकार करण्यासाठी एक योजना तयार करण्यात आली. या योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी विनोबा भावेकडे सोपविण्यात आली. जयप्रकाश नारायणसारखा सक्रिय समाजवादी नेता सर्वोदयी चळवळीकडे आकर्षित झाला आणि त्यांनी चळवळीत भाग घेण्यासाठी राजकारणाचा त्याग केला. सर्वोदय म्हणजे नेमके काय हे स्पष्ट करण्यासाठी सर्वोदयाच्या व्याख्या काही अभ्यासकांनी केलेल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे होत.

१. महात्मा गांधी:- सर्वोदय म्हणजे अहिंसात्मक मार्गाने समाजपरिवर्तन घडवून आणणारी आणि सर्वांच्या विकासाला वाव देणाऱ्या व्यवस्थानिर्मितीसाठी केली जाणारी चळवळ होय,

२. विनोबा भावे:- सर्वोदय म्हणजे काही लोकांचा उदय नव्हे, अधिक लोकांचा उदयदेखील नव्हे, बहुसंख्य लोकांचा उदयदेखील नव्हे, तर लहान-मोठा, दुर्बल सबल, श्रेष्ठ-कनिष्ठ इत्यादी सर्वांचा उदय वा विकास होय.

३. दादा धर्माधिकारी :- सर्वोदय म्हणजे सर्वांचे जीवन साथ-साथ संपन्न होणे. एकसाथ समान स्वरूपात सर्वाच्या विकासाला वाव देणारी अहिंसात्मक क्रांतिकारी चळवळ म्हणजे सर्वोदय होय.

४. भारतन कुमारप्पा : सर्वोदय म्हणजे गांधींजीच्या दृष्टिकोनातील आदर्श समाजव्यवस्था होय. प्रेम हा या समाजव्यवस्थेचा पाया आहे.

 ५. शंकरराव देव:- अहिंसा आणि सत्यावर आधारित वर्गहीन आणि जातिविहीन : समुदाय की ज्यात कोणत्याही प्रकारचे शोषण अस्तित्वात नसेल आणि प्रत्येक व्यक्तीला आपला विकास करण्याची संधी आणि साधने प्राप्त होतील. अशा समाजाची स्थापना करणे हे सर्वोदयाचे ध्येय आहे.

सर्वोदय संकल्पनेच्या उपरोक्त व्याख्यांचा अभ्यास केल्यास असे दिसून येते की, ही विचारधारा मनुष्याच्या विकास आणि उदय संकल्पनेवर आधारलेली आहे. मानवी विकासाची फळे सर्वांना चाखण्यास मिळावी यावर तो भर देते. मानवी हिताची पूर्ती करताना कोणत्याही प्रकारच्या हिंसा, द्वेष, स्पर्धेला मान्यता देत नाही. मानवाच्या आंतरआत्म्यास जागृत करून वा हृदयपरिवर्तनाच्या मार्गाने समाजपरिवर्तन घडवून आणण्याची भाषा करते. त्यासाठी सर्वोदयाच्या गाभ्यात अनेक आध्यात्मिक कार्यक्रमांचा समावेश केलेला आहे. सर्वोदय म्हणजे मानवाच्या चांगुलपणावर विश्वास व्यक्त करतो. मानवाच्या वैयक्तिक आणि सामुदायिक जीवनात विशिष्ट प्रकारचे आचरण आणि दृष्टिकोनाची निर्मिती करून मानवी कल्याणाचे नवे मार्ग खुले करण्याचा प्रयत्न करतो.

सर्वोदयाच्या धारणा वा गृहीतके:-

 गांधींची सर्वोदय संकल्पना जॉन रस्किन यांनी लिहिलेल्या 'Un to the last' ग्रंथातील तीन प्रमुख तत्त्वांवर आधारलेली आहे. रस्किन यांनी आपल्या ग्रंथात खालील तीन तत्त्वांची मांडणी केलेली आहे.

१. समाजहितात व्यक्तिहित सामावलेले असते.

२. समाजातील सर्व कामे महत्त्वपूर्ण, आवश्यक आणि गरजेची असतात. म्हणून सर्व कामांचे मूल्य समाज असणे आवश्यक असते.

३. श्रमप्रधान जीवन म्हणजे सुखी जीवन होय.

जॉन रस्किन यांनी मांडलेल्या तीन तत्त्वांतील  पहिले तत्व समाजकल्याण वा समाजहितायला महत्व देणारे आहे, तर दुसरे तत्व समतेला महत्व देते आणि तिसरे श्रमप्रतिष्ठेला महत्व देणारे आहे. गांधींनी यांनी सांगितल्या सर्वोदयाची तीन गृहीतक विशद करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

 

१.सर्वाच्या कल्याणात आपले कल्याण अंतर्भूत आहे. याचा अर्थव् आणि सामुदायिक हितात कोणत्याही प्रकारचे अंतर नसते. मानव सर्वांच्या हिताया विचार करेल, तेव्हा आपोआप त्याचे निदेखील साधले जा सामुदायिक चेतना व्यक्तीला सामूहिक हिताविषयी संवेदनशील बनवेल व्यक्तीला वैयक्तिक स्वार्थाचा त्याग करून सामुदायिक कल्याणासाठी तयार करणे हा याच प्रमुख आधार आहे.

2 समाजातील सर्व कामांचे मूल्य समान आहे. समाजातील सर्व कामे महत्त्वपूर्ण आहेत. विभिन्न कार्यामध्ये श्रेष्ठ-कनिष्ठ हा भेद पाळला जाणार नाही. बौद्धिक आणि शारीरिक कामाना समान महत्त्व दिले जाईल. वकील आणि न्हाव्याच्या कामाचे मूल्य समान असेल. समान मूल्यात्मक व्यवस्थेच्या माध्यमातून समाजातील सर्व वर्गांना समान प्रतिष्ठा आणि संधी उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. कार्याच्या आधारावर केला जाणारा भेदभाव, शोषण आणि समानता नष्ट करण्यासाठी सर्वोदय हा क्रांतिकारी मार्ग सुचवितात.

 ३. श्रमप्रधान जीवन म्हणजे खरे जीवन होय. श्रमाच्या आधारावर समाजात होणारा भेदभाव नष्ट करणे, श्रमाप्रति समाजात आदर निर्माण करणे, बौद्धिक श्रम आणि शारीरिक श्रम यांतील तफावत दूर करणे आणि समाजव्यवस्थेत श्रमप्रतिष्ठेला महत्त्व मिळवून देणे, हा गांधींच्या तिसऱ्या तत्त्वाचा प्रमुख उद्देश आहे...

 सर्वोदयाच्या तीन तात्त्विक धारणांवर जॉन रस्किनच्या तत्त्वांचा स्पष्ट प्रभाव आहे. मात्र गांधीनी भारतीय परिस्थितीचा विचार करून त्यात आवश्यक बदल केलेले आहेत. सर्वोदय संकल्पनेत सामाजिक, राजकीय, नैतिक, आर्थिक आणि सांस्कृतिक इत्यादी बहुविध आयामांचा समावेश आहे. गांधींना सर्वोदयी तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून भारतात अहिंसात्मक क्रांती घडवून आणावयाची होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.