शेतकरी संघटना उदय, विकास, आणि उद्दिष्टे
महाराष्ट्राच्या इतिहास शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महात्मा फुले
यांच्यापासून ते ऐशींच्या दशकापर्यंत अनेक लोकांनी वैचारिक मंथन केलेले आहे. परंतु, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर स्वतंत्र संघटनेची निर्मिती करून
लढा उभारण्याचा प्रयत्न कोणीही केलेला नाही. महाराष्ट्रात हा प्रयत्न सर्वप्रथम
शरद जोशी यांनी केलेला आहे. पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरात कांद्याचे विक्रमी
उत्पादन झाले. त्यामुळे कांद्याचे भाव पडले. स्थानिक शेतकऱ्यांनी आंदोलन
केल्यामुळे सरकारने कांद्याचा भाव वाढवून दिला. शेतकरी संघटित झाला तर शासनावर
दडपण आणून योग्य भाव मिळविता येईल हे शेतकऱ्यांच्या लक्षात आले. या आंदोलनातून
शेतकरी संघटना निर्माण करण्याची कल्पना पुढे आली. शरद जोशी यांनी पुणे जिल्ह्यातील
चाकण येथे ९ ऑगस्ट १९७९ मध्ये शेतकरी संघटनेची स्थापना केली. शेतकन्यांच्या
प्रश्नावर लढाऊ चळवळ उभी करण्याचे श्रेय शरद जोशी यांना आहे. शेतकरी संघटनेच्या
प्रत्यक्ष कार्याला १९८० मध्ये सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळात संघटनेला
मर्यादित शेतकन्यांचा पाठिंबा होता. संघटनेने सुरु केलेल्या आंदोलनात
महाराष्ट्रातील विविध भागातील शेतकरी सहभागी होऊ लागले. कांदा आणि ऊस आंदोलनाच्या
काळात संघटनेचा प्रचार व प्रसार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात झाला. अल्पकाळात
शेतकरी संघटना वाऱ्यासारखी महाराष्ट्रभर पसरली. संघटनेने सुरू केलेल्या चळवळीत
शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होऊ लागले. शेतकरी संघटित होणार नाही या पारंपरिक
समजुतीला धक्का देण्याचे काम संघटनेने केले. चळवळीमुळे शेतकरी नुसता संघटित झाला
नाही तर ताठमानेने संघर्ष करण्यासाठी उभा ठाकला. रस्त्यावर उतरून प्रस्थापित
व्यवस्थेविरुद्ध लढा देऊ लागला. पोलीस व तुरूंगाची भीती नष्ट झाली. 'शेतकऱ्याचा उद्गाता' बनून शरद जोशी यांनी चळवळीची पुरा आपल्या हाती घेतली. शेती
प्रश्नावर तात्त्विक व वैचारिक चिंतन करून शेतकरी आंदोलनाची वैचारिक चौकट व ताकद
पुरविण्याचे कार्य केले. संघटनेचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन चळवळींची शक्ती कमी
करण्यासाठी संघटनेत फूट पाडण्याचा सत्ताधाऱ्यांनी केला. विरोधकांनी चळवळींच्या
शक्तीचा वापर करून आपला प्रभाव वाढविता येईल या हेतूने चळवळीला पाठिंबा दिला.
संघटनेचा पाठिंबा प्रयत्न मिळविण्याचा प्रयत्न केला. शेतमालाला उत्पादन खर्चावर
आधारित रास्त भाव मिळाल्याशिवाय शेती व्यवसायाचा विकास होणार नाही. शेतमालाला
रास्त भाव देण्याची उपाययोजना करणे आवश्यक आहे अन्यथा शासनाकडून केल्या जाणाऱ्या
उपाययोजना या मलमपट्ट्या ठरतील. प्रा. अरविंद वामन कुलकर्णी हे ‘साप्ताहिक माणूस' मध्ये शरद जोशी यांच्या कार्याचा अभ्यास करून सांगतात की, “शेतकरी कर्जमुक्ती, शेतमालाला रास्त भाव आणि शेतकरी आत्महत्या यावर आर्थिक
नुकसान भरपाई हा उपाय नाही. 'आम्हाला भीक नको, घामाचे दाम हवे' असे सांगून कर्जबाजारीपणाला अनुदानाचा उपाय संघटनेला मान्य
नव्हता. भारतात हरित क्रांती होऊनही शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाचा गाडा रुतला
होता. हरित क्रांतीतून वाढलेल्या उत्पादनाचा लाभ शेतकऱ्यांऐवजी दलाल आणि व्यापाऱ्यांना
होत होता. वाढत्या शेती उत्पादनाला योग्य भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांची मेहनत
मातीमोल होत होती. शेतमालाला योग्य भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये वैफल्याची भावना
वाढत होती नेमक्या याच काळात शरद जोशी यांनी शेतकरी संघटनेची स्थापना केली.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा सखोल अभ्यास करून सैद्धांतिक मांडणी केली. शेती
अर्थशास्त्रातील बारकावे शेतकऱ्यांच्या लक्षात आणून दिले. त्यामुळे संघटनेने सुरू
केलेल्या आंदोलनाला उदंड पाठिंबा मिळू लागला.
शेतकरी चळवळीची उद्दिष्टे-
'शेतकरी संघटना विचार आणि
कार्यपद्धती' या शेतकऱ्यांच्या गीता मानल्या जाणाऱ्या पुस्तकात शेतकरी
चळवळींची उद्दिष्टे विशद केलेली आहेत. ती पुढीलप्रमाणे सांगता येतात
१) गरिबी निर्मूलन- शेतकरी संघटनांचा हेतू निव्वळ शेतकऱ्यांना लाभ मिळवून देणे नव्हे तर देशातील गरिबीचे निर्मूलन करणे हा
प्रमुख उद्देश आहे. शेती वर अवलंबून असलेल्या सर्व घटकांचा विकास झाल्याशिवाय देशातील
गरिबी दूर होणार नाही. शेतकऱ्यांसोबत शेतमजुरांच्या
उन्नतीचा विचार संघटनेत सामील आहे.
२) शेतीमालाच्या भावाबाबत शास्त्रशुद्ध भूमिका - 'उत्पादन खर्चानुसार रास्त भाव' हे
संघटनेचे प्रमुख घोषवाक्य आहे. शेतमालाच्या भावाबाबत कोणत्याही अर्थशास्त्रज्ञांनी
शास्त्रशुद्ध भूमिका मांडली नाही. संघटनेच्या माध्यमातून शेतमालाच्या भावाबाबतच
शास्त्रशुद्ध भूमिका शासन आणि समाजाला पटवून देण्याच्या भूमिकेतून संघटनेचा जन्म
झालेला आहे.
३) उत्पादन खर्चावर आधारित किंमत-'तूट असेल तर लूट आणि मुबलकता असेल तर लिलाव' हे शासनाचे अन्यायकारक धोरण
बदलण्यासाठी संघटनेने उत्पादन खर्चावर आधारित किमतीचे सूत्र निश्चित केले पाहिजे. जेणेकरून शेतकऱ्यांचा खर्च भरून निघेल हा उद्देश आहे. शेतीतील
उत्पादित मालाला योग्य भाव मिळत नसल्याकारणाने ही चळवळ उदयाला आली.
४) शेतकऱ्यांमध्ये आत्मभान निर्माण करणे- शेतकरी संघटनेच्या स्थापनेचा उद्देश भौतिक नाही. आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगला भाव मिळवून देणे इतका मर्यादित उद्देश नसून शेतकऱ्यांमध्ये आत्मभान निर्माण करणे हा संघटनेचा प्रमुख उद्देश आहे. शेतकऱ्यांमध्ये आत्मभान निर्माण झाल्यास ते स्वाभिमानाने जीवन जगू शकतील.
५) शेती अर्थशास्त्राची नव्याने मांडणी करणे- शेतमालाला
उत्पादन खर्चावर आधारित भाव हा एककलमी कार्यक्रम नाही. शेतकरी चळवळ व विचार हे एका वर्गाच्या प्रासंगिक स्वार्थाचे
तत्त्वज्ञान नसून शेती व्यवसाय हा उपभोग्य वस्तूचा गुणाकार करणारा एकमेव व्यवसाय
आहे. उपभोग्य वस्तूंचा गुणाकार फक्त शेतीतच होऊ शकतो हे अर्थशास्त्रीय तत्त्व
जनतेला पटवून देणे. शेती अर्थशास्त्राची नवी मांडणी करून शेतकऱ्यांच्या शोषणाचे
खरे स्वरूप उघड करणे हा चळवळीचा प्रमुख उद्देश होता.
६) शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करणे- अज्ञान, दारिद्र्य आणि निरक्षरतेने गांजलेल्या
शेतकऱ्यांमध्ये आपल्या हक्कांबद्दल जागृती घडवून आणण्यासाठी संघटना जन्माला आली
आहे. 'आम्हाला भीक नको, घामाचे
दाम हवे' ही संघटनेची मागणी शासनाकडून मदतीची अपेक्षा
करत नाही तर शासनाने शेतकऱ्यांचे देणे त्यांना द्यावे हा आग्रह धरते.
शेतकन्यांमध्ये जागृती आल्याशिवाय आपल्या हक्कांसाठी संघर्ष करण्याची वृत्ती
निर्माण होणार नाही म्हणून संघटनेने शेतकऱ्यांमध्ये जागृती घडवून आणण्याचा प्रयत्न
केला.
७) शेतमालाला हमी भाव- अपेक्षित उत्पादन करूनही शेतकरी दारिद्र्यात खितपत चालला आहे याचे प्रमुख कारण म्हणजे शेतमालाला नसलेला भाव आहे. शासनाने उत्पादन खर्चानुसार शेतमालाला हमी भाव जाहीर करावा. शेतमालाला हमी मिळाल्यास शेतकरी ताठमानेने जगेल त्याला शासनाच्या आधाराची गरज भासणार नाही. शेतमालाला हमी भाव मिळवून देण्यासाठी खुल्या बाजाराचे तत्व शासनाने मान्य करावे.
८) राजकारण व पक्षनिरपेक्ष चळवळ- शेतकरी चळवळ ही राजकारण आणि राजकीय पक्षापासून अलिप्त राहून काम करेल.
सक्रिय राजकारणात सहभागी होणार नाही. विशिष्ट राजकीय पक्षाला पाठिंबा देणार नाही.
राजकारणाचे जोडे बाहेर काढून या किंवा मी राजकारणात भाग घेतला तर जोड्याने मारा.' असे शरद जोशी नेहमी म्हणत असत. राजकारणामुळे चळवळीचे मुख्य ध्येय बाजूला
पडेल म्हणून संघटनेचे कार्य राजकारणविरहित असेल असा आग्रह शरद जोशी यांनी
सुरुवातीच्या काळात धरलेला होता. परंतु, शरद जोशी यांनी
नंतरच्या काळात आपली भूमिका बदलली. स्वतः राजकारणात भाग घेतला. 'स्वतंत्र भारत' नावाचा पक्षदेखील काढला होता.
९) शेतमजुरांची पिळवणूक थांबविणे- शेतमालाला योग्य भाव मिळाल्यास शेतकरी शेतमजुरांची मजुरी वाढवून देतील.
त्यामुळे ग्रामीण भागातील गरिबी दूर होण्यास हातभार लागेल. शेतमजुरांना आपल्या
मेहनतीचे योग्य फळ मिळेल. त्यांची पिळवणूक होणार नाही.
वरील उद्दिष्ट्यांसोबत संपूर्ण कर्जमाफी आणि शेती मालावरील निर्यात बंदी
उठविणे ही संघटनेने नवी उद्दिष्टे सामील केलेली आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.