https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

संशोधना समोरील, अडचणी, आव्हाने आणि समस्या


संशोधना समोरील, अडचणी, आव्हाने आणि समस्या

संशोधन करणे अत्यंत अवघड बाब असते. संशोधन पद्धती संशोधनाला दिशा देण्याचे काम करत असते. सामाजिकशास्त्रात संशोधन करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अनेक नैतिक पेच निर्माण होऊ शकतात. संशोधनातील अडचणीचे योग्य पद्धतीने निराकरण केले नाही तर संशोधन अर्धवट सोडून दयावे लागते. संशोधनात येणाऱ्या समस्या योग्य पद्धतीने जाणून घेणे आवश्यक असते. संशोधनाची पहिली पायरी म्हणजे समस्या ओळखणे मानले जाते. संशोधन करताना पुढील समस्या वा अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

. प्रशिक्षणाची कमतरता- संशोधनाच्या पद्धतीमध्ये सर्वात मोठी अडचण म्हणजे शास्त्रीय प्रशिक्षणाची कमतरता मानली जाते. सामाजिकशास्त्रामध्ये सक्षम संशोधकांची कमतरता आहे. सक्षम संशोधकांचा अभाव असल्यामुळे दुय्यम संशोधकावर अवलंबून राहावे लागते. संशोधन पद्धतीचे योग्य ज्ञान नसल्यामुळे अनेकदा संशोधन हा अंधारात चाललेला प्रवास असतो. या प्रवासाद्वारे निघालेले निष्कर्ष वास्तविकतेचे दर्शन घडवित नाही. संशोधकाने सर्वप्रथम संशोधन पद्धतीचा पद्धतीशीरपणे अभ्यास केला पाहिजे जेणेकरून भविष्यात संशोधनातून निर्माण होणान्या समस्येला योग्य पद्धतीने तोड देता येईल.

 . माहिती संकलन- संशोधनातील मुख्य अडचण म्हणजे संशोधनासाठी आवश्यक माहितीची उपलब्धता मानली जाते. संशोधनासाठी जमा केलेल्या माहितीचा दुरूपयोग होऊ शकतो. या भयाने माहिती पुरवठादार सत्य माहिती पुरवित नाही. असत्य दिशाभूल करणारी माहिती देतो. सरकारी कार्यालये, स्वयंसेवी संस्था आणि प्रतिष्ठानाकडून संशोधनासाठी आवश्यक माहिती वेळेवर उपलब्ध करून दिली जात नाही. विविध नियम कायदयाचा आधार घेऊन माहिती नाकारण्याचा प्रयत्न केला जातो. संशोधनासाठी आवश्यक माहिती उपलब्ध होऊ शकत नसल्यामुळे संशोधन कार्यासाठी जास्त वेळ खर्च होता.

3. दुय्यम माहितीची अनुउपलब्धता- संशोधनासाठी आवश्यक दुय्यम माहिती उपलब्ध होत नसल्यामुळे देखील संशोधन स्थापित करावे लागते. सरकारी आणि इतर संस्थाकडून सांख्यिकीय माहिती अहवाल लवकर प्रसिद्ध केले जात नाही.. संस्थेच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेली माहिती देखील जुनी अपूरी असते. त्यामुळे अनेकदा संशोधकाला जुनी अपुऱ्या माहितीचा आधार घ्यावा लागतो. म्हणून दुय्यम माहिती ताबडतोब वेळेवर उपलब्ध झाल्यास संशोधनाला चालना मिळू शकते

. ग्रंथालय व्यवस्थापनाचा अभाव-संशोधनासाठीचे ग्रंथालयाचे सहाय्यत आवश्यक असते. परंतु अनेक खाजगी सरकारी संस्थातील ग्रंथालयाचे कामकाज आणि व्यवस्थापन समाधानकारक नसते. ग्रंथालय पद्धतीनुसार पुस्तके लावलेली नसतत. ग्रंथालयात पुस्तके, मासिके, वर्तमानपत्र विखुरलेली असतात. या परिस्थितीत पुस्तके प्रबंध, मासिकाचा शोध घेण्यात संशोधकाया फार वेळ जातो. त्यामुळे संशोधनाला विलंब होता. ग्रंथालय कामकाज व्यवस्थापन संगणिकृत असल्यास संशोधनासाठी आवश्यक माहिती लवकर उपलब्ध होते.

. तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव- आधुनिक काळात संशोधनावर तंत्रज्ञानाचा प्रभाव फार वाढला आहे. संशोधन अधिकाधिक उत्तम करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा लागतो. परंतु अनेकदा संशोधकाला तंत्रज्ञानाचा परिचय नसल्यामुळे ह्या सर्व सेवा पैसे खर्च करून वापराव्या लागतात. त्यामुळे संशोधनाचा खर्च वाढतो.

. वाड:मयचौर्य (Plagiarism) वाड:मयचौर्य आधुनिक संशोधनातील गंभीर समस्या बनलेली आहे. वाड:मयचौर्य म्हणजे दुसऱ्याचे संशोधन या कल्पनेची चोरी या नक्कल करून आपल्या संशोधन प्रबंध या प्रकाशित सहयष्टकरणे वाहमयचोयत पुस्तके, इंटरनेट, ओडिया विडिओ, ग्राफ, आराखडे, -साहित्य इत्यादीत उपलब्ध असलेली माहितीची नक्कलाचा संशोधन साहित्यात समावेश करणे. वाङ्मपचौर्य समावेश गंभीर स्वरूपाच्या नैतिक गुन्हात होता.

. प्रतिसादाचा अभाव- संशोधनात प्रतिसादकाची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असते. परंतु प्रश्नावली अनुसूची, निरीक्षण, मुलाखत इत्यादतंत्राचा वापर करून संशोधन करताना प्रतिसादकाची भूमिका निर्णायक मानली जाते. परंतु अनेकदा प्रतिसादक चुकांची दिशाभूल करणारी माहिती पुरवितो. संशोधकाला प्रतिसाद देत नाही. उदा. वेळेवर प्रश्नावली भरून पाचुकीचा अपूर्ण प्रश्नावली पाठविणे, निरोक्षण सुरू असताना मुद्दाम कृत्रिम वर्तन करणे योग्य प्रतिसादाच्या अभावी उत्साह कमी होतो.

. प्रायोगिक अध्ययन करता येत नाही.- सामाजिकशास्याच्या संशोधन पद्धतीचे नेमको अडचण म्हणजे प्रायोगिक पद्धतीने अध्ययन करता येत नाही. वैज्ञानिक संशोधन करताना प्रत्योगिक पद्धतीचा वापर केला जातो. त्यामुळे विज्ञानात होणारे संशोधन हे अचूक विश्वसनीय स्वरूपाचे होते. परंतु सामाजिकशास्त्रामध्ये मानव सारख्या सजीव प्राण्याच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो. मानवी वर्तनाचे प्रयोगाद्वारे मोजमाप करता येत नाही. मानवी वर्तन अत्यंत चंचल स्वरूपाचे असते. प्रायोगिक परिस्थितीत मानवावर प्रयोग करावयाचा प्रयत्न केला तरी बाह्य या अंतर्गत घटकाचा प्रभाव व्यक्ती वर्तनावर पडतो. सामाजिकशास्त्रामध्ये प्रायोगिक अध्ययनाचा वापर मोठया प्रमाणावर करता येत नसल्यामुळे अनेकदा नैसर्गिकशास्त्राच्या संशोधनासारखा मानसन्मान दर्जा सामाजिकशास्त्रांना प्राप्त होत नाही.

. वेळ आणि पैसा- संशोधन करणे हे सोपे काम नाही. संशोधनासाठी अत्यंत चिकाटी आणि मेहनतीची आवश्यकता असते. संशोधन हे दीर्घकाळ चालणारे काम असते. संशोधनासाठी वेळ आणि पैसा दोन्हीची आवश्यकता असते. परंतु अनेकदा संशोधकाची इच्छा असूनही वेळ पैसाच्या अभावी संशोधन करता येत नाही. संशोधन अत्यंत खर्चिक बनल्यामुळे अनेकदा अपुरे देखील राहते. संशोधनावर प्रचंड वेळ पैसा खर्च होतो. परंतु त्या मानाने पैसा संशोधकांना मिळत नाही. अनेकदा संशोधकाचे संशोधन व्यावसायिक लोक अत्यंत कमी किमतीत विकत घेतात. आर्थिक प्राप्तो चांगली होत नसल्यामुळे अनेकदा लोक संशोधनाकडे वळत नाही.

१०. प्रोत्साहनाचा अभाव- संशोधन हे अत्यंत खर्चिक  बाब असते. संशोधनाकडून शासन, स्वयंसेवी संस्था आणि औद्योगिक प्रतिष्ठानकडून आर्थिक मदत मिळणे आवश्यक असते. परंतु भारतासारख्या देशात सरकारद्वारे संशोधनावर केल्या जाणाऱ्या खर्चाचे प्रमाण फारच कमी आहे. संशोधनासाठी सरकारकडून जास्त शिष्यवृत्त्या मिळत नाही. खाजगी क्षेत्र देखील संशोधनाला फारशी व्यापक प्रमाणात मदत मिळत नाही. आर्थिक मदतीच्या अभावामुळे अनेक संशोधन प्रकल्प खडलेले दिसतात. आर्थिक विवंचनेमुळे अनेक संशोधकांना आपले संशोधन अर्धवट सोडावे लागते.

एका वाक्यात अपेक्षित प्रश्नोत्तरे

. संशोधनासाठी मानवी मनातील कोणतो प्रवृत्ती कारणीभूत असते.

उत्तर- विज्ञासा वा कुतूहल ही मानवी मनातील प्रवृत्ती संशोधनाला चालना देते.

. संशोधन म्हणजे काय?

उत्तर- संशोधन शब्दाला इंग्रजी भाषेत Research असे म्हणतात. Research म्हणजे पुन्हा पुन्हा शोध घेणे या तपासणी करणे होय. Research हा शब्द Re आणि Search या दोन संशापासून बनलेला आहे. त्याचा अर्थ परीक्षण करणे, चाचणी करणे, प्रयत्न करणे आणि कसून तपासणी करणे हा होता.

. संशोधनाची एक व्याख्या लिहा.

उत्तर- जे. बेस्टच्या मते.- संशोधन म्हणजे वैज्ञानिक पद्धती प्रत्यक्ष कार्यान्वित करण्याची सुव्यवस्थित नियमबद्ध अभ्यासण्याची प्रक्रिया होय.

 . स्लेसिनर स्टीफेन्सन यांनी संशोधन प्रक्रियेचे कोणते तीन पैलू सांगितलेले आहेत.

उत्तर- . सामान्यीकरणाच्या हेतूने संकल्पना प्रतीके यांची जाणीवपूर्वक हाताळणी . प्रस्थापित ज्ञानाच्या कक्षा रुदाविणे. ज्ञानात सुधारणा ज्ञान प्रमाणीकरण करणे. . प्रमाणित ज्ञानाचा सिद्धांत निर्मितीसाठी व्यवहारात उपयोग करणे हे तीन पैलू सांगितले आहेत.

. संशोधनाचे दोन उद्देश लिहा.

उत्तर- ज्ञानाप्राप्ती करणे. मूलभूत नियमांचा शोध घेणे, शास्त्रीय संकल्पनांची निर्मिती करणे हे संशोधनाचे उद्देश आहेत.

. संशोधनाचे महत्त्व कोणत्या दोन कारणामुळे वाढले आहे.

उत्तर- नियोजनास सहाय्यक, ज्ञानविस्तार, सिद्धांत निर्मिती, व्यावहारिक उपयोग इत्यादी कारणामुळे संशोधनाचे महत्त्व वाढत चाललेले आहे.

. संशोधन पद्धतीची दोन सांगा.

उत्तर- राजकीय घटनांचा अभ्यास कार्यकारणसंबंधाचा शोध, ज्ञानाचा विस्तार, व्यावहारिकतेला उत्तेजन आदि संशोधनाची वैशिष्ट्ये आहेत.

 . संशोधन पद्धतीच्या दोन समस्या लिहा.

उत्तर प्रशिक्षणाची कमतरता, माहिती संकलन, प्रतिसादाचा अभाव, वेळ आणि पैसा इत्यादी संशोधनाच्या मार्गातील अडचणी सांगता येतात.

. वाड:मयचौर्य म्हणजे काय?

 उत्तर- वाड:मयचौर्य म्हणजे दुसन्याचे संशोधन या कल्पनेची चोरी या नक्कल करून आपल्या संशोधन प्रबंध वा प्रकाशित साहित्यात समाविष्ट करणे. वाड:मयचौर्यात पुस्तके, इंटरनेट, ओडिया व्हिडिओ, , आराखडे, -साहित्य इत्यादीत उपलब्ध असलेली माहितीची नक्कलाचा संशोधन साहित्यात समावेश करणे.

१०. सामाजिकशास्त्रातील प्रायोगिक अध्ययनाच्या मर्यादा कोणत्या आहेत.

उत्तर- मानवी वर्तनाचे प्रयोगाद्वारे मोजमाप करता येत नाही. मानवी वर्तन अत्यंत चंचल स्वरूपाचे असते. प्रायोगिक परिस्थितीत मानवावर प्रयोग करावयाचा प्रयत्न केला तरी बाह्य या अंतर्गत घटकाचा प्रभाव व्यक्तो  वर्तनावर पडतो. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.